es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
736
Suscriptores
Sin datos24 horas
-17 días
-230 días
Archivo de publicaciones
पेपरफुटीबद्दल देवा भाऊंचे मनोगत परीक्षा पारदर्शक पद्धतीने कशी करता येईल ह्याचे सविस्तर उत्तर दिले

CJP आणि राहुल गांधी ह्यांची काय रणनीती आहे हे देवा भाऊंनी सर्वांसमोर मांडली

नाही नाही पक्ष अशा जबाबदाऱ्या वगैरे देत नसतो जर कोणी महाराष्ट्रात येऊन रोज खोटं बोलेल तर त्याला उत्तर मी देणारच फॅक्ट्स आणि फिगर्स वर बोललं पाहिजे वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे पण खोटं बोल आणि रेटून बोल रोज खोटं बोल आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हो की इतक्या वरच्या स्तरातल्या नेत्याला लाजच वाटत नाही खोटं बोलण्याची किती खोटं बोलतात आणि खोटं उघड पडलं तरी देखील रोज तेच बोलतात अनेक वेळा असं होतं हा खोटं बोलतोय आपल्याला माहिती असतं लोकांना माहिती नसतं त्याच्यामुळे रोज कोणी खोटं बोललं तर लोकांना वाटायला लागतं की खरं आहे. IMP

माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवतील मला राजकारण कळतं माझा पक्ष कळतो त्यामुळे दर दोन-तीन महिन्यांनी कधी कोणाला न्यूज मिळाली नाही तर ते मला दिल्लीला पाठवतात कधी कोणाला न्यूज क्रिएट करायची असेल तर ते मला दिल्लीला पाठवतात मला त्याचा आनंदच आहे माझा पक्ष ठरवेल माझे नेते ठरवतील त्या दिवशी जरूर दिल्लीला जाईल पण आज तरी माझं मत आहे 2029 पर्यंत मी दिल्लीमध्ये नाही

भाजपची पहिली गोष्ट तर अशी आहे की आमच्यासमोर प्रश्न आहे की एखादा व्यक्ती बालबुद्धीने वागला तर त्याच्यावर किती रिअक्शन द्यायची म्हणजे आपण त्या बालबुद्धीला महत्त्व द्यायचं की आपण त्याला इग्नोर करायचं याच कदाचित असमंजस मध्ये आम्ही होतो."

मुळामध्ये ज्यावेळी लोक समोर येऊन असं म्हणतात की हो आम्हाला मराठी शिकायच आहे पण आम्हाला वेळ वाढवून द्या तुम्ही विचार करा ज्या लोकांनी पंधरा वीस वर्षापूर्वी शिक्षण सोडलेल आहे काही कमी शिकलेले आहेत अशा लोकांना तीन महिने सहा महिन्यामध्ये एखादी भाषा बोलता येईल किंवा जुजबीज बोलायची आहे भाषा काही पूर्ण बोलायची नाहीये इतकं सोपं नाहीये शेवटी आज आपण जर एखाद्या 60 वर्षाच्या व्यक्तीला एकदम स्मार्टफोन हाती दिला तर त्याची काय आज आता आपल्या घरचे आजी आजोबा स्मार्टफोन वापरतायत"

सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं असतं हे 2014 ते 19 हे दाखवलं 2022 नंतर ते आम्ही करून दाखवलं आणि पुढेही करत राहू त्यामुळे कुठेही काम थांबणार नाही कुठलाही प्रोजेक्ट थांबणार नाही आणि शेवटी रुसवे फुगवणे वगैरे काही नसतात पण हे खर आहे की आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत आमच्या प्रत्येक पक्षाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत"

IMP

आता जवळपास मुंबईमध्ये 2000 km पैकी 1600 km कॉंक्रीट रोड पूर्ण झाले आता 400 किलोमीटर मध्येच खड्डे आहेत 1600 किलोमीटर मध्ये खड्डे पडत नाही नागपूर मध्ये तीच परिस्थिती आहे असं एकेका जे काही शहर आहे त्या ठिकाणी आपण करतो आहोत आता पूर्वी आपण बघा हायवे तयार करायचो त्या हायवेला मोठ्या प्रमाणात खड्डे पडायचे आता समृद्धीला आपण जो पूर्णपणे कॉंक्रीटचा बेस केला

आपण दरवर्षी तीन टक्क्याच्या आतच कर्ज घेतो पण जर अर्थव्यवस्था वाढली तर कर्ज पण वाढणारच आहे अर्थव्यवस्था वाढली आणि कर्ज तेवढच राहिलं असं तर होऊ शकत नाही वाढणारी आपली कर्ज घेण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर करून जर आम्ही गुंतवणूक वाढवतोय तर त्या गुंतवणुकीने क्षमता अजून वाढते आणि विकासाच चक्र असच असतं आज जगामध्ये सगळ्यात जास्त कर्ज असलेला देश कोणता आहे अमेरिका पण ते कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे तीच कॅपॅसिटी आपण घेतलेलं कर्ज परत करण्याची आपल्याकडे आहे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕞 3.40pm | 3-9-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/sxpth1z5850?si=5s_kjza_iwt-gs_g https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1342636998084831 https://x.com/Dev_Fadnavis/status/2095454382141915590?s=20

आपण थम रूलने सांगायचो आता सायंटिफिकली जिल्ह्याचा जीडीपी आपण काढतो आणि आत्ताच जिल्ह्याच्या जीडीपीचा आपण जो काही मी आढावा घेत होतो परवा मी बहुतेक ट्वीट ही केलं असेल बोललो मी कुठेतरी ते म्हणजे एक्स वर आल असेल की 13 जिल्ह्यांनी आता त्यांना जे जीडीपी च टार्गेट होतं ते पार केलं ते पुढे गेलेले आहेत त्याते जिल्ह्यांचे मी अभिनंदन केलं

आता नवीन ग्रोथ इंजिन आपलं तयार होतय पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सांगली आणि कोल्हापूरचा जो भाग आहे ते ग्रोथ इंजिन आपलं तयार होतय कोकणामध्ये रायगड आणि पालघर हे दोन नवीन ग्रोथ इंजिन आपले तयार होत आहेत. त्यासोबत रत्नागिरी एक ग्रोथ इंजिन आपलं तयार होत आहेत. विदर्भामध्ये गडचिरोली आणि आपल्या नागपूर सोबत चंद्रपूर आणि अमरावती हे नवीन ग्रोथ इंजिन तयार होतात

100 टक्के इथेनॉल तयार करणारा हा शेतकरी आहे

खरं तर जेवढ्या आमच्या मेजर ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहेत या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीनी स्पष्टपणे सांगितलं की इथेनॉल मुळे तुमचं इंजिन खराब झालं अशी एक केस दाखवा. अद्याप कोणी केस दाखवू शकले नाही. मुळामध्ये आपण जर बघितलं तर इथेनॉल हे क्लीन फ्युएल आहे. फरक काय आहे फरक एवढा आहे की इथेनॉल च कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी आहे आणि ते कॅलोरीफिक व्हॅल्यू कमी असल्यामुळे त्याचा गाडीच्या वरेजवर काही ना काही परिणाम होईल पण तो किती होईल तर तो परिणाम होईल आता आपलं इथेनॉलच ब्लेंडिंग 20%,20 टक्क्याच्या 7%,20%च्या 7% म्हणजे एकूण 100%च्या किती मी जर इथे काही लोकांना कॅल्क्युलेशन येत असेल तर ते एका मिनिटात सांगतील

म्हणजे जर शेतकऱ्यांना समजा आपला कोरडूचा शेतकरी आहे या शेतकऱ्याला एकरी अह त्याचं उत्पन्न ₹2000 25 हजार च्या वर नाहीये. ते एखाद्या वेळेस पावसाने दडी मारली तर त्याची अडचण होते किंवा एखाद्या वेळेस दुष्काळ आला तर अडचण होते. पण आज नेपियर ग्रासचा जर आपण विचार केला तर वर्षातन चार वेळा तो तो ग्रास उत्पन्न घेऊ शकतो आणि प्रत्येक वेळी सायकलला त्याला एकरी पंधरा ते वीस हजार रुपये मिळू शकतात त्यामुळे हे जे काही आता एक प्रकारे शेतीतन इंधन... अशा पद्धतीच्या सायकल कडे आपण चाललो आहोत याच्यामुळे शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शाश्वतता येणार आहे

मुळात आता त्या ट्रान्सफॉर्मेशनला सुरुवात झाली आहे सगळ्यात जर आपण महत्त्वाचं काही असेल तर आज अन्नधान्यामध्ये आपण पूर्णपणे स्वयंपूर्णतेकडे गेलोत धान्याची कोठार आपली भरलेली आहेत धान्याचा कुठेही आपल्याकडे कमतरता नाहीये आता आवश्यकता काय आहे आता जो काही शेतमाल आपण तयार करतो त्याला व्हॅल्यू ऍडिशन करणं आणि त्यातन अधिक पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत इथेनॉलची जी पॉलिसी केंद्र सरकारने केली आहे ती प्रिसाईसली शेतकऱ्याला यातच मदत करते आज आपण बघा की 100% मका हा जर इथेनॉल कडे गेला तर मक्याच्या शेतकऱ्याला हमी भावापेक्षा जास्त भाव मिळणार आहे आता त्याची सुरुवात झाली आहे

आज आपण जर बघितलं तर युरोपच्या कुठल्याही देशात तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी जे अनार आहेत हे सगळे महाराष्ट्रातून गेलेले अनार आहेत. त्यामुळे द्राक्ष तर आपण करत होतो संत्री आपण अर्थात संत्र्यांना आता बांगलादेशमुळे बाजारपेठ आपली थोडी अडचणीची झाली पण त्यामुळे मला असं वाटतं की आपण शेतीमध्ये पुढे खूप गेलोत पण अजून पुढे जाण्याची आवश्यकता आहे याचं कारण काय आहे की आजही उत्पादन खर्च आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित मिळणारे भाव याच्यामध्ये तफावत येते

देशामध्ये एकूण जेवढे सौर पंप लागले शेतीच्या क्षेत्रात एकट्या महाराष्ट्राने 60% 60% एकट्या महाराष्ट्रात लागलेत . म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तर आमची दर अधिवेशनात मागणी काय असायची पंप मिळत नाही दोना वर्षाच वेटिंग आहे पैसे भरून तीन वर्ष झाले आहे पण आम्हाला पंप मिळाला नाही आता तीन महिन्याचा देखील वेटिंग नाहीये महिन्याभरात आता शेतकऱ्याला आम्ही पंप देतो पंप लावून देतो पाच वर्षाचा त्या पंपाला इन्शुरन्स आहे चोरी गेला तरी इन्शुरन्स आहे खराब झाला तरी इन्शुरन्स आहे तुटला तरी इन्शुरन्स आहे

दुसरीकडे सेकंड जो महत्वाचा बेस आपल्या इकॉनोमीला पाहिजे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टराचा आणि आज देशामध्ये जवळपास देशाचं 20% मॅन्युफॅक्चरिंग हे आपण करतो त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग मध्येही ज्या गुंतवणूक आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आल्या, त्या गुंतवणुकींमुळे आपलं ज्याला आपण एक बेसिक किंवा फंडामेंटल अर्थव्यवस्थेचे जे म्हणतो हे अत्यंत मजबूत आहे