uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 114
Obunachilar
+224 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
-3830 kun
Postlar arxiv
photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis in conversation at the 'News18 Rising Bharat Summit' on ‘The Next Growth Leap’. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'न्यूज18 रायझिंग भारत समिट' मध्ये 'द नेक्स्ट ग्रोथ लीप' या विषयावर संवाद. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका ‘न्यूज़18 राइजिंग भारत समिट’ में 'द नेक्स्ट ग्रोथ लीप' इस विषय पर संवाद। 🕛 11.50am | 28-10-2026📍Mumbai | स. ११.५० वा. | २८-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #RisingBharatSummit

Today's News_28-10-2026 .pdf1.97 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | News 18 Rising Bharat Summit 🕛 11.48am | 28-10-2026📍Mumbai. #Maharashtra #Mumbai #RisingBharatSummit https://www.youtube.com/live/OzTpkLJBfrM?si=enh6uLZ_EIBWUcaI https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1512843130676193 https://x.com/Dev_Fadnavis/status/2115327455682596917?a=RQ9uJd73VrKsAA8QCuY&s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा 2027 पवित्र ध्वजारोहण सोहळा 31 ऑक्टोबर 2026, राम तीर्थ, नाशिक आणि कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकेश्वर #Maharashtra #DevendraFadnavis #SimhasthaMahakumbh #NashikKumbhMela

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Golden Punch for India! 🥇🇮🇳 Heartiest congratulations to Aditya on clinching the Gold Medal at the World Boxing U19 Championships 2026 in Montenegro. His 4–1 victory over Russia’s Islam Magomedov in the men’s 55 kg final marks India’s first gold medal at this edition of the championships. Wishing him continued success in the years ahead! #U19WorldBoxingChampionships #IndianBoxing #Cheer4India

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Hero Honoured Beyond Borders! 🇮🇳 Heartiest congratulations to Captain Smit Machchhar and the flydubai crew on being conferred the prestigious First Class Order of Zayed II by UAE President H.H. Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan. The honours were presented by Crown Prince H.H. Sheikh Hamdan bin Mohammed Al Maktoum. A proud moment for Mumbai and the entire nation indeed! #IndiaUAE #Bravery

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: आदिवासी बांधवांचे शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन व पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे आदिवासी समाजाचे शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार नोंदणी आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली. आदिवासी समाजाचे शिक्षण, वनहक्क, पुनर्वसन, पाणीपुरवठा, आधार नोंदणी आणि कामगार कल्याणाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सकारात्मक कार्यवाही करीत आहे. संबंधित विभागांनी समन्वयाने प्रस्ताव व कालबद्ध कृती आराखडे तयार करून कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. विकसित भारत 2047 व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या प्रक्रियेत श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेला सहभागी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच, आदिवासी समाजाच्या विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करताना विविध संघटनांच्या सूचनांचा समावेश करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. आदिवासी विद्यार्थ्यांना 18 वर्षांपर्यंत मोफत, सक्तीचे शिक्षण देण्याच्या अधिकाराबाबत तपासून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. आदिवासी विद्यार्थ्यांना शुल्कमुक्त शिक्षण आणि पुरेशी शिष्यवृत्ती देणे, आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरणे तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. पात्र वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी 15 डिसेंबर 2026 पर्यंत विशेष मोहीम आयोजित करण्यात येणार आहे. या मोहिमेत सामूहिक वैयक्तिक ग्रामस्तरीय समितीने मंजूर केलेले दावे निकाली काढण्यात येतील. कुठलाही दावा प्रलंबित राहता कामा नये असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. पालघर जिल्ह्यातील पिढ्यान्-पिढ्या जमीन कसणाऱ्या, मात्र कायदेशीर नोंदीअभावी हक्कापासून वंचित असलेल्या कुटुंबांच्या प्रश्नावर महसूल विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील वेठबिगारीतून मुक्त झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांच्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा. आधार कार्ड नसलेल्या आदिवासी नागरिकांच्या जिल्हानिहाय याद्या तयार करून प्रत्येक पात्र व्यक्तीला आधार कार्ड मिळण्यासाठी प्रशासनाने कालबद्ध मोहीम राबवावी. आदिवासी तसेच भटके-विमुक्त समुदायांसाठी जन्मनोंदणी दाखला देण्याचे अधिकार तहसीलदारांना पुन्हा देण्याबाबत सरकार सकारात्मक कार्यवाही करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका 12-अ साडेतीन वर्षात पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219716/ नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219720/ मंत्रिमंडळ निर्णय https://mahasamvad.in/219739/ दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219792/ #Maharashtra #DevendraFadnavis

CMO Maharashtra Tweets: दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे अखिल भारतीय किसान सभेच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. सध्या राज्यात असलेल्या संघर्षमय दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. राज्य सरकारच्या मदतीतून हा दुष्काळाचा संघर्ष निश्चितच कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अडचणीत असलेल्या उपसा सिंचन योजनांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, या निर्णयाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ₹5000 ची अग्रिम मदत देण्यात येईल. या अग्रिमामुळे शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार आहे. दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून चारा उपलब्ध करून देण्यास सरकारचे प्राधान्य आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना देण्यात येतील. नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहनपर ₹50,000 चे अनुदान देत आहे. या अनुदानात वाढ करण्याबाबत कर्जमाफीसाठी गठित मंत्रिगट चर्चा करेल आणि आर्थिक परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल. नवीन पीक कर्ज देताना सिबिलची अट ठेवू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांना पत्र देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांना थकीत हप्ता तातडीने देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवीन लाभार्थी तसेच ई-केवायसी न झालेल्या आदिवासी भागातील महिलांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल. महिलांसाठी योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक महिलांना लाभ दिला जात आहे. पीक विम्यासाठी पूर्वी लागू असलेले ट्रिगर पुन्हा सुरू करण्याबाबत संबंधित विभागामार्फत तपासणी करून निर्णय घेण्यात येईल. बाळ हिरड्याची आदिवासी विकास महामंडळामार्फत होणारी खरेदी पूर्ववत करावी आणि या उत्पादनाचा किमान आधारभूत दरामध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दरमहा ₹2500 मानधनात ₹1000 ची वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. पेसा गावांतील मोबिलायझर महिलांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत ग्रामविकास विभागाने तपासणी करून कार्यवाही करावी. संबंधित ग्रामसभांशी चर्चा करून विद्यमान शासन निर्णयांचे एकत्रीकरण करावे आणि दीर्घकालीन विचारातून समर्पक शासन निर्णय काढावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्राम रोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्याबाबत विभागाने तपासून कार्यवाही करावी. केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्यानुसार बांधकाम कामगारांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांचे स्वरूप निश्चित करावे. त्यांच्यासाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना सुरू करण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे. वर्धा जिल्ह्यात कृषी पंपाच्या वीजजोडणीसाठी मागणीपत्र भरूनही जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांची तपासणी करून कार्यवाही करावी. सौरऊर्जेवर आधारित कृषी पंप कार्यान्वित केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचीही सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai