uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 114
Obunachilar
+124 soatlar
+47 kun
-3530 kun
Postlar arxiv
CM Shri Devendra Fadnavis Tweets: Strengthening Government Schemes Through Effective Surveys Chaired a meeting regarding various schemes implemented by the State Government and post-scheme surveys at Sahyadri Guest House, Mumbai. Conducting surveys is essential to expanding the reach of government schemes, ensuring that benefits reach more citizens, and improving implementation. The exercise will help assess outcomes, identify gaps and enhance the effectiveness of these schemes. These surveys aim to analyse beneficiary data, evaluate scheme performance, and identify areas for improvement. Emphasised the importance of translating data into actionable measures and instructed the field-level officials to extend their full cooperation. The focus remains on building a reliable database, improving access to government benefits, strengthening public trust, and ensuring better service delivery. Emphasised that coordinated efforts among government departments and concerned organisations will help improve implementation and enhance the quality of services delivered to citizens. Minister Adv. Ashish Shelar and senior officials were present. #Maharashtra #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2115477151885758969?a=g7usMiTVkRJhEDK6ww4&s=20

CMO Maharashtra Tweets: शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अचूक माहिती आणि डेटाबेस निर्मितीवर भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि योजनांपश्चात सर्वेक्षणाबाबत बैठक पार पडली. सरकारी योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्त्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने योजनांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. योजनांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास, लाभार्थ्यांच्या माहितीचे विश्लेषण, योजनांमुळे साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन आणि त्यातून पुढील सुधारणांसाठी आवश्यक बाबी निश्चित करणे, अशा विविध स्तरांवर काम केले जात आहे. राज्यातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी या सर्वेक्षणांचा चांगला उपयोग होऊ शकतो. योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्वेक्षणातून मिळणारी माहिती केवळ माहितीपुरती मर्यादित न ठेवता, त्यातून प्रत्यक्ष कामकाजात सुधारणा घडवून आणण्यास मदत होईल. उपलब्ध माहितीच्या आधारे योजनांची सद्यःस्थिती समजून घेणे, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी ओळखणे आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आवश्यक सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून योजनांबद्दलची अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, आणि सरकारच्या योजनांना मिळणारा प्रतिसाद समजण्यास मदत होईल. तसेच या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अचूक डेटाबेस तयार होईल, आणि लोकांना सरकारी योजनांचा अधिक लाभ मिळण्यास मदत होईल. या सर्वेक्षणातून सरकारी योजनांबाबत अधिक विश्वासार्हता निर्माण होऊन राज्य सरकारला अचूक माहिती मिळेल आणि गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग महत्त्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजनांची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करून माहिती संकलन व विश्लेषणाच्या प्रक्रियेत समन्वय साधावा आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूरक वातावरण निर्माण करावे. शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थांनी एकसंघ भावनेतून काम केल्यास योजनांच्या अंमलबजावणीत अधिक चांगले परिणाम साधता येतील. उपलब्ध माहितीचा योग्य वापर, समन्वयपूर्ण कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांच्या आधारे प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणता येईल. या माध्यमातून सरकारच्या विविध योजना अधिक परिणामकारक होण्यासह नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्याच्या प्रक्रियेत गुणात्मक परिवर्तन घडविणे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय पटाचे सखोल अभ्यासक आणि राजकीय, सामाजिक व आर्थिक घडामोडींची अभ्यासपूर्ण मांडणी करणारे व्यक्तिमत्त्व हरपले, ही पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. ॐ शांती 🙏 #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: MahaSaarthi: Strengthening Governance Through Data-Driven Scheme Delivery Chaired a review meeting regarding MahaSarathi in Mumbai, today. With Artificial Intelligence, integrated databases and digital systems, governance will become more efficient, transparent and accountable. Directed that these tools be effectively utilised to ensure government scheme benefits reach eligible beneficiaries, evaluate scheme outcomes and identify ineligible beneficiaries through robust verification mechanisms. As a step in this direction, MahaID will consolidate citizen information to improve administrative coordination and service delivery. AI-powered systems will accelerate access to Government Resolutions, streamline correspondence and simplify office procedures for faster decision-making. Maharashtra is the first state in the country to adopt sovereign AI in this manner, advancing technology-driven governance. MahaID has been soft-launched, with over one crore IDs generated so far. Full-scale implementation will follow the completion of backend integration across all departments. As MahaSaarthi nears completion, directed that the remaining work across all departments be expedited to ensure timely implementation. Minister Nitesh Rane and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai #DigitalGovernance https://x.com/Dev_Fadnavis/status/2115449803652166054?a=zjy9n20dUyOoQwLtYL8&s=20

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A big fat ZERO! At least Congress is consistent at something.. https://x.com/Dev_Fadnavis/status/2115443689153827008?a=KiICNFx09A6O-0BvqWo&s=20

CMO Maharashtra Tweets: ‘महासारथी’ला गती, ‘महाइंडस’चा शुभारंभ, AI च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रशासनात नवे पर्व! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महासारथी संदर्भात आढावा बैठक पार पडली. कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन आणि अपात्र लाभार्थ्यांची पडताळणीही या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शासकीय कामकाजासाठी एकात्मिक डेटाबेस, एआयचा वापर आणि विविध विभागांतील माहितीचे एकत्रीकरण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘महाआयडी’च्या माध्यमातून नागरिकांची माहिती एकत्रित करण्याबरोबरच शासकीय यंत्रणेची कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढविण्यास मदत होणार आहे. शासन निर्णयांच्या मोठ्या संग्रहातून आवश्यक माहिती वेगाने शोधणे, पत्रव्यवहाराचे व्यवस्थापन करणे आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ करणे यासाठी या प्रणालींचा उपयोग होईल. सार्वभौम एआयचा अशा प्रकारे वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. योजनांच्या लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावी होणार ‘महासारथी’ हा राज्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम पूर्णत्वाकडे जात असून, त्यातील विविध विभागांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. या प्रणालीमध्ये विविध विभागांच्या माहितीचे एपीआय इंटिग्रेशन केल्यास संबंधित डेटाचे सातत्याने अद्ययावतीकरण करणे शक्य होईल. त्यातून योजनांची अंमलबजावणी, निधीचा विनियोग आणि लाभार्थ्यांची पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. विशेषतः वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये योग्य लाभार्थ्यांची निवड, अपात्र लाभार्थ्यांची ओळख आणि योजनांमुळे प्रत्यक्षात साध्य झालेल्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी एकत्रित माहितीचा उपयोग होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. ‘महाइंडस’मुळे प्रशासकीय कामकाज सुलभ ‘सर्वम एआय’च्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यात मराठीसह 22 भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य होणार आहे. शासकीय डेटा देशाबाहेर जाणार नाही किंवा एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरला जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवरील ‘जीआर एक्सपर्ट’ सुविधेद्वारे आजपर्यंतचे शासन निर्णय शोधणे आणि त्यातील बदल तपासणे, ‘ई-मेल समरायझर’द्वारे ई-मेलचा सारांश तयार करणे, तर ‘आरएफपी बिड इव्हॅल्युएटर’च्या माध्यमातून निविदांची तुलना व मूल्यांकन करणे शक्य होणार आहे. डिजिटल प्रणालींचा प्रत्यक्ष वापर महत्त्वाचा ‘महाडीबीटी’, ‘आपले सरकार 2.0’ आणि ‘मैत्री 2.0’ या उपक्रमांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केवळ डिजिटल व्यवस्था उभारणे पुरेसे नाही, तर संबंधित विभागांनी त्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू करणे आणि अधिकाधिक वापरकर्त्यांना या प्रणालींशी जोडणे महत्त्वाचे आहे. प्रणालींचा वापर वाढल्यास त्यातील त्रुटी आणि अडचणी लक्षात येतील व त्यावर वेळेत उपाययोजना करता येतील. ‘महाआयडी’चे सॉफ्ट लॉन्च करण्यात आले असून, त्याअंतर्गत आतापर्यंत 1 कोटींहून अधिक आयडी तयार झाले आहेत. सर्व विभागांचे बॅकएंड इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतर ही प्रणाली अधिक व्यापक स्वरूपात कार्यान्वित करता येईल. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी निर्धारित वेळेत पूर्ण करून पुढील टप्प्याचे नियोजन काटेकोरपणे राबवावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. महाडीबीटी, आपले सरकार आणि मैत्री पोर्टलवर नवीन सेवा ‘महाडीबीटी 2.0’वर मत्स्यव्यवसाय विभागाच्या 24, कामगार विभागाच्या 10 आणि महिला व बालविकास विभागाच्या 2 अशा एकूण 36 नवीन योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. ‘आपले सरकार 2.0’ पोर्टलवर परिवहन विभागाच्या 61 सेवांसह विविध विभागांच्या एकूण 71 सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच ‘मैत्री’ पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या 13 नवीन सेवांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी मंत्री नितेश राणे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #DigitalGovernance

photo content

CMO Maharashtra Tweets: डेटा सेंटर के क्षेत्र में महाराष्ट्र का नेतृत्व बरकरार रहेगा! #Maharashtra #DataCenter #InvestMaharashtra

photo content

संवैधानिक संस्थाओं को बदनाम करने की कोशिश । #IndianConstitution #CJP #ConstitutionOfIndia

photo content

अराजकता फैलाकर संविधान को समाप्त करने का सीजेपी का प्रयास। #CJP #ConstitutionOfIndia #IndianConstitution

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: भक्तीमय सुरांचा आनंद सोहळा.. काय असेल? ओळखू शकाल? #KumbhMela #SimhasthaKumbhMela #NashikKumbhMela #Maharashtra #kumbh

photo content

CMO Maharashtra Tweets: 🤝 CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an ‘Enterprise Agreement’ between the Government of Maharashtra’s (Commissionerate of Electronics, Information Technology & Artificial Intelligence) and Axonwise Private Limited (Sarvam) for the provision of specified AI-based software and/or services to the Government of Maharashtra. Minister Nitesh Rane, Co-Founder of Sarvam, Dr. Vivek Raghavan and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन (इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग) आणि ॲक्सॉनवाइज प्रायव्हेट लिमिटेड (सर्वम्) यांच्यात महाराष्ट्र शासनाच्या विविध गरजांसाठी एआय-आधारित सॉफ्टवेअर व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थात्मक करार करण्यात आला. यावेळी मंत्री नितेश राणे, 'सर्वम्'चे सहसंस्थापक डॉ. विवेक राघवन व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai