ru
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

Открыть в Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 🎯 eMPSCKatta 🎯

Канал 🎯 eMPSCKatta 🎯 (@empsckatta) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 97 046 подписчиков, занимая 1 448 место в категории Образование и 2 822 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 97 046 подписчиков.

Согласно последним данным от 20 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -1 060, а за последние 24 часа — -31, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 8.75%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 4.41% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 8 492 просмотров. В течение первых суток публикация набирает 4 276 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 8.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 21 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

97 046
Подписчики
-3124 часа
-2147 дней
-1 06030 дней
Архив постов
MPSC चालू घडामोडी ✅ 21 सप्टेंबर 2026 स्लिनेक्स-26 (SLINEX-26) द्विपक्षीय सागरी सराव⚓🚢 💡 Key Fact: भारत आणि श्रीलंका यांच्यातील 'स्लिनेक्स-26' या द्विपक्षीय सागरी सरावाच्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन 17 ते 21 सप्टेंबर 2026 या कालावधीत विशाखापट्टणम येथे करण्यात आले आहे. 📌 Important Fact: या सागरी सरावात भारतीय नौदलाकडून स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धनौका 'आयएनएस कवरत्ती' (INS Kavaratti) आणि ताफ्याला इंधन पुरवणारी नौका 'आयएनएस ज्योती' (INS Jyoti) सहभागी झाल्या आहेत. तर श्रीलंकेच्या नौदलाचे प्रतिनिधित्व 'एसएलएनएस सिंदुराला' (SLNS Sindurala) या नौकेने केले आहे. 📚 Static Fact: 'आयएनएस कवरत्ती' ही प्रोजेक्ट 28 (Project 28) अंतर्गत गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) द्वारे बांधण्यात आलेली कामोर्टा-क्लास (Kamorta-class) पाणबुडीविरोधी युद्धनौका असून ती ऑक्टोबर 2020 मध्ये नौदलात दाखल झाली होती. भारत-श्रीलंका नौदलांमधील SLINEX सरावाची सुरुवात 2005 मध्ये झाली होती. ब्रिक्स (BRICS) देशांमधील भारताची निर्यात 34 टक्क्यांनी वाढली 📈 💡 Key Fact: केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने 20 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-ऑगस्ट 2026 या कालावधीत चार प्रमुख ब्रिक्स (BRICS) देशांमधील भारताच्या निर्यातीत 34% ची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. 📌 Important Fact: चीन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि रशिया या चार देशांमधील भारताची निर्यात मागील वर्षीच्या याच कालावधीतील $14.9 अब्ज वरून वाढून $19.9 अब्ज इतकी झाली आहे. भारताच्या एकूण जागतिक निर्यातीतील या चार देशांचा वाटा 8.1% वरून 9.2% पर्यंत वाढला आहे. दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi

65 हजार रिक्त पदांची भरती 🔥
65 हजार रिक्त पदांची भरती 🔥

📌 Important Fact: या धोरणांतर्गत उडुपी (Udupi) येथे मरीन बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आणि सीवीड (Seaweed) उत्पादनासाठी विशेष पीएलआय (PLI) योजना राबविली जाणार आहे. २०३१ पर्यंत कर्नाटकची 'ब्ल्यू बायोइकॉनॉमी' ६-८ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिवस २०२६🐼 🗓️ Date: १९ सप्टेंबर २०२६ (सप्टेंबर महिन्यातील तिसरा शनिवार). 📌 Important Fact: रेड पांडा नेटवर्कतर्फे रेड पांडा (Ailurus fulgens) या लुप्तप्राय प्रजातीचे आणि पूर्व हिमालयातील त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. 📚 Static Fact: रेड पांडा हा सिक्कीम राज्याचा 'राज्य प्राणी' (State Animal) असून, तो भारतात प्रामुख्याने सिक्कीम, पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग टेकड्या आणि अरुणाचल प्रदेशात आढळतो. IUCN च्या लाल यादीत त्याला 'धोक्यात असलेला' (Endangered) म्हणून वर्गीकृत केले आहे. 👇दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi

MPSC चालू घडामोडी ✅ 20 सप्टेंबर 2026 पहिल्या 'नेक्स्ट जनरेशन मिसाईल व्हेसेल' (NGMV) ची पायाभरणी🚢 💡 Key Fact: भारतीय नौदलासाठी बांधण्यात येणाऱ्या पहिल्या 'नेक्स्ट जनरेशन मिसाईल व्हेसेल' (NGMV) चे 'कील लेईंग' (Keel Laying) कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL), कोची येथे पार पडले. 📌 Important Fact: भारतीय नौदलासाठी एकूण ६ NGMV युद्धनौका ९,८०५ कोटी रुपयांच्या करारांतर्गत बनवल्या जात असून या सर्व युद्धनौका 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत. 📚 Static Fact: या उच्च-गती युद्धनौका पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी ब्रह्मोस (BrahMos) क्षेपणास्त्रे, प्रगत अँटी-मिसाईल डिफेन्स सिस्टीम आणि अत्याधुनिक रडार प्रणालीने सुसज्ज असतील. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) आंतरराष्ट्रीय परिषद आणि ॲप लाँच ⚖️ 💡 Key Fact: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 'पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचे भविष्य' (The Future of Environment and Climate Dynamics) या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. 📌 Important Fact: याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी 'NGT Mobile App' (एनजीटी मोबाईल ॲप) चे अधिकृत अनावरण केले. या परिषदेत १७ देशांतील तज्ञ आणि न्यायिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. 📚 Static Fact: पंतप्रधानांनी परिषदेत नमूद केले की, भारताचे दरडोई कार्बन उत्सर्जन जागतिक सरासरीच्या निम्म्याहून कमी असून, विकसित देशांचे उत्सर्जन भारताच्या सहा पटीने अधिक आहे. सेमिकॉन इंडिया २०२६' चा समारोप💻 💡 Key Fact: नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आयोजित 'सेमिकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) या पाचव्या पर्वाचा समारोप झाला. 🎯 Theme: "सिलिकॉन टू सिस्टीम्स: बिल्डिंग द इकोसिस्टीम" (Silicon to Systems: Building the Ecosystem). दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY) २.० 👨‍🎓 💡 Key Fact: केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने ऑक्टोबर २०२६ पासून बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये DDU-GKY 2.0 अंतर्गत नवीन प्रशिक्षण तुकड्या (Training Batches) सुरू करण्याची घोषणा केली. 📌 Important Fact: पहिल्या टप्प्यात १४ राज्यांमधील ३४,९२० ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. डिसेंबर २०२७ पर्यंत ३,५७,११२ तरुणांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 📚 Static Fact: DDU-GKY ही ग्रामीण गरीब तरुणांना हमखास रोजगार देणारी 'रोजगार-आधारित कौशल्य प्रशिक्षण' (Placement-linked skill training) योजना आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ३ ते १२ महिन्यांचा असतो. आयएनएस त्रिशूल (INS Trishul) ची इजिप्तला भेट ⚓ 💡 Key Fact: भारतीय नौदलाची मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका 'आयएनएस त्रिशूल' (INS Trishul) ने १४ ते १७ सप्टेंबर २०२६ या काळात अलेक्झांड्रिया, इजिप्त येथे सदिच्छा भेट (Port Call) दिली. 📌 Important Fact: या भेटीदरम्यान भारतीय नौदलाने इजिप्शियन नौदलाच्या 'ENS Bernees' या युद्धनौकेसोबत 'PASSEX' (Passage Exercise) हा संयुक्त नौदल सराव पार पाडला. मोढेरा सूर्य मंदिरासाठी विशेष स्मारक नाणे🪙 💡 Key Fact: गुजरातच्या ऐतिहासिक मोढेरा सूर्य मंदिराच्या स्मरणार्थ (१०२६-२०२६) केंद्र सरकारकडून एक विशेष स्मारक नाणे जारी करण्यात येणार आहे. 📌 Important Fact: या ३२ ग्रॅम वजनाच्या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसऱ्या बाजूला मोढेरा सूर्य मंदिराची प्रतिकृती (Motif) कोरलेली असेल. हे नाणे निकेल, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून तयार केले जाईल. 📚 Static Fact: मोढेरा येथील सूर्य मंदिर हे सूर्य देवाला समर्पित असलेले एक ऐतिहासिक मंदिर आहे. जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) च्या नव्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती🌾 🌐 संयुक्त राष्ट्रांच्या 'जागतिक अन्न कार्यक्रम' (World Food Programme - WFP) च्या नवीन कार्यकारी संचालकपदी अमेरिकेचे कृषी अधिकारी ल्यूक जे. लिंडबर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 📌 Important Fact: त्यांनी सिंडी मॅककेन (Cindy McCain) यांची जागा घेतली आहे. 📚 Static Fact: WFP ची स्थापना १९६१ मध्ये झाली असून त्याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे. जगभरात भूकबळी रोखण्याच्या प्रयत्नांसाठी या संस्थेला २०२० चा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. कर्नाटकचे नवे सागरी जैवतंत्रज्ञान धोरण २०२६-३१ 🌊 💡 Key Fact: कर्नाटक राज्याने १२० कोटी रुपयांच्या खर्चासह 'सागरी जैवतंत्रज्ञान धोरण २०२६-३१' (Marine Biotechnology Policy 2026-31) ला मंजुरी दिली आहे.

ऑस्करसाठी मराठी चित्रपट गोंधळ ची निवड
ऑस्करसाठी मराठी चित्रपट गोंधळ ची निवड

MPSC चालू घडामोडी: 19 सप्टेंबर 2026 रेल्वे पायाभूत सुविधा विस्तार: चौक-कर्जत आणि मुकुटबन-गडचांदूर मार्ग (महाराष्ट्र)🚂 💡 Key Fact: भारतीय रेल्वेने १८ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील दोन प्रमुख रेल्वे प्रकल्पांना अधिकृत मंजुरी दिली आहे. यात 'चौक-कर्जत' रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि 'मुकुटबन-गडचांदूर' या नवीन रेल्वे मार्गाचा समावेश आहे. 📌 Important Fact: या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमाभागातील औद्योगिक आणि खाण क्षेत्रातील मालवाहतुकीला मोठी गती मिळेल, तसेच पनवेल-कर्जत या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासी क्षमता वाढेल. 📚 Static Fact: चौक-कर्जत मार्ग हा मध्य रेल्वेच्या (Central Railway) अंतर्गत येतो. 🚧 चौक - कर्जत प्रकल्प: १०.८६ किमी लांबीच्या या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार असून, यासाठी ४९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याचा मुख्य उद्देश पनवेल-कर्जत मार्गावरील प्रवासी व मालवाहतूक क्षमता वाढवणे हा आहे. 🚧 मुकुटबन (आदिलाबाद) - गडचांदूर प्रकल्प: ३८.२१ किमी लांबीचा हा नवीन रेल्वे मार्ग असून, यासाठी ४९३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याचा मुख्य उद्देश प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि कोळसा/सिमेंट मालवाहतूक सुलभ करणे हा आहे. ग्रो इंडिगोचा 'आदि' कार्यक्रम: भारतातील पहिले 'सॉइल कार्बन पेमेंट'🌱💰 💡 Key Fact: शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल पंजाब आणि हरियाणामधील २५५० पेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना भारतातील पहिले 'मृदा कार्बन देयक' (Soil Carbon Payment) थेट बँक खात्यात (DBT) वितरीत करण्यात आले. 🏢 Organisation: 'ग्रो इंडिगो' (Grow Indigo) द्वारे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) तांत्रिक मार्गदर्शनाखाली हा 'आदि' (Aadi) कार्यक्रम राबवला जातो. 📌 Important Fact: शेतकऱ्यांनी 'डायरेक्ट सीडेड राइस' (DSR), शून्य मशागत आणि पीक अवशेष व्यवस्थापन (स्टबल बर्निंग टाळणे) केल्यामुळे कार्बन उत्सर्जनाला आळा बसला. यासाठी त्यांना 'Verra VM0042' या जागतिक मानकांवर आधारित ५०,००० कार्बन क्रेडिट्सच्या स्वरूपात २.९ कोटी रुपयांपेक्षा जास्त मोबदला मिळाला. SCO देशांच्या आर्थिक आणि व्यापार मंत्र्यांची २५ वी बैठक 🌐 💡 Key Fact: शांघाय सहकार्य संघटना (SCO) सदस्य देशांच्या आर्थिक आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांची (Ministers Responsible for Economic and Foreign Trade) २५ वी उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. 📍 Place: ताजिकिस्तान. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा 'रुग्ण सुरक्षा दिन २०२६' विशेष कार्यक्रम_ 🏥 💡 Key Fact: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत (NIHFW) 'जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त' (World Patient Safety Day) विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. 🎯 Theme: 'सेफ केअर फॉर नॉन-कम्युनिकेबल डिसीजेस' (Safe Care for Noncommunicable Diseases - NCDs). 📌 Important Fact: भारतातील एकूण मृत्यूंपैकी जवळपास ६३% मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे (NCDs) होतात. त्यामुळे या आजारांच्या प्रतिबंध, निदान आणि सुरक्षित उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज या परिषदेत व्यक्त करण्यात आली. 👇 दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi

विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf

महाराष्ट्रामध्ये २७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून 'ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह' (Greenfield Shipbuilding Cluster) उभारण्यासाठी 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड'ने (MDL) या ठिकाणासाठी सामंजस्य करार केला आहे?
Anonymous voting

अ) या परिषदेच्या ५ व्या पर्वाचे आयोजन यशोभूमी (IICC), नवी दिल्ली येथे करण्यात आले. ब) 'सिलिकॉन टू सिस्टिम्स: बिल्डिंग द इकोसिस्टिम' ही या परिषदेची Theme होती. क) १,२७,५०० कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह 'सेमिकॉन २.०' योजनेला मंजुरी देण्यात आली आहे
Anonymous voting

1) केंद्र सरकारने EPFO च्या अनिवार्य कव्हरेजसाठीची वेतन मर्यादा १५,००० रुपयांवरून _____ रुपये प्रति महिना इतकी वाढवली आहे.
Anonymous voting

जा. क्र. 018/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेब
जा. क्र. 018/2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह दिनांक 23 सप्टेंबर 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

18 सप्टेंबर 2026 - MPSC चालू घडामोडी ईपीएफओ (EPFO) अनिवार्य वेतन मर्यादेत वाढ💰 💡 Key Fact: केंद्र सरकारने 17 सप्टेंबर 2026 (विश्वकर्मा जयंती) पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) अनिवार्य कव्हरेजसाठीची वेतन मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये प्रति महिना इतकी वाढवली आहे. 📌 Important Fact: या धोरणात्मक निर्णयामुळे भारतातील संघटित क्षेत्रातील 51 लाखांहून अधिक नवीन कामगारांना ईपीएफ (EPF), पेन्शन (EPS) आणि आयुर्विमा (EDLI) चे अनिवार्य संरक्षण मिळणार आहे. पेन्शन योजनेतील वाढीव योगदानासाठी केंद्र सरकारला अंदाजे 11,339 कोटी रुपयांचा वार्षिक अतिरिक्त भार सोसावा लागेल. 📚 Static Fact: याआधी सप्टेंबर 2014 मध्ये ही वेतन मर्यादा 6,500 रुपयांवरून 15,000 रुपये करण्यात आली होती. दिघी (रायगड) येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी क्लस्टर🚢 💡 Key Fact: महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी येथे 'ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह' (Greenfield Shipbuilding Cluster) उभारण्यासाठी 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. 🏢 Organisation: हा करार सार्वजनिक क्षेत्रातील 'माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड' (MDL) आणि 'नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड' (NSHIPML) यांच्यात झाला. 📌 Important Fact: या महाप्रकल्पामुळे महाराष्ट्रात मोठ्या व्यावसायिक जहाजांची बांधणी होणार असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सुमारे 90,000 रोजगार निर्माण होतील. तसेच, वार्षिक 2 दशलक्ष ग्रॉस टन जहाजबांधणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 📚 Static Fact: हा उपक्रम केंद्र सरकारच्या 'ग्रीनफिल्ड शिपबिल्डिंग क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन' आणि भारताला जागतिक स्तरावर आघाडीवर नेणाऱ्या 'मॅरीटाईम अमृत काळ व्हिजन 2047' (Maritime Amrit Kaal Vision 2047) च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. सेमिकॉन इंडिया 2026 (SEMICON India 2026) 💻 💡 Key Fact: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2026 रोजी 'सेमिकॉन इंडिया 2026' या पाचव्या पर्वाचे उद्घाटन झाले. 📍 Place: यशोभूमी (IICC), द्वारका, नवी दिल्ली. 🎯 Theme: 'सिलिकॉन टू सिस्टिम्स: बिल्डिंग द इकोसिस्टिम' (Silicon to Systems: Building the Ecosystem). 📌 Important Fact: भारताला सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) व 'SEMI' द्वारे याचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत जपान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसह 52 देशांतील 600 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. 📚 Static Fact: सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था मजबूत करण्यासाठी अलीकडेच 'सेमिकॉन 2.0' या नवीन टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे. स्वच्छता ही सेवा 2026 (Swachhata Hi Seva 2026)🧹 💡 Key Fact: देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीसाठी 'स्वच्छता ही सेवा 2026' मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. 🎯 Theme: 'स्वच्छता में सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत' (Swachhata Mein Sahbhag, Swachh Bharat, Viksit Bharat). भारताचे 51 वे डॉपलर वेदर रडार (51st Doppler Weather Radar)📡 💡 Key Fact: केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतातील 51 व्या डॉपलर वेदर रडारचे ओडिशातील संबळपूर येथे 17 सप्टेंबर 2026 रोजी उद्घाटन करण्यात आले. 📋 Scheme: हे रडार नव्याने मंजूर झालेल्या 'मिशन मौसम' (Mission Mausam) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग आहे. 📚 Static Fact: अति तीव्र हवामान आणि हवामान बदलाचा अचूक अंदाज घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2,000 कोटी रुपयांच्या खर्चासह 'मिशन मौसम'ला मंजुरी दिली आहे. हे मिशन प्रामुख्याने भारतीय हवामान विभाग (IMD), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरोलॉजी (IITM) आणि नॅशनल सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) या संस्था राबवणार आहेत. 👇दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा👇 @chalughadamodi

दहावी, बारावी वेळापत्रक✅
दहावी, बारावी वेळापत्रक✅

आजच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्न👆👆 https://t.me/ChaluGhadamodi/23763 दररोजच्या चालू घडामोडींसाठी जॉइन करा @chalughadamodi

केंद्र सरकारने १६ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू केलेल्या 'नेट झिरो पोर्टल' (Net Zero Portal) चा मुख्य उद्देश काय आहे?
Anonymous voting

दक्षिण कोरियातील चांगवोन येथे झालेल्या 'पॅरा शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६' मध्ये भारताच्या कोणत्या महिला संघाने R2 १० मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 सांघिक प्रकारात भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले?
Anonymous voting

२. 'मोठ्या राज्यांच्या' (Large States) श्रेणीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ३. डोंगराळ आणि ईशान्य राज्यांच्या श्रेणीत मणिपूरने अव्वल स्थान मिळवले आहे. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने सत्य आहेत?
Anonymous voting

१६ सप्टेंबर २०२६ रोजी साजरी करण्यात आलेल्या 'जागतिक ओझोन दिन'ची संकल्पना (Theme) खालीलपैकी कोणती होती?
Anonymous voting

अमृततर्फे राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीच्या पूर्वतयारी साठी अर्थसाहाय्य https://mahaamrut.org.in/
अमृततर्फे राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीच्या पूर्वतयारी साठी अर्थसाहाय्य https://mahaamrut.org.in/paripatra

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास 24 सप्टेंबर 2026 पर्
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास 24 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.