✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल
Ir al canal en Telegram
💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL
Mostrar más1 271
Suscriptores
-124 horas
+27 días
-1030 días
Archivo de publicaciones
शोध सुखाचा (कथासंग्रह )
- अनिल भगवान चव्हाण (ABC )
“शोध सुखाचा हे पुस्तकं अल्पावधितच लोकप्रिय झालं.. लोकांच्या मनामनापर्यंत पोहोचल आतापर्यंत दोन २००+ वाचकांनी हे पुस्तकं ऑनलाईन खरेदी केलं आहे आणि ३०० पेक्षा जास्त वाचकांनी ह्या पुस्तकाच ई बुक खरेदी केलं आहे.. ह्या पुस्तकाला आतापर्यंत तीन पुरस्कार मिळाले आहे
१)डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार
नाशिक याठिकाणी दि. २३मे २०२६
२)पलपब प्रेरक व्यक्तीमत्व २०२६
३)राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार १२जुलै २०२६
४)राज्यस्तरीय शब्दप्रेरणा पुरस्कार २०२६
(दि. ३०ऑगस्ट २०२६ला नाशिक याठिकाणी मिळणार )
आतापर्यंत पाच नामांकित लेखक आणि समीक्षकांनी ह्या पुस्तकाच समीक्षणही केलं आहे..
जीवनाला सकारात्मक दिशा देणारं हे सुंदर पुस्तकं आजच खरेदी करा...!”
किंमत २०० रुपये
ई बुक किंमत ८० रुपये
पुस्तक खरेदीसाठी संपर्क
-8806379959
आपली प्रत आताच बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://wa.me/918806379959?text=नमस्कार!%20मला%20'शोध%20सुखाचा'%20हे%20पुस्तक%20खरेदी%20करायचे%20आहे.%20कृपया%20ऑर्डरची%20माहिती%20द्या
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर निघण्यासाठी खूप मोठ्या यंत्रणा आहेत पण मनाचा आजार बरा करण्यासाठी अजून कुठलाच पर्याय उपलब्ध नाही म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती नक्कीच कमवा तिच्याशी बोलताना मनातील दुःख आपोआपचं कमी होईल कारण हे विज्ञाने पण मान्य केलं की मनाला झालेला आजार शरीराच्या खूप मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त तुलाव गरज पडते प्रत्येकाचा आधाराची का तुझ्या तुडक्या शब्दांनी फक्त कोंडली विचारपूस करत रे तुझी गरजचं नाही कोणालाच तर उगाच का रे आपलेपणाचा थापा मारत रे देवानेच तुला अपंगत्वं दिलं ना मग का चांगुलपणाचा आव आणत रे!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते त्यानुसारच आपल्याला जगाव लागतं नाही तर आयुष्य एवढं कठीण होऊन जातं की त्यातून निघणं प्रत्येकाला शक्य होतं नसतं!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
+1
शेवटी माणसाची किंमत काय..?
नक्की वाचा आणि प्रतिक्रिया कळवा... 🙏🥰
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
आयुष्यात कोणालाच एवढ महत्व देऊ नका की त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य होऊन जाईल कारण हल्ली नात्याचा वापर फक्त गरजेपुरता केला जातो एकदा का त्यांची गरज पूर्ण झाली की उरतो फक्त गैरसमज म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा दुसऱ्यांचा विचार करत राहण तर स्वतःच जगणं कठीण होऊन बसेल!,,,✍🏻 एकमन#लेखक@Ommshelke
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
या जगात सर्वात मोठा भिकारी कोण माहिती आहे का,? ज्याला समजून घेणार असे कोणीच नाही असा व्यक्ती😒😒
म्हणून प्रत्येकाकडे अशी एक व्यक्ती हवी तिच्याकडे हक्काने मन मोकळ करता येईल नाही तर आपल्या मनाचा एवढा काही कोंडमारा होईल की त्यापुढे स्वतःच अस्तित्व संपवावं वाटेल!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
अस्तित्वाचा शोध घेणारा जीवनप्रवास : 'शोध सुखाचा'
(पुस्तक समीक्षण )
“प्रस्तावना आणि वाड:मयीन पार्श्वभूमी साहित्य हे केवळ कल्पनाविलासाचे माध्यम नसून ते मानवी संवेदना, मूल्ये आणि जगण्याच्या अनुभवांचा परिपक्व आरसा असते. सुप्रसिद्ध लेखक व कवी शिक्षक अनिल भगवान चव्हाण (ABC) यांनी आपल्या प्रदीर्घ साहित्यिक प्रवासातून हीच भूमिका सातत्याने मांडली आहे.२०११ मध्ये प्रकाशित झालेला ' दिपस्तंभाचे आधारस्तंभ' हा त्यांचा पहिला वैचारिक ग्रंथ प्रकाशित झाला २०१२ मध्ये आलेला 'स्वयंप्रकाशित व्हा..!' हा काव्यसंग्रह.२०२३ मध्ये वाचकांच्या पसंतीस उतरलेली 'ABC डायरी'.आणि २०२६ मध्ये वाचकांच्या भेटीस आलेला 'शोध सुखाचा' हा कथासंग्रह या अनुक्रमाने पाहता, अनिल चव्हाण सर यांची लेखणी ही वैचारिकतेकडून काव्यात्मकतेकडे आणि तिथून पुढे समृद्ध ललित अनुभूतीकडे अधिक परिपक्व होत गेल्याचे स्पष्ट दिसते. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि 'एम.ए. (राज्यशास्त्र)' या अभ्यासू पार्श्वभूमीमुळे त्यांच्या लेखनात सामाजिक दृष्टी, मानवी वर्तनाचे सूक्ष्म निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी प्रगल्भता आपसूकच उतरली आहे.'शोध सुखाचा' : मुख्य आशयसूत्र आणि निरूपण
'शोध सुखाचा' हा संग्रह केवळ वाचकाला रंजवण्यासाठी लिहिलेला नसून, तो आजच्या धावपळीच्या युगात माणसाला स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून पाहायला लावणारा एक तत्त्वज्ञानात्मक दस्तऐवज आहे. पुस्तकात एकूण २६ ललित लेखांच्या माध्यमातून मानवी आयुष्याचे अनेकविध रंग उलगडले आहेत.पुस्तकाची सुरुवातच 'सुख म्हणजे काय..?' आणि 'पैसा आणि सुख' यांसारख्या मौलिक प्रश्नांवर चिंतन करून होते. भौतिक गोष्टींच्या मागे पळणाऱ्या माणसाला खऱ्या सुखाची आणि समाधानाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.
*भावभावना* : 'विश्वास नावाच झाड', 'प्रेमाची ताकद...', आणि 'बाप नावाचा माणूस...' यांसारख्या लेखांमधून नात्यांमधील ओलावा, त्याग आणि एकमेकांवर असणारा विश्वास अत्यंत तरल शब्दांत व्यक्त झाला आहे.वास्तवता आणि *जीवनसंघर्ष* : लेखकाने केवळ सकारात्मकतेचे काल्पनिक चित्र रंगवले नाही, तर 'आत्महत्येचा विचार...', 'डिप्रेशन नंतर.... ?', 'पडझडीनंतरच आयुष्य...' आणि 'भुकेची आग आणि भूत' यांसारख्या विषयांना हात घालून मानवी दुःखाची, अपयशाची आणि मानसिक संघर्षाची धगधगती वास्तव बाजूही तितक्याच संवेदनशीलतेने मांडली आहे.ते इथेच थांबत नाही तर ते ,रूपकात्मकता आणि निसर्गदृष्टीकडे ही वळतात 'कर्म नावाच्या झाडाची फळं... 'सुगरण...' 'सुखावणारा पाऊस...' या लेखांमधून लेखकातील कवी आणि निसर्गप्रेमी जागा होतो. निसर्गातील विविध घटकांचा आधार घेत मानवी जीवनातील कर्माचा सिद्धांत आणि जगण्याची जिद्द यावर भाष्य केले आहे.
*भाषाशैली व वाङ्मयीन वैशिष्ट्ये*
अनुभवातून आलेली प्रगल्भता हा लेखसंग्रह केवळ कल्पनेवर आधारित नसून, लेखकाच्या स्वतःच्या जगण्याच्या आणि निरिक्षणाच्या समृद्ध अनुभवांवर अधिष्ठित आहे.यात
ओघवती आणि थेट संवाद साधणारी भाषा लेखकाची भाषाशैली अत्यंत सोपी, प्रांजळ आणि वाचकाच्या मनाला थेट भिडणारी आहे. कोणताही क्लिष्टपणा न ठेवता सोप्या दृष्टांतांमधून तत्त्वज्ञान मांडणे हे या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.या कथासंग्रहास आत्मचिंतनाची जोड आहे प्रत्येक लेख वाचल्यानंतर वाचक आपोआपच स्वतःच्या जगण्याचा विचार करू लागतो, हीच या संग्रहाची सर्वांत मोठी फलश्रुती आहे.
या संग्रहाला लाभलेली ज्येष्ठ साहित्यिक प्रा. छाया बोरकर यांची प्रस्तावना पुस्तकाचे वाङ्मयीन मूल्य द्विगुणित करते. १० पुस्तकांच्या लेखिका आणि 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण' पुरस्कारासह १५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या प्रा. छाया बोरकर यांच्यासारख्या प्रगल्भ समीक्षकाची दाद मिळणे, ही या पुस्तकाची आणि लेखकाची खूप मोठी वाङ्मयीन उंची दर्शवते.
साहित्य सेवा प्रकाशन (छत्रपती संभाजी नगर) यांनी अत्यंत देखण्या व नेटक्या स्वरूपात हा संग्रह वाचकांपर्यंत पोहोचवला आहे.थोडक्यात सांगायचे तर, 'शोध सुखाचा' हे पुस्तक वाचकाला सुखाचा बाह्य शोध थांबवून, स्वतःच्या आत डोकावून शाश्वत समाधानाचा मार्ग शोधण्यास प्रवृत्त करते. संवेदनशील वाचक, अभ्यासू आणि साहित्यप्रेमींसाठी अनिल भगवान चव्हाण (ABC) यांची ही एक अत्यंत मौल्यवान आणि संग्रहणीय वाङ्मयीन भेट आहे.सुप्रसिद्ध लेखक कवी अनिल चव्हाण चव्हाण (ABC ) यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा..!”
पुस्तकं परिचय
पुस्तक:'शोध सुखाचा '
लेखक: अनिल भगवान चव्हाण (ABC)
संपर्क -8806379959
प्रस्तावना: प्रा. छाया बोरकर
प्रकाशक: साहित्य सेवा प्रकाशन, छत्रपती संभाजी नगर
किंमत -१३० रुपये
समीक्षक - विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
मो.नं -7350956344
आपली प्रत आताच बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
https://wa.me/918806379959?text=नमस्कार!%20मला%20'शोध%20सुखाचा'%20हे%20पुस्तक%20खरेदी%20करायचे%20आहे.%20कृपया%20ऑर्डरची%20माहिती%20द्या
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
आपण जसं आहोत तसं जगण्यात खरचं खूप समाधान लपलेलं आहे नाही तर दिखावा करण्यात त्या माणसाला एवढा त्रास होतो की त्याला त्यातून दुःखाशिवाय काहीच मिळत नाही म्हणूनचं म्हटल जातं की जे आपल्याकडे आहे त्यात सुखी राहता आलं की जे आपल्याकडे नाही त्याच दुःख आपल्याल कधीच होणार नाही कारण आपण जसे आज आहोत तसं जीवन जगण्याचं कित्येकाचं स्वप्नं असू शकते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
"लॉर्डचा राजाची यशोगाथा"(नक्की पूर्ण वाचा✍)
जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्न,शंका उपस्थित केल्या जातात तेव्हा त्याला कसे टोलवायचे हे रोहित शर्माने आपल्या खेळातून दर्शवले🔥संघर्षाच्या काळात कसे मैदानावर खंबीर उभे राहायचे व बाहेर चालू असलेल्या तुमच्याबद्दलच्या चर्चेला स्वकार्यातून कसे शांततेत उत्तर द्यायचे हे शिकवले💪दडपणाखाली तर सर्वच व्यक्ती(खेळाडू)जातात पण त्यातून जो स्वतःचा मार्ग तयार करून पुढे जातो तोच खरा खेळाडू🫡इतरांना लाजवेल अशी त्यांची खेळी.सोपे नसते बाहेर एवढ्या तुफान चर्चा चालू असताना स्वतःला त्या गोष्टींपासून दूर ठेवून आपल्या कार्यावर लक्ष बिंबवून चालणे✍हे कार्य कठीण आहे पण अशक्यही नाही हे दाखवून दिली आणि लॉर्डच्या मैदानावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतका झळकवण्याच्या पहिला मानही मिळवला..संघर्षात दम असेल तर इतिहासालाही आपली नोंद घ्यावी लागते🔥हे दिमाखात यश मिळवल्यासारखेच..हेच खरे प्रतिउत्तर त्या सर्व शंकांचे जे ध्येयापासून दूर करतात..खरंच हा प्रवास खूप काही शिकवून जातो!
......🦋🌺✍🙏.....
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
लेखक अनिल भगवान चव्हाण(ABC) यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित..! https://youtu.be/CQZA-aQAdMM?si=qnVV8lDeFltI_HKp
Lakshatara_News लक्षतारा_न्यूज चॅनेल
📌वरील लिंकवरून आजच News पहा.
✓आपल्या भागातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा मोबाईल नंबर : 9860713396
नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आपला "लक्षतारा News" चॅनेल सबस्क्राईब, लाईक, 🛎️करा.
+2
पुस्तकाची किंमत..
“अलीकडच्या काळात एका विद्यार्थ्यांने मला ही दोन पुस्तकं दिली. खरतर ही पुस्तकं जुनी आहेत त्या विद्यार्थ्यांने ही वाचली पण त्याला यातलं काही समजलं नसावं.. त्याला एका मुलाने सांगितलं की, “ही पुस्तकं तूझ्या काही कामी नाही तू हे चव्हाण सरला दे!”आणि त्याने ही पुस्तकं माझ्याकडे दिली.. खरं सांगायचं तर ह्या पुस्तकाची माझ्या पेक्षा अधिक कोणीच जाणू शकतं नाही.. कधी काळ असा होता की, अशी पुस्तकं घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे,असे पुस्तकं मला विकत घ्यावं वाटतं होते पण पैसेच नसल्याने ते विकत घेता आले नाही.. पर्यायाने कधी कधी मला स्पर्धा परीक्षेत अपयशाला समोर जावं लागलं.. पण आता वेळ अशी आली की,कधीकाळ पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसणारा मी माझी स्वतः ची स्वालिखित चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालीत आणि माझी पुस्तकं आता लोकं विकत घेत आहे.. आता पाचवे पुस्तकं सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आलं आहे.. खरच पुस्तकाची किंमत त्यालाच समजू शकते जो ज्ञान आणि शिक्षणाच मूल्य जाणतो.. ही पुस्तकं माझ्यासाठी खूप किंमती आहे.. मला ही पुस्तकं देणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचे आभार.”
✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक )
