uk
Feedback
प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

Відкрити в Telegram

📚 दररोज प्रेरणादायी लेख 💡 सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स 🌱 व्यक्तिमत्त्व विकास ✨ सुंदर सुविचार आणि मराठी साहित्य 🎯 स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी चॅनेल जॉईन करा. https://t.me/PreranadayiVyaktimatva जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤

Показати більше
5 867
Підписники
-524 години
+167 днів
+830 день
Залучення підписників
липень '26
липень '26
+72
в 1 каналах
червень '26
+89
в 1 каналах
Get PRO
травень '26
+100
в 2 каналах
Get PRO
квітень '26
+99
в 1 каналах
Get PRO
березень '26
+44
в 1 каналах
Get PRO
лютий '26
+60
в 1 каналах
Get PRO
січень '26
+69
в 2 каналах
Get PRO
грудень '25
+57
в 0 каналах
Get PRO
листопад '25
+47
в 0 каналах
Get PRO
жовтень '25
+50
в 0 каналах
Get PRO
вересень '25
+50
в 0 каналах
Get PRO
серпень '25
+63
в 0 каналах
Get PRO
липень '25
+69
в 0 каналах
Get PRO
червень '25
+51
в 0 каналах
Get PRO
травень '25
+95
в 1 каналах
Get PRO
квітень '25
+92
в 0 каналах
Get PRO
березень '25
+105
в 0 каналах
Get PRO
лютий '25
+131
в 0 каналах
Get PRO
січень '25
+277
в 3 каналах
Get PRO
грудень '24
+352
в 0 каналах
Get PRO
листопад '24
+329
в 0 каналах
Get PRO
жовтень '24
+394
в 0 каналах
Get PRO
вересень '24
+385
в 2 каналах
Get PRO
серпень '24
+488
в 1 каналах
Get PRO
липень '24
+724
в 1 каналах
Get PRO
червень '24
+634
в 0 каналах
Get PRO
травень '24
+619
в 1 каналах
Get PRO
квітень '24
+632
в 0 каналах
Get PRO
березень '24
+724
в 0 каналах
Get PRO
лютий '24
+697
в 1 каналах
Get PRO
січень '24
+665
в 0 каналах
Get PRO
грудень '23
+393
в 1 каналах
Get PRO
листопад '23
+42
в 0 каналах
Get PRO
жовтень '23
+58
в 0 каналах
Get PRO
вересень '23
+82
в 0 каналах
Get PRO
серпень '23
+123
в 0 каналах
Get PRO
липень '23
+187
в 0 каналах
Get PRO
червень '23
+162
в 0 каналах
Get PRO
травень '23
+37
в 0 каналах
Get PRO
квітень '23
+24
в 0 каналах
Get PRO
березень '23
+23
в 0 каналах
Get PRO
лютий '23
+47
в 0 каналах
Get PRO
січень '23
+40
в 0 каналах
Get PRO
грудень '22
+23
в 0 каналах
Get PRO
листопад '22
+20
в 0 каналах
Get PRO
жовтень '22
+11
в 0 каналах
Get PRO
вересень '22
+25
в 0 каналах
Get PRO
серпень '22
+220
в 0 каналах
Дата
Залучення підписників
Згадування
Канали
11 липня+4
10 липня+1
09 липня+11
08 липня+8
07 липня+4
06 липня+7
05 липня+7
04 липня+8
03 липня+6
02 липня+12
01 липня+4
Дописи каналу
2
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
109
3
अनुभवाशिवाय ज्ञान अपूर्ण का ठरतं...?? 👉🏻 मित्रांनो, आजच्या काळात ज्ञान मिळवणे खूप सोपे झाले आहे... इंटरनेटवर लाखो लेख उपलब्ध आहेत, हजारो पुस्तके आहेत, असंख्य व्हिडिओ आहेत. कोणत्याही विषयाची माहिती तुम्ही अगदी काही मिनिटांत मिळू शकता. पण एक प्रश्न स्वतःला विचारून पाहा माहिती म्हणजेच ज्ञान का..?? आणि ज्ञान म्हणजेच अनुभव का..?? उत्तर आहे.....नाही 👉🏻 पुस्तकी ज्ञान तुम्हाला एखादी गोष्ट काय आहे हे सांगते, पण अनुभव तुम्हाला ती गोष्ट कशी जगायची हे शिकवतो... उदाहरणार्थ, 📌 पाण्यात पोहायचे कसे यावर शंभर पुस्तके वाचली तरी पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही... 📌 स्वयंपाकाच्या शेकडो रेसिपी पाठ असल्या तरी प्रत्यक्ष स्वयंपाक केल्याशिवाय चवदार जेवण बनत नाही... 📌 गाडी चालवण्याचे नियम वाचून समजतात, पण रस्त्यावर गाडी चालवताना मिळणारा आत्मविश्वास हा फक्त अनुभवातूनच मिळतो. म्हणूनच अनुभवाला पर्याय नाही... 👉🏻 आज खुप लोक पुस्तके वाचून, इंटरनेटवरील माहिती एकत्र करून किंवा इतरांचे विचार कॉपी करून लेख लिहितात, पुस्तके लिहितात,भाषणे देतात किंवा लोकांना मार्गदर्शन करतात. त्यात माहिती असते, शब्द असतात, उदाहरणेही असतात पण त्यात जिवंतपणा नसतो. कारण त्या शब्दांमागे त्यांचा स्वतःचा काहीच अनुभव नसतो... 👉🏻 पुस्तकी ज्ञान कोणालाही देता येते. पुस्तक वाचून त्यातील माहिती कॉपी करून कोणीही लेख लिहू शकते. पण अनुभवातून लिहिलेला प्रत्येक शब्द वेगळा असतो. त्यात सत्य असते, संघर्ष असतो, यश-अपयशाची चव असते आणि म्हणूनच तो थेट वाचकांच्या मनाला स्पर्श करतो... 👉🏻 जेव्हा एखादा शेतकरी शेतीबद्दल बोलतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक शब्दामागे वर्षानुवर्षांचा अनुभव असतो... एखादा उद्योजक व्यवसायाबद्दल सांगतो, तेव्हा त्याच्या यशाइतकेच त्याचे अपयशही त्याला शिकवून गेलेले असते. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, तेव्हा त्याने हजारो विद्यार्थ्यांसोबत केलेल्या कामाचा अनुभव त्याच्या शब्दांना वजन देतो... म्हणून अनुभवातून आलेले ज्ञान अधिक प्रभावी, अधिक विश्वासार्ह आणि अधिक उपयोगी ठरते... याचा अर्थ पुस्तके महत्त्वाची नाहीत का...??? बघा... पुस्तके महत्वाची आहेत... 👉🏻 पुस्तके ही ज्ञानाची दारे उघडतात. ती विचार करायला शिकवतात. चुका टाळायला मदत करतात. नवीन कल्पना देतात. अनेक महान व्यक्तींच्या आयुष्याचा प्रवास आपल्या समोर आणतात. पण पुस्तक वाचून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरले नाही, तर ती फक्त माहिती राहते...📚 ज्ञानाचे रूपांतर शहाणपणात करण्याचे काम अनुभव करतो... 👉🏻 म्हणूनच प्रत्येकाने वाचन करावे, पण त्याचबरोबर कृतीही करावी. कारण कृतीशिवाय अनुभव मिळत नाही आणि अनुभवाशिवाय व्यक्तिमत्त्व पूर्ण होत नाही... आज सोशल मीडियाच्या काळात अनेक लोक प्रेरणादायी पोस्ट लिहितात. काहीजण यशाचे सूत्र सांगतात, काहीजण जीवनावर मोठमोठ्या गोष्टी लिहितात. पण त्या शब्दांमध्ये स्वतःचे जगलेले आयुष्य नसेल, तर ते शब्द काही वेळासाठी प्रभाव टाकतील मात्र कायमस्वरूपी प्रेरणा देऊ शकणार नाहीत... 📌 लोकं यशस्वी व्यक्तींची पुस्तके का वाचतात..?? 👉🏻 कारण त्या पुस्तकांमध्ये केवळ सिद्धांत नसतात तर प्रत्यक्ष आयुष्यातील संघर्ष, चुका, अपयश, निर्णय आणि त्यातून मिळालेले धडे असतात. अशा पुस्तकांमधून वाचकाला फक्त माहिती मिळत नाही, तर दिशा मिळते... म्हणूनच अनुभव घेण्यासाठी पुस्तके वाचा पण अनुभव देणारे पुस्तक वाचा... अशा पुस्तकांची निवड करा जी लेखकाने स्वतःच्या आयुष्यातील संघर्षातून लिहिली आहेत. ज्यात फक्त उपदेश नाही, तर प्रत्यक्ष जगलेले आयुष्य आहे. कारण अनुभवातून लिहिलेले पुस्तक तुमचा वेळ वाचवते, चुका कमी करते आणि पुढे जाण्याची हिंमत देते... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इतरांचा अनुभव कितीही मौल्यवान असला, तरी तुमचा स्वतःचा अनुभव सर्वात मोठा गुरु असतो... 👉🏻 जीवनात पडाल, चुका कराल, अपयशी व्हाल, पुन्हा उभे राहाल याच गोष्टीतुन प्रक्रियेतून तुमची खरी प्रगती होईल. कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला असे काही शिकवतो, जे कोणतेही पुस्तक पूर्णपणे शिकवू शकत नाही... म्हणून ज्ञान मिळवा, भरपूर वाचा, नवीन गोष्टी शिका पण त्या प्रत्यक्ष कृतीत आणा. 👉🏻 कारण ज्ञानाला कृतीची जोड मिळाली की अनुभव जन्माला येतो, आणि अनुभवातूनच आत्मविश्वास, शहाणपण आणि यशाचा मजबूत पाया तयार होतो... 👉🏻 पुस्तके तुम्हाला मार्ग दाखवतात, पण त्या मार्गावर चालण्याची हिंमत अनुभव देतो... माहिती तुमच्या मेंदूत साठते, पण अनुभव तुमच्या व्यक्तिमत्त्वात उतरतो. म्हणून फक्त पुस्तके वाचणारे बनू नका...अनुभव जगणारे बना... कारण जगाला केवळ माहिती सांगणाऱ्या लोकांची गरज नाही, तर अनुभवातून बोलणाऱ्या आणि कृतीतून प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची गरज आहे...💫 धन्यवाद.... 🙏🏻🌹😇 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ 9545441697
316
4
Немає тексту...
305
5
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
335
6
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
62
7
जीवनाचा आनंद घ्या... प्रत्येक दिवस मनापासून जगा...💞 मित्रांनो, या जगात प्रत्येक सजीवाला जीवन एकदाच मिळते. त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाने, उत्साहाने आणि सकारात्मक विचारांनी जगण्याचा प्रयत्न करा... 👉🏻 आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख येत असते. कोणाचेही जीवन कायम आनंदी किंवा कायम दुःखी नसते... परिस्थिती सतत बदलत असते आणि माणसालाही त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो. म्हणून प्रत्येक संकटाकडे शेवट म्हणून न पाहता, नवीन सुरुवातीची संधी म्हणून पाहायला शिका... आज अनेक तरुण स्वतःच्या, घरच्या परिस्थितीमुळे निराश होतात...काही जण म्हणतात 1)सर, आम्ही गरीब आहोत. 2) आमच्याकडे शेती नाही. 3)घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. 4) आम्हाला मार्गदर्शन करणारे कोणी नाही. 👉🏻 मित्रांनो, या गोष्टींवर आयुष्यभर रडत बसल्याने तुम्हाला काही ही मिळणार नाही आणि काहीही बदलणार नाही. परिस्थितीपेक्षा तुमचा दृष्टिकोन आणि कृती तुमचे भविष्य घडवतात... 👉🏻 आपल्या आई-वडिलांना कधीच दोष देऊ नका. त्यांनी तुम्हाला श्रीमंती दिली नसेल, पण आयुष्य दिले आहे. स्वतः अनेक अडचणी सहन करून त्यांनी तुम्हाला मोठे केले आहे. प्रत्येक आई-वडिलांची एकच इच्छा असते, त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा मोठी व्हावीत, यशस्वी व्हावीत आणि आनंदी राहावीत. 👉🏻 त्यामुळे त्यांच्या परिस्थितीची थट्टा करू नका. त्यांच्या कष्टांचा आदर करा आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या... 👉🏻 मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला जन्म कोणत्या घरात झाला, हे आपल्या हातात नसते पण आयुष्यात आपल्याला काय बनायचं, हे पूर्णपणे आपल्या हातात असते... इतिहासात आणि वर्तमानात अशी असंख्य उदाहरणे आहेत, ज्यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून सुरुवात करून मोठे यश मिळवले आहे... त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण जिद्द होती. मोठे संपर्क नव्हते, पण मेहनत करण्याची तयारी होती... 👉🏻 मेहनतीला पर्याय नाही. नशीब कधी साथ देईल, कधी देणार नाही पण सातत्याने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही.... दररोज काहीतरी नवीन शिका. चांगली पुस्तके वाचा, नवीन कौशल्य आत्मसात करा, सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा आणि स्वतःमध्ये दररोज थोडी सुधारणा करा... एका दिवसात मोठे यश मिळत नाही पण रोज केलेली छोटी प्रगती एक दिवस मोठा बदल घडवते... 👉🏻 आज भारतात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे फक्त पदवी घेऊन चालत नाही. संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, वेळेचे नियोजन, आत्मविश्वास, शिस्त, तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि सतत शिकण्याची वृत्ती असणे अत्यंत आवश्यक झाले आहे... जो स्वतःला बदलतो आणि काळानुसार शिकत राहतो, तोच पुढे जातो... 👉🏻 कधीही स्वतःची तुलना इतरांशी करू नका. सोशल मीडियावर दिसणारे प्रत्येक यश खरे असेलच असे नाही. प्रत्येकाचा संघर्ष, प्रत्येकाचा प्रवास आणि परिस्थिती वेगवेगळी असते...त्यामुळे दुसऱ्यांचे आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका... जर कालच्या तुलनेत आज तुम्ही थोडे चांगले बनत असाल, तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात... असं समजा... 👉🏻 तक्रारी करण्यापेक्षा उपाय शोधायला शिका. अनेक लोक संधीची वाट पाहत बसतात, तर काही लोक स्वतःच संधी निर्माण करतात... तुम्ही कोणत्या गटात राहणार, हा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे... अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण त्यांच्यावर मात करणारेच इतिहास घडवतात... 👉🏻 मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचे जीवन बदलण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे. जेव्हा तुम्ही स्वतः बदलता, तेव्हा तुमचे कुटुंब बदलते. तुमच्या यशामुळे तुमचे मित्र प्रेरित होतात, समाजात सकारात्मक विचार निर्माण होतात आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होतो... म्हणून फक्त स्वतःसाठी यशस्वी होऊ नका तर इतरांसाठीही प्रेरणा बना...💫 आजपासून एक निर्णय घ्या... 📌 मी परिस्थितीला दोष देणार नाही... 📌 मी आई-वडिलांवर नाराज होणार नाही... 📌 मी अपयशामुळे खचणार नाही... 📌 मी दररोज काहीतरी नवीन शिकणार... 📌 प्रामाणिकपणे मेहनत करणार आणि स्वतःला कालपेक्षा अधिक चांगला माणूस बनवणार... 👉🏻 कारण शेवटी यशस्वी तोच होतो, जो परिस्थिती बदलण्याची वाट पाहत नाही तर स्वतः बदलण्याचा निर्णय घेतो. मित्रांनो, जीवन एकदाच मिळते. ते फक्त जगू नका, तर अशा पद्धतीने जगा की तुमच्या यशामुळे तुमचे आई-वडील अभिमानाने हसतील, समाजाला प्रेरणा मिळेल आणि तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस अर्थपूर्ण ठरेल.... 👉🏻 आनंदाने जगा... मनापासून मेहनत करा... स्वतःवर विश्वास ठेवा... कारण तुमचे भविष्य आज तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर अवलंबून आहे... जीवन बदलण्यासाठी अनेक वर्षांची गरज नसते... एका योग्य निर्णयाची गरज असते. तो निर्णय आजच घ्या...👍🏻 धन्यवाद... 🙏🏻🌹😇 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ 9545441697
652
8
Немає тексту...
558
9
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
67
10
👉🏻 जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःचा स्वीकार करता आणि स्वतःचा आदर करता, तेव्हा जगही तुमच्यावर प्रेम करायला लागते...
👉🏻 जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःचा स्वीकार करता आणि स्वतःचा आदर करता, तेव्हा जगही तुमच्यावर प्रेम करायला लागते...💖 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
661
11
https://nddipake.blogspot.com/2026/07/100.html
737
12
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
7
13
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
69
14
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
28
15
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
59
16
https://nddipake.blogspot.com/2026/07/blog-post.html
841
17
माती शेतातली असो की मनाची यात तेच उगवत जे आपण पेरतो म्हणजे बघा आपण जेवढ दर्जेदार बी टाकतो तेवढंच चांगलं झाड निर्माण होतं हेच
माती शेतातली असो की मनाची यात तेच उगवत जे आपण पेरतो म्हणजे बघा आपण जेवढ दर्जेदार बी टाकतो तेवढंच चांगलं झाड निर्माण होतं हेच तत्व आपल्या विचारांना लागू पडत जेवढे चांगले आपण विचार करू शकतो तेवढी आपली चांगली मानसिकता बनू शकते फक्त आपण आपल्याला चांगल्या विचाराशी किती प्रामाणिक राहतो यावर आपलंच वर्तमान आणि भविष्य ठरतं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
689
18
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
204
19
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
83
20
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
212