uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
757
Підписники
-224 години
-17 днів
-1030 день
Архів дописів
मला असं वाटतं की एकच आकडेवारी तुम्हाला देतो यूपीए सरकार होतं यूपीए सरकारच्या २००४ ते २०१४ दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राला एकूण २ लाख कोटी रुपये मिळाले १० वर्षात दोन लाख कोटी रुपये आणि मोदीजींच्या दहा वर्षात मी १२ वर्ष म्हणतच नाही दहा १० वर्षाचे दहा वर्ष कंपेअर करतो मोदीजींच्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राला १२ लाख कोटी रुपये मिळाले आता हा फायदा नाही तर काय?

मुळामध्ये वित्त विभागाच हे कामच आहे की जे ठरलंय ते तुम्ही करा म्हणणं आता ज्यावेळी एसटीला मदत करायचं आपण ठरवलं त्यावेळी काही गोष्टी एसटीने देखील करायच्या होत्या त्यांनी काही सुधारणा करायच्या होत्या ती जबाबदारी एसटी च आणि एसटी च्या कर्मचाऱ्यांची आहे त्या जर सुधारणा झाल्या नाहीत तर दरवर्षी किंवा दर महिन्याला तोटा वाढत जातो आणि मग सरकारवर अधिक भर येतो त्यामुळे त्या गोष्टी वित्त विभाग पॉईंट आउट करतो याचा अर्थ वित्त विभाग पैसे देत नाही असं नाहीये आवश्यकता पडली आणि जे ठरलाय तेवढे पैसे हे वित्त विभाग वारंवार दर महिन्याला एसटीला देतोय.

देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात उत्तर महाराष्ट्राच्या संपूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे

आपण आता हे काम सुरू केलय विशेषतः आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या डाळी आहेत त्याच्या संदर्भात खूप मोठी कमतरता आपल्याला ते इम्पोर्ट कराव्या लागतात आणि म्हणून आपण रिप्लेसमेंट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये डाळी असतील काही भागांमध्ये मका असेल मक्यापासून आपण इथेनॉल तयार करतोय त्यामुळे इथेनॉल करता मका असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी बदल जे आहेत हे कापूस आणि सोयाबीन या दोनच्या अवतीभवती फिरणारं जे आपलं चक्र आहे हे थोडं डायव्हर्सिफाय कसं करता येईल हा प्रयत्न आपण करतोय पण त्याला निश्चितपणे वेळ लागेल

साहेब तुम्ही ज्या पद्धतीचे काम करता आहात आज इन्फ्रामॅन म्हणून या संपूर्ण देशामध्ये तुमची प्रतिमा होते

सरकारच्या ॲडव्हायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल म्हणून आतापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलाय तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडन येणाऱ्या ॲडव्हायझरीकडे लक्ष द्यावं आणि जशा जशा पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये आमचं जो काही कृषी विद्यापीठ आहेत आणि राज्य सरकारची कृषी विभागाची यंत्रणा आहे ही यंत्रणा ज्या ॲडव्हायझरी देते आहे त्यानुसारच आणि आम्ही एसएमएस हि पाठवतो आहोत आणि महाविस्तार ॲप वर देखील आम्ही सगळी माहिती देतो आहोत त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी प्रेरणा कराव्यात अशी विनंती आहे

पहिला जो प्रश्न आहे मी मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टीम तयार केली त्यामुळे विक्रमी गुंतवणूक विदेशी थेट गुंतवणूक भारतामध्ये झाली आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झालाय कारण आलेल्या गुंतवणुकीच्या ४० टक्के गुंतवणूक त्या महाराष्ट्राने केली आहे आणि महाराष्ट्र सातत्याने नंबर वनच आहे आपण २०१५ पासून २०१९ पर्यंत नंबर वन होतो २१२ मध्ये आपण तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेलो पण पुन्हा २३ पासून आपण नंबर वन आहोत याही वर्षी आपणच नंबर वन आहोत त्यामुळे त्याचा निश्चित फायदा झालाय

मोदीजींच सरकार आल्यावर मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून एमएसपी स्वामीनाथन रिपोर्ट प्रमाणे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्या त्यावरही काही लोकांनी विरोध केल्यानंतर स्वतः स्वामीनाथन यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून हे स्पष्ट केलं की माझा रिपोर्ट हा दहा वर्ष पेंडिंग होता तो मोदींनी लागू केलाय आणि तो नीट लागू झालेला आहे त्यामुळे एमएसपी च्या संदर्भात सर्वाधिक बोल्ड निर्णय मोदीजींनी केले खरेदीच्या संदर्भातही आपण जर आकडेवारी बघितली यूपीएच्या दहा वर्षा वर्षात त्यांनी जेवढी खरेदी केली तेवढी खरेदी एकेका वर्षामध्ये काही कमोडिटीज मध्ये ही मोदीजींच्या सरकारने केलेली आहे

जीएसटी आता 22 लाख कोटीवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे यूपीआयचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12 हजार पटीने वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले चायना सहित सगळ्या देशांना मागे टाकलेला आहे डिजिटल व्यवहारांमध्ये आणि विशेषता आम्ही तयार केलेला यूपीआय हा आता जगातले 30 देश वापरतायत

पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना' अशा पद्धतीने जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही, पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा, आम्हाला नुकसान नाही

*Program begins* 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE| माजी खासदार स्व. अण्णासाहेब चुडामण पाटीलजी यांच्या 'अजिंक्य' या जीवनचरित्राचे प्रकाशन | मुंबई https://www.youtube.com/live/chbMMbpBR7g?si=8u7nCRPk7jOp9_Nc

पहिली गोष्ट अशी आहे की २१ नाही २५ कोटी लोक गरिबी रेषेतन बाहेर आलेत. गरिबी रेषेतन बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्या तशी परिस्थिती नाहीये. आता ते एक डिसेंट अशा प्रकारचे जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते या परिस्थितीत कायम होत नाही कारण असं यापूर्वी आपण बघितलेल आहे की काही लोक गरिबीतन बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात. त्यामुळे त्यांना किमान दोन वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा या दृष्टीने पाच वर्षा करता ती योजना चालूच ठेवण्यात आलेली आहे

हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांच्या मेलेल्या बैलाचा त्यांना कंपेन्सशन दिलं आणि एक बैल देखील दिला आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा.

ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की १२ वर्ष बेदाग अशा पद्धतीच सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलाय

मा. मोदीजींच्या नेतृत्वातील सुशासनाचा नवा अध्याय डिजिटल क्रांती आणि थेट लाभ

आणि म्हणून जसं मी सांगितलं की केवळ लॉन्गेस्ट सर्विंग नाही तर फायनेस्ट सर्विंग केवळ लॉन्गेस्ट सर्विंग नाही तर ज्यांनी देशामध्ये 360 डिग्रीचा बदल करून दाखवला 360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत अनंत शुभेच्छा देतो

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचा अनावरण असेल इंदू मिल इथलं स्मारक असेल नवी मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल मेट्रो तीन सहित वेगवेगळ्या राज्य शहरांमधल्या मेट्रो असतील अटल सेतू कोस्टल रोड मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे ३० वर्ष महाराष्ट्र देशात नंबर वन राहील अशा पद्धतीच वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या दहा बंदरातल बंदर असणार आहे १० लाख लोकांना रोजगार देणारे आणि महाराष्ट्राची आणि अर्थ भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे

२.६ लाख स्टार्टअप्स आणि १२० यूनिकॉर्न देशात तयार झालेत आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीने या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडोर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशांमध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून सतराशे कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत

जनधन ते जनकल्याण, उज्ज्वला ते आयुष्मान सर्वसमावेशक विकासाची यशोगाथा...

विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94 टक्के कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे