ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 114
Подписчики
+124 часа
+47 дней
-3530 дней
Архив постов
CM Shri Devendra Fadnavis Tweets: Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj Memorial: A Legacy of Devotion, Reform and Inspiration Chaired a meeting regarding the development plan for the national memorial of Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, Anjangaon Surji taluka, Amravati district in Mumbai today. Approved the ₹80.26 crore development plan for the national memorial dedicated to Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, marking a significant step towards preserving Maharashtra’s rich spiritual and cultural heritage. Maharaj carried forward the legacy of Sant Gadge Baba and Rashtrasant Tukdoji Maharaj through social reform, the eradication of superstition and the propagation of religion and social awareness. The memorial will preserve the rich heritage of the Warkari Sampradaya and carry forward Shri Sant Rupalalji Maharaj’s enduring message of social reform and awakening to future generations. The development plan for the national memorial dedicated to Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj includes comprehensive religious, cultural and residential facilities for devotees and visitors. These will include a museum, Pothivachan and multipurpose halls, accommodation facilities, a hostel and spaces for religious and cultural programmes. These facilities will create a dedicated space for spiritual gatherings, cultural activities and accommodation for visiting devotees, while preserving Maharashtra’s rich spiritual heritage for upcoming generations. MLA Sanjay Kute and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai #WarkariSampradaya https://x.com/Dev_Fadnavis/status/2115812713935012051?a=rCDcpKTGXGn_yYNqCyo&s=20

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Driving Transparency in App-Based Mobility Chaired a meeting regarding the Maharashtra Motor Vehicle Aggregator Rules, 2026, at Varsha Bungalow in Mumbai today. Reviewed key issues in the aggregator sector, including passenger safety, independent taxi drivers’ concerns and transparency in ride allocation. Directed the development of an AI-powered digital platform to track vehicle and driver records, shifts and regulatory compliance, enabling better monitoring and prompt action. Instructed the Transport Department to examine ride-allocation algorithms to prevent discrimination and ensure fair opportunities for independent taxi drivers and fleet operators. Our focus is on passenger safety, fair opportunities for local drivers and transparent, technology-driven regulation to meet Maharashtra’s evolving mobility needs. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. #Maharashtra #Mumbai #Transport https://x.com/Dev_Fadnavis/status/2115811724062593306?a=h8NpRg4ulqtzfiorK3U&s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | Book Launch | 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई https://www.youtube.com/live/ulyHPIpT2hM?si=fw5a5m_AUsQC_sd2

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: धर्मध्वजातून जागृत होणारी आस्था… सनातन संस्कृतीचा गौरवशाली वारसा… आणि भक्तिभावाने सुरू होणाऱ्या एका दिव्य पर्वाचा मंगलमय प्रारंभ! 🙏🚩 #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Wardha, Vidarbha: ₹2100 Crore Investment to Drive Industrial Growth and Create Jobs The MoU between the Government of Maharashtra and Varun Beverages Ltd. proposes an investment of ₹2100 crore in an integrated FMCG and beverages manufacturing unit at MIDC, Arvi, Wardha, creating 550 direct jobs. The project will boost agro-industries, packaging, transport and cold-chain infrastructure, while generating demand for locally sourced fruits and milk. #Maharashtra #Mumbai #Investment https://x.com/Dev_Fadnavis/status/2115777212465226124?a=aeuZOvdSxdQ8R1L4BQk&s=20

CMO Maharashtra Tweets: श्री संत रूपलालजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक धार्मिक, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र ठरणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्यासंदर्भात बैठक पार पडली. हे स्मारक ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती येथे उभारण्यात येणार असून, सुमारे ₹80.26 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती चळवळीचा वारसा आणि श्री संत रूपलालजी महाराजांचे समाजप्रबोधनाचे विचार जतन होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अंजनगाव सुर्जी येथील मौजे जेठमलपूर येथे हे राष्ट्रीय स्मारक आकार घेणार आहे. या स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करावा. संत श्री गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या श्री संत रूपलालजी महाराज यांनी समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकास आराखड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाविक, वारकरी आणि पर्यटकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व निवासी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, वस्तुसंग्रहालय, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत, दिंडी सभागृह, वसतिगृह, चंद्रभागा इमारत, प्रवचन सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, निवासी खोल्या, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. या सुविधांमुळे धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, पोथीवाचन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासासह अन्य आवश्यक सुविधाही निर्माण केल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या स्मारकाच्या आराखड्यात मुख्य स्मारकासोबत शहानूर नदीवरील पूल, 2.40 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता, श्री संत रूपलालजी महाराजांचा पुतळा आणि अन्य पुतळ्यांच्या उभारणीचाही समावेश आहे. या कामांमुळे स्मारकापर्यंत पोहोचणे सुलभ होऊन परिसरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. हे राष्ट्रीय स्मारक धार्मिक श्रद्धेसह सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. आधुनिक व पर्यावरणपूरक सुविधांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra Tweets: ॲग्रीगेटर कंपन्यांसाठी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे महाराष्ट्र मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स, 2026 संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ॲग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहन संख्या, स्वतंत्र टॅक्सी चालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा आढावा घेतला. राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी ॲग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाचे तास याची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावा. या प्लॅटफॉर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जोड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियुक्ती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. वाहन आणि चालकांची संपूर्ण माहिती एका प्लॅटफॉर्मवर ॲग्रीगेटर कंपन्यांकडून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालविण्याचा परवाना, पोलीस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कोणता चालक कोणते वाहन चालवितो, याची अद्ययावत नोंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध होईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्लॅटफॉर्मवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने वाहनांचे संचालन, चालकांच्या पाळ्या आणि अन्य महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण करता येईल. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करणे शक्य होईल. प्रवास वाटपातील पारदर्शकतेसाठी अल्गोरिदमचे परीक्षण ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये स्वतंत्र टॅक्सीचालक आणि मोठ्या फ्लीट कंपन्यांच्या वाहनांना प्रवास वाटप करताना समान संधी मिळते की नाही, याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणत्या वाहनाला, कोणत्या कारणाने आणि कोणत्या निकषांवर प्रवास दिला जातो, याचे परीक्षण करता येणे आवश्यक आहे. प्रवास वाटपामध्ये भेदभाव होत असल्यास तो ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळण्यासोबतच स्थानिक चालकांना रोजगाराच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रवास वाटप आणि कंपन्यांच्या कामकाजावर तांत्रिक देखरेख या बाबींना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. राज्यातील ॲग्रीगेटर क्षेत्राचा विस्तार आणि प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी, सक्षम आणि गतिमान नियामक यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. स्वतंत्र टॅक्सी चालकांचे हित, प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्त यांचा समतोल राखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहन विभागाला दिले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the development plan for the national memorial of Shri Sant Shiromani Rupalalji Maharaj, Anjangaon Surji taluka, Amravati district. MLA Sanjay Kute and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखडा, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती संदर्भात बैठक. यावेळी आमदार डॉ. संजय कुटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखड़ा, तह. अंजनगांव सुर्जी, जिला अमरावती के संदर्भ में बैठक। इस अवसर पर विधायक डॉ. संजय कुटे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐1pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु.१ वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding the Maharashtra Motor Vehicle Aggregator Rules, 2026. Minister Pratap Sarnaik and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स, 2026 संदर्भात बैठक. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र मोटर व्हीकल एग्रीगेटर रूल्स, 2026 के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री प्रताप सरनाईक एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧 12.30pm | 29-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.३० वा. | २९-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Government of Maharashtra (Industries Investment and Services Department) and Varun Beverages Ltd. for establishing state-of-the-art integrated manufacturing unit for FMCG & beverages at MIDC, Arvi, Wardha district, Maharashtra. Key Highlights of the MoU: 🔸 Proposed Investment: ₹2100 crore 🔸 Direct Employment: 550 jobs Objectives of the MoU: ✅ Direct jobs at the plant, plus indirect work in transport, packaging and distribution around Arvi. ✅ Boost to the surrounding industrial ecosystem, including agro-industries, packaging, transport and cold-storage suppliers. ✅ Creation of demand for local fruit and milk. COO, Group Head-Technical, RjCorp & Varun Beverages Ltd. Rajinder Jeet Singh Bagga and senior officials were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग) आणि वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यात वर्धा जिल्ह्यातील एमआयडीसी, आर्वी येथे एफएमसीजी व पेय पदार्थांसाठी अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य कराराची ठळक वैशिष्ट्ये : 🔸 प्रस्तावित गुंतवणूक : ₹2100 कोटी 🔸 थेट रोजगार संधी : 550 सामंजस्य कराराची उद्दिष्टे : ✅ प्रकल्पामुळे थेट रोजगारासोबतच आर्वी परिसरात वाहतूक, पॅकेजिंग व वितरण क्षेत्रांत अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ✅ कृषी-आधारित उद्योग, पॅकेजिंग, वाहतूक आणि शीतगृह पुरवठादारांसह परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला चालना. ✅ स्थानिक स्तरावर फळे आणि दुधाच्या मागणीत वाढ. यावेळी सीओओ, ग्रुप हेड-टेक्निकल, आरजे कॉर्प अँड वरुण बेव्हरेजेस लिमिटेड, राजिंदर जीत सिंह बग्गा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Today's_News_29-10-2026.pdf6.27 KB

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 28 ऑक्टोबर 2026 महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219840/ शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/219859/ #Maharashtra #DevendraFadnavis