Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 154
Підписники
-224 години
-47 днів
-4530 день
Архів дописів
4 154
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : महसूल व वन विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions
4 154
CMO Maharashtra Tweets:
🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of MoUs between the Government of Maharashtra (Energy Department) and various companies in Mantralaya, Mumbai, today.
Details of the MOUs:
🔸Adani Power Limited and its Coastal-Maha Atomic Energy Limited
For setting up a nuclear power plant at Barsu, Dist. Ratnagiri.
✅Proposed Capacity: 6000 MW
✅Proposed Investment: ₹1,50,000 Crore
✅Direct + Indirect Employment Opportunities: 4500 + 7500 = 12,000
🔸Reliance Industries Ltd.
For setting up Bharat Small Reactors/Small Modular Reactor (SMR)/Nuclear Power Reactors at Purnagadh, Dist. Ratnagiri.
✅Proposed Capacity: 2 X 220 MW to 6 X 1200 MW
✅Proposed Investment: ₹8000 to ₹2,00,000 Crore
✅Direct + Indirect Employment Opportunities: 3000 + 1,00,000 = 1,03,000
🔸NTPC (National Thermal Power Corporation) Ltd.
For setting up a nuclear power plant at Devgad, Dist. Sindhudurg.
✅Proposed Capacity: 6 Units/ 4000 MW - 7200 MW
✅Proposed Investment: ₹1,00,000 Crore
✅Direct + Indirect Employment Opportunities: 5000
Minister Atul Save, Business Head, Nuclear Energy at Adani Group, Vivek Sharma, President Nuclear Energy Business Reliance Industries Ltd., Ranjay Sharan, CEO, NTPC, Arnada Prasad Samal and other senior officials were present.
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासन (ऊर्जा विभाग) आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.
सामंजस्य करारांचे तपशील
🔸अदानी पॉवर लिमिटेड व त्यांची कोस्टल-महा ॲटोमिक एनर्जी लिमिटेड
बारसू, जि. रत्नागिरी येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.
✅ प्रस्तावित स्थापित क्षमता - 6000 मेगावॅट
✅ प्रस्तावित गुंतवणूक - ₹1,50,000 कोटी
✅ प्रत्यक्ष+अप्रत्यक्ष रोजगार संधी : 4500 + 7500 = 12,000
🔸 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
पूर्णगड जि. रत्नागिरी येथे 'भारत स्मॉल रिॲक्टर्स' / स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (SMR)/ अणुऊर्जा रिॲक्टर प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.
✅ प्रस्तावित स्थापित क्षमता : 2 X 220 MW ते 6 X 1200 MW
✅ प्रस्तावित गुंतवणूक : ₹8000 ते ₹2,00,000 कोटी
✅ प्रत्यक्ष+अप्रत्यक्ष रोजगार संधी : 3000 + 1,00,000 = 1,03,000
🔸 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार.
✅ प्रस्तावित स्थापित क्षमता : एकूण 6 युनिट्सद्वारे 4000 ते 7200 मेगावॅट
✅ प्रस्तावित गुंतवणूक : ₹1,00,000 कोटी
✅ प्रत्यक्ष+अप्रत्यक्ष रोजगार संधी : 5000
यावेळी मंत्री अतुल सावे, अदानी समूहाच्या न्यूक्लिअर एनर्जीचे बिझनेस हेड विवेक शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या न्यूक्लिअर एनर्जी बिझनेसचे अध्यक्ष, रंजय शरण, एनटीपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णदा प्रसाद सामल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #NuclearEnergyAgreement
4 154
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 18 मे 2026
आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/201836/
तीर्थक्षेत्र विकासकामे दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/201808/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Healthy State, Healthy Future: Accelerating Medical Infrastructure and Excellence in Maharashtra
Chaired a meeting of the 'Social Sector War Room' in Mumbai today. Instructed all departments to work in coordination to complete the construction of 'Pradhan Mantri Ayushman Arogya Mandir', Critical Care Blocks, and laboratories within the stipulated time to make the state's healthcare services effective, high-quality, and citizen-oriented. Conducted a detailed review regarding various pending works under the Central and State Government's Pradhan Mantri Jan Arogya Yojana, strengthening of health infrastructure under the 15th Finance Commission, Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission, the establishment of 13 new medical colleges, and the HPV vaccination campaign.
Referring to the positive changes made in the Primary Health Centres of Pune, directed that such good initiatives should be adopted elsewhere.
Reviewed the HPV vaccination campaign launched by Hon PM Narendra Modi Ji for cervical cancer prevention. Directed officials to fast-track Maharashtra's 10-lakh HPV vaccination target for girls across Maharashtra by intensifying district awareness campaigns with parental consent.
DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Prakash Abitkar, MoS Meghnatai Bordikar and senior officials were present.
#Maharashtra #Mumbai
https://x.com/Dev_Fadnavis/status/2056418058793873919?s=20
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Preserving Maharashtra’s Sacred Heritage: ₹993 Crore Development Push for Major Tirthkshetras
Chaired the Apex Committee meeting on development plans for 6 major Tirthkshetras, forts and historical sites across Maharashtra. Directed officials to preserve the spiritual, historical and cultural identity of these sacred places while ensuring modern amenities, tourism infrastructure and healthcare facilities for devotees and visitors.
Directed that the ₹172.22 crore comprehensive development works at Shri Kshetra Bhimashankar Jyotirlinga be completed by May 2027. Instructed to undertake road widening, modern bus terminal and parking facilities, pedestrian pathways, covered corridors, sewage treatment project, police station and rest house facilities. Also directed that future planning should include a substation near Dimbhe Dam, ropeway facility, development of the MTDC Bhimashankar Resort and tourism facilities at Rajapur.
Directed implementation of the ₹41.71 crore conservation and development plan for Jagadguru Sant Tukaram Maharaj Janmasthan at Dehu, Vaikunthgaman Temple precinct and Bhandara Dongar, with focus on beautification, devotee facilities, greenery conservation and preservation of the natural environment.
At Fort Ajinkyatara, directed that the ₹134.80 crore conservation and beautification works including pathways, landscaping, restoration of Raj Sadar, conservation of bastions, viewing galleries, hanging bridge and tourism facilities be completed in a time-bound manner.
Directed implementation of the ₹133 crore conservation project at Sangam Mahuli Samadhisthal, including restoration and landscape development of the Samadhisthals of Maharani Tarabai, Maharani Yesubai and Chhatrapati Shahu Maharaj, along with conservation of the Sangameshwar Temple and ghats.
At Shri Kshetra Grishneshwar Jyotirlinga, Verul, directed to expedite the ₹210.45 crore development works including devotee accommodation, waiting halls, shopping complex, ghats and bypass road.
Directed that the ₹301.54 crore development works at Shri Kshetra Parli Vaijnath Jyotirlinga be completed in phases, including temple beautification, digital queue system, annachhatra, rejuvenation of Harihar and Markandeya Tirthas, disabled-friendly facilities and development works at Meru Parvat.
These projects, with a total outlay of nearly ₹993 crore, aim to create future-ready infrastructure while preserving Maharashtra’s sacred and historical legacy for generations to come.
DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Ganesh Naik ji, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Jaykumar Gore, MLA Dilip Walse Patil ji and senior officials were present.
#Maharashtra #TeerthKshetra
https://x.com/Dev_Fadnavis/status/2056411366584701160?s=20
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Hon PM Narendra Modi Ji Honoured with Norway’s Highest Recognition!
A proud recognition of the visionary leadership as our Hon PM Narendra Modi Ji is conferred with Norway's highest honour, the ‘Grand Cross of the Royal Norwegian Order of Merit.’ This 32nd international award stands as a testament towards Hon PM Modi Ji’s transformative leadership, which has elevated India’s prestige on the global stage and filled every Indian with pride through his message of peace, unity and international cooperation.
#India #Norway #PMModiInNorway #IndiaNordicSummit
https://x.com/Dev_Fadnavis/status/2056409891963883888?s=20
4 154
CMO Maharashtra Tweets:
नागरिकाभिमुख आरोग्य व्यवस्थेसाठी राज्य शासनाचा वेगवान कृती आराखडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'सामाजिक क्षेत्र वॉर रूम' बैठक पार पडली.
केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत पायाभूत आरोग्य सुविधा बळकटीकरण, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी, एचपीव्ही लसीकरण मोहीम आदींसह विविध प्रलंबित कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील आरोग्यसेवा परिणामकारक, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा विशेष भर आहे. यासाठी तमिळनाडूसह विविध राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. केंद्र शासनाकडून मिळणारा निधी निर्धारित वेळेत खर्च होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारणे, क्रिटिकल केअर ब्लॉक व एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांची कामे वेगाने करण्यासाठी लक्ष घालावे. सर्व जिल्ह्यांनी आता निश्चित केलेल्या वेळापत्रकात काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. प्रलंबित प्रकल्पांमध्ये विभागांमधील समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी शासन म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि चांगले ब्रँडिंग असावे, मॉड्यूलर तंत्रज्ञानामुळे दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण होऊ शकत असल्याने अधिकाऱ्यांनी कल्पकतेने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आलेल्या सकारात्मक बदलाचा आदर्श घेत अशा चांगल्या उपक्रमांचा राज्यातील इतर ठिकाणीही अवलंब व्हायला हवा. नागरिकांना शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये गुणवत्ता जाणवली पाहिजे, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारून लक्ष घालावे. वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीमधील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
सर्व्हायकल कर्करोग प्रतिबंधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राला जवळपास 10 लाख मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जिल्हास्तरावर पालकांची संमती घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबवावी आणि लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. राज्यात नवीन 13 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या महाविद्यालयांच्या उभारणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामे वेगाने पूर्ण होतील, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राष्ट्रप्रथम या भावनेने एकजूट होऊया
आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे.
चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या!
#IndiaFirst #VocalForLocal #AtmanirbharBharat
4 154
54 कोटींची तरतूद
'श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर' परिसर मूळ आराखड्यातील पुढील नवीन कामांसाठी सुमारे ₹301.54 कोटींचा अतिरिक्त आराखडाही तयार करण्यात आला आहे. तीन टप्प्यांत या मंदिराची कामे पूर्ण केली जाणार आहेत. पहिला टप्पा (मुख्य मंदिर परिसर) विकासाअंतर्गत भव्य प्रवेशद्वारे, डिजिटल रांग व्यवस्था, प्रतीक्षागृहे, अन्नछत्र, योग-ध्यान केंद्र आणि मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, दुसरा टप्पा (तीर्थ व पुरातन स्थळे): हरिहर व मार्कंडेय तीर्थांचे वैज्ञानिक पुनरुज्जीवन, घाट, सायकल ट्रॅक, दिव्यांगसुलभ सुविधा, फूड कोर्ट आणि सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था उभारणे. तिसरा टप्पा (मेरू पर्वत विकास) मेरू पर्वतावर भव्य शिवमूर्ती, शिवपुराण व वैदिक संग्रहालय, ॲम्फिथिएटर, लेझर लाईट अँड साऊंड शो आणि ध्यानस्थळे विकसित करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गणेश नाईक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप वळसे पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #TeerthKshetra
4 154
CMO Maharashtra Tweets:
महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ₹993 कोटींच्या कामांना मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्यातील 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली.
राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन व संवर्धनास शासनाचे प्राधान्य असून तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच भाविक-पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी शिखर समितीच्या बैठकीत 6 तीर्थक्षेत्र विकासासाठी एकूण ₹993.72 कोटींच्या विकास आराखड्यांना आणि निधीला मंजुरी देण्यात आली.
श्री क्षेत्र भीमाशंकर आदर्श गाव विकासासाठी ₹172 कोटींची तरतूद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कामे करावीत. या विकास आराखड्याअंतर्गत अत्याधुनिक बस स्थानक आणि पार्किंग सुविधा उभारण्यात यावी. या कामांसाठी जागांचे भूसंपादन वेळेत करावे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹172.22 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मे 2027 पर्यंत काम पूर्ण करावे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध वळण रस्ते आणि रस्ते रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत. सध्या 2.7 मीटर रुंदी असलेले रस्ते 7 मीटरपर्यंत रुंद करावे. भाविक आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी मंदिर परिसरात पादचारी मार्ग, कव्हर्ड कॉरिडॉर, फ्लोअरिंग आणि ॲम्फिथिएटर, 257 केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, नवीन पोलीस ठाणे आणि विश्रामगृह, भविष्यातील विकास आराखड्यांतर्गत डिंभे धरण परिसरात सबस्टेशन उभारणे, केबल कार (रोपवे) सुविधा सुरू करणे, एमटीडीसीच्या भीमाशंकर रिसॉर्टचा विकास करणे, राजापूर येथे नव्या पर्यटन सुविधांची निर्मिती करण्याचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
जगदगुरु संत तुकाराम महाराज जन्मस्थानाच्या संवर्धनासाठी ₹41 कोटींची तरतूद
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे देहू येथील जन्मस्थान, वैकुंठगमन मंदिर परिसर तसेच भंडारा डोंगर परिसराच्या संवर्धन आणि विकासासाठी सर्वंकष आराखडा ₹41.71 कोटींचा आहे. यात संत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर, वैकुंठगमन स्थळ, भंडारा डोंगर आणि परिसरातील इतर धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करावे. यामध्ये रस्त्यांचे सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी निवास सुविधा तसेच माहिती केंद्र उभारणे, भंडारा डोंगर परिसरात हरित क्षेत्र संवर्धन, वृक्षारोपण आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
किल्ले अजिंक्यतारा जतन आणि संवर्धनासाठी ₹134.80 कोटींची तरतूद
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरणासाठी ₹134.80 कोटींचा विकास आराखडा आहे. यामध्ये नियोजित असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास, नियोजित प्रेक्षक गॅलरी, नवे पादचारी मार्ग व लँडस्केपिंग, राज सदरेचे पुनरुज्जीवन, बुरूजांचे संवर्धन, पर्यटन आकर्षणे, अत्याधुनिक झुलता पूल, स्वच्छता व विश्रांतीगृहांची कामे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित कामे वेळेत पार पाडावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
संगम माहुली (सातारा) समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी ₹133 कोटींची तरतूद
संगम माहुली समाधीस्थळ संवर्धनासाठी ₹133 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार, संवर्धन, पुनरुज्जीवन व परिसरात विकास कामे केली जाणार आहेत, याशिवाय, ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन हँगिंग ब्रिज (झुलता पूल), व्ह्यूइंग गॅलरी आणि सुसज्ज पाथवेची निर्मिती करून या परिसराला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा (वेरुळ)साठी ₹210 कोटींची तरतूद
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील प्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या विकासासाठी सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत आता ₹210.45 कोटी प्रस्तावित करण्यात आली असून, यामध्ये ₹53.82 कोटींच्या वाढीव निधीची मागणी समाविष्ट आहे. सध्या या ठिकाणी भाविकांसाठी अत्याधुनिक भक्त निवास, दर्शन बारी (प्रतीक्षागृह), शॉपिंग कॉम्प्लेक्स, फंक्शन हॉल, घाट आणि 1.6 किमीचा बाह्य वळण रस्ता (बायपास रोड) यांसारखी कामे गतीने करावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ₹301.
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या धानीवरी येथे एका टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. ही घटना ऐकून अतिशय दु:ख झाले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाशी मी सातत्याने संपर्कात आहे. पोलिस अधीक्षक हे स्वत: घटनास्थळी होते. तेथील बचावकार्य पूर्ण झाले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.
#Palghar #Maharashtra
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
