🔰 Current Affairs Marathi 🔰
कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi
显示更多📈 Telegram 频道 🔰 Current Affairs Marathi 🔰 的分析概览
频道 🔰 Current Affairs Marathi 🔰 (@chalughadamodi) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 121 281 名订阅者,在 教育 类别中位列第 1 034,并在 印度 地区排名第 1 884 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 121 281 名订阅者。
根据 05 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -1 256,过去 24 小时变化为 -27,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 7.22%。内容发布后 24 小时内通常能获得 4.03% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 8 762 次浏览,首日通常累积 4 888 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 10。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.)
@eMPSCkatta
@MPSCMaterialKatta
@MPSCEconomics
@Marathi”
凭借高频更新(最新数据采集于 06 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
数据加载中...
| 日期 | 订阅者增长 | 提及 | 频道 | |
| 05 九月 | +12 | |||
| 04 九月 | 0 | |||
| 03 九月 | +8 | |||
| 02 九月 | 0 | |||
| 01 九月 | 0 |
| 2 | प्रश्नांच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनेल वरील रोजच्या चालू घडामोडी पहा👆👆
https://t.me/ChaluGhadamodi/23704 | 2 371 |
| 3 | हवामान अनुकूल शेतीला चालना देण्यासाठी आणि 'DiCRA' (Data in Climate Resilient Agriculture) प्लॅटफॉर्मवर हवामानाची अचूक माहिती एकत्रित करण्यासाठी कोणत्या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे? | 2 288 |
| 4 | जॉर्जिया मेलोनी या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदावर राहणाऱ्या कोणत्या देशाच्या नेत्या ठरल्या आहेत? | 2 120 |
| 5 | अ) शालेय गटातून महाराष्ट्रातील डॉ. कविता गित्ते आणि कुंदा बच्छाव यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
ब) हा पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे ५ सप्टेंबर रोजी प्रदान केला जातो.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? | 2 130 |
| 6 | अ) हा भारताचा जिओसिंक्रोनस कक्षेतून कार्य करणारा पहिला इमेजिंग उपग्रह आहे.
ब) याचे प्रक्षेपण GSLV-F17 या रॉकेटच्या मदतीने करण्यात आले.
क) या उपग्रहाचे पूर्वीचे नाव 'GISAT-1A' असे होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? | 1 912 |
| 7 | आक्रोश मोर्चा...आपल्या न्याय हक्कासाठी. | 1 823 |
| 8 | Daily Current affairs ✅🗓️ 5 सप्टेंबर 2026
🚀 इस्त्रोकडून EOS-05 या भारताच्या पहिल्या जिओसिंक्रोनस इमेजिंग उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
🔹 Key Fact: इस्त्रोने (ISRO) GSLV-F17 रॉकेटच्या मदतीने 'EOS-05' या अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
📍 Place: सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा.
💡 Important Fact: हा भारताचा जिओसिंक्रोनस कक्षेतून (Geosynchronous orbit - सुमारे ३६,००० किमी उंचीवरून) कार्य करणारा पहिला इमेजिंग उपग्रह असून, याद्वारे आपत्ती व्यवस्थापन आणि सीमेवरील हालचालींवर सतत नजर ठेवता येईल.
📌 Static Fact: 'EOS-05' उपग्रहाचे पूर्वीचे नाव 'GISAT-1A' असे होते.
👩🏫 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ आणि महाराष्ट्रातील विजेते
🔹 Key Fact: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ५ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरातील ४८ शालेय आणि २१ उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात येणार आहे.
🌟 Important Fact: शालेय गटातून महाराष्ट्रातील डॉ. कविता गित्ते (केज, बीड) आणि कुंदा बच्छाव (नाशिक) यांची, तर उच्च शिक्षण व तंत्रनिकेतन गटातून प्रा. विक्रम विशाल (IIT Bombay), डॉ. अमर मोहनराव टाकसांडे (JNMC वर्धा) आणि डॉ. संदिपान प्रल्हाद नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) यांची निवड झाली आहे.
🌦️ हवामान अनुकूल शेतीसाठी नाबार्ड (NABARD) आणि हवामान विभागाचा (IMD) करार
🔹 Key Fact: कृषी हवामानशास्त्रीय डेटा (Agro-meteorological data) आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी 'नाबार्ड' (NABARD) आणि 'भारतीय हवामान विभाग' (IMD) यांच्यात सामंजस्य करार झाला.
💡 Important Fact: हा करार 'Data in Climate Resilient Agriculture' (DiCRA) प्लॅटफॉर्मवर हवामानाची अचूक माहिती एकत्रित करण्यासाठी झाला असून, याद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचे वेळेवर अंदाज आणि कृषी सल्ले डिजिटल स्वरूपात थेट उपलब्ध होतील.
🐯 आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) आणि आशियाई विकास बँक (ADB) करार
🔹 Key Fact: वन्यजीव लँडस्केप संवर्धन आणि निसर्ग-पूरक वित्तपुरवठ्यासाठी (Nature-Positive Financing) 'आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स' (IBCA) ने 'आशियाई विकास बँक' (ADB) सोबत सामंजस्य करार केला.
🌿 Important Fact: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'व्याघ्र लँडस्केपवरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत' हा करार संपन्न झाला.
🌊 स्वच्छ सागर, सुरक्षित सागर २०२६ मोहीम
🔹 Key Fact: महासागर संवर्धनासाठी 'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर २०२६' या मोहिमेच्या पाचव्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला.
🏢 Organisation: पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES).
📅 Date: १२ ते १९ सप्टेंबर २०२६.
💡 Important Fact: ही एक आठवडाभर चालणारी देशव्यापी मोहीम असून, किनारपट्ट्यांची स्वच्छता आणि सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्याविषयी जनजागृती निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
🇮🇹 जॉर्जिया मेलोनी इटलीच्या युद्धोत्तर इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान
🔹 Key Fact: जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान (Longest continuously serving Prime Minister) पदावर राहणाऱ्या नेत्या ठरल्या आहेत.
📜 इटलीच्या सातत्याने बदलणाऱ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा एक ऐतिहासिक विक्रम मानला जात आहे.
⛽ BPCL आणि CSE यांचा जैवइंधनासाठी सामंजस्य करार
🔹 Key Fact: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि 'सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट' (CSE) यांच्यात जैवइंधन आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) विकासासाठी सामंजस्य करार झाला.
♻️ Important Fact: बायोमासचा वापर, टाकाऊ वस्तूंपासून संसाधन निर्मिती (Waste-to-resource) आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था (Circular economy) या उपक्रमांवर दोन्ही संस्था एकत्रितपणे काम करतील.
Join - @chalughadamodi | 6 318 |
| 9 | प्रश्नांच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनेल वरील रोजच्या चालू घडामोडी पहा👆👆
https://t.me/ChaluGhadamodi/23697 | 2 797 |
| 10 | नवी दिल्ली येथे आयोजित 'सेमीकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) ची मुख्य संकल्पना (Theme) खालीलपैकी कोणती होती? | 7 234 |
| 11 | भारतीय नौदलाचे 'आयएनएस सुदर्शिनी' हे जहाज नुकतेच 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात पोहोचले? | 6 864 |
| 12 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) प्रलंबित दंडात्मक विवाद आणि नुकसानभरपाईचे खटले सवलतीच्या दरात सोडवण्यासाठी कोणती नवी योजना जाहीर केली आहे? | 6 020 |
| 13 | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच प्रकाशित केलेले 'रक्षा' (RAKSHA) दस्तऐवज खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? | 5 608 |
| 14 | सप्टेंबर २०२६ मध्ये कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 'ब्रिक्स मुख्य न्यायाधीश मंच २०२६' (BRICS Chief Justices' Forum) चे यजमानपद भूषवले? | 5 502 |
| 15 | 📅 MPSC चालू घडामोडी: ०४ सप्टेंबर २०२६
⚖️ १) 'ब्रिक्स' मुख्य न्यायाधीश मंच (BRICS Chief Justices' Forum) २०२६
🔹 Key Fact: भारताचे सर्वोच्च न्यायालय 'ब्रिक्स' (BRICS) मुख्य न्यायाधीश मंच २०२६ चे यजमानपद भूषवणार आहे.
📍 Place: नवी दिल्ली.
📅 Date: ४ ते ६ सप्टेंबर २०२६.
🎯 Theme: मध्यस्थी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विवाद, लवादाच्या निवाड्यांची सीमेपार अंमलबजावणी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व न्यायपालिका, आणि न्यायालयीन नेतृत्व व शाश्वत विकास.
👨⚖️ भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.
🛡️ २) 'रक्षा' (RAKSHA) संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवज
🔹 Key Fact: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'रक्षा' (RAKSHA) या नव्या संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवजाचे प्रकाशन केले.
🗺️ हा दस्तऐवज आगामी १० वर्षांसाठी भारताच्या जागतिक संरक्षण भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्याची रूपरेषा (Roadmap) स्पष्ट करतो.
🤝 'मेक-इन-इंडिया' अंतर्गत शस्त्रास्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, लष्करी सराव वाढवणे आणि हिंद महासागर क्षेत्रात भारताची 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर' (Net Security Provider) म्हणून भूमिका बळकट करणे हे याचे चार मुख्य स्तंभ आहेत.
💰 Static Fact: भारताने २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या वार्षिक संरक्षण निर्यातीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे.
🧬 ३) 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) उपक्रमाचा शुभारंभ
🔹 Key Fact: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) या नवीन धोरणात्मक मंचाचा शुभारंभ केला.
💡 Important Fact: बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांच्यात समन्वय वाढवणे, तसेच संशोधनाचे रूपांतर व्यावसायिक उत्पादनामध्ये करण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
📈 Static Fact: मागील काही वर्षांत भारताची 'बायो-इकॉनॉमी' १० अब्ज डॉलर्सवरून २०० अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारली आहे.
💼 ४) 'विश्वास २०२६' (VISHWAS, 2026) योजना
🔹 Key Fact: प्रलंबित 'ईपीएफ' (EPF) नुकसानभरपाई विवाद सोडवण्यासाठी 'विश्वास २०२६' ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
🏢 Organisation: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) / कामगार आणि रोजगार मंत्रालय.
⚖️ Important Fact: या योजनेंतर्गत पात्र आस्थापनांना त्यांच्यावरील प्रलंबित दंडात्मक कारवाया व विवाद अत्यंत सवलतीच्या दरात (Reduced rates) मिटवण्याची संधी दिली जाईल.
💻 ५) सेमीकॉन इंडिया (SEMICON India) २०२६
🔹 Key Fact: भारताच्या प्रमुख सेमीकंडक्टर परिषदेचे म्हणजेच 'सेमीकॉन इंडिया २०२६' चे पाचवे संस्करण आयोजित केले जाणार आहे.
📍 Place: यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर), नवी दिल्ली.
📅 Date: १७ ते १९ सप्टेंबर २०२६.
🎯 Theme: "सिलिकॉन ते सिस्टीम्स: इकोसिस्टीमची उभारणी" (Silicon to Systems: Building the Ecosystem).
🏢 Organisation: इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY).
🚆 ६) मुंबई-सावंतवाडी नवीन दैनंदिन रेल्वे सेवा
🔹 Key Fact: कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
✨ Important Fact: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ५१० किमी अंतराच्या या सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला व आर्थिक विकासाला गती मिळेल.
⛵ ७) आयएनएस सुदर्शिनीची 'लोकायन २६' मोहीम
🔹 Key Fact: भारतीय नौदलाचे शिडाचे प्रशिक्षण जहाज 'आयएनएस सुदर्शिनी' (INS Sudarshini) स्पेनमधील बार्सिलोना येथे पोहोचले.
🌊 Important Fact: हा प्रवास भारतीय नौदलाच्या 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेचा (Transoceanic Expedition) एक भाग आहे.
Join : @chalughadamodi | 7 326 |
| 16 | तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४ | 3 437 |
| 17 | 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारांबाबत
अ) बलजीत कौर यांनी एकाच हंगामात ८,००० मीटरपेक्षा उंच ५ शिखरे सर करण्याचा विक्रम केला आहे.
ब) हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील 'द्रोणाचार्य' पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो. कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? | 7 206 |
| 18 | 🗞️Daily Current affairs📰 3 सप्टेंबर 2026 ✅
🌊 1) पहिली राष्ट्रीय जल विभाग शिखर परिषद
🔹 जलशक्ती मंत्रालयाची पहिली 'विभागीय शिखर परिषद' संपन्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी समारोपीय सत्रात सहभागी
📍 सुषमा स्वराज भवन, नवी दिल्ली
📅 1 ते 2 सप्टेंबर 2026 (समारोप 2 सप्टेंबर)
📌 Important Fact:
✨ 'सहकारी संघवाद' बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित या मालिकेतील ही पहिलीच राष्ट्रीय परिषद
✨ चार प्रमुख विषयांवर भर: जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, 'जल संचय जन भागीदारी' (Catch the Rain), पिण्याच्या पाण्याचे स्रोत शाश्वत करणे आणि 'जल जीवन मिशन 2.0' अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल
🏔️ 2) तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2024👤
विजेते व कामगिरी: (पुरस्कार 2024 चा आहे पण घोषणा काल झाली आहे)
🧗 बलजीत कौर (लँड): एकाच हंगामात 8,000 मीटरपेक्षा उंच 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय
🧗 स्काल्झांग रिग्झिन (लँड): विना ऑक्सिजन माऊंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय
🏊 रिमो साहा (वॉटर): 48 सुवर्णपदके जिंकणारा आंतरराष्ट्रीय पॅरा-जलतरणपटू
🏅 शिव प्रसाद चमोली (जीवनगौरव): हिवाळी खेळ आणि साहसी मोहिमांमधील योगदानाबद्दल सन्मान
💡 Static Fact: 15 लाख रुपये आणि कांस्य पुतळा (हा अर्जुन पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो)
🐠 3) 'मिशन रंगीन मछली 2031
🔹 उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते 'मिशन रंगीन मछली 2031' या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन
🏢 मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (MoFAHD)
📌 Important Fact:
✨ देशातील शोभिवंत मत्स्यपालनाच्या (Ornamental Fisheries) शाश्वत विकासासाठी हा विशेष कृती आराखडा तयार
💻 4) क्वांटम कम्प्युटिंगसाठी 'FQCI' ची स्थापना
🔹 'नॅशनल क्वांटम मिशन' (NQM) अंतर्गत IISc बंगळुरूने 'फाऊंडेशन फॉर क्वांटम कम्प्युटिंग इनोव्हेशन' (FQCI) ची स्थापना केली
📌 Important Fact:
✨ ही संस्था सेक्शन-8 (विना-नफा) कंपनी म्हणून काम करेल आणि क्वांटम तंत्रज्ञानासाठी 'क्वांटम कम्प्युटिंग थेमॅटिक हब' म्हणून भूमिका बजावेल
✨ यामध्ये फोटोनिक क्वांटम सिस्टीम्स, सुपरकंडक्टिंग सर्किट्स आणि सेमीकंडक्टर-आधारित क्वांटम उपकरणांच्या विकासावर लक्ष
💡 Static Fact: विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या नॅशनल क्वांटम मिशनचा कार्यकाळ 2023-24 ते 2030-31
💡 4) 18 वी ब्रिक्स बौद्धिक संपदा (IP BRICS) प्रमुखांची बैठक
📍 नवी दिल्ली (1-3 सप्टेंबर 2026)
🎯 Theme: “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability”
📌 Important Fact: जागतिक बौद्धिक संपदा मानकांना चालना देण्यासाठी अद्ययावित 'ऑपरेशनल गाईडलाईन्स' स्वीकारण्यात आल्या
💡 Static Fact: 2026 चे IP BRICS अध्यक्षपद व यजमानपद भारताकडे (CGPDTM) आहे.
Join @chalughadamodi | 9 421 |
| 19 | अलिकडेच सोन नदीच्या (Sone River) पाणीवाटपावरून कोणत्या दोन राज्यांमधील २५ वर्षांचा जुना वाद नवीन करारामुळे संपुष्टात आला आहे? | 8 403 |
| 20 | 'स्वच्छ भारत मिशन (शहरी २.०)' अंतर्गत 'स्वच्छ शहर जोडी' उपक्रमात जुन्या कचऱ्याची (Legacy Waste) १००% शास्त्रोक्त विल्हेवाट लावणारे देशातील पहिले शहर कोणते ठरले आहे? | 8 251 |
