en
Feedback
एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯

Open in Telegram

मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke

Show more
362
Subscribers
+124 hours
+97 days
+2830 days
Posts Archive
👉🏻 कॉपी करणाऱ्यांची गर्दी मोठी असते, पण नवीन विचार निर्माण करणाऱ्यांची ओळखच वेगळी असते...💫 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
👉🏻 कॉपी करणाऱ्यांची गर्दी मोठी असते, पण नवीन विचार निर्माण करणाऱ्यांची ओळखच वेगळी असते...💫 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके

समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र प्रसिद्धी ती कुठल्या मार्गाने मिळवायची हे आपल्या हातात
समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र प्रसिद्धी ती कुठल्या मार्गाने मिळवायची हे आपल्या हातात असतं कारण प्रसिद्धी ही चांगल्या कर्माने पण मिळते आणि वाईट कर्माने पण मात्र आपण कुठला मार्ग निवडतो यावर प्रसिद्धीचे स्वरूप ठरकेलं असतं कारण हल्ली आपण बघतं आहोत की कोणी चांगल्या नीतीने समजाला जागृत करत आहे तर कुणी समजाला अंधात ठेऊन त्यालाच फसवत राहत मात्र फसवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीच समाधान नसतं एवढ मात्र निश्चित आहे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

_*मोहमायेच्या आभासी जगातून माणूस बाजूला आला की त्याला ईश्वरधर्म समजायला लागतो.*_
_*मोहमायेच्या आभासी जगातून माणूस बाजूला आला की त्याला ईश्वरधर्म समजायला लागतो.*_

डिअर जिंदगी तु मला रडवण्यासाठी हजार प्रॉब्लेम्स निर्माण कर, मी त्यातून हसण्यासाठी एक कारण शोधून काढेल...! कारण रडत बसने आयुष्याने कधी शिकवलंच नाही..... तेजस्विनी प्र. राऊत     @TejuRaut

🙏🥀 *-----➿-----➿-----➿-----➿----* नशिबाने कितीही परिक्षा घेतल्या तरी उत्तर एकच असंल पाहिजे मी हरणार नाही *-----➿-----➿-----➿-----➿-----* ंंंशुभ सकाळ ््््् ्््््

मला मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा 🙏🏻🌹💓

आईच्या शब्दांनी शब्दाची ओळख होते, परंतु त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारे हे आपल्या आयुष्याचे द्व
आईच्या शब्दांनी शब्दाची ओळख होते, परंतु त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणारे हे आपल्या आयुष्याचे द्वितीय गुरू म्हणजे शिक्षक.... 👩‍👦📚 शिक्षक आणि गुरू हे वेगळे नाहीत... 🙏 कारण शिक्षक शाळेतले धडे देऊन, समाजाची ओळख करून देतात, आणि गुरू समाजाचेच धडे देऊन समाज ओळखायला शिकवतात.... 🏫🌍 एका शिक्षकाशिवाय विद्यार्थी कधीच घडू शकत नाही, कारण शब्दांच्या व भावनांच्या संगमातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतो.... ✍️❤️ ज्ञान देणं ही त्यांची जबाबदारी असेल... 📖 पण त्याची ओळख विद्यार्थ्यांच्या यशातून होत असते... 🏆 आणि हीच त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी पावती असते.... ❤️ अशाच प्रकारे ज्यांच्या ज्ञानातून हे कच्चं मडकं घडलं, त्या प्रत्येक शिक्षकाला, गुरूला नमन! 🙏🌹 आणि ज्यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, अशा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना विनम्र अभिवादन! 🙏💐 @Writer_sonya ✍️

काही शिक्षक फक्त धडे शिकवत नाहीत, ते आयुष्य वाचायला शिकवतात. पुस्तकातली अक्षरं तर अनेकजण शिकवतात, पण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारा शिक्षक आयुष्यभर लक्षात राहतो. @rutuja_writes1203

श्री कृष्णाला फक्त एक देव म्हणून पूजन करण हे अंधश्रद्धेचे पहिलं लक्षण मात्र त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्याने दिलेल्या
श्री कृष्णाला फक्त एक देव म्हणून पूजन करण हे अंधश्रद्धेचे पहिलं लक्षण मात्र त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्याने दिलेल्या प्रत्येक संदेशाचा मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण आपलं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी भक्ती श्री कृष्णाला पण आवडेलं याची मला पूर्णपणे खात्री आहे ❣️🙏🏻   जय जय राम कृष्ण हरी 🌺🚩🙏🏻 एकमन#लेखक @Ommshelke

╭───────────────🦚🌸🦚───────────────╮ 🌺 देवकीनंदन माझा कृष्ण… 🌺 ╰───────────────🦚🌸🦚───────────────╯ 🙏 प्रेमाचा पुजारी
╭───────────────🦚🌸🦚───────────────╮     🌺 देवकीनंदन माझा कृष्ण… 🌺 ╰───────────────🦚🌸🦚───────────────╯ 🙏 प्रेमाचा पुजारी माझा कृष्ण 💛 🌹 राधेचा श्याम माझा कृष्ण 🌺 🧈 माखनचोर माझा कृष्ण 😋 🤝 सुदामाचा सखा माझा कृष्ण 💞 🎶 मुरली मनोहर माझा कृष्ण 🎵 🌸 गोपिकांचा लाडला माझा कृष्ण 🥰 👑 द्वारकाधीश माझा कृष्ण 🏰 🌿 वृंदावनात बागडणारा माझा कृष्ण 🍃 📖 अर्जुनाला गीता सांगणारा माझा कृष्ण 🙏 🐎 रथाचा सारथी माझा कृष्ण 🏹 ╭──────────────💙──────────────╮ ❤️ राधेविना अधुरा माझा कृष्ण… 💙 कृष्णाविना अधुरी माझी राधा… 🌸 ╰──────────────💙──────────────╯ 🪷✨ राधे कृष्ण… राधेश्याम… ✨🪷 🌺 राधे… राधे…! 🌺 ╔══════════════════════════╗   🙏🌸 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या 🌸🙏     ✨ हार्दिक शुभेच्छा! ✨ ╚══════════════════════════╝ 🪔🌿 श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात प्रेम, आनंद, शांती आणि भक्ती सदैव नांदो. 🌿🪔   🦚💙 जय श्रीकृष्ण! 💙🦚     ✍️ @Writer_sonya

*🍁*कृष्ण*🍁 *कृष्ण म्हणजे अविरत संघर्ष* *कृष्ण म्हणजे पराकोटीचा संयम* *कृष्ण म्हणजे सांगोपांग विचार* *कृष्ण म्हणजे जीवनाचे सारथ्य* *कृष्ण म्हणजे भावनांचा त्याग* *कृष्ण म्हणजे निस्वार्थ प्रेम* *कृष्ण म्हणजे असीम मैत्री* *कृष्ण म्हणजे जीवनाचा पाया आणि आयुष्याचा सारथी* *कृष्ण जेवढा समजायला सोपा जाणायला अवघड😊* *कृष्णनीती वाचून कृष्ण समजत नाही तर ती जगायला लागते.* *प्रत्येकाचा आयुष्यात एक तरी कृष्ण* *असायला हवा जो आयुष्याचा काला* *करणार नाहीतर दहीहंडी करेल* *आपल्याला समाजात सुदाम तर भेटतीलच पण कृष्ण भेटणं अवघड..* *म्हणूनच जिला कृष्ण कळाली ती राधा झाली* *रुक्मिणी अठ्ठावीस युगे विटेवरी उभी राहिली* *आणि सत्यभामा हक्काची असूनसुद्धा  आयुष्यभर तडफडत राहिली..कारण तिच्या अपेक्षा आयुष्यभर संपलाच नाहीत किंबहुना आयुष्यात कृष्ण असूनसुद्धा तो तिला कळला नाही म्हणून कृष्ण फक्त वाचून नाहीतर  प्रत्येकाने जगून पाहिला पाहिजे..* *प्रत्येकाचा मनात एक महाभारत असते.. अर्जुनासारखी अवस्था प्रत्येकाची होत असते* *त्यावेळी सोबत कृष्ण पाहिजे* *आपला हात कोणी धरला हे महत्त्वाचे तो शकुनी असेल तर आपण दुर्योधन आणि कृष्ण असेल तर आपण अर्जुन निश्चित 😊* *@प्रसाद🩷* 9970820227

असंसख्य वाटा असतात एका मुलाला मनसोक्त जगायच्या पण तो मर्यादा निवडतो....
असंसख्य वाटा असतात एका मुलाला मनसोक्त जगायच्या पण तो मर्यादा निवडतो....

_*फुलपाखराचं रंग बदलणं आल्हाददायक तर माणसाचं रंग बदलणं धोकादायक असतं.*_
_*फुलपाखराचं रंग बदलणं आल्हाददायक तर माणसाचं रंग बदलणं धोकादायक असतं.*_

समुद्रातील वादळापेक्षा' मनात चाललेली वादळे" खूप भयानक असतात..! #Journey_Of_Life
समुद्रातील वादळापेक्षा' मनात चाललेली वादळे" खूप भयानक असतात..! #Journey_Of_Life

*संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील,* *पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात.* *स्वाभिमान आणि हिम्मत या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत. त्या रक्तात असाव्या लागतात...* *🙏🙏शुभ सकाळ 🙏🙏*

आजही मी काय लिहितो, कशासाठी लिहितो, का लिहितो? हा प्रश्न काहींना नेहमी पडतो. कारण लिखाणातुन मांडलेल्या प्रेरणादायी विचारांपेक्षा यातुन हिला नेमके किती पैसे मिळत असतील असा हिशेब लावणारीही काही मंडळी आहेत. पण  लिहिल्यानंतर मला जे 'मानसिक समाधान' भेटतं..ते पैसे कमवुनही मला मिळालं नसतं हे फक्त मलाच माहितीय. काहीजण खुप मोटीव्हेटही करतात, काही मिळो अथवा न मिळो लिहित रहा बोलतात. शेवटी काय तर, तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे काहीही नसताना पैसा, गाडी, बंगला इत्यादी. इत्यादी..जी माणसं तुम्हांला विचारत होतीत ती खरी तुमची..! त्यांना अजिबात विसरायचं नाही. आणि हे सगळं कमावल्यानंतर जी तुम्हाला विचारतायत ते फक्त ओळखीचे चेहरे असतात..ती तुमची हक्काची माणसं कधीच नसतात..! # जगणं दुनियादारीतलं. ✍️ शैलजा खाडे ❣️ शब्दशैली @Shabdshailee

आज मी एका अशा विषयावर लिहिणार आहे जो बहुतांश जणांसाठी 'सर्वस्व' आहे. खुपजणांना तो प्राणप्रिय आहे. त्याला मिळवण्यासाठी बरेचजण आपला अख्खा जन्म खर्ची घालतात. तो नसेल तर काहींची झोप ऊडुन जगणंही मुश्किल होतं.. आणि तो जर अतिप्रमाणात ऊपलब्ध झाला तर मात्र काहींना त्याची गुर्मी, आंधळी घमेंड चढते. कधी कधी तर  त्याच्यासमोर सगळ्या मानवी भावना बोथट होतात. सख्खी नातीही एकमेकांची वैरी बनतात.  माणुसकीची हार होते. सर्वांत महत्वाचं तो आपल्याकडे असेल तरच आपल्याला लोकांच्या मनात किंमत मिळते. नाहीतर आपल्याला 'शुन्य' समजलं जातं. हो.. हो अगदी बरोब्बर..'पैशांबद्दलच' लिहितोय मी..! आपला खिसा 'रिकामा' असताना आपल्या आयुष्यात जी माणसं असतात तीच माणसं कालांतराने आपल्या भरलेल्या खिशाचे खरे 'हकदार' असतात..'वाटेकरी' असतात. असंच मला वाटतं. त्यातल्या त्यात लग्नाच्या 'मार्केटमध्ये' जर तुम्हाला ऊतरायचं असेल..तर तुम्हाला गब्बर पगाराची नोकरी मिळवावी लागते. तेंव्हा कुठं मुलीच्या आई वडिलांच्या प्राईम लाईक्स मध्ये तुमचा नंबर लागतो. याचा अर्थ हाच होतो की..तुमचा खिसा पैशांनी टम्म भरलेला हवाय. हीच परिस्थिती मुलीलाही लागु होते बरं..मुलगी कमविणारी असेल तर तिच्याकडुन जास्त मानपानाची व खर्चाची अपेक्षा केली जात नाही. तिला लग्नानंतर निव्वळ कमवते म्हणुन थोडंफार स्वातंत्र्यही दिलं जातं. आता, हौस म्हणुन मुलीला शिक्षण देऊन तिला स्वत:च्या पायावर ऊभं करुन पुन्हा तिच्या लग्नासाठी पाच-पन्नास लाख खर्च करणारे आई वडिल याला अपवाद असु शकतात बरं..! मी तर म्हणतो, आपला खिसा रिकामा असेल तर आपले घरचे सुध्दा विचारत नाहीत. (अपवाद असु शकतात.) आपलेच आपल्याला कोसुन खातात. नातेवाईक नावाचा प्रकार तर या बाबतीत मानहानी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जिथे जाईल तिथे आपल्या कर्तृत्वावर बोट ठेवलं जातं. आपलं चांगलं वागणं-बोलणं, आपला स्वभाव, आपली सर्वांना समजुुन घेण्याची व वेळोवेळी मदत करण्याची वृत्ती हे सगळं कुणासाठीही घंटा मैटर करत नाही. ऊलट आपण किती पैसे कमावतो? या ऊत्तरावर आपल्या ऊभ्या आयुष्याचा लेखाजोगा ठरवला जातो. कुणी म्हणेल असं काही नसतं हो..पण मी जे लिहिलंय तेच आपल्या समाजातील अत्यंत जहाल व कडु वास्तव आहे. अनुभवांती शब्द खोटे नसतात बरं..! काही वर्षांपुर्वी मी स्पर्धा परीक्षा करत होतो. दिवसातले १४ तास लायब्ररीत जायचे. त्या १४ तासांत अभ्यास करुन मनाला शिणवटा आलाच तर कटींग (चहा ) घ्यायला अमृततुल्य मध्ये जाणं व्हायचं आणि आयुष्याचा खरा चेहरा मला तिथे दिसायचा. अक्षरश: पाच रुपयांचा चहा सुध्दा काहीजणांना ऊधारीवर घ्यावा लागायचा अशी आर्थिक परिस्थिती हलाखीची असायची. कधी कधी चहा-नाश्त्याचे पैसे मी भागवायचो. अगदी दाढी करायलाही काहींकडे पैसे नसायचे. तेंव्हा" घरचेही आता वैतागलेत..तुझ नोकरीचं काम कधी होणारैय? असं विचारतात. गावाकडची सगळी नावं ठेवतात..शहरात अभ्यासाच्या नावाखाली ऊंडारत फिरतोय नोकरीचा पत्ताच नाही असं बोलतात"..असं सगळं माझे हलाखीचे परिस्थिती असणारे मित्र मैत्रीण मला बोलायचे. मी त्यांना माझ्या परीनं मोटीव्हेट करायचो. हेही दिवस बदलतील हा धीर द्यायचो. यांपैकी काहींच जेंव्हा सिलेक्शन व्हायचं तेंव्हा त्यांच्यावर गुलालाची पोती ओतली जायचीत. गावाकडुन ट्रकभरुन माणसं यांच्या सत्काराला हजर असायचीत. घरचेही एकदम खुश..! मग यातल्या काही विजयी ऊमेदवारांचा मला फोन यायचा.."यार, हे सगळे साले सुखाचे धनी आहेत गं, तुच खरी माझी मैत्रीण आहेस. माझ्याकडे काहीही नसताना तु माझं ऐकुन घेतलंस, मला धीर दिलास, तुला काय पाहिजेल बोलं..माझ्या पहिल्या पगारावर तुझा हक्क..!" आणि मला हे शब्द ऐकुन डोळ्यांत पाणी यायचं. "माणसाच कर्तृत्व हे पैशांतच मापलं जातं.." हे तेंव्हाच कळलं. हा इतरांच्या बाबतीतला अनुभव मी स्वत: सुध्दा चांगलाच अनुभवलाय. कारण जेंव्हा मी जॉब करत होतो तेंव्हा माझ्याशी असणारं काही लोकांचं नातं..व मी जॉब करीत नसताना माझ्याशी असणारं त्या लोकांचं नातं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पैसा कमवणं खुप महत्वाचं आहे. शिवाय आर्थिक स्वावलंबी असणं ही नक्कीच गरजेची व अभिमानाची गोष्ट आहे. पण, एखाद्याच्या आयुष्यात पैसा ही सेकंड प्रायोरिटी असु शकते हेच लोकांना मान्य नाहीय याचं मला आश्चर्य वाटतं..! मला अजुनही आठवतं. एकदा झी मराठीच्या दिवाळी अंकात 'मुका पाऊस' ही मी लिहिलेली लघुकथा पहिल्या क्रमांकाने छापुन आली होती.  मला व माझ्या घरच्यांना खुप आनंद झाला. मी सर्वांना त्याचे फोटोज शेअर केले. कारण तो दिवाळी अंक अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिध्द झाला होता. माझ्यासाठी ही मिळणारी प्रसिध्दीच बक्षीस होतं. मला एक रुपयाचीही आस न्हवती. पण एका  सोफिस्टीकेटेड फुल पैकेज असणा-या मैत्रीणीने मला पाचकन विचारले.."हे पब्लिसिटी वगैरे ठीकय गं..पण तुला यातुन किती पैसे भेटले..?" हा प्रश्न माझ्या काळजाच्या आरपार गेला..! शेवटी शब्दांची किंमत पैशांत केलीच.

जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न
जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न करतो तोच समाधाने राहू शकतो कारण त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की प्रभू श्री रामाला पण वनवास स्वीकारावा लागला तर मग आपण साधी माणसं ना!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke