We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше759
Підписники
Немає даних24 години
+17 днів
+130 день
Архів дописів
प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना यातही महाराष्ट्र आता देशात पहिल्या क्रमांकावर
मला आता सांगताना आनंद वाटतो की, राज्यातल्या 46 लाख कृषी ग्राहकांपैकी 33 लाख कृषी ग्राहकांना आपण दिवसावीज पुरवठा करू शकतो आहे
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्यूटेड सोलर एनर्जी योजना आहे. 100% एग्रीकल्चर फिडर ऊर्जीकृत आपण करणार आहोत. 27 जिल्ह्यांमध्ये 3881 विद्युत उपकेंद्रांसाठी म्हणजे सबस्टेशनसाठी सौर प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेत. त्यासोबत जवळपास आता 10 लाख 25 हजार शेतकरी यातन ऑलरेडी लाभान्वित झालेले आहेत त्यांना दिवसा वीज मिळते
मागेल त्याला सौर कृषी पंप ही आपली योजना आहे . या योजनेमध्ये महाराष्ट्र आघाडीवर तर आहेच जवळपास आपण 60% पेक्षा जास्त हे पंप त्या ठिकाणी लावले आहेत. आणि हा रेकॉर्ड आपण केलाय 1500 पंप प्रतिदिवस या गतीने आपण शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देत आहोत आणि या योजनेमुळे 40 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आणण्यात आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालाय
देवाभाऊंनी कधीही आपल्या स्वार्थासाठी तडजोड केली नाही याउलट उद्धव ठाकरेने स्वतःला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळविण्यासाठी हिंदुत्वाला तिलांजली दिली!
हरित वाढीला चालना देण्याकरता आपण, मोठ्या प्रमाणात आपण अर्थसंकल्पीय गुंतवणूक करतो आहोत आणि खाजगी गुंतवणूक देखील आणतो आहोत
महाराष्ट्राने नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा साठवणूक धोरण 2025 ते 35 हे आपण या ठिकाणी केलेल आहे. या धोरणाप्रमाणे एकूण ऊर्जेमध्ये 2030 साली 52 टक्के ऊर्जा ही अपारंपरिक स्त्रोतांनी येईल आणि 2035 साली 65% ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांनी येईल
मराठवाड्याकरता जो वरदान ठरणार आहे उल्हास खोऱ्याच पाणी हे मराठवाड्यामध्ये नेण्याच्या संदर्भात आपला जो प्रकल्प होता येता प्री फिजिबिलिटी रिपोर्ट आता आलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो आपण अपेक्षित केलं होतं 54 टीएमसी पाणी, पण प्री फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये 78 टीएमसी पाणी हे उल्हास खोऱ्यातन आपल्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नेता येईल. 87 हजार कोटी रुपयाचा प्रकल्प असणार आहे
जल आराखड्यामध्ये महाराष्ट्राची अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर इतकी आपण त्या ठिकाणी अंदाजित केलेली आहे . आता जून 2024 अखेरपर्यंत 57 लाख हेक्टर म्हणजे अंतिम सिंचन क्षमतेच्या 70 परसेंट आपण सिंचन क्षमता तयार केलेली आहे
आदिवासी विकास विभागाचा जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे. जवळपास 83% निधी आपण वितरित केलेला आहे. खर्च 70% झालेला आहे.
“मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना” घोषित केली पण याला निधी नाही दिला खर म्हणजे , याकरता बजेटमध्ये 1 हजार कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत .
मला सांगताना आनंद वाटतो की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्या शंका कुशंका दूर करत या ठिकाणी 8.69 लाख कोटी रुपये हे जलजीवन मिशनला नव्याने अलॉट केले आहे
ग्राम विकास विभागाच मी अभिनंदन करेन, ग्राम विकास विभागाने एक महिन्यात 30 लाखापैकी 27 लाख लोकांच रजिस्ट्रेशन करून त्यांच घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये दिला.
विशेषतः आपण दिलेल्या अनुदानात आता वाढ केलेली आहे आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घर आहेत पहिल्या दिवसापासन रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत त्यांना विजेचं बिल येणार नाही."
मला सांगताना आनंद वाटतो एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घर मंजूर केली.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे आणि एकूण आपण जर विचार केला तर 14 हजार 300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे
जयंतराव, भीमाशंकरचा आराखडा आहे घृष्णेश्वरचा आराखडा आहे औंढा नागनाथचा आराखडा आहे. त्रंबकेश्वरचा आणि परळी वैजनाथचा आता नवीन आराखडा 300 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आता आपल्या शिखर समितीत आलेला आहे जुना चालू आहे त्याला पैसे दिले आहेत , त्यामुळे त्यालाही आपण जे काही पैसे आहे ते देणार आहोत"
आपण रायगडाच संवर्धन करतो तसच मनकर्णिका घाटाच संवर्धन होतय. जयंतराव मला असं वाटत की तुमच्यासारख्या माणसांनी तरी अशा नरेटिव्हच्या भानगडीत पडू नये हुशार माणसं जी असतात त्यांनी आकड्यातन तर्कातन आपला नरेटिव्ह तयार केला पाहिजे
जयंतराव तर थेट मणकरणिका घाटावर पोहोचले मला आनंद वाटला, तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा या ठिकाणी उल्लेख केला.
अर्थात तुमच्या सरकारला अहिल्या देवींचा सन्मान करण्याची संधी होती पण 66 वर्षात तुम्ही अहमदनगरच नाव अहिल्यानगर नाही केलं
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
