YCMOU MJCollege 5303A
Ir al canal en Telegram
1 157
Suscriptores
Sin datos24 horas
+67 días
+1730 días
Archivo de publicaciones
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी अभ्यास केंद्र बंद राहील कोणीही अभ्यास केंद्रावर येऊ नये तसेच ज्यांना प्रवेश अर्ज अथवा परीक्षा अर्ज भरावयाचे असतील त्यांनी ऑनलाइन सायबर कॅफे मधून भरून घ्यावे
तसेच मे जून 2026 मध्ये झालेल्या परीक्षेचे निकाल गुणपत्रक अभ्यास केंद्रावर आलेले असून ते दिनांक 12 ऑक्टोबर पासून दिले जातील सर्वांनी बारा ते तीन या वेळेत अभ्यास केंद्रात येऊन आपले गुणपत्रक व यश कार्ड घेऊन जावे
📢 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
FY B.A., B.Com., M.BA, M.Sc. व इतर वर्गांमध्ये प्रथम वर्षास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर PRN नंबरचा SMS प्राप्त होईल.
PRN (Permanent Registration Number) हा विद्यार्थ्याचा विद्यापीठातील कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक आहे. विद्यापीठाशी संबंधित विविध शैक्षणिक कामांसाठी PRN नंबरचा उपयोग होतो. उदाहरणार्थ:
- विद्यापीठाच्या ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन/विद्यार्थी माहिती पाहण्यासाठी
- परीक्षा अर्ज व परीक्षा संबंधित प्रक्रियेसाठी
- परीक्षा वेळापत्रक, हॉलतिकीट व निकाल पाहण्यासाठी
- असाइनमेंट/शैक्षणिक कामकाजाशी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी
- विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय व शैक्षणिक सेवांचा लाभ घेण्यासाठी
- पुढील वर्षातील पुनर्नोंदणी (Re-registration) व इतर विद्यापीठीन प्रक्रियांसाठी
त्यामुळे PRN नंबरचा SMS डिलीट करू नये व तो सुरक्षितपणे जतन करून ठेवावा. तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार PRN नंबर सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी त्याची नोंद करून ठेवावी.
सर्व विद्यार्थ्यांनी याची आवर्जून नोंद घ्यावी.
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आताच मा. संचालक, विद्यार्थी सेवा विभाग यांच्या सोबत झालेल्या ऑनलाईन मिटींगनुसार आज सकाळपासून ग्रुपवर पेमेंट बाबत येणा-्या अडचणी या सर्वच राज्यभर येत असल्यामुळे त्याची नोंद घेण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेंमेंट केले आहे. परंतु ते लॉगीनला अपडेट झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांना दुस-्यांदा पेमेंट करायला सांगू नये. या सर्व केसेसवर टेक्निकल टीम काम करत आहे. आज सायंकाळी किंवी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत या सर्व केसेस चे पेमेंट अपडेट होऊन त्यांचे अर्ज त्यांना डाऊनलोड करता येतील. कृपया विद्यार्थ्यांना याची माहिती द्यावी ही विनंती.
*तसेच, दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेशाची मुदत वाढविण्यांत आली आहे. आणि 28 सप्टेंबर 2026 पर्यंत पेमेंट करण्याची मुदत आहे.* त्यामुळे कोणीही पॅनिक होऊ नये. राहिलेल्या एडमिशन्स लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. धन्यवाद
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की दिनांक 12 सप्टेंबर पासून अभ्यास केंद्र 11 ते 5.30 राहील तसेच सीए फाउंडेशनच्या सुपरविजन ला 12.45 ते 3 वाजेपर्यंत जावे लागणार असल्याने अभ्यास केंद्र तेवढ्या वेळेसाठी बंद राहील .
तीन वाजेनंतर आपण प्रवेशा संबंधित कामासाठी अभ्यास केंद्रात यावे.
*महत्वाची सुचनाः-*
ज्या विद्यार्थ्यांनी Online MBA CET दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना देखील ODL MBA P79 शिक्षणक्रमाच्या प्रवेशा करिता ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सदरील माहिती अवगत करून प्रवेश निश्चित करण्याचे सुचित करावे, ही विनंती.
विद्यार्थी मित्रहो
आज दिनांक 7 सप्टेंबर पासून ते 11 सप्टेंबर पर्यंत मी बाहेरगावी असल्याने अभ्यासकेंद्र बंद राहील याची नोंद घ्यावी. कोणीही महाविद्यालय परिसरात येऊ नये.
या कालावधीमध्ये कोणीही कॉल करू नये
दिनांक 12 सप्टेंबर रोजी अभ्यास केंद्र १२ ते ५ या नियमित वेळेत सुरू राहील याची नोंद घ्यावी.
ज्यांना शक्य होईल त्यांनी सायबर कॅफे वरून आपले प्रवेश करून घ्यावे.
प्रवेशाची अंतिम मुदत 15 सप्टेंबर आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
उद्या दिनांक सात ऑगस्ट नियमित अभ्यास केंद्र चालू राहील.
नमस्कार सर / मॅडम,
आपल्याला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, MBA P79 शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या Second Phase मधील प्रवेशास मान्यता प्राप्त झाली आहे.
त्यानुषंगाने MBA P79 शिक्षणक्रमाचे प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ववत सुरू करण्यात येत आहेत. तसेच, MBA CET प्रक्रियादेखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे, याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.
आपल्या अधिनस्त प्रवेश घेणे बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत तात्काळ अवगत करून, त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, ही विनंती.
आपल्या सर्वांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 😊🙏🏻
सर्व प्रवेशांची मुदत दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी आपला लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे.
द्वितीय वर्ष बी ए शुल्क : 4,146
द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806
तृतीय वर्ष बी ए / बीकॉम शुल्क : 4,506
अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100
अतिरिक्त लागेल..
येत्या एक दोन दिवसांमध्ये FY MBA प्रवेशाबाबत notification येण्याची शक्यता आहे.
त्यानंतर प्रवेश मर्यादा नसणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येऊ शकेल.
Notification प्राप्त होताच MBA CET देखील तातडीने चालू करण्यात येईल.
आपल्याला त्वरित याबाबतीत कळविण्यात येईल.
आपण सर्वांनी FY MBA प्रवेशाबाबत खुप संयमाने, सहनशीलतेने आम्हा सर्वांना सहकार्य केले आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. 🙏🏾🙏🏾
मागील वर्षी 2025 26 ला प्रथम वर्ष बीए व बीकॉम ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले यश कार्ड घेण्यासाठी आज 12 ते 3 या वेळेत अभ्यास केंद्रात यावे सोबत आपला मोबाईल आणावा.
