MPSC चालू घडामोडी: 25 ऑक्टोबर 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌾 महाराष्ट्रात 'मिशन मुरघास' आणि 'मागेल त्याला मुरघास' उपक्रम सुरू
🌾 राज्यातील ३०५ तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 'मिशन मुरघास' हे राज्यव्यापी अभियान सुरू केले.
💰 उपलब्ध हिरव्या चाऱ्याचे (मका, ज्वारी, नेपिअर गवत) शास्त्रीय पद्धतीने मुरघासामध्ये (Silage) रूपांतर करण्यासाठी २०२६-२७ च्या खरीप हंगामातील ५१.२० कोटी रुपयांच्या निधीव्यतिरिक्त ७६.४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
🐄 विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये 'मागेल त्याला मुरघास' योजनेअंतर्गत पशुपालकांना मुरघास खरेदीवर प्रति किलो ३ रुपये अनुदान (प्रति पशु दररोज ५ किलोच्या हिशोबाने ९० दिवसांसाठी थेट बँक खात्यात - DBT) दिले जाणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🧪 मुंबईत १४ व्या 'इंडिया केम २०२६' (India Chem 2026) परिषदेचा समारोप
🧪 रसायने व पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील १४ व्या द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचा २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत समारोप झाला.
📍 Place: मुंबई (भागीदार देश: जपान)
🎯 Theme: “Advantage Bharat: An Emerging Global Chemicals Hub”
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏅
५ व्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप: भारताची विक्रमी ११४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी
🏅 जपानमधील आयची-नागोया येथे १८ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या ५ व्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेचा (5th Asian Para Games 2026) २४ ऑक्टोबर २०२६ रोजी समारोप झाला असून, भारताने विक्रमी ११४ पदकांसह (३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य) पदकतालिकेत ऐतिहासिक चौथे स्थान पटकावले.
🎯 Theme: “Imagine One Heart” (अधिकृत घोषवाक्य)
🏆 अंतिम पदकतालिकेत चीनने पहिल्या (४३५ पदके - २०७ सुवर्ण), जपानने दुसऱ्या (१८६ पदके - ६४ सुवर्ण) आणि उझबेकिस्तानने तिसऱ्या (१४५ पदके - ४५ सुवर्ण) क्रमांकावर स्थान मिळवले. भारताने सर्वाधिक ६५ पदके पॅरा-ॲथलेटिक्समध्ये (२२ सुवर्ण) आणि १६ पदके पॅरा-बॅडमिंटनमध्ये जिंकली.
✅ महाराष्ट्रातील प्रमुख सुवर्णपदक विजेते – दिलीप महादू गावित (१०० मी. T47) आणि सचिन सर्जेराव खिलारी (गोळाफेक F46).
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌫️ दिल्ली-NCR साठी जगातील पहिल्या एकात्मिक वायुप्रदूषण विश्लेषण प्रयोगशाळेचे (AATAL) उद्घाटन
🌫️ केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी २४ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली-NCR साठी जगातील पहिल्या एकात्मिक वायुप्रदूषण विश्लेषण प्रयोगशाळेचे 'AATAL' (Integrated Atmospheric Chemistry and Aerosol Toxicity Analysis Laboratory) उद्घाटन केले.
🔬 'मिशन मौसम' (Mission Mausam) अंतर्गत उभारलेल्या या प्रयोगशाळेतील उपकरणांचा अंदाजित खर्च सुमारे ७९.५ कोटी रुपये आहे. ही प्रयोगशाळा 'AIRWISE' (Air Quality Warning and Integrated Decision Support System for Emissions) प्रणालीशी संलग्न असून, PM 2.5 व विषारी घटकांचे रासायनिक विश्लेषण करून प्रदूषणाचे नेमके स्रोत (वाहतूक, उद्योग, बायोमास ज्वलन, धूळ) रिअल-टाइममध्ये शोधण्यास सक्षम आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚂 स्वातंत्र्यानंतर प्रथमच मध्य प्रदेशातील 'सीधी' जिल्हा रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला
🌟 ६५ कि.मी. लांबीच्या रीवा–चुरहट रेल्वे मार्गामुळे मध्य प्रदेशातील 'सीधी' (Sidhi) हा जिल्हा स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडला गेला असून, या प्रकल्पांतर्गत 'देवेंद्र नगर–चुरहट' ही नवीन रेल्वे सेवाही सुरू करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇
@chalughadamodi