es
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 210
Suscriptores
+124 horas
-127 días
-9530 días
Archivo de publicaciones
photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नाशिक येथे लाडक्या बहिणींनी राखी बांधली. बहिणींच्या या आपुलकीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नाशिक हे महाराष्ट्राच्या विकासाचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार आहे. नासिक महाराष्ट्र के विकास का महत्वपूर्ण 'ग्रोथ इंजन' बनने के लिए तैयार है। (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर येथील प्रशासकीय इमारतीचे उदघाटन | नाशिक | 28-8-2026) #Maharashtra #Nashik #SPPU

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – नाशिक उपकेंद्र’ हेच नाव कायम राहील. ‘सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय – नासिक उपकेंद्र’ यही नाम कायम रहेगा। (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर येथील प्रशासकीय इमारतीचे उदघाटन | नाशिक | 28-8-2026) #Maharashtra #Nashik #SPPU

Full_Media Interaction_Nashik_28-08-2026.mp420.82 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕖 6.46pm | 28-8-2026📍Nashik. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nashik https://www.youtube.com/live/OwJTB4P9-X4?si=9qjHKuQQ3TWjl8Lq https://www.facebook.com/100044197187974/videos/28047910421530938 https://x.com/Dev_Fadnavis/status/2093327113088897518?s=20

Full_Speech_सिंहस्थ_महाकुंभ_भक्ती_संगम'चे_उदघाटन_28_08_2026.mp472.45 MB

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील भगिनींनी राखी बांधली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी या लाडक्या बहिणींचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik #RakshaBandhan

CMO Maharashtra Tweets: उच्च शिक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर येथील प्रशासकीय इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राशी जवळपास 196 महाविद्यालये जोडली गेली असून, 32 संशोधन केंद्रे याअंतर्गत येतात. तसेच, जवळपास 3,00,000 विद्यार्थी या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात येणार आहेत. या उपकेंद्राला कोणतेही नवीन नाव देण्यात येणार नसून, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नाशिक उपकेंद्र’ हेच याचे नाव असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षणाला आधुनिकतेकडे नेण्याचे काम सुरू केले आहे. त्यातील एक मैलाचा दगड म्हणून नाशिक उपकेंद्राच्या माध्यमातून काम होईल आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी झाली आहे. नाशिकचा विकास वेगाने होत असून, अशा प्रकारचे उपकेंद्र सुरू व्हावे, या महत्त्वाच्या मागणीची आज पूर्तता झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील प्रथितयश विद्यापीठांपैकी एक आहे. तसेच जागतिक मानांकनात विद्यापीठ आघाडी घेत आहे. आपल्या शिक्षण पद्धतीतून मानव संसाधन तयार झाले पाहिजे. रोजगाराच्या क्षेत्रात एआय आणि डेटा सायन्समुळे मोठे परिवर्तन होत असून, त्यानुसार नवनवीन अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाशिक जिल्ह्यात सुमारे ₹30,000 कोटींची गुंतवणूक होत असून, आगामी काळात नाशिक हे विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनेल. त्यादृष्टीने विद्यापीठांनीही नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासोबतच इन्क्युबेशन केंद्रे बनले पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. आगामी 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027' च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने या आयोजनासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, याचाही विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री छगन भुजबळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #SPPU

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम'चे उदघाटन 🕕 संध्या. ६.०७ वा. | २८-८-२०२६📍नाशिक. #Maharashtra #Nashik #KumbhBhaktiSangam https://www.youtube.com/live/FcfpVKREUIg?si=kvT_WvBaS0ilGyRs https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4586900201541235 https://x.com/Dev_Fadnavis/status/2093317267778138219?s=20

photo content

photo content

Devendra Fadnavis - Estadísticas y analítica del canal de Telegram @devendragfadnavis