एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
الذهاب إلى القناة على Telegram
मी हे चॅनल फक्त सकारात्मक विचार वाचता यावे याकरिता सुरू करत आहे या मध्ये फक्त अश्याच पोस्ट शेअर केल्या जातील जश्यातश्या फॉरवर्ड करू कुठल्याही लेखाचं नाव न कट करता किंवा कुठल्याही चॅनलची लिंक न हटविता तुम्ही पण ☝🏻 मला अशा पोस्ट शेअर करू शकता @Ommshelke
إظهار المزيد382
المشتركون
+624 ساعات
+137 أيام
+2930 أيام
أرشيف المشاركات
तंत्रज्ञान माणूस एकमेकांपासून दूर असला तरी त्यांना एकमेकांशी जोडून ठेवते... दूर राहून सुध्दा मानसाच मन समजून घेते.... तंत्रज्ञान चे जितके तोटे आहेत तितकेच फायदे पण आहेत......
माणसाला जवळून अनुभवून त्याच्यासोबत भावना अचूकपणे समजून घेऊ शकतो. तो आनंद वेगळाच असतो.
तंत्रज्ञान च्या बाबतीत फक्त भावाना समजतात मानसाची मनस्थिती समजून घेता येत नाही
जग तंत्रज्ञानाच्या कितीही संपर्कात असलं तरी मनातील भावना व्यक्त करायला आपल्या माणसांची गरज भासते कारण की तंत्रज्ञान फक्त आपल्याला अचूक माहिती शोधून देऊ शकते पण माणसाच मन समजून घेण्यासाठी दुसऱ्या मनाची गरज असते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
*🩷Heart like a song🩷*
*जागतिक हृदय दिन (World Heart Day) हा केवळ एक दिवस नाही, तर आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या हृदयाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्याची काळजी घेण्याची आठवण करून देणारा दिवस आहे.*
*आपल्या कुटुंबाचे सुख आणि आनंद आपल्या निरोगी हृदयाशी जोडलेला असतो. धावपळीच्या आयुष्यात आपण बऱ्याचदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण लक्षात ठेवा, तुमचे हृदय निरोगी असेल, तरच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी राहील.*
*तुमच्यासाठी 24 तास काम करणाऱ्या या संवेदनशील भागासाठी आजच संकल्प करा ...मी काळजी घेईन त्याचबरोबर जपणूक ही करेन..*
*आणि हो..हृदयात चांगल्या माणसांची साठवणूक ही..*
*हृदयाची beat ..ही जगातील सुंदर संगीत असते..*
*हे संगीत जास्त काळ चालावं वाटत असेल..तर..*
*त्यांची काळजी घ्या या संगीताच्या जोरावरच तुम्हाला तुमचे आयुष्याचे गाणे वाजवायचे आहे...🩷🤍💚*
*@Prasad🩷*
Repost from धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
*हसणं म्हणजे काय...* *मरगळलेल्या मनाला ताजेतवाने करून ऊर्जावान करण्याचे औषध...*
*@Prasad🩷*
Repost from प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱
तुमची सध्याची परिस्थिती काय आहे... यावर लक्ष देण्यापेक्षा भविष्यात तुमची परिस्थिती कशी असायला हवी याकडे जास्त लक्ष द्या...
👉🏻 बघा, जो माणूस सकरात्मक आणि मोठा विचार करू शकतो, तो भविष्यात काय काय करता येईल, याचे कल्पनाचित्र नेहमी रंगवत असतो... तो कधीही वर्तमान परिस्थितीत अडकून राहत नाही...💫
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
Repost from ꧁࿇♥👑विश्व माझ्या शब्दांचे👑♥࿇꧂
🇮🇳 प्राण गेला हुतात्म्यांचा, स्वातंत्र्यासाठी लढताना...
पण नाही करत कोणी त्यांना सलामी, तिरंगा फडकवताना... 🫡🇮🇳
⚔️ आनंदाने फासावर चढले ते, आपल्याला स्वातंत्र्य देताना...
साधी घोषणाबाजीही करत नाहीत हे राजकारणी, राज्य करताना... 💔
😔 लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना, ‘जय किसान’चा नारा देताना...
🌾 शेतकऱ्यांच्या कष्टाचं रक्त पितात, स्वतःचं घर भरताना...
देतात फक्त खोटी आश्वासनं,
या गोरगरीब शेतकऱ्यांना... 💔🌾
काय स्वप्न पाहिलं होतं त्या हुतात्म्यांनी,
बलिदान देताना...? 🥀
यांनी तर भारतच विकण्याची भूमिका घेतलीय,
स्वतःची पोळी भाजताना... 🔥
🇮🇳 या भारतभूमीसाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या
क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🫡🇮🇳
✍️ @Writer_sonya
दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हिणवून आपल्या बद्दल त्यांच्या मनात कमीपणा करून घेऊ नका आणि प्रत्येकात दोष बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण शोधा कारण हीच सोबती तुम्हाला जीवनात कधी एकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
"इंकलाब जिंदाबाद"असे स्वातंत्र्यासाठी नारा लावणारे भगतसिंह हे फक्त क्रांतिकारक नसून एक उत्तम पुस्तकप्रेमीही होते🇮🇳..त्यांच्या शेवटच्या प्रवासात जेल मध्ये असताना त्यांनी अनेक पुस्तके वाचली,लेखनही केले✍त्यांच्या सारख्या विचारवंतांची आज गरज आहे✍,त्यांचे वर्तमानपत्रातील लेखन ब्रिटिशांना वटणीवर आणणारे होते,मनात जे क्रांतिकारक विचार येतात ते कागदावर आणि लोकाच्या मनावर बिंबवण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला,त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून अनेक क्रांत्या घडल्या✍स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारे युवक,"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ हैं मेरी कलम,मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनक़लाब लिखा जाता हैं !असे ठाम विचार मांडणारे,स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर क्रांतिकारक,शहीद भगत सिंह यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏जय हिंद,वंदे मातरम्🇮🇳
........🦋🌺😇💞.......
लेखन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा
Repost from प्रवास आयुष्याचा !!!!!!✍️🕊️
"आत्मसंवादाची पातळी उच्च ठेवा" हा लेख नक्की वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका
Repost from प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱
गर्दीत जाऊ नका…
गर्दीचे कारण बना...🔥
👉🏻 लोक ज्या दिशेने चालले आहेत, त्याच दिशेने चालण्यात वेगळेपण नाही. अशी वाट तयार करा की लोकांनी तुमच्या मागे यावं...💫
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
Repost from श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
*#ऊर्जास्तोत*
_*संघर्षाच्या काळात खचून जावू नका कारण स्वतःला सिद्ध करुन दाखविण्याचा तोच सुवर्णकाळ असतो…!*_
*#हर_हर_महादेव* 🙏🏻🚩
Repost from ꧁࿇♥👑विश्व माझ्या शब्दांचे👑♥࿇꧂
🙏 आज जाताना बाप्पा एक गोष्ट सांगून गेला…
“बाळांनो, ज्या प्रमाणे तुम्ही मला दहा दिवस तुमच्या घरात 🏠, तुमच्या हृदयात ❤️ स्थान दिलंत… माझ्यावर मनापासून प्रेम केलंत 🥹, माझ्यात रमून गेलात…
पण अकराव्या दिवशी जड अंतःकरणाने 💔 मलाही तुमचा निरोप घ्यावा लागला… 😔
तसाच एक दिवस तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील माणसांना निरोप द्यावा लागणार आहे… 🥀
कारण या जगाचा हाच नियम आहे… 🌍
इथे कोण कधी भेटेल, किती काळ सोबत राहील आणि कोणत्या क्षणी कोणाला निरोप द्यावा लागेल, हे कुणालाच माहीत नसतं… ⏳
म्हणून माणसं सोबत असताना त्यांच्यावर प्रेम करा… ❤️
मनातलं मनापासून बोला… 🫶
नाती जपा… 🤝
रुसवे-फुगवे विसरा… 🥹
कारण कदाचित उद्या निरोप देताना मनात फक्त एकच प्रश्न राहील— “काश… अजून थोडं प्रेम केलं असतं!” 💔🥀🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ पुढच्या वर्षी लवकर या… 🥹 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 ✍️ @Writer_sonya
Repost from मनातील भावना..✍💌
आयुष्याचे गणित सोडवताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करा...
उत्तर शेवटी शून्यच येणार आहे.
Repost from राष्ट्रनिर्माण वाचन मंच
“शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे, नवचैतन्य, नवसंस्कृती, नवमानव, नि नवसमाज शिक्षणातून निर्माण करावयाचा असतो.”
--समाजसुधारक, कर्मवीर भाऊराव पाटील.
Repost from Govind Rodge official channel
"आत्मसंवादाची पातळी उच्च ठेवा" हा लेख नक्की वाचा आणि आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका
