fa
Feedback
mpsc insight

mpsc insight

رفتن به کانال در Telegram

MPSC letest updet , daily current affairs and letest update' pyq anylisis #pyq #G.k #MPSC #police #vanrkshak #policebharti https://t.me/official_mpsc #nokari #Bamudp #krushi #gramsevak #talathi #club #chalughadamodi #gov #current #offecer

نمایش بیشتر
3 542
مشترکین
-124 ساعت
-107 روز
-3530 روز
آرشیو پست ها
दिल्ली ‘ब्रिक्स’ परिषद : भारतासाठी महत्त्व (18th BRICS Summit) 👉 18 वी BRICS परिषद ( 12–13 सप्टेंबर 2026), नवी दिल्ली 👉 घोष
दिल्ली ‘ब्रिक्स’ परिषद : भारतासाठी महत्त्व (18th BRICS Summit) 👉 18 वी BRICS परिषद ( 12–13 सप्टेंबर 2026), नवी दिल्ली 👉 घोषवाक्य (Theme): “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” 👉 अर्थ: लवचिकता, नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी 👉 दृष्टीकोन: “Humanity First” ( मानवता प्रथम) 👉 भारतासाठी महत्त्व: Global South मध्ये भारताचा प्रभाव व नेतृत्व अधिक मजबूत करण्याची संधी. 👉 मुख्य भर: आर्थिक-आर्थिक सहकार्य, व्यापार, तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि जागतिक संस्थांमध्ये सुधारणा. 👉 आव्हान: सदस्य देशांच्या वेगवेगळ्या राष्ट्रीय हितसंबंधांमुळे एकमत साधणे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ: तलाठी भरती आणि सरकारी नियोजनाचा फज्जा स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी आपली उमेदीची अनेक वर्षे एका आशेवर खर्च करत असतो. पण जेव्हा सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे या आशेचा चुराडा होतो, तेव्हा नैराश्य येणे स्वाभाविक आहे. अलीकडेच तलाठी भरतीच्या प्रक्रियेत जो गोंधळ उडाला, तो प्रशासकीय नियोजनशून्यतेचा आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांचा एक दुर्दैवी नमुना आहे. मुळात तलाठी भरतीचे नियोजन हे 'सरळ सेवा' पद्धतीनेच राबवण्याचे ठरलेले होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि जंतर-मंतरवर झालेले तीव्र आंदोलन यामुळे सरकारवर मोठा दबाव आला. या आंदोलनाला शांत करण्यासाठी आणि तात्पुरती मलमपट्टी म्हणून सरकारने अत्यंत घाईगडबडीने तलाठी हे पद 'गट-क' मध्ये समाविष्ट करून मुलांना शांत केले. विद्यार्थ्यांचा रोष तात्काळ कमी करण्यासाठी उचललेले हे पाऊल वरवर दिलासा देणारे वाटले, तरी त्यामागे कसलाही भक्कम विचार किंवा प्रशासकीय पूर्वतयारी नव्हती हे लवकरच स्पष्ट झाले. या घाईच्या निर्णयाचा थेट परिणाम असा झाला की, नियोजनाअभावी एमपीएससीच्या इतिहासामध्ये प्रथमच या पदासाठी सर्वात जास्त आणि विक्रमी संख्येने अर्ज आले. एवढ्या प्रचंड प्रमाणावर आलेल्या अर्जांची छाननी करणे आणि परीक्षा पारदर्शकपणे राबवणे यासाठी लागणारी सक्षम यंत्रणा सरकार उभी करू शकले नाही. परिणामी, संपूर्ण प्रक्रियेचा बोजवारा उडाला. आधीच गोंधळलेली ही भरती प्रक्रिया 'पेपर फुटी'च्या प्रकरणांमुळे अधिकच रसातळाला गेली. पेपर फुटीच्या घटना समोर येताच राज्यभरातील विद्यार्थी पुन्हा एकदा संतापाने रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनामुळे सरकारला नाईलाजाने पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलावी लागली आहे. रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी यामुळे केवळ मनस्ताप आणि निराशाच पडली आहे. आता प्रशासकीय गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आलीच आहे, तर या वेळेचा सदुपयोग करून एक व्यापक आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवणे सरकारला सहज शक्य आहे. जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर सर्व संबंधित विभागांमधील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे याच पदभरतीमध्ये समाविष्ट करून ही परीक्षा एकत्रितपणे घेण्यात यावी, ही तमाम विद्यार्थ्यांची सरकारला नम्र विनंती आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील, तसेच प्रशासनातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रिक्त पदेही एकाच पारदर्शक प्रक्रियेतून भरली जातील. सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत आणि त्यांच्या भविष्यासोबत असा पोरखेळ करू नये. कोणतीही मोठी भरती प्रक्रिया राबवताना किंवा प्रशासकीय ध्येयधोरणे ठरवताना केवळ आंदोलने दाबता यावीत म्हणून तात्पुरते निर्णय घेणे घातक ठरते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि संबंधितांशी योग्य ती विचारपूस करून, सर्व बाजूंनी अभ्यास करून आणि भक्कम नियोजन करूनच पावले उचलली गेली पाहिजेत. विद्यार्थ्यांचे भविष्य हा प्रयोगांचा विषय नाही, तर राज्याच्या प्रगतीचा पाया आहे; आणि या पायाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी सरकारने पार पाडायलाच हवी. - समाधान निमसरकार

गट 'क' पुर्व परीक्षा - 3 जानेवारी 2027

photo content

photo content

# छत्रपती संभाजीनगर आंदोलन सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे...उद्याच्या आंदोलनात प्रत्येकाने हजर रहावे..तसेच आपली जबाबदारी आहे की, आपल्या अभ्यासिका मालकाला उद्या अभ्यासिका सकाळच्या सत्रात compulsory बंद ठेवायला सांगणे.... उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.... ही विनंती... आपल्या संभाजीनगर शहरातील शिक्षक वर्गाने आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे...एक विद्यार्थी म्हणून आपल्याला खांद्याला खांदा देऊन उद्या आवर्जून सहभागी व्हायचे आहे...🙏

कराड (सातारा ) : उद्या
कराड (सातारा ) : उद्या

​ 📌CTET परीक्षा सुधारणा (Correction Window): अर्ज भरलेल्या सर्व_ _उमेदवारांना आपल्या अर्जात काही चुका असल्यास त्या सुधारण्यासाठी 07 सप्टें‌बर 2026 ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत ऑनलाईन संधी देण्यात आली आहे._ 📌वेबसाईट: सुधारणा करण्यासाठी_ https://ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी._ 📌अंतिम मुदत: 10 सप्टेंबर 2026 नंतर अर्जात कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही.

# छत्रपती संभाजीनगर आंदोलन सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे...उद्याच्या आंदोलनात प्रत्येकाने हजर रहावे..तसेच आपली जबाबदारी आहे की, आपल्या अभ्यासिका मालकाला उद्या अभ्यासिका सकाळच्या सत्रात compulsory बंद ठेवायला सांगणे.... उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.... ही विनंती... आपल्या संभाजीनगर शहरातील शिक्षक वर्गाने आंदोलन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे...एक विद्यार्थी म्हणून आपल्याला खांद्याला खांदा देऊन उद्या आवर्जून सहभागी व्हायचे आहे...🙏

एकजूट 🔥🔥गर्दी 🔥🔥 #DRONE VIEW विद्यार्थ्यांची एकजूट...❤️❤️❤️ #History
एकजूट 🔥🔥गर्दी 🔥🔥 #DRONE VIEW विद्यार्थ्यांची एकजूट...❤️❤️❤️ #History

♦️MPSC पेपर फुटीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी... आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर
♦️MPSC पेपर फुटीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी... आक्रोश मोर्चा सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026 सकाळी 10 वाजता ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे.

नागपूर कोतवाल भरती जाहिरात https://www.instagram.com/reel/Dc0vNuYtFxg/?igsi=MXgxdDZhdHgwNnVicw==

+2
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद/ छत्रपती संभाजी नगर खंडपीठातील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या २,०८१ उमेदवारांची यादी.