Devendra Fadnavis
Open in Telegram
4 156
Subscribers
+124 hours
-147 days
-5330 days
Posts Archive
4 155
CMO Maharashtra Tweets:
मुंबई महानगर प्रदेशाच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग व फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या ₹17,036 कोटी; तसेच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1 A आणि मार्ग 2 च्या ₹5575 कोटी, अशा एकूण ₹22,611 कोटींच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान 5.86 किलोमीटर लांबीचा 6 पदरी भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान 9.58 किलोमीटर लांबीचा 6 पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम मुंबईला ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पनवेल; तसेच राष्ट्रीय महामार्ग-48 च्या दृष्टीने अधिक वेगवान आणि सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध होईल. हा भुयारी मार्ग टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे उभारण्यात येणार असून, त्याचा व्यास 14 मीटर असेल. सुमारे 5 वर्षांत हा बोगदा पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलावर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहतूक शक्य होणार आहे.
घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक आणि जड वाहनांचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून विशेषतः ठाणे व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ मॉडेलद्वारे करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे; तसेच प्रकल्प परिसरात एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मान्यता दिली.
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग 2 (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ T-4) या प्रकल्पास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. या विस्तारामध्ये मार्ग 1A वर 2 आणि मार्ग 2 वर 11 स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
4 155
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Cabinet Committee on Infrastructure.
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Uday Samant and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मंत्रिमंडल आधारभूत संरचना समिति की बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, मंत्री उदय सामंत एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕜 1.15pm | 9-6-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.१५ वा. | ९-६-२०२६📍मंत्रालय, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
4 155
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring the Legacy of 'Dharti Aaba' Bhagwan Birsa Munda
Honoured to attend the commemorative programme marking the martyrdom day of the great tribal leader and freedom fighter 'Dharti Aaba' Bhagwan Birsa Munda, along with Hon Governor Jishnu Dev Varma ji.
In a life spanning just 25 years, Bhagwan Birsa Munda emerged as a symbol of resistance, uniting tribal communities and inspiring countless generations to stand up against injustice and oppression. His fearless struggle shook the foundations of the British Empire, while his commitment to social reform and community empowerment transformed the lives of thousands. His message transcended regional boundaries, inspiring people across the nation.
The contribution of tribal communities to India's freedom struggle is immense and invaluable. Through the Azadi Ka Amrit Mahotsav initiative, our visionary leader, Hon PM Narendra Modi Ji, has brought the history of tribal freedom fighters into the national spotlight, ensuring that their sacrifices and contributions inspire future generations.
India’s rich tribal heritage has preserved its unique identity, traditions and values through the ages. The Government of Maharashtra is committed to preserving and promoting the rich cultural legacy of tribal communities. Various initiatives and transformative programmes, including the Dharti Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan have been undertaken to empower and uplift tribal society.
DCM Eknath Shinde ji, Minister Dr. Ashok Uike, Minister Narhari Zirwal, MoS Indranil Naik and other dignitaries were present.
#Maharashtra #BhagwanBirsaMunda #BirsaMundaBalidanDiwas
https://x.com/Dev_Fadnavis/status/2064316349820940799?s=20
4 155
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मंत्रालय, मुंबई येथे बालभारतीच्या इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण केले.
यावेळी मंत्री दादाजी भुसे, मंत्रिमंडळातील इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Education
4 155
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 155
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)
#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय
4 155
CMO Maharashtra Tweets:
जननायक भगवान बिरसा मुंडा : संघर्ष आणि बलिदानाची गाथा
राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकभवन, मुंबई येथे जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात जननायक, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची अशी ज्योत पेटवली की संपूर्ण ब्रिटिश राजवट हादरून गेली. जल, जमीन आणि जंगलांसाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लढा केवळ झारखंड-बिहारपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण देशभरातील आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा ठरला.
स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी नायक-नायिकांचे योगदान अनन्यसाधारण असूनही इतिहासाने त्यांची दखल घेतली नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे या वीरांचा गौरवशाली इतिहास देशासमोर आला आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचू लागला. आदिवासी संस्कृतीतील निसर्गसंवर्धन, समता आणि समृद्ध समाजव्यवस्था ही आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
आदिवासी संस्कृतीचे जतन आणि या समाजाचे सक्षमीकरण ही सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम आदिवासी समाज घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भगवान बिरसा मुंडा हेच या सर्व कार्यामागील प्रेरणास्थान आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #BirsaMundaBalidanDiwas
4 155
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आदिवासी जननायकांचा गौरवशाली इतिहास नव्याने देशासमोर आणला.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने आदिवासी जननायकों का गौरवशाली इतिहास नए सिरे से देश के सामने प्रस्तुत किया।
(भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन | लोकभवन, मुंबई | 9-6-2026)
#Maharashtra #Mumbai #BirsaMundaBalidanDiwas
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
