We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر739
مشترکین
+124 ساعت
+17 روز
-430 روز
آرشیو پست ها
रिकाम्या डोक्याच्या काँग्रेसला देवाभाऊंनी आरसा दाखवला! निवडणुकीचा निकाल आवडला तर आयोग चांगला, पराभव झाला की आयोगच खराब? वारे दोगले..
गेल्या 30 वर्षात भैयाजी बिगाडे सातत्याने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा प्रयत्न करतात. कधीही ते स्वतः समोर येत नाही, समोरसमोर करत नाही, आदर नाही, सत्कार नाही, तर न्याय मिळाला पाहिजे याकरता सातत्याने काम करणारे भैयाजी आहेत आणि म्हणूनच या कार्यक्रमाला येत असताना नेहमी मला आनंद होतो की आपल्या कर्तृत्वान पुढच्या पिढीला भेटण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते
आता समाजामध्ये काही लोक चांगले उद्योजक झाले पाहिजेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीन मोठं काम केलं पाहिजे याकरता प्रशिक्षण असेल याकरता कर्ज असेल या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना कशा देता येतील हा प्रयत्न देखील आपण करू. आणि त्यासोबत ही जी काही व्यवस्था आपण उभी करतोय त्यातनं आपल्या समाजातली मुलं आयएएस आयपीएस कसे होतील एमपीएससी मध्ये कसे जातील स्पर्धा परीक्षात कसे पास होतील याही संदर्भात सर्व प्रकारची प्रशिक्षण ही सुरू करण्याचं काम आपण करू
पण एक अजून अपेक्षा व्यक्त केली आहे की ज्याप्रमाणे पारटी आहे आरटी आहे चर्मकार समाजाचे देखील आपले जे विद्यार्थी आहेत यांच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आणि तत्सम गोष्टी झाल्या पाहिजेत आज केवळ लीडकॉम आपल्याकडे आहे पण आता या लीडकॉम ला नव्याने आपण रिपर्पस करू त्याला आपण नव्याने त्याची बांधणी करू आणि त्याच्या अंतर्गत जसं पार्टीमध्ये आरटी मध्ये काम होतं तसं काम हे त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि संत रविदास महाराजांच्या नावाने आपल्या चर्मकार समाजाच्या विद्यार्थ्यांकरता शिक्षण प्रशिक्षण उच्च शिक्षण या सगळ्या व्यवस्था या त्याच्या माध्यमातून कशा करता येतील हे आपण निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू हा विश्वास देखील मी आपल्याला या निमित्ताने देतो
बाभुळखेडाला जवळपास 37 हजार चौरस फुटाची जागा ही आपण आता चर्मकार सेवा संघाला दिलेली आहे आणि त्याच्यावर बांधकाम करण्याकरता देखील राज्य सरकारच्या वतीनेच आम्ही तुम्हाला निधी देऊ आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं रविदास महाराजांच स्मारक आणि त्यासोबत आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांकरता त्या ठिकाणी अभ्यास करता यावा याकरता एक चांगली ई- लायब्ररी ही आपण त्या ठिकाणी तयार करू आणि आपल्या समाजाच्या हिताचा एक हॉल की ज्यात वेगवेगळे कार्यक्रम हे आपल्याला असा कार्यक्रम करायचा असेल तर तो तिथे करता आला पाहिजे अशा प्रकारचं एक भव्य अस स्मारक आपण तयार करू
जातीपातीपेक्षा समाज एक झाला पाहिजे समाजाची उन्नती झाली पाहिजे समाजाची प्रगती झाली पाहिजे हा विचार मांडणारे संत श्रेष्ठ रविदास महाराज होते आणि आता यावर्षीपासून त्यांची 650 वी जयंती आपण साजरी करणार आहोत आणि भैयाजी मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात ही जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही खूप मोठे मोठे कार्यक्रम या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये घेणार आहोत
आज आपल्याला माहिती आहे आमच्या शिख समाजाच जे गुरुग्रंथ साहेब आहे शिख समाजाचं सर्वात मोठं ज्याचा एक प्रकारे ज्याचा आराध्य म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. त्या गुरुग्रंथ साहेब मध्ये देखील ज्यावेळेस गुरुदेव शिखांचे जे गुरु आहेत यांनी गुरुग्रंथ साहेब लिहायला घेतला आणि त्यावेळी अनेक गुरूंनी आपल्या स्वतःचे श्लोक तर त्यात लिहिलेच पण देशामध्ये मानवतेच्या कल्याणाच्या उत्तम गोष्टी काय आहेत याचं संकलन केलं आणि ते संकलनही त्यात टाकलं त्यामध्ये त्यांनाही हा मोह आवडता आला नाही आणि त्यांनी जवळपास 43 त्यातले जे दोहे घेतलेले आहेत ते संत श्रेष्ठ श्री रविदास महाराजांचे दोहे आहेत की जे आज आमचा सिख समाज एक प्रकारे त्याची पूजा करतो
रविदास महाराज की ज्यांनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं वाक्य आपल्याला सांगितलं मन चंगा तो कठोती मे गंगा या वाक्याचा अर्थ असा आहे की जर तुमचं मन पवित्र नसेल तर गंगेत जाऊन आंघोळ करूनही तुमचे पाप धुतले जाऊ शकत नाही
चर्मकार समाजातील आमचे जे बंधूभगिनी विद्यार्थी 65 टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवतील त्यांचा सत्कार करण्याची एक अतिशय सुंदर अशा प्रकारची परिपाठी सुरू झाली आज देखील 400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय 495 म्हणजे जवळजवळ 500 विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की दहावी मध्ये पहिला आलेला जो आमचा हिमांशू आहे त्याला 97.40 टक्के मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत तर आमची समृद्धी जी 12 वीत पहिली आलीये किंवा 12 वी मध्ये आपण जिचा सत्कार केलाय तिला जवळपास 94% मार्क मिळालेत
जे लोकं हरतात त्या लोकांना हरण्याचं खापर निवडणूक आयोगावर फोडायची इच्छा असते.
तेलंगणा, पंजाब, हिमाचल, कर्नाटकला जिंकल्यानंतर निवडणूक आयोग चांगलं असतं. पण भाजप जिंकल्या बरोबर निवडणूक आयोग खराब होत.
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
संवैधानिक संस्थांना बदनाम करायचं आणि संविधानाचा मुखवटा घालून त्यावरच वार करायचा, राहुल गांधींच्या अतिडाव्या राजकारणाचा बुरखा आता फाटलाय.
नाही मला असं वाटतं की पहिल्यांदा तर इंडिया आघाडी नावाचं काही अस्तित्वात नाही इंडिया आघाडी ही पूर्णपणे तुटलेली आहे संपलेली आहे. आपण सगळ्या लोकसभेनंतरच्या सगळ्या विधानसभा मध्ये बघितलं सगळीकडे एनडी आघाडी वेगवेगळी लढलेली आहे. याला फार तर मोदीजींच्या विरोधातली आघाडी म्हणता येईल मोदीजींना विरोध करण्याकरता एकत्रित येणारे लोक एवढंच यांना म्हणता येईल बाकी कुठलीही आघाडी शिल्लक नाही
म्हणूनच मी सांगितलं की हे वोट चोरी म्हणतायत पण यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे. मी तर माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करतो की एखादी अशी जाज कमिटी तयार करता येईल का? की जी यांचा मेंदू यांना परत आणून देईल जो चोरी गेलेला आहे किंवा यांनी घाण आहे तो त्यांना परत मिळेल अशी एखादी व्यवस्था करता येईल का अशी माझी मागणी आहे. Hindi
मला असं वाटतं की काल तीनही निवडणूक आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फेक नरेटिव हा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे राहुल गांधी यांच डिझाईन वेगळं आहे. Hindi
लोकांना कन्विन्स करता येत नाही तर कन्फ्युज करा पण मी जसं सांगितलं संविधान विरोधी अशा पद्धतीची ही मोडस ऑपररेंडी जी आहे की ज्यातन संविधानावरचा विश्वास उडवून कडवी डावी विचारसरणी यांना आहे ती आम्ही येऊ देणार नाही
मुळामध्ये आता जो अलनीनो आहे हा अजून पीकवर जाणार आहे साधारणपणे आत्ताचे एक्सपर्टचे जे काही ओपिनियन आहे त्यानुसार तो फेब्रुवारीमध्ये पीक करेल आणि फेब्रुवारी नंतर मग तो खाली येईल अशा पद्धतीचे म्हणजे जे काही पेसिफिक ओशन हिटिंग असतं ज्याच्यामुळे अलनीनो होतो तर ते पॅसिफिक ओशन हा कल डाऊन होणं किंवा त्यात थोडं शितलता येण हे सुरू होईल आणि त्यानंतर अल निनोचा जो इफेक्ट आहे हा कमी होईल त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रकारच्या तयारीत राहाव लागेल विशेषतः समजा अल निनोचा इफेक्ट वाढला तर आपल्याला ज्या अडचणी असतील त्याच्याही करता तयार राहावं लागेल ती तयारी आम्ही करतोय
मुळामध्ये आता बघा आपला प्रयत्न असा आहे की प्रत्येक जिल्ह्याला पाण्याचा आराखडा करायला लावला उपलब्ध साठ्यां मधलं पाणी आणि साधारण जुलै ऑगस्ट 2027 पर्यंत पुरेल एवढं पाणी ठेवून जर कुठे जास्ती पाणी असेल तर ते पाणी इतर गोष्टीं करता वापरता येईल
