Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 206
المشتركون
-124 ساعات
-167 أيام
-8930 أيام
أرشيف المشاركات
4 206
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. प्रकृती अस्वस्थ असल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अण्णा हजारे यांना लवकर आराम पडावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. “अण्णा, तुम्ही शतायुषी व्हा,” अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना दिली. यावेळी त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले.
#Maharashtra #Mumbai #AnnaHazare
4 206
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मंत्रालय, मुंबई येथे आज राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर तसेच आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सीमाताई हिरे, आमदार अनुराधाताई चव्हाण आणि राज्यातून आलेल्या इतर लाडक्या बहिणींनी आपुलकीने राखी बांधली.
या प्रेमासाठी आणि जिव्हाळ्यासाठी मनःपूर्वक आभार! 🙏
#Maharashtra #Mumbai
4 206
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला.
महाराष्ट्रातील जमीन आणि महसूलविषयक सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी 'महाभूमी स्टॅक'च्या माध्यमातून डिजिटल व्यवस्थेला बळकटी देण्यात येत आहे. जमिनीचे अभिलेख, फेरफार प्रक्रिया तसेच विविध महसूल सेवा एका डिजिटल परिसंस्थेत आणून नागरिकांना जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. सर्व विखुरलेल्या प्रणालीचे एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाभूमी स्टॅक प्रणाली अभिलेखांचे डिजिटल भांडार
✅ 3.5 कोटींहून अधिक अधिकार अभिलेख (7/12 व 8-अ)
✅ 1.5 कोटीहून अधिक भू-नकाशे व मिळकत पत्रिका
✅ 40 कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख
✅ नोंदणी विभागाचे दस्त क्र. 2 (Index-II) च्या प्रती व महसूल न्यायालयीन प्रकरणांची अद्ययावत स्थिती
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 206
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the issues of the sale of loose edible oil in the state.
DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Narhari Zirwal, other members from the cabinet, senior officials and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात सुटे खाद्य तेल विक्रीच्या प्रश्नांसंदर्भात बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्रिमंडळातील इतर सदस्य, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में राज्य में खुले खाद्य तेल की बिक्री के संदर्भ में बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री नरहरी झिरवाल, मंत्रिमंडल के अन्य सदस्य, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕒 2.55pm | 1-9-2026📍Mantralaya, Mumbai | दु. २.५५ वा. | १-९-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
