uk
Feedback
Tech With Rahul

Tech With Rahul

Відкрити в Telegram

विविध शासकीय व कृषी योजनांचे तात्काळ अपडेट या चॅनलवरती आपल्याला मिळतील.

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Tech With Rahul

Канал Tech With Rahul (@tech_with_rahul) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 14 490 підписників, посідаючи 13 670 місце в категорії Освіта та 28 005 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 14 490 підписників.

За останніми даними від 27 серпня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -160, а за останні 24 години на -4, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 26.61%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 8.45% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 856 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 224 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
विविध शासकीय व कृषी योजनांचे तात्काळ अपडेट या चॅनलवरती आपल्याला मिळतील.

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 серпня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

14 490
Підписники
-424 години
-317 днів
-16030 день
Архів дописів
शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना 'मुख्यसेविका' पदावर पदोन्नतीची सुवर्णसंधी; २१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज ​नवी मुंबई: एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत केवळ शहरी विभागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अंगणवाडी सेविकांमधून 'मुख्यसेविका' (पर्यवेक्षिका) पदावर पदोन्नती कोट्यातून रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. ​महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या आयुक्तालयाकडून याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया केवळ राज्यातील १०४ नागरी (शहरी) प्रकल्पांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या सेविकांसाठीच राबवली जाणार आहे. ​काय आहेत प्रमुख पात्रता निकष? या पदोन्नती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी खालील निकष निश्चित करण्यात आले आहेत: ​सेवेचा कालावधी: उमेदवाराने १ जानेवारी २०२५ पर्यंत सलग १० वर्षे विनाखंड आणि नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. ​वयोमर्यादा: १ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९७५ नंतरचा असावा). ​शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही संवैधानिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर असणे आवश्यक आहे. ​अतिरिक्त अटी: मुख्यसेविका पदावर रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दोन वर्षांच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र आणि मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. तसेच, तीन वर्षांच्या आत हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करेपर्यंत उमेदवाराची वार्षिक वेतनवाढ आणि पुढील पदोन्नती रोखली जाईल. ​अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना: ​अर्ज करण्याची मुदत: ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांना २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २३.५५ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. ​प्रमाणपत्र बंधनकारक: ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्यामार्फत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. ​जुन्या अर्जदारांना सूट: ज्या सेविकांनी २५ एप्रिल २०२५ च्या पत्राच्या अनुषंगाने यापूर्वीच ऑनलाइन अर्ज 'Successfully Submitted' केला आहे आणि परीक्षेची फी भरली आहे, त्यांना या प्रक्रियेत पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ​हेल्पलाईन सुविधा: ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास, प्रशासनाने ९५९४५३३२०३ हा हेल्पलाईन क्रमांक (Helpline Number) उपलब्ध करून दिला आहे. ​तरी सर्व पात्र नागरी अंगणवाडी सेविकांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

photo content

ग्रामसेवकांना आता जीएएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीमधून हजेरी सक्तीची आप आपल्या गावातील व्हॉट्सअँप ग्रुपला पत्र शेयर करून जनतेला
ग्रामसेवकांना आता जीएएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीमधून हजेरी सक्तीची आप आपल्या गावातील व्हॉट्सअँप ग्रुपला पत्र शेयर करून जनतेला नक्की अवगत करा. 🙏

Gadchiroli

Chandrapur

Jalgaon

Jalna

Nagpur

Ratnagiri

Wardha

Satara

🚨 आनंदाची बातमी! नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' जाहिरात २०२६ 🚨   राज्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्याची सुवर्णसंधी!   नवीन सेवा केंद्रे सुरू करण्याबाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ८ जिल्ह्यांमधील जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. जे नागरिक स्वतःचे सेवा केंद्र सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.   📌 सविस्तर माहिती, पात्रता आणि अटी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या PDF फाईल्स नक्की पाहा. www.shivbhumi.com 👇 जिल्हानिहाय जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF डाउनलोड करा:

जालना - आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु! आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 👆 2026
जालना - आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु! आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 👆 2026

शेतकरी कर्जमाफी २०२६: e-KYC मध्ये अडचण? 'हा' ऑफलाइन अर्ज 👆भरा

नमस्कार मित्रांनो! मी राहुल वाघ, आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडीओ मधे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये शासनाकडून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांची यादीत नावे आली आहेत, त्यांना e-KYC (आधार प्रमाणीकरण) करणे अनिवार्य आहे. परंतु, अनेक शेतकरी मित्रांना ही e-KYC करताना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. जर तुम्हालाही e-KYC करताना अडचण येत असेल, तर शासनाने यावर उपाय म्हणून एक ऑफलाइन अर्ज उपलब्ध करून दिला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा अर्ज अचूक कसा भरायचा आणि कोणती कागदपत्रे अर्जासोबत जोडायची, याबाबत सविस्तर माहिती. मित्रांनो सर्वात आधी हा अर्ज तुम्हाला कोठे मिळेत, तर हा अर्ज आपलया टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे चॅनलची लिंक या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मधे तुम्हाला पहायला मिळेल, मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहत असलेला हा अर्ज 'मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था' यांच्या नावे द्यायचा आहे. तसेच खाली तुमच्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे, त्यानंतर अर्जामधे विचारलेली वैयक्तिक आणि बँकेची माहिती हि अचूक भरायची आहे या माहितीमधे, तुमचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कर्जयादिमधील तुमच्या नावासमोरिल विशिष्ट क्रमांक (VK Number). अचूक लिहायचा आहे, त्यानंतर तुमचा Farmer ID म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक) हिलायचा आहे, त्यानंतर खाली ज्या बँकेत तुमचे कर्ज आहे त्या बँकेचे नाव आणि शाखेचे नाव लिहायचे आहे, तसेच खाली तुमचा बचत खाते क्रमांक म्हणजेच Saving Account Number आणि कर्ज खाते क्रमांक म्हणजेच Loan Account Number लिहायचा आहे, आणि शेवटी तुमच्या कर्जाची एकूण रक्कम." लिहायची आहे. त्यानंतर मित्रांनो या अर्जामधे एक तक्ता दिलेला आहे, ज्यामध्ये आधार प्रमाणीकरण न होण्याची १४ मुख्य कारणे दिलेली आहेत. तुम्हाला जी अडचण येत आहे, त्यासमोरील रकान्यात तुम्हाला खूण म्हणजेच टिक करायची आहे आणि शेरा लिहायचा आहे. काही प्रमुख कारणे कोण कोणती आहेत ती पाहुयात, यामधे सर्वप्रथम तुमचे कर्ज आणि पोर्टलवरील रक्कम यामध्ये तफावत (फरक) असणे, हाताचे ठसे किंवा डोळे स्कॅन न होणे म्हणजेच बायोमॅट्रिक अडचण, सोसायटी आणि इतर बँक अशा दोन्ही ठिकाणी कर्ज असणे, प्रमाणीकरण करताना "Record Not Found" असा संदेश येणे, पोर्टलवर बचत खाते क्रमांक चुकीचा दाखवणे किंवा संयुक्त (Joint) खाते असणे, जर खातेदार नातेवाईक मयत असतील, तर त्यामुळे प्रमाणीकरण न होणे, तुमची सर्व माहिती बरोबर आहे पण पोर्टलवर दुसऱ्याचेच नाव दाखवत असणे, किंवा तुम्ही थकबाकीदार असूनही कर्जमाफी यादीत नाव न येणे. मित्रांनो या १४ कारणांपैकी जे कारण तुमचे असेल, ते निवडा. जर तुमचे कारण या यादीत नसेल, तर १४ व्या क्रमांकावर 'इतर (इथे वर्णन करा)' असा पर्याय आहे, तिथे तुम्ही तुमची अडचण लिहू शकता. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडायची? तर सर्वप्रथम १. आपले सरकार केंद्रावरील आलेल्या माहितीचा संगणक स्क्रीनशॉट किंवा झेरॉक्स प्रत. त्यानंतर २. तुमच्या आधार कार्डची प्रत (झेरॉक्स). त्यानंतर ३. जर खातेदार मयत असेल, तर मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल, त्यानंतर ४. बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, ५. आणि इतर कोणतीही आवश्यक कागदपत्रे जी तुमच्या अडचणीशी संबंधित आहेत ती अतिरीक्त तुम्ही जोडू शकता. शेवटी, मित्रांनो अर्जाच्या तळाशी 'आपला विश्वासू' खाली तुमची सही करा, तुमचे नाव, पत्ता मु.पो., तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा व्यवस्थित लिहा. हा संपूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करा जेणेकरून तुमच्या कर्जमाफीचा मार्ग हा मोकळा होईल. तर मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल, तर या व्हिडिओला लाईक तसेच शेयर करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर हा व्हिडीओ युट्यूबवरती पाहत असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पाहत असाल, तर पेजला लाईक आणि फॉलो करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. चला तर मग, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण पुढिल व्हिडीओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र!"

photo content

२ लाख कर्जमाफीची नवीन प्रेसनोट जाहीर! | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६

राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धा 2026-2027
राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धा 2026-2027

🚨 महत्त्वाची बातमी: 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ची पहिली यादी जाहीर! 🚨   शेतकरी बांधवांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला आहे! आज सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील यांच्या पत्रकार परिषदेत कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून पहिल्या यादीचे अधिकृत अनावरण करण्यात आले आहे.   खालील महत्त्वाचे मुद्दे नक्की वाचा: प्रमुख ठळक बाबी:पहिली यादी जाहीर: कर्जमाफीची पहिली यादी आज प्रसिद्ध झाली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या याद्या एकाच वेळी न येता टप्प्याटप्प्याने प्रकाशित केल्या जातील. ⚠️ केवळ ५३३ शेतकऱ्यांचा समावेश: पहिल्या यादीत संपूर्ण राज्यातून केवळ ५३३ शेतकऱ्यांचीच नावे आहेत. (ही एक 'पायलट रन' किंवा प्रणालीची तांत्रिक चाचणी असू शकते). 🏦 यादी कुठे पाहायची?: ही यादी सध्या कोणत्याही पब्लिक पोर्टलवर किंवा ऑनलाईन उपलब्ध नाही. ती थेट संबंधित बँकांच्या लॉगिनला देण्यात आली आहे. त्यामुळे माहितीसाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊनच संपर्क साधावा लागेल. ज्यांचे नाव यादीत आहे त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया: कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी 'आधार प्रमाणीकरण' (e-KYC) करणे अनिवार्य आहे.   सोबत काय न्यावे? 👉 आधार कार्ड 👉 बँकेचे पासबुक 👉 आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर   (जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा CSC केंद्रावर जाऊन KYC पूर्ण करा)   ज्यांचे नाव पहिल्या यादीत नाही त्यांनी काय करावे? अजिबात घाबरून जाण्याचे किंवा निराश होण्याचे कारण नाही! पुढील मोठी यादी ही येत्या २ ते ३ दिवसांत प्रकाशित केली जाईल. त्यामुळे आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा. 📲 जशी पुढची यादी प्रकाशित होईल, त्याची सर्वात पहिली अपडेट तुम्हाला इथेच मिळेल. ही अत्यंत महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा! — आपला, राहुल वाघ (अशाच नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्ससाठी आपले चॅनल Subscribe/Follow करायला विसरू नका!) 🔗YouTube : www.youtube.com/techwithrahul 🔗Facebook : https://www.facebook.com/fbtechwithrahul/  🔗Instagram : https://www.instagram.com/techwithrahulinsta/ 🔗 Website : www.shivbhumi.com

https://www.facebook.com/reel/1387792119979171 मोबाईलवर फक्त २ मिनिटांत पहा तुमच्या गावचे 'ई-पीक पाहणी सहाय्यक' कोण आहेत! नमस्कार शेतकरी मित्रांनो! 🙏 आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की, आपल्या गावासाठी नियुक्त केलेल्या 'ई-पीक पाहणी सहाय्यकाचे' (E-Peek Pahani Sahayyak) नाव ऑनलाईन कसे तपासायचे. आपल्या शेतातील अद्रक, मका, हरभरा किंवा कांदा बीजोत्पादन यांसारख्या कोणत्याही पिकांची ई-पीक पाहणी ॲपवर अचूक नोंद करण्यासाठी, तसेच काही तांत्रिक अडचण आल्यास गावातील नियुक्त सहाय्यकाशी संपर्क साधणे अत्यंत गरजेचे असते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरून ही माहिती कशी मिळवायची, याची स्टेप-बाय-स्टेप माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये काय पाहाल? ई-पीक पाहणी सहाय्यकाचे नाव कसे शोधावे? शासनाच्या अधिकृत वेबसाईट/ॲपचा वापर कसा करावा? ई-पीक पाहणी करताना येणाऱ्या अडचणींवर उपाय. आपली वेबसाईट www.shivbhumi.com