We Support Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Показати більше736
Підписники
-124 години
-47 днів
-230 днів
Архів дописів
काल हरियाणाच्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली त्यावेळी पानिपतला कालाम या ठिकाणी जे आपल्याला पानिपत युद्ध स्मारक करायचा आहे मराठ्यांच्या शौर्याचा जो एक प्रचंड मोठा ऐतिहासिक अशा प्रकारचा जो क्षण आहे त्या संदर्भात एक अतिशय चांगलं स्मारक व्हावं ही आपली अपेक्षा होती. त्या निमित्ताने काही जागा पण आपण घेतली. एक कमिटी पण आपण केली. काल त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्हालाही त्या ठिकाणी असं स्मारक करायचं आहे
मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे आहे आम्हाला अजून वेळ पाहिजे आहे तर त्यांना वेळ ही वाढवून द्यायला सरकार तयार आहे. सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला ( Hindi )
मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे आहे आम्हाला अजून वेळ पाहिजे आहे तर त्यांना वेळ ही वाढवून द्यायला सरकार तयार आहे. सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत. पण सातत्याने जे एनआयसीयू (NICU) असतात त्याच्यामध्ये आपण फायर ऑडिट करत असतो. फायर ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीने आग का लागली? फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल आणि अशा पद्धतीने चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय क कारवाई केली जाईल
साखरेच्या साठेबाजांवर कडक चाबूक!
देवाभाऊंचा आदेश शोधून काढा, कारवाई करा!
दोन टप्पे मिळून 12 lakh 56 हजार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि द हजार 115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत. सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत, यापैकी प्रत्येक शेतकऱ्याच नीट इ केवायसी होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕔 5.03pm | 24-8-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/4OVhzDxfUQw?si=gOBrbi-oR31Wy0LC
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1617652730062906/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2091851466030129250?s=20
देवाभाऊंचा मोठा निर्णय
NEET पेपर फुटीनंतर कोचिंग क्लासेसची ‘दादागिरी’ बंद
बडा नेता असो किंवा असुद्या मंत्री आमदार खासदार....चुकी करणारा कोणीही असुद्या देवाभाऊची कारवाई होणार म्हणजे होणार...
देवाभाऊंच्या निर्णयाने घडलेला हा विकास....नवे विक्रम पण आणि नवा ट्रेंड पण...
कर्मचाऱ्याचे नियुक्ती पत्र जारी झाल्यापासून त्याचा जर्नी (प्रवास) सुरू होईल. त्याने घेतलेली कोणतीही सुटी किंवा त्याला मिळणारे विविध फायदे आता नव्याने मॅन्युअली नोंदवण्याची गरज भासणार नाही; या सर्व गोष्टी आपोआप त्याच्या सर्व्हिस बुकवर नोंदवल्या जातील आणि सिस्टम बिल्डअप होत जाईल
गेल्या दोन वर्षांच्या प्रवासात एसीएस जीएडी (ACS GAD), मुख्य सचिव आणि इतर सर्व विभागांच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम झाले आहे.सचिवांच्या मार्गदर्शनाखालील संपूर्ण टीमने डेटा गोळा करणे (Data Collection), त्याचे संकलन करणे (Collation) आणि त्यात आवश्यक सुधारणा करण्याचे काम चोख बजावले
विशेषतः आपल्याकडे माहिती आहे आपण जीआरने चालतो मगाशी मी सांगितलं आणि आपण इतके जीआर काढतो आणि मग अनेक वेळा जर एकाच विभागामध्ये एकाच विषयाचे जीआर आपण पाहिले तर ते एकमेकाला कॉन्ट्राडिक्ट करणारे दहा जीआर आपल्याला पाहायला मिळतात
आपल्या सर्वांना कल्पना आहे की खरं तर शासन जे चालतं हे नियमाने चालतं. अनेक वेळा नियम इतके स्टॅटिक (static) होऊन जातात, म्हणजे एखाद्या वेळेस जर माझ्या पत्नीने मला विचारलं की 'उद्या माझ्या माहेरी जेवायला जायचं आहे का?' तर मला विचारण्याचा मोह होतो की, 'जीआर (GR) काढलाय का? तर मी जाईल जेवायला, नाहीतर जाणार नाही.'
आपल्या सुदैवाने कोलॅप्स व्हायच्या आधी आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचं (Intervention) केलं आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे. एचआर रिफॉर्म्स (HR Reforms) मध्ये आता देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत, सर्वात चांगले रिफॉर्म्स आज आपल्या राज्यामध्ये झालेले आहेत
प्रत्येक मुख्यमंत्री जीएडी विभाग आपल्याकडे ठेवतो आणि जीएडीला अप्पर मुख्य सचिव दर्जाचा एक मोठा अधिकारी आपण देतो. मुख्यमंत्र्यांचे त्या विभागाशी देणेघेणे नसते; त्या अधिकाऱ्याला देणेघेणे नसते असे मी म्हणणार नाही, पण थोडी अनिच्छा असते किंवा 'मला कुठे आणून ठेवले, मी एवढा क्षमतावान अधिकारी आणि मला का यडीत (जीएडीत) बसवले' अशा प्रकारचे एक चित्र आपण खूप वर्षे बघितले
खरं तर जेव्हा याची सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा राधा मॅडमनी या संदर्भात काही विषय मांडले, तेव्हा माझ्या देखील एक गोष्ट लक्षात आली की राज्यातला तुलनेने सर्वात महत्त्वाचा विभाग हा जीएडी (GAD - सामान्य प्रशासन विभाग) आणि राज्यातला तुलनेने सर्वात दुर्लक्षित विभाग देखील जीएडीच आहे
