uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 156
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-17 kunlar
-4730 kunlar
Postlar arxiv
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: कुतूहल, जिद्द आणि मोठी स्वप्ने; याच बालमनांत दडले आहे महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य! #Maharashtra #Raigad #SchoolPraveshotsav2026

CMO Maharashtra Tweets: जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण अधिक दर्जेदार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पी.एम.श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथे आयोजित 'शाळा प्रवेशोत्सव 2026' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या 'आयडियल सेंटर'चे उदघाटन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असणारे शैक्षणिक परिवर्तन तसेच इतर सकारात्मक बदलांमुळे अनेक ठिकाणी खासगी शाळांमधूनही विद्यार्थ्यांचा कल पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण देण्यासाठी उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक डिजिटल लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. इयत्ता 1 ली ते 8 वीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध असून शिक्षकांना अधिक प्रभावीपणे अध्यापन आणि विद्यार्थ्यांना अध्ययन करता येईल. तसेच ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेमुळे शिक्षण प्रक्रियेला अधिक गती आणि गुणवत्ता प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, हक्क व कर्तव्यांची जाणीव, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांची जडणघडण होणे आवश्यक आहे. अतिशय उत्तम भावी नागरिक या शाळांच्या माध्यमातून तयार व्हावा यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #FirstDayOfSchool

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पी.एम.श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथील 'आयडियल सेंटर'चे (इंटरॅक्टिव्ह डिजिटल, एक्सपेरिमेंटल, ॲडमिनिस्ट्रेशन अँड लर्निंग सेंटर) उदघाटन केले. आयडियल सेंटरची वैशिष्ट्ये : ✅इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ व ऑडिओ स्वरूपातील अभ्यासक्रम उपलब्ध ✅इंग्रजी, मराठी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये सर्व विषयांच्या अध्ययनाची सुविधा ✅विद्यार्थी व शिक्षकांसाठी सॉफ्टवेअर-आधारित शिक्षण सुविधा15 ✅विद्यार्थ्यांसाठी 24 आणि शिक्षकांसाठी 1 संगणक उपलब्ध ✅ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, स्क्रीन प्रेझेंटेशन आणि परीक्षा व्यवस्थापनाच्या आधुनिक सुविधा ✅90% ऑफलाइन कार्यरत सॉफ्टवेअरमुळे अखंड इंटरनेटची आवश्यकता नाही #Maharashtra #DevendraFadnavis #FirstDayOfSchool #IDEALCenter

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण अधिक दर्जेदार आहे. जिला परिषद विद्यालयों में शिक्षा अधिक गुणवत्तापूर्ण है। (शाळा प्रवेशोत्सव 2026 | पनवेल, रायगड | 15-6-2026) #Maharashtra #Panvel #FirstDayOfSchool

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: शाळेतलं पहिलं पाऊल खास, नवीन स्वप्नांचं नवं आकाश... ✨📚👧👦 🏫CM Devendra Fadnavis at the ‘Shala Praveshotsav 2026’ organised at the P.M.Shri. Raigad Zilla Parishad Primary School, Vahal in Panvel. MLA Mahesh Baldi, former MP Ramsheth Thakur and other dignitaries were present. 🏫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पी.एम.श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथे आयोजित 'शाळा प्रवेशोत्सव 2026' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. 🏫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी पी.एम.श्री. रायगढ़ जिला परिषद, प्राथमिक विद्यालय, वहाल, पनवेल में आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर विधायक महेश बालदी, पूर्व सांसद रामशेठ ठाकुर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕙 10.05am | 15-6-2026📍Vahal, Panvel | स. १०.०५ वा. | १५-६-२०२६📍वहाळ, पनवेल. #Maharashtra #DevendraFadnavis #FirstDayOfSchool