Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 209
Підписники
-424 години
-117 днів
-9230 день
Архів дописів
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
लाडक्या बहिणींच्या प्रेमाचा आशीर्वाद हीच माझी मोठी ताकद!
महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींच्या मनातील भावना, आमदार चित्राताई वाघ यांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या या अपार प्रेमाचा आणि आशीर्वादाचा मी मनापासून स्वीकार करतो. आपले आशीर्वाद मला जनसेवेचे कार्य पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी अधिक बळ आणि प्रेरणा देत राहतील.
माझा ठाम विश्वास आहे की, भावाने बहिणीचे केवळ संरक्षणच नव्हे, तर तिला सक्षम करण्याचाही प्रण घ्यायला हवा. महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या प्रेमाच्या ऋणात आयुष्यभर राहून, प्रत्येक बहिणीला आत्मनिर्भर आणि सक्षम करण्यासाठी कार्यरत राहणे, हाच माझा संकल्प आहे.
#Maharashtra #RakshaBandhan
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Historic Move for Indian Chess! 🇮🇳♟️
Heartiest congratulations to Grandmaster R. Praggnanandhaa on becoming the first Indian to win the Grand Chess Tour title at St. Louis, USA. His historic 15–13 victory over Fabiano Caruana is a landmark achievement for Indian chess making the entire nation proud.
Wishing Praggnanandhaa many more victories and greater heights ahead!
#India #IndianChess #GrandChessTour
4 209
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #Education | कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन | नाशिक
https://www.youtube.com/live/URQGJ2_oClI?si=FTTrF98Mik-ILNkg
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
प्रधानमंत्री जन धन योजनेद्वारे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि कुटुंबांचे बळकटीकरण!
#12YearsOfJanDhan #India
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
On the occasion of Raksha Bandhan, BJP Mahila Morcha State President MLC Chitratai Wagh tied a Rakhi and presented gifts lovingly prepared and sent by my tribal sisters. Will always remain grateful for this love and affection.
रक्षाबंधनानिमित्त भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा, आमदार चित्राताई वाघ यांनी राखी बांधली आणि आदिवासी बहिणींनी स्वतः तयार करून पाठवलेल्या भेटवस्तू दिल्या. माझ्या बहिणींच्या या प्रेमासाठी सदैव ऋणी राहीन.
#Maharashtra #RakshaBandhan
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Celebrating 12 years of Pradhan Mantri Jan Dhan Yojana, a transformative journey towards financial inclusion, bringing banking, financial services and greater opportunities closer to every family.
#12YearsOfJanDhan #India
4 209
CMO Maharashtra Tweets:
भक्तीचा, कीर्तनाचा, संगीताचा महासोहळा महाकुंभाचा!
सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम
#Maharashtra #DevendraFadnavis #KumbhBhaktiSangam
4 209
कैलास मानसरोवर यात्रेतील ३७ भाविकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीचा पुढाकार; सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील ३७ भाविक अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक आज, दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सागा येथून न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे सुखरूप रवाना झाले आहेत.
ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील जय गिरनारी ट्रस्ट, अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत हे ३७ भाविक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान ते सागा येथे अडकले. त्यांचे काठमांडू येथून परतीचे विमान २९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नियोजित असल्याने वेळेत काठमांडू गाठणे अत्यंत आवश्यक होते.
या समूहातील नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी सागा येथे अडकल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली.
माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पुढाकार घेत मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी तातडीने पत्रव्यवहार व समन्वय साधण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही तत्परतेने आवश्यक मदत व सहकार्य केले.
या सर्व प्रयत्नांना यश आले असून सर्व ३७ भाविकांचा सागा ते काठमांडू सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. संकटाच्या प्रसंगी तातडीने मदत मिळाल्याबद्दल सर्व भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन तसेच भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार व्यक्त केले आहेत
4 209
मराठी- प्रत्येकासाठी आपलेपणाची भाषा!
अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रात व्यावहारिक मराठी अवगत असलीच पाहिजे, या भूमिकेला पूर्ण समर्थन दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचे रिक्षा व टॅक्सी चालकांनी स्वागत केले आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis
