es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
742
Suscriptores
Sin datos24 horas
-27 días
-1330 días
Archivo de publicaciones
पुढची अर्थव्यवस्था ही युवा या ठिकाणी जे इन्व्हेन्शन्स करतील त्याची आहे. पण आपल्या देशात नीतीही नव्हती आणि स्टार्टअपही नव्हते. अनेक देश पुढे निघून गेले होते. पण केवळ दहा वर्षांमध्ये मोदीजींच्या नीतीमुळे आम्ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम झालो. अमेरिका चीन नंतर भारत झालाय आणि आता पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये आम्ही जगातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम होणार आहोत

दुर्दैवाने मला असं वाटतं की हे जे काही राहुल गांधी बोलताय आहेत निश्चितपणे ते रोज खोटं बोलतील पण ते कितीही खोटं बोलले तुम्ही आणि आम्ही सत्य घेऊन जर जनतेमध्ये गेलो तर जनतेला माहिती आहे महिलांचा खरा कैवारी कोण आहे अरे ज्या महिलांकरता स्वातंत्र्यानंतर साधी शौचालय तुम्ही बांधली नव्हती बारा कोटी घरांमध्ये शौचालय बांधणारे नरेंद्र मोदी आहेत

माननीय मोदीजींवर अरे मोदीजी एकदा जे ठरवतात. ते करून दाखवतात. आणि त्यामुळे आकाश पाताळ एक करून मोदीजी 2029 ला महिला आरक्षण आणल्याशिवाय राहणार नाही

"प्रश्न आज निर्माण काय झाला? 2026 पुन्हा बिल का आणावं लागलं ते याकरता आणावं लागलं की कोविड मुळे आपलं सेन्सस पुढे गेलं जनगणना पुढे गेली आणि मोदीजींच्या लक्षात आलं की जनगणनेचे आकडे 2028 च्या आधी मिळू शकत नाहीत कारण जनगणना केल्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन असतात. तीन टप्पे त्याचे असतात ते स्टॅच्युटरी टप्पे आहेत त्यामुळे 2028 पर्यंत जर हे आकडे मिळाले नाहीत तर 2029 च्या निवडणुकीमध्ये आपल्याला महिला आरक्षण देता येणार नाही

यांना माझा प्रश्न आहे. 2023 हे बिल आलं हा कायदा आला काय होतं या कायद्यामध्ये? दोनच गोष्टी होत्या पहिली गोष्ट होती. महिला ना 33% आरक्षण आणि हे आरक्षण देण्याकरता दोन कंडिशन होत्या पहिली कंडिशन सेन्सस पूर्ण करून आकडेवारी घ्यायची आणि दुसरी कंडिशन डी लिमिटेशन त्या आकडेवारीच्या आधारावर करायचं माझा सवाल आहे राहुल गांधींना सवाल आहे सुप्रिया ताईंना माझा सवाल आहे सकाळच्या भोंग्याला माझा सवाल आहे मला सांगा 2023 ला तुम्ही ज्या कायद्याकरता मतदान केलं होतं त्या कायद्यामध्ये डी लिमिटेशन होतं की नव्हतं

मगाशी आमच्या चित्राताईंनी खरा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न हाच आहे काँग्रेस पक्षाला राहुल गांधीना की राहुल जी सांगा जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिलांना संधी देण्याची वेळ होती तर प्रियंकाजींना संधी तुम्ही का दिली नाही हे राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्रींना देखील त्या ठिकाणी सांगावं लागेल

वंदे मातरम. वंदे मातरम पेक्षा मातृसत्ता पद्धतीचं दुसरं कुठलं प्रतिक नाही. ही दुर्गा दशपहरण धारिणी. हे सुरू झाल्याबरोबर सोनियाजींनी थयथयाट चालू केला आणि वंदे मातरम गीत थांबायला लावलं काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अरे तेच वंदे मातरम गीत आहे. ज्या गीताला त्या ठिकाणी गात गात अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी फाशीवर गेले आणि गळ्यात फास होता. तरी देखील घाबरले नाहीत वंदे मातरम म्हणत राहिले वंदे मातरम

सैन्यसेवेनंतर आता राज्यसेवेची संधी, देशसेवा करणाऱ्या तरुणांच्या भविष्याला महाराष्ट्र सरकारचा भक्कम आधार
सैन्यसेवेनंतर आता राज्यसेवेची संधी, देशसेवा करणाऱ्या तरुणांच्या भविष्याला महाराष्ट्र सरकारचा भक्कम आधार

या ठिकाणी सांगितलं जातं भारत देश हा पितृसत्ताक आहे या ठिकाणी महिलांना जागा नाही अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातात. पण खरंतर मला आपल्याला सांगायचंय ही जी जनरेशन आहे ना कुणी त्याला जेंझिम म्हणत त्याच्यानंतर अल्फा आहे मग बीटा आहे जे काही मी त्याला जेंझ म्हणत नाही. मी त्यांना युवाशक्ती मानतो युवाशक्ती

पण मला विश्वास आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान आपल्याला दिलाय कोणी जर त्याचा दुरुपयोग करण चा प्रयत्न केला तर त्याचे हात जळाल्याशिवाय राहणार नाही हा मला या ठिकाणी विश्वास आहे

आणि म्हणून भारत आत्मनिर्भरतेकडे चाललाय आणि आत्मनिर्भरतेकडे जाणारा भारत तुम्हाला आणि आम्हाला आवडत असेल पण जगामध्ये अशा खूप शक्ती आहेत ज्या शक्तींना तो चालत नाही आहे आवडत नाही आहे पाहवत नाही आहे . त्या शक्तींना माहिती आहे या भारताला याच ठिकाणी जर रोखलं नाही तर या भारताला पुढे रोकता येणार नाही आणि म्हणून त्यांनी देखील कार्यपद्धती बदलल्या आहेत

आणि त्यासोबत आज तिसरा श्रावण सोमवार देखील आहे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की छत्रपती शिवरायांनी आपल्याला लढायला शिकवलं आणि छत्रपती शिवरायांची सेना मैदानात उतरली की एकच द्यायची हर हर... नम पार्वती पते हर हर महादेव

ज्यावेळेस इथन बाहेर पडेल तर मीडिया एकच प्रश्न मला पुण्याच्या संदर्भात विचारणार आहे की तुम्ही गणेशोत्सवाचा बोललात मग गणेशोत्सवामध्ये डीजे वाजला पाहिजे की नाही हा प्रश्न नक्की मला विचारणार आहे पण मी पुणेकरांना सांगू इच्छितो पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीन उत्सव साजरा केला पाहिजे हे फक्त पुणेकर करू शकतात

ज्या पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांनी सामाजिक अभिसरणा करता गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप दिलं त्याच पुण्यात आजच्या या पावन दिवशी ही कार्यकारणी होती आहे ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 🪷भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक 🕟 संध्या. ४.१९ वा. | ३१-८-२०२६📍पुणे. #Maharashtra #Pune #BJP https://www.youtube.com/live/vUFf9UuztX4?si=GPbmj6Z0b7rynXlB https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1019055284440187 https://x.com/Dev_Fadnavis/status/2094377582871679454?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #BJP | भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक समारोप सत्र | पुणे https://www.youtube.com/live/vUFf9UuztX4?si=S90zfWVT0c8sNJFN