महाराष्ट्राच्या 2025_ 26 च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
१) *
विकसित भारत विकसित महाराष्ट्र* या सूत्रानुसार राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा
उद्योग विकास
औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार .
पुढील पाच वर्षात
*
40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि
50 लाख नवीन रोजगार निर्मितीचे* लक्ष्य.
मुंबई महानगर प्रदेश (MMR REGION) याचा
ग्रोथ हब म्हणून विकास.
गडचिरोली जिल्हा
स्टील हब म्हणून उदयास येणार.
२) *
पायाभूत सुविधा विकास* पालघर जिल्ह्यात
वाढवण बंदराची निर्मिती .याच बंदराजवळ मुंबईसाठीचे तिसरे विमानतळ बनवण्यात येणार .
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या लाभाकरिता समृद्धी महामार्ग लगत
ऍग्रो लॉजिस्टिक हब चा विकास.
३) *
कृषी व संलग्न क्षेत्र*
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (AI)शेतीमध्ये वापर.
गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबवणार.
बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 4300 कोटी रुपयांचा बांबू लागवड प्रकल्प.
बी बियाणे यंत्रसामुग्री खत आणि शेतमाल वाहतुकीसाठी
_बळीराजा शेत व पानांद रस्ते ही नवीन योजना_
४) *
पर्यटन व स्मारके*
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक .
आंबेगाव पुणे येथे शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपयांचा निधी.
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक .
पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून एक स्मारक.
सिंहस्थ मेळाव्यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा
५) *
सामाजिक क्षेत्र*
सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण.
स्वस्त धान्याची वाहतूक आणि वितरण प्रणाली याकरिता
सप्लाय चेन ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर.
लाडकी बहीण योजनेकरिता 36 हजार कोटी रुपयांची तरतूद .
सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा.
Join
@prateekgavhane