es
Feedback
mpsc insight

mpsc insight

Ir al canal en Telegram

MPSC letest updet , daily current affairs and letest update' pyq anylisis #pyq #G.k #MPSC #police #vanrkshak #policebharti https://t.me/official_mpsc #nokari #Bamudp #krushi #gramsevak #talathi #club #chalughadamodi #gov #current #offecer

Mostrar más
3 590
Suscriptores
-124 horas
-47 días
-3930 días
Archivo de publicaciones
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सरांनी  पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार 13 जुलै 2026 संध्या. 5:30 वाजताची वेळ दिली आहे #MPSC च्या सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या यासह इतर सर्व मागण्यांचा प्रस्ताव मा. सचिवांकडे अगोदरच पाठवला आहे या संदर्भात सोमवारी चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे.. 🙏

photo content
+3

photo content

✅ उद्या छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलनात शक्य तेवढ्या उमेदवारांनी सहभागी व्हा. "या ऑनलाइनच्या सोंगाचे परिणाम फार भयंकर होऊ शकतात बर, वेळीच सावध व्हा...हा निर्णय रद्द व्हायलाच पाहिजे... उद्या:  6 जुलै , 2026 वेळ:- सकाळी 10.00 वाजता. ठिकाण:- विभागीय आयुक्त कार्यालय समोर छत्रपती संभाजीनगर.

(38) CBT साठी सर्व जिल्ह्यांत पुरेशी सुविधा नसताना सर्व विद्यार्थ्यांना जवळची परीक्षा केंद्रे मिळतील का? (39) सरळसेवा परीक्षेत एकच पेपर देऊन नोकरी मिळते; पण MPSC मध्ये पूर्व + मुख्य परीक्षेची पद्धत आहे. अशा परीक्षेत सरळसेवा प्रकारचे ऑनलाइन मॉडेल वापरणे कितपत योग्य आहे? (40) या नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अतिरिक्त फायदा कोणता मिळणार? (41) वर्षातून अनेक पूर्व परीक्षा घेतल्यास मुख्य परीक्षा दिनदर्शिका, गुणवत्ता यादी, पात्रता आणि अंतिम निवड यांचा संपूर्ण आराखडा आयोग स्पष्ट करणार का? (42) ऑनलाइन / CBT परीक्षेत प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका, हरकती आणि पारदर्शकता याबाबत आयोग कोणती पद्धत वापरणार? (43) अनेक सत्रांमुळे समानता, न्याय आणि गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, याची आयोगाची काय खात्री आहे? (44) ऑनलाइन पद्धतीत परीक्षा केंद्रांवरील देखरेख, सुरक्षा, माहिती सुरक्षा आणि सर्व्हर नियंत्रण याची जबाबदारी कोणाची असेल? (45) खाजगी सेवा पुरवठादाराच्या चुकीमुळे परीक्षेत अनियमितता झाली, तर जबाबदारी MPSC घेणार की सेवा पुरवठादार? (46) ऑनलाइन परीक्षेत उतारे वाचणे, rough work, screen fatigue आणि navigation problems याबाबत आयोगाने काही विचार केला आहे का? (47) जर ऑनलाइन परीक्षेत काही केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाला आणि इतर केंद्रांवर परीक्षा व्यवस्थित झाली, तर प्रभावित उमेदवारांसाठी फेरपरीक्षा होईल का? (48) फेरपरीक्षा झाल्यास त्या उमेदवारांची तुलना मूळ परीक्षा दिलेल्या उमेदवारांसोबत कोणत्या सूत्राने केली जाईल?

(1) मुख्य परीक्षा ऑफलाईन होईल की ऑनलाइन? (2) पेपर कोण सेट करणार — MPSC की TCS / खाजगी सेवा पुरवठादार? (3) MPSC आता फक्त नियामक संस्था असेल का आणि परीक्षा घेण्याची जबाबदारी खाजगी सेवा पुरवठादाराकडे असेल का? (4) दोन उमेदवार एकाच पदासाठी परीक्षा देत असताना, विभाग आणि पगार सारखा असताना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका का? (5) जर उमेदवार पहिली पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला, तर तो दुसरी / पुढील पूर्व परीक्षा पुन्हा देऊ शकतो का? (6) पहिली पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा दुसरी पूर्व परीक्षा दिली, तर नवीन विद्यार्थ्यांना संधी कमी होणार का? (7) मुख्य परीक्षेतील स्पर्धा कमी करण्यासाठी पहिली पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुन्हा दुसरी पूर्व परीक्षा देतील का? (8) वर्षातून दोन किंवा अधिक पूर्व परीक्षा झाल्या, आणि एखादा विद्यार्थी पहिल्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाला, तर त्याला मुख्य परीक्षेसाठी वर्षभर वाट पाहावी लागेल का? (9) जर वर्षातून तीन पूर्व परीक्षा झाल्या, तर जानेवारीमध्ये उत्तीर्ण झालेल्या, मे मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि ऑगस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेगवेगळा वेळ मिळेल. हे समान संधीच्या तत्त्वाविरोधात नाही का? (10) जर मुख्य परीक्षेसाठी एका जागेमागे 15 पट उमेदवार घ्यायचे असतील, तर वर्षातून 2–3 पूर्व परीक्षा घेण्याचा नेमका उद्देश काय? (11) मुख्य परीक्षा एकच असेल, तर मुख्य परीक्षेसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कशी ठरवली जाईल? सध्याप्रमाणे एका जागेमागे 1:15 प्रमाण कायम राहणार का? (12) जर तीन पूर्व परीक्षा झाल्या, तर प्रत्येक पूर्व परीक्षेतून 1:15 उमेदवार घेतल्यास एकूण 1:45 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील का, की अंतिम संख्या पुन्हा 1:15 पर्यंतच मर्यादित राहील? (13) जर उद्देश अधिक विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेची संधी देण्याचा असेल, तर 2–3 पूर्व परीक्षा घेण्याऐवजी एकच पूर्व परीक्षा घेऊन 1:15 प्रमाण वाढवणे अधिक सोपे नाही का? (14) नवीन पद्धतीचे सर्व नियम, पात्रतेचे निकष आणि संपूर्ण प्रक्रिया आयोग स्पष्टपणे कधी जाहीर करणार? (15) अनेक सत्रे झाल्यास आयोगाला प्रश्नांचा दर्जा / काठिण्य पातळी राखता येईल का? (16) एखादा प्रश्न सोपा किंवा अवघड आहे, हे आयोग कोणत्या आधारावर ठरवणार? (17) प्रत्येक उमेदवारासाठी पेपर सोपा किंवा अवघड जाणे व्यक्तिनिष्ठ असते, तर काठिण्य पातळीचे गणित कसे असेल? (18) सामान्यीकरण करताना संबंधित सत्राला उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेतली जाणार का? (19) ऑनलाइन परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती वापरणार की सामान्यीकरण? (20) जर एका सत्रातील प्रश्न रद्द झाले आणि दुसऱ्या सत्रातील झाले नाहीत, तर सामान्यीकरणाचा सूत्र त्या सत्रातील विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकेल का? (21) ऑनलाइन परीक्षेनंतर काही प्रश्न रद्द करावे लागले, तर सामान्यीकरण कसे केले जाईल? (22) परीक्षा एकाच सत्रात होणार की अनेक सत्रांत, हे ठरवण्यासाठी उमेदवारांच्या संख्येची काही मर्यादा असणार का? (23) एक पूर्व परीक्षा प्रक्रिया पूर्ण व्हायला मोठा कालावधी लागला, तर 2–3 पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मिळून प्रक्रिया जलद होणार की संथ? (24) आयोग म्हणतो निकाल लवकर लागेल; पण ऑनलाइन परीक्षा जर एक महिना चालणार असेल, तर निकाल लवकर कसा लागणार? (25) ऑफलाईन परीक्षेचा निकाल आयोगाने 17 दिवसांत लावला असताना ऑनलाइन पद्धतीची गरज का? (26) जर परीक्षा घेताना सर्व ठिकाणी MPSC कर्मचारी असतील, तर ऑफलाईन परीक्षा घेण्यास नेमकी अडचण काय? (27) CBT पद्धतीत राज्यसेवा CSAT मधील उतारे कसे घेतले जाणार? (28) ऑनलाइन पेपर फुटणार नाही, याची खात्री काय? (29) मोठ्या बँकांची सुरक्षा असूनही फसवणूक होते, मग ऑनलाइन परीक्षा प्रणाली सुरक्षित राहील याची खात्री कशी? (30) परीक्षेसाठी वापरली जाणारी संगणक प्रणाली आयोगाच्या मालकीची असेल की खाजगी कंपनीकडून घेतली जाईल? (31) शाळा / महाविद्यालय / खाजगी केंद्रे काही खाजगी किंवा राजकीय लोकांच्या मालकीची असू शकतात; अशा ठिकाणी बाह्य हस्तक्षेप होणार नाही याची खात्री काय? (32) तांत्रिक अडचणीमुळे संगणक बंद पडला, तर अतिरिक्त वेळ दिला जाणार का? (33) तांत्रिक अडचणीमुळे भरपाई वेळ दिला, तर उमेदवाराला जागेवरून हलता येईल का? (34) परीक्षेदरम्यान तांत्रिक सुधारणा करत असताना इतर उमेदवार त्रासले जाऊ शकतात का? (35) तांत्रिक अडचणीमुळे अतिरिक्त वेळ / हालचाल दिल्यास प्रश्नफुटीचा धोका निर्माण होऊ शकतो का? (36) परीक्षेदरम्यान उद्भवणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र आणि वेळबद्ध तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध असेल का? (37) अर्ज भरताना परीक्षा केंद्राचा प्राधान्यक्रम घेतला जात नसल्याने दूरची केंद्रे मिळू शकतात. जवळचे आणि न्याय्य केंद्र वाटप करण्यासाठी आयोगाची काय व्यवस्था आहे?

"संविधानाने MPSC ला राज्य सरकारच्या भरतीची जबाबदारी दिली आहे, पण सरकार मात्र ही जबाबदारी खाजगी कंपन्यांच्या (उदा. TCS) घशात घ
"संविधानाने MPSC ला राज्य सरकारच्या भरतीची जबाबदारी दिली आहे, पण सरकार मात्र ही जबाबदारी खाजगी कंपन्यांच्या (उदा. TCS) घशात घालत आहे. संविधानात कोठेही सरकारी नोकऱ्या खाजगी एजन्सीमार्फत भरण्याचा अधिकार सरकारला दिलेला नाही. मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळून हा खाजगीकरणाचा घाट का घातला जात आहे? भरती प्रक्रियेचे बाजारीकरण बंद करा आणि MPSC च्या स्वायत्ततेचे रक्षण करा!

#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची मागणी असून दोन दिवसांपूर
#MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करुन पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची राज्यभरातील विद्यार्थ्यांची मागणी असून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा मॅडम यांना विद्यार्थ्यांसह भेटून याबाबत त्यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. ऑनलाईन परीक्षेतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांवर कसा अन्याय होतो याबाबतचे पुरावेही त्यांना दिले. तसंच ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेताना MPSC कडून काही चुकीच्या गोष्टींचा दाखला दिला जात असल्याची माहितीही त्यांना दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या काही निकालांचे दाखलेही दिले. त्यांनी या सर्व बाबी समजून घेतल्या असून त्या मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री महोदय याबाबत आयोगाच्या अध्यक्षांशी बोलतील, असं त्यांनी आश्वासित केलं. त्यामुळं येत्या काही दिवसांत ऑनलाईन परीक्षा रद्द केली जाईल, अशी अपेक्षा आहे. # धन्यवाद # MPSC ऑनलाइन परीक्षा रद्द करा

photo content

ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा. मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! ✊🇮🇳

photo content