en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
759
Subscribers
No data24 hours
+17 days
-230 days
Posts Archive
120 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या मराठी माणसांना ५०० चौरस फुटाचा टॉवर मधला २bhk मिळतोय म्हणजे स्वप्नवत गोष्टच ! याचाच प्रत्यय शोभा गायकवाड यांना आला !

दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा अधिकारी कितीही मोठा असला तरी त्याच्यावरही कारवाई करणार

नायजेरीयन तस्करांवरील छोटे गुन्हे रद्द करून त्यांना डीपोर्ट करण्यास सुरूवात केली आहे

वसई विरार परिसरातून ६८ नायजेरीयन नागरिकांना डीपोर्ट केले आहे, १२२ जणांनाही लवकरच डिपोर्ट केले जाणार आहे. अशा गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. पोलीसांना इमिग्रेशन शाखेशी सतत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपुरमध्ये ११ महिन्यात ९०७ गुन्हे दाखल करण्यात आले, १२५४ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले ज्याची किंमत १० कोटी रू. आहे.

अंमली पदार्थांच्या गुन्हेगारांना संघटित गुन्हेगारीखालीआणले आहे. केवळ शहरी भागात नाही तर ग्रामीण भागातही Anti Narcotic Task Force निर्माण करण्यात आल्या असून त्या कार्यरत आहेत. त्यांना पुरेसे मनुष्यबळही देण्यात आले आहे.

अनधिकृत पान टपऱ्यांवर अंमली पदार्थ मिळणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना तत्काळ पोलिसांना देण्यात येतील. जर असा प्रकार आढळला तर संबंधित पोलीस निरीक्षकालाच जबाबदार धरण्यात येईल

महाराष्ट्राच्या शेतीची नवी पहाट... देवाभाऊ आणि पाणी फाउंडेशनची ‘पॅन-महाराष्ट्र फार्मर कप’ च्या दिशेने मोठी झेप
महाराष्ट्राच्या शेतीची नवी पहाट... देवाभाऊ आणि पाणी फाउंडेशनची ‘पॅन-महाराष्ट्र फार्मर कप’ च्या दिशेने मोठी झेप

ऑपरेशन थंडर अंतर्गत संघटित गुन्हेगार आणि अंमली पदार्थ तस्करांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. अंमली पदार्थांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबण्यात येत आहे.

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक नक्की कोणासाठी आहे समजून घ्या...

देवाभाऊंनी विधानसभेत सादर केले महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक...पूर्व सूचना न दिल्यास आता धर्मांतर अवैध ठरवले जाईल.

३५ वर्षांचा संघर्ष देवाभाऊंमुळे संपला... नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांना पुनर्विकास प्रकल्पात हक्काचं ५०० स्क्वेअर फुटांचं घर मिळालं.

अपराध जर घडला असेल तर, त्याच्या शिक्षा दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये सात वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंड आहे. अज्ञान, मनोविकल व्यक्ती असेल किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची व्यक्ती असेल तर त्या केसमध्ये सात वर्ष कारावास आणि पाच लाख रुपये दंड या पद्धतीने ते करण्यात आलेला आहे. सामूहिक जे काही त्या ठिकाणी असं कार्य होतं त्याला सात वर्ष कारावास आणि पाच लाख रुपये दंड आहे. दोष सिद्धीपूर्वी दुसरा अपराध जर केला तर दहा वर्ष कारावास हा या कायद्याच्या माध्यमातन सांगण्यात आलेला आहे.

आता एखाद्या व्यक्तीला जबरदस्ती त्याचा धर्मांतर केलेला आहे अशा पद्धतीची तक्रार देण्याच्या संदर्भात व्यक्तीचे आई-वडील, भाऊ-बहीण अथवा अशा व्यक्तीशी रक्ताचे किंवा वैवाहिक किंवा दत्तक नाते असेल अशा कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी ती तक्रार देता येईल

जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतराच्या संदर्भात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा धर्मांतराची अधिकृत सूचना (intimation) दिली नाही, तर ते धर्मांतर कायदेशीररित्या अवैध (null and void) मानले जाईल

धर्मांतरण जर कोणाला करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे त्याचीही तरतूद यात केलेली आहे. त्या संदर्भात धर्मांतर करण्याचा इरादा असलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जशी लग्नाची नोटीस देतात तशी धर्मांतरणाची नोटीस द्यायची आहे

यासोबत कस्टडी जी आहे बाळाची ती आईकडे असेल

बेकायदेशीर धर्मांतरणामुळे एखादा बालक जर जन्माला आला असेल तर त्या बालकाला कुठल्या जातीचा धर्माच मानण्यात यावं तर आई बालकाची ज्या पूर्वाश्रमीचा तिचा जो काही धर्म होता तोच त्या मुलाचा धर्म मानण्यात येईल

बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी केलेला कुठलाही विवाह न्यायालयाद्वारे शून्यवत व निरर्थक असल्याचे घोषित करण्यात येईल

या कायद्यातल्या तरतुदीच जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीने ते इन्व्होल्ह असतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील