uz
Feedback
Adv. Bodkhe Sir ( ज्ञानांकुर Foundation ) UPSC / MPSC

Adv. Bodkhe Sir ( ज्ञानांकुर Foundation ) UPSC / MPSC

Kanalga Telegram’da o‘tish

ज्ञानांकुर foundation UPSC , MPSC , COMBINE call : 8390097967 , 897593799 App : https://play.google.com/store/apps/details?id=com.gyankur.foundation

Ko'proq ko'rsatish
2 798
Obunachilar
-124 soatlar
+77 kunlar
+7730 kunlar
Postlar arxiv
भेटूया संध्याकाळी पाच वाजता😎
भेटूया संध्याकाळी पाच वाजता😎

♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज
♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज एडिट करण्यावरही निर्बंध! 👉 Telegram Restricted  फक्त 2 दिवस 👉 21 & 22 जून NEET परीक्षा काळात.. 👉 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले 👉 बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार ♦️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे.

5_6163611616920214924.pdf7.21 KB

कोणीही हसायचं नाही😂😂😂
कोणीही हसायचं नाही😂😂😂

वरील टेस्ट ही संपूर्ण रित्या मोफत आहे त्यामुळे तुम्ही खरंच अभ्यास असाल तर ह्या ठेचा नक्की फायदा घ्या तुम्हाला जशास तसे प्रश्न कदाचित 2026 मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल विषय अंतर्गत दिसणार आहे....( मी मोटेगावकर नाहीये हे अधोरेखित करतो) अनुभव आणि परिश्रम या आधारावर एवढं कॉन्फिडंटली बोलू शकतो....

5_6140680739282230184.pdf6.46 KB

🔥🔥🔥🔥 सूचना - सूचना-सूचना 👉 येत्या 21 जून पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये PSIR optional विषयाच्या संबंधित मोफत स्वरूपात हे सिरीज सुरू होत आहे तरी ज्या विद्यार्थ्यांना या ते सिरीज चा फायदा घ्यायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या ग्रुपला जॉईन होऊन जा.... 👉 या ग्रुपमध्ये ठरवलेल्या तारखेनुसार होणाऱ्या परीक्षेचा कालावधी आणि टॉपिक संदर्भित केलेला आहे त्याच कालावधीत आणि तेवढ्याच वेळेत तुम्हाला पेपर लिहून ग्रुप वर पाठवायचे आहे... 👉 यामध्ये तुम्हाला टाईम सांगितला जाणार आहे त्याच टाईम मध्ये तुम्ही पेपर सबमिट करायचा आहे अन्यथा नंतर पेपर चेक करून दिल्या जाणार नाही... सुरुवातीला ती उत्साही स्वरूपामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुचित करतो की संपूर्ण टेस्ट सिरीज देणार असेल तरच ग्रुप जॉईन करावा अन्यथा दोन पेपर दिल्यानंतर पेपर दिल्यानंतर जर तुम्ही पेपर देत नसाल तर तुम्हाला ग्रुप मधून काढून टाकले जाईल.... https://chat.whatsapp.com/KVJOstttphj28sclqPEkd7

आठवण आहे ना.... नवीन काहीतरी

भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता😎
भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता😎

कम्बाईन चा पेपर झाला...... आता पुढे काय? हा प्रश्न त्या विद्यार्थ्याला पडला असेल ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला परंतु त्या एका तासामध्ये अपेक्षित पद्धतीने tackle करता आलं नाही... अभ्यास हा कमी जास्त नसतो... अभ्यासाची दिशा त्या एक तासांमध्ये ठरत असते... सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासात खूप चांगला आहे परंतु आयोगाने ज्या पद्धतीने स्वतःला बदल केला आहे त्या पद्धतीने आपण स्वतःला बदलणं हे खूप अपेक्षित आहे... कम्बाईन पूर्व परीक्षा आता राज्यसेवा पूर्व परीक्षा सारखी वाटायला लागलेली आहे.... साहजिकच आहे वाढणारा कट ऑफ वाढणारी स्पर्धा आणि जे विद्यार्थी संपूर्ण आयुष्यातले महत्त्वपूर्ण दिवस ह्या स्पर्धा परीक्षेसाठी देत आहे त्या विद्यार्थ्यांना दुसरे काही ऑप्शन भेटावे याकरिता कदाचित आयोगाने स्वतःला या पद्धतीने बदल केला आहे की त्याच्यातून नवीन अधिकारी भेटावे असे अपेक्षित असेल.... परंतु या सर्व बाबींमध्ये आपल्या विद्यार्थी मित्र जे चार-पाच वर्षापासून तयारी करत आहे त्यांचा थोडा तरी विचार होणे अपेक्षित होते... परंतु यास तुम्ही किंवा कोणीही म्हणू शकत नाही की आयोग असा का बदलला..... हरकत नसावी या सर्व बाबी आता आपल्याला स्वीकाराव्या लागतील आणि ज्या पद्धतीने पेपर पद्धत बदलली आहे त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यासाची ही पद्धत बदलावी लागणार आहे... हे मात्र सत्य आहे.... आणि सर्वात महत्त्वाचे दोन दगडावर पाय ठेवून हे आता संपवावे लागणार आहे... सत्य परिस्थिती ही आहे जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त त्याच्याकडेच असायला पाहिजे... आणि जर तुम्ही कम्बाईन परीक्षेची तयारी करत असाल तर संपूर्ण लक्ष त्याच परीक्षेकडे असायला हवे... लक्षात घ्या ह्या सर्व बाबी आपल्या येत्या आगामी परीक्षेसाठी खूप उपयोगाचे लागू होणार आहे... ही स्पर्धा आयुष्याची नाहीये ही स्पर्धा आयोगाला ओळखून प्रशासनात शिरण्याची आहे... तर आत्ताच ठरवा नेमकं काय करायचं आहे प्रत्येक परीक्षेची डिमांड ही वेगवेगळी आहे जर तुम्ही राज्यसेवा करून कम्बाईन वर वळत असेल किंवा कम्बाईन करून राज्यसेवा देण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर कृपया करून अशा प्रकारे तुमच्या महत्त्वाच्या आयुष्यातल्या वेळेला असे वळण देऊ नका.... एक वर्ष कोणत्याही एका एक्झामला टार्गेट करा आणि फक्त त्या एक्झाम च्या बद्दल विचार करा आणि त्यासाठी वाटेल त्या परिश्रमाची परिक्रष्टा करा यश 100 टक्के तुम्हाला मिळणार आहे...... यदा कदाचित पुढील वाटचालीसाठी नेमकं काय करायचं आहे याबद्दल जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर नक्की साधू शकतात इतर कोणाला बोलायची इच्छा असेल की नेमकं काय करू सर पुढे त्यासाठीही माझा हा पर्सनल नंबर मी तुमच्यासोबत शेअर करतो... Adv. Sudhir Bodkhe Patil 8390097967, 8975593799

महाराष्ट्र_गट_ब_राजपत्रित_सेवा_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2026_सेट_B.pdf11.72 MB