✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल
الذهاب إلى القناة على Telegram
💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL
إظهار المزيد1 282
المشتركون
+224 ساعات
+27 أيام
+330 أيام
أرشيف المشاركات
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याला नाईलाज खातर समाजाच्या टोमण्यानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागतं तरच मेल्यागतं जगता येईल नाही तर एक दिवस त्याला स्वतःच अस्तित्व कायमचं संपवावं लागेल म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्या आधी स्वतःला त्याच्या परिस्थितीत ठेवून बघा मग समजेल की तो कुठल्या वेदना सहन करत आहे तुमचे शब्द कोणाची तरी उमेद बनली पाहिजे दुःखाचे कारण नाही!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
शोध सुखाचा
आजच तुमची प्रत मागवा!
📲 WhatsApp: 8806379959
👇 ऑर्डरसाठी येथे क्लिक करा: https://wa.me/918806379959?text=नमस्कार!%20मला%20%22शोध%20सुखाचा%22%20हे%20पुस्तक%20खरेदी%20करायचे%20आहे.%20कृपया%20संपूर्ण%20माहिती%20पाठवा�.
अधुरी आस
"नियतीने हिरावून नेलेली माणसं प्रार्थना किंवा उपवासाने परत येत नसतात, हे बुद्धीला पटतं; पण मनाला कसं पटवायचं? मन तर अजूनही त्याच जुन्या उंबरठ्यावर थांबून आहे.
डोळ्यांत साठलेली तिचीच आस आणि पावलोपावली होणारा तिचाच भास... हा खेळ रोज जीवघेणा छळ मांडत असतो. विरहाच्या या अंधारातही मन एकाच आशेचा दिवा लावून बसलंय— की कधीतरी, कोणत्यातरी एका वळणावर, तिचा एक फोन किंवा मेसेज येईल आणि थांबलेलं आयुष्य पुन्हा सुरू होईल."
— विकास सुखधाने
स्मृतींचे प्राजक्त आणि एक अधुरी साद
"लाखो हृदयांच्या स्पंदनांनी हेच सत्य अधोरेखित केले आणि मीदेखील मनाशी हजारदा झुंज देऊन पाहिली... परंतु, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वात गुंतलेला जीव तिथून कधीच मुक्त होत नाही. इथे सारे प्रयत्न थकतात, काळाचे ऋतू बदलतात, वर्षेही उलटून जातात; पण त्या एकाच व्यक्तीची स्मृती आणि तिच्यात अडकलेले प्राजक्त श्वास मनाचा तळ सोडत नाहीत.
म्हणूनच, बंध तोडून दूर निघून गेलेल्या त्या जीवाने, निदान 'माणुसकी'च्या नात्याने तरी एकदा मागे वळून पाहावे... मागे उरलेला हा जीव विरहाच्या कोणत्या दाहक अवस्थेत दिवस कंठतोय, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.
आज कदाचित पूर्वीसारखी जन्मभराची साथ नसेल, निरंतर सहवासाचे भाग्यही नसेल... परंतु, तिने दिलेली एक आर्त साद किंवा त्याने साधलेला एक संवादी क्षणही... या निष्प्राण झालेल्या देहात पुन्हा जगण्याचे चैतन्य फुंकणारी 'नवसंजीवनी' ठरेल!"
— विकास सुखधाने (साहित्यिक)
आठवण: एक जिवंत मरण
एखाद्या व्यक्तीची आठवण येणं ही केवळ डोळ्यांची कडा ओलावणारी साधी गोष्ट नसते. काही आठवणी अशा असतात, ज्या जिवंत देहाची चिरफाड करतात आणि मनाला सुन्न करून एखाद्या बेवारस प्रेतासारखं एकांतात फेकून देतात. भोवताली फक्त स्मशानाची शांतता आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचे भास उरतात.
मृत्यूसम वेदना सहन करत घालवलेल्या वेळेची किंमत चुकवून, निघून गेलेल्या त्या प्रिय व्यक्तीच्या अस्तित्वाला पुन्हा पुन्हा शोधणं... म्हणजेच 'आठवण'.
— विकास सुखधाने
+1
अनिल भगवान चव्हाण(ABC )यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार जाहीर...
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
