Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 154
Підписники
+124 години
-107 днів
-5130 день
Архів дописів
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Proud Milestone in India's Journey Towards Defence Self-Reliance! 🇮🇳🚀
Heartiest congratulations to DRDO (Defence Research and Development Organisation), its scientists, engineers and the Defence Forces on the successful demonstration of India's multi-layered Ballistic Missile Defence (BMD) capability and the maiden flight-test of the Naval Anti-Ship Missile-Medium Range (NASM-MR).
This remarkable achievement reflects the dedication, innovation and commitment of DRDO towards building a stronger, safer and self-reliant India. Best wishes to Team DRDO for continued success in advancing India's defence capabilities and achieving many more milestones.
Jai Hind! 🇮🇳
#India #AatmanirbharBharat #NationalSecurity
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Yuva Shakti Driving Viksit Bharat!
India’s Amrit Peedhi is shaping the future with skill, innovation, entrepreneurship and sporting excellence.
Under the vision of Hon PM Narendra Modi Ji, transformative initiatives such as Skill India, PMKVY, Startup India, MY Bharat, Rozgar Melas and Khelo India are empowering youth with opportunities, confidence and global recognition, driving the nation’s journey towards Viksit Bharat.
#12YearsOfYuvaShakti #KheloIndia #NewIndia #YoungEntrepreneur #ViksitBharat
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
खेलों में बढ़ता भारत, विश्व में गूंजता भारत!
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में खेलो इंडिया से लेकर अंतरराष्ट्रीय मंचों पर रिकॉर्ड प्रदर्शन तक, भारतीय खिलाड़ियों को मिला नया आत्मविश्वास और नई पहचान।
आधुनिक खेल सुविधाएं, मजबूत खेल संस्कृति और ऐतिहासिक उपलब्धियां, यही है नए भारत में खेलों का स्वर्णिम युग।
#12YearsOfYuvaShakti #KheloIndia #NewIndia #SportsInfrastructure #ViksitBharat
4 154
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 12 जून 2026
धुळे – नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे 'ग्रोथ इंजिन' बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या 'अजिंक्य' चरित्रग्रंथाचे प्रकाशन
https://mahasamvad.in/203759/
पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख
https://mahasamvad.in/203793/
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामीण पेयजल धोरण सादरीकरण बैठक
https://mahasamvad.in/203789/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Sustainable Water Security Framework for Rural Maharashtra!
Chaired a meeting regarding the 'State Rural Drinking Water Policy' at Varsha Bungalow in Mumbai, today.
Directed that all rural water supply schemes in the State to be progressively transitioned towards solar energy in order to ensure sustainable operations and reduce recurring expenditure.
Instructed that a comprehensive solar energy policy to be formulated through the Maharashtra Energy Development Agency (MEDA) for all rural water supply schemes, taking into consideration the source of water, the number of citizens dependent on each scheme, the capacity of motor pumps and the total electricity units required for the operation of each scheme.
Instructed to take the necessary measures to ensure uninterrupted functioning of water supply schemes across Maharashtra. Also, directed that all water supply schemes be completed and implemented in accordance with the Government of India’s norm of providing 55 litres of water per capita per day.
Instructed that maintenance and repair units be established at the taluka level for all rural regional and individual water supply schemes. Directed that Gram Panchayats within the respective talukas be actively involved in the functioning of these units.
Directed that the expenditure towards the maintenance and repair of water supply schemes to be met through the collection of water charges. Instructed that, in areas where the collection of water charges is insufficient, the required funds be provided from the resources of the concerned local self-government institutions.
Instructed that the establishment of such units will facilitate cost-effective maintenance and repairs, while ensuring the uninterrupted operation and sustainability of water supply schemes.
Minister Gulabrao Patil, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present.
#Maharashtra #WaterPolicy #RuralDrinkingWater
https://x.com/Dev_Fadnavis/status/2065471891079635185?s=20
4 154
CMO Maharashtra Tweets:
पाणीपुरवठा योजनांच्या सक्षमीकरणासाठी सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी 'राज्य ग्रामीण पेयजल धोरण' संदर्भात बैठक पार पडली.
राज्यामध्ये कार्यान्वित अनेक पाणीपुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी लक्षात घेता, यापुढे राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यासाठी विभागाने सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपांची क्षमता, संपूर्ण योजनेसाठी लागणाऱ्या एकूण युनिट्सची संख्या आदी लक्षात घेऊन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचे धोरण तयार करावे. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये, याची काळजी घ्यावी. केंद्र सरकारच्या निकषानुसार दरडोई दरदिवशी 55 लिटर पाणी पुरविले पाहिजे, यानुसार योजना पूर्णत्वास न्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
सर्व ग्रामीण प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी तालुका स्तरावर युनिटची स्थापना करण्यात यावी. या युनिट्समध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग घेण्यात यावा. पाणीपट्टीच्या वसुलीतून योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यात यावा. अशा युनिट्सच्या माध्यमातून देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होईल आणि योजनाही बंद पडणार नाही. ज्या ठिकाणी पाणीकराची कमी वसुली असेल, अशा ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीमधून रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
तालुका स्तरावर युनिट्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी एजन्सीची सूची तयार करावी. ग्रामसभेच्या ठरावाने या सूचीमधील एजन्सीकडून पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती करावी. या व्यवस्थेमुळे कोणतीही पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीअभावी बंद पडणार नाही. ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा योजनेचा स्रोत हा शाश्वत असला पाहिजे. काही ठराविक कालावधीने पुन्हा नवीन स्रोत शोधून पाणीपुरवठा योजना करण्यात येऊ नये, त्यामुळे आधीच्या योजनेवरील खर्चाचा उपयोग होत नाही. 'व्हीबी जी रामजी' या योजनेतून पाणीपुरवठ्याचे स्रोत सक्षमीकरण करण्यास निधीची उपलब्धता होत आहे, त्यामुळे योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारे पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात यावे. ज्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
50 % वर काम पूर्ण झालेल्या पुनर्जोडणी योजनांना निधी देण्यात यावा आणि अशा योजना पूर्ण कराव्यात. जल जीवन मिशन अंतर्गत 100 % काम पूर्ण झालेल्या योजनांची पडताळणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पाणी पुरवठा योजनांचे टप्प्याटप्प्याने सौर उर्जीकरण करण्याचे प्रस्तावित असून एकूण 22,185 योजनाकरिता सौर यंत्रणा उभी करण्याचे प्रस्तावित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 11,643 सौर यंत्रणा यापूर्वीच त्यांच्या मूळ अंदाज पत्रकांमध्ये समविष्ट करण्यात आल्या आहेत.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #WaterPolicy #RuralDrinkingWater
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Empowering Women, Strengthening Agriculture!
Chaired a meeting regarding the 'Maharashtra Women Farmers’ Empowerment Bill, 2026' at Varsha Bungalow in Mumbai, today.
Reviewed the proposed Maharashtra Women Farmers Empowerment Bill, 2026, which will be introduced in the upcoming Monsoon Session to provide women farmers with independent legal recognition as farmers and strengthen their place in Maharashtra’s agricultural ecosystem.
Across Maharashtra, women contribute more than 81% of the workforce in agriculture. This legislation seeks to ensure that women engaged in agriculture and allied activities receive recognition, rights and opportunities.
Directed that the final draft of the Bill be prepared after incorporating all relevant suggestions, with a focus on improving access to credit, technology, markets, crop insurance, agricultural subsidies and social security benefits. The proposed framework will also support women engaged in allied sectors, along with landless farmers, tenant farmers, agricultural labourers and migrant agricultural workers.
This legislation will be a significant step towards providing lakhs of women farmers with an independent identity, rights and opportunities, while setting a new benchmark for gender equality in the agricultural sector.
DCM Sunetratai Pawar, Minister Dattatray Bharane ji, MoS Adv. Ashish Jaiswal, Chairperson of the M. S. Swaminathan Research Foundation (MSSRF), Dr. Soumya Swaminathan ji, senior officials and other dignitaries were present.
#Maharashtra #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2065462622032629891?s=20
4 154
CMO Maharashtra Tweets:
राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' संदर्भात बैठक पार पडली.
राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील कृषी क्षेत्रात 81% हून अधिक महिलांचा सहभाग आहे. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला, तसेच मत्स्यव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आले आहे.
सर्व सूचनांचा विचार करून विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करा. कृषी क्षेत्रातील महिलांना ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता देणे, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ व विविध सेवा महिलांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश असावा, पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, बागायती, फुलशेती, मशरूम उत्पादन, कृषी वनीकरण, वनउपज संकलन असे विविध उपक्रम तसेच भूमिहीन शेतकरी, भाडेकरू शेतकरी, शेतमजूर, चराई व्यवसाय करणारे आणि स्थलांतरित कृषी कामगार यांचाही यामध्ये समावेश करावा. महिलांना राज्य शासनाच्या कर्ज योजना, कृषी अनुदाने, बियाणे, खते, पीक विमा, विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, वाहतूक, साठवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळू शकेल अशी डिजिटल प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सर्व अभ्यास करावा. तसेच महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार करणे या सर्व बाबींचा समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन करणे, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीची यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जावा. जिल्हा आणि तालुका व गावस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा असली पाहिजे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती असावी जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमित परीक्षण केले जाऊ शकेल. हे विधेयक राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून कृषी क्षेत्रात लिंगसमानतेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या (MSSRF) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 154
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the 'Maharashtra Women Farmers’ Empowerment Bill, 2026'.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Dattatray Bharane, MoS Adv. Ashish Jaiswal, Chairperson of the M. S. Swaminathan Research Foundation (MSSRF) Dr. Soumya Swaminathan, senior officials and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' संदर्भात बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या (MSSRF) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'महाराष्ट्र महिला किसान सशक्तिकरण विधेयक, 2026' के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) की अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕟4.25pm | 12-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | संध्या. ४.२५ वा. | १२-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
