en
Feedback
आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Open in Telegram

Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Show more

📈 Analytical overview of Telegram channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉

Channel आयुष्याच्या डायरीतून..📝🎯🎉 (@life_lessons_learning) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 18 545 subscribers, ranking 10 699 in the Education category and 22 078 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 18 545 subscribers.

According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -110 over the last 30 days and by -10 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 58.73%. Within the first 24 hours after publication, content typically collects N/A% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 0 views. Within the first day, a publication typically gains 0 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Personal Blog by Punam Ahire(Probationary Deputy Collector 2021 and Ex-Section Officer 2020) Aspirant to officer..# अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही.. ब्लॅाग- पुनवेच्या शब्दशलाका https://punvechyashabdshalaka.blogspot.com/?m=1

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

18 545
Subscribers
-1024 hours
-337 days
-11030 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '26
September '26
+3
in 0 channels
August '26
+29
in 0 channels
Get PRO
July '26
+25
in 0 channels
Get PRO
June '26
+49
in 0 channels
Get PRO
May '26
+47
in 1 channels
Get PRO
April '26
+29
in 1 channels
Get PRO
March '26
+29
in 2 channels
Get PRO
February '26
+21
in 0 channels
Get PRO
January '26
+34
in 1 channels
Get PRO
December '25
+20
in 1 channels
Get PRO
November '25
+43
in 0 channels
Get PRO
October '25
+126
in 0 channels
Get PRO
September '25
+61
in 1 channels
Get PRO
August '25
+28
in 0 channels
Get PRO
July '25
+59
in 0 channels
Get PRO
June '25
+37
in 1 channels
Get PRO
May '25
+61
in 1 channels
Get PRO
April '25
+83
in 1 channels
Get PRO
March '25
+169
in 2 channels
Get PRO
February '25
+56
in 1 channels
Get PRO
January '25
+266
in 1 channels
Get PRO
December '24
+140
in 0 channels
Get PRO
November '24
+204
in 4 channels
Get PRO
October '24
+205
in 2 channels
Get PRO
September '24
+397
in 0 channels
Get PRO
August '24
+223
in 1 channels
Get PRO
July '24
+404
in 1 channels
Get PRO
June '24
+241
in 0 channels
Get PRO
May '24
+272
in 1 channels
Get PRO
April '24
+336
in 1 channels
Get PRO
March '24
+277
in 2 channels
Get PRO
February '24
+463
in 0 channels
Get PRO
January '24
+1 119
in 2 channels
Get PRO
December '23
+731
in 1 channels
Get PRO
November '23
+575
in 3 channels
Get PRO
October '23
+706
in 2 channels
Get PRO
September '23
+769
in 0 channels
Get PRO
August '23
+698
in 0 channels
Get PRO
July '23
+839
in 0 channels
Get PRO
June '23
+871
in 0 channels
Get PRO
May '23
+863
in 0 channels
Get PRO
April '23
+638
in 0 channels
Get PRO
March '23
+1 138
in 0 channels
Get PRO
February '23
+1 218
in 0 channels
Get PRO
January '23
+1 882
in 0 channels
Get PRO
December '22
+6 598
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
07 September0
06 September0
05 September0
04 September0
03 September+1
02 September+2
01 September0
Channel Posts
“ओळख निर्माण करण्याचे स्वप्न”… स्थळ - जनता विद्यालय घोटी ता इगतपुरी जि नाशिक साल २००७ वय वर्षे १३ इयत्ता सातवी सातवी अ च्या वर्गात कुणीच संस्थेच्या स्पर्धा परीक्षेचा फॅार्म भरला नाही म्हणून कुमावत सर सगळ्यांची कान उघाडणी करत होते ..सुरुवातीला सरांची बोलण्याची पट्टी फार वरची होती परंतु यावर रागावून ,चिडून उपयोग नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी नरमाईचा सूर घेतला ..अख्खा तास त्यावर घालवायचा असे ते जणू ठरवून आले होते ..परीक्षेला धरून विद्यार्थ्यांची उदासीनता का आहे याची कारणे जाणुन घेऊ लागली.काही विेशेष कारणंही नव्हती . मग सरांनी वर्गातील हुशार विद्यार्थ्यांना एक एक करुन उठवून कारण विचारत फॅार्म भरण्यासाठी सुचित करु लागले.कुणाच्या पालकांना भेटायचे असेल तर ते ही मी भेटतो त्यांना समजावतो असेही सांगत होते ,कुणाची फी ची अडचण असेल तर तस सांगा मी भरतो असे सर सांगत होते. अशातच उभं राहण्याचा माझा नंबर आला ,सरांनी मला उभे केले,”पुनम ,तू का नाही भरत फॅार्म?” मी म्हटलं,”सर ,मला नाही भरायचा फॅार्म यावेळी” कारण खरचं काहीही नव्हते. असाच नव्हता भरायचा ..सरांनी मला विचारले तुझे आई वडील करतात .?? मी म्हटले , जि . प . शिक्षक आहेत . सर म्हटले , “ आज तुझी ओळख आहे .? सरांना काय म्हणायचे हे मला काही कळत नव्हते ,ते वयही स्वतःची ओळख असावी असे वाटावे असे नव्हते .. ते म्हटले किती दिवस अमुक तमुक यांची मुलगी ,यांची विद्यार्थी अशी तुझी ओळख असावी…तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन करावे की तुमच्यामुळे तुमच्या पालकांची ,शिक्षकांची ओळख व्हावी..यासाठीच तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्ही बसले पाहिजे ,खूप अभ्यास केला पाहिजे ,यश मिळवले पाहिजे ,तुम्ही कोणतेही यश मिळवले की तुमच्यामुळे तुमच्या ओळख होईल…अन् सरांच्या तासभर केलेल्या ब्रेनवॅाशमुळे आम्ही काहींनी फॅार्म भरले…अन् आज १९ वर्षांनी सरांनी सांगितली तशी ओळख काही अंशी निर्माण झाली आहे असे वाटते . पण महत्वाचे आहे ते सरांनी योग्य वेळी केलेली कान उघाडणी अन् दाखवलेले स्वतःच्या ओळखीचे स्वप्न.. वरील प्रसंग मांडण्याचा उद्देश एकच ..आज शिक्षक दिन.. आयुष्याच्या वाटेवर असे अनेक चांगले शिक्षक भेटले ज्यांनी जगण्यासाठी भाकरी कमवण्याचे शिक्षण दिलेच पण मोठी स्वप्नं पाहण्याची ठिणगी अंतर्मनात पेटवली.स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवले. शिक्षक समाजाला ,विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवणारे दीपस्तंभ..आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा खुप पुढे जावा असा उदात्त हेतू असणारा शिक्षकी पेशा…आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारे शिक्षक भेटतात तेव्हा आपली आयुष्याची नाव कुठल्याही टप्प्यावर भरकटत नाही … आजवर भेटलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन आणि शुभेच्छा…! शिक्षणाची सुरुवात जिथून झाली त्या जि.प शाळेपासून ते जि.प शाळा ज्या सरकारी यंत्रणेचा भाग या त्या यंत्रणेचा एक भाग होणं या सगळयात माझ्या शिक्षकांचा खुप मोठा वाटा आहे ….पदाची ओळख मिळवण्यापासुन ते पदापलीकडचा माणुस होण्याचं स्वप्न दाखवण्यात शिक्षकांच नक्कीच मोठं योगदान मी मानते.सर्वांप्रती कृतज्ञता आणि वंदन 💐✨

2
स्थळ - जनता विद्यालय घोटी ता इगतपुरी जि नाशिक साल २००७ वय वर्षे १३ इयत्ता सातवी सातवी अ च्या वर्गात कुणीच संस्थेच्या स्पर्धा परीक्षेचा फॅार्म भरला नाही म्हणून कुमावत सर सगळ्यांची कान उघाडणी करत होते ..सुरुवातीला सरांची बोलण्याची पट्टी फार वरची होती परंतु यावर रागावून चिडून उपयोग नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी नरमाईचा सूर घेतला ..अख्खा तास त्यावर घालवायचा असे ते जणू ठरवून आले होते ..परीक्षेला धरून विद्यार्थ्यांची उदासीनता का आहे याची कारणे जाणुन घेऊ लागली.काही विेशेष कारणंही नव्हती . मग सरांनी वर्गातील हुशार विद्यार्थ्यांना एक एक करुन उठवून कारण विचारत फॅार्म भरण्यासाठी सुचित करु लागले.कुणाच्या पालकांना भेटायचे असेल तर ते ही मी भेटतो त्यांना समजावतो असेही सांगत होते . अशातच उभं राहण्याचा नंबर आला ,सरांनी मला उभे केला,”पुनम तु का नाही भरत?” मी म्हटलं,”सर ,मला नाही भरायचा फॅार्म यावेळी” कारण खरचं काहीही नव्हते. असाच नव्हता भरायचा ..सरांनी मला विचारले तुझे आई वडील करतात .?? मी म्हटले , जि . प . शिक्षक आहेत . सर म्हटले , “ आज तुझी ओळख आहे .? मला काही कळत नव्हते ,ते वयही स्वतःची ओळख असावी असे वाटावे असे नव्हते .. ते म्हटले किती दिवस अमुक तमुक यांची मुलगी ,यांची विद्यार्थी अशी तुझी ओळख असावी…तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन करावे की तुमच्यामुळे तुमच्या पालकांची ,शिक्षकांची ओळख व्हावी..यासाठीच तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तुम्ही बसले पाहिजे ,खूप अभ्यास केला पाहिजे ,यश मिळवले पाहिजे ,तुम्ही कोणतेही यश मिळवले की तुमच्यामुळे तुमच्या ओळख होईल…अन् सरांच्या तासभर केलेल्या ब्रेनवॅाशमुळे आम्ही काहींनी फॅार्म भरले… वरील प्रसंग मांडण्याचा उद्देश एकच ..आज शिक्षक दिन.. आयुष्याच्या वाटेवर असे अनेक चांगले शिक्षक भेटले ज्यांनी जगण्यासाठी भाकरी कमवण्याचे शिक्षण दिलेच पण मोठी स्वप्नं पाहण्याची ठिणगी अंतर्मनात पेटवली.स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवले. शिक्षक …एक खर्या तळमळीचा आत्मा..समाजाला ,विद्यार्थ्यांना योग्य वाट दाखवणारे दीपस्तंभ..आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा खुप पुढे जावा असा उदात्त हेतू असणारा शिक्षकी पेशा…आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखणारे शिक्षक भेटतात तेव्हा आपली आयुष्याची नाव कुठल्याही टप्प्यावर भरकटत नाही … आजवर भेटलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षकदिनानिमित्त मनःपूर्वक वंदन आणि शुभेच्छा…! शिक्षणाची सुरुवात जिथून झाली त्या जि.प शाळेपासून ते जि.प शाळा ज्या सरकारी यंत्रणेचा भाग या त्या यंत्रणेचा एक भाग होणं या सगळयात माझ्या शिक्षकांचा खुप मोठा वाटा आहे ….पदाची ओळख मिळवण्यापासुन ते पदापलीकडचा माणुस होण्याचं स्वप्न दाखवण्यात शिक्षकांच नक्कीच मोठं योगदान मी मानते.
1
3
काही माणसांचं जगणं निव्वळ प्रेरणेचा कलम असतं..आयुष्यातील असंख्य अडचणीतही त्यांच्या कपाळावरील आठ्या येत नाही .रोजच्या दिवसाला प्रचंड सकारात्मकतेने सामोरे जातात,चेहऱ्यावर हसू कायम असतं. स्वतःच्या अडचणींचा पाढा न वाचता आजूबाजूच्या सर्वांसाठी सदैव सर्वकाळ उपलब्ध असतात.एकदाच मिळालेल्या आयुष्यात कृतज्ञता भाव जपून आनंदी राहणाऱ्या नक्कीच हेवा करावासा वाटतो✨💯💫
10 644
4
#Efforts in Right Direction स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना नुसतीच मेहनत करुन उपयोग नसतो मित्रांनो,योग्य दिशेने मेहनत केली तरच रिझल्ट येतो. बऱ्याचदा aspirants सांगतात की तासनतास अभ्यास करुनही आत्मविश्वास वाटत नाही किंवा “पुढचं पाठ मागचं सपाट” असं होतं हे असे होऊ नये यासाठी योग्य दिशेने मेहनत करणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे ज्या गावाला जायचे त्याचा नेमका पत्ता माहीत नसला तर आपणंच वारंवार एकाच ठिकाणी फिरत असतो ,डेस्टीनेशन पोहचता मात्र येत नाही त्याप्रमाणेच आपल्याला प्रत्येक विषयातील खाचखाळगे,आपला अभ्यास ,त्या विषयातील performance,उजळणीचे नियोजन आपल्या दृष्टीक्षेपात पाहिजे. आपण योग्य दिशेने तयारी करत आहोत् की नाही हे ओळखण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे आपला अभ्यास मार्क्समधे reflect झाला पाहिजे. होत नसेल तर खोलवर विश्लेषण करुन त्रुटी शोधता आल्या पाहिजे. तसेच आपल्या संपूर्ण अभ्यासाचे Record keeping देखील आपली तयारी ट्रॅक करायला मदत करते. योग्य वेळी कुणाचे मार्गदर्शनही घेता आले पाहिजे. योग्य दिशेशिवाय dream destination गाठणे अवघडच त्यामुळे right direction मध्ये efforts घ्या नेहमी 💯📝📈
7 244
5
#Mental Front स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना अभ्यासाच्या कंटेट सोबतच Stable and Positive mindset असणं खूप आवश्यक आहे. स्वतःकडून अपेक्षा नक्की ठेवाव्यात पण त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दबून जावू नये अशा ठेवाव्यात माणूस आहोत पण कधीकधी चुका होतात अशावेळी मागच्या अपयशाचा धोशा लावून पुढील तयारीचे मनोधैर्य कमी करता कामा नये आपल्यातील strengths बलस्थान याचा योग्य वापर करुन आपल्या उणीवा weakness भरून काढायला प्रयत्नशील राहायचे . रोजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करायची . नकारात्मक विचारांना आव्हान देऊन हाणून पाडायचे स्वतःला गाडून घ्यायचे “स्व”च्या सकारात्मक कोशात .. तुम्ही टिकून आहात म्हणजे जिंकण्याची संधीही नक्कीच आहे मित्र मैत्रिणींनो 💯✨
7 784
6
Voice clear.?
1 162
7
आज रात्री नऊ वाजता Counselling Session घेऊयात One to one चर्चा करु
7 728
8
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्या च करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मैत्री चाटते  गाय होऊनी मना जा बिलग तू तिला वारसारासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा - कवी अनंत राऊत सर्वांना मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा 💐
10 192
9
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . काल ज्यांचे डिस्कशन राहिले त्यांनी जॅाईन करावे. Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील परीक्षा आणि त्याचे तुमचे नियोजन व अनुषांगिक प्रश्न.
11 519
10
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . काल ज्यांचे डिस्कशन राहिले त्यांनी जॅाईन करावे. Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील परीक्षा आणि त्याचे तुमचे नियोजन व अनुषांगिक प्रश्न.
12 357
11
One to one counselling cum gappa मुळे आजचे सेशन रेकॉर्ड केले नाही 🙏
12 608
12
आज रात्री नऊ वाजता आपण counselling Session घेऊ. ज्यामध्ये पाच aspirant शी त्यांच्या preparation बद्दल one by one चर्चा करु . Interested people can join. Information required १ तयारी कधी सुरु केली २ तुम्ही दिलेल्या परीक्षा आणि त्यातील कामगिरी ३.भविष्यातील परीक्षा आणि त्याचे तुमचे नियोजन व अनुषांगिक प्रश्न
10 331
13
“आयुष्य”वारीत “वारकरी”होता यावं.. आषाढ सुरु झाला की शेतीची कामं आवरुन त्यांची एकच लगबग सुरु होते संसार ,शेती ,नातीगोती सर्व पांडुरंगाच्या भरोश्यावर सोडून पाऊल पंढरीची वाट धरतात आजच्या स्पर्धेच्या काळातही आयुष्यातील दरवर्षी १५-२० दिवस पायपीट करत एक क्षणाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी यांच्यात भक्तीचा भाव पाहून नतमस्तक व्हायला होतं.. देवाचिया दारी उभा क्षणभरी” असं म्हणत त्या पांडुरंगासमोर निव्वळ एक दोन सेकंद उभं राहायला मिळतं असतं कधीकधी तर तेही नाही तरीही मागचे १०-१५ दिवस पायवारी अन् २०-२२ तासाच्या रांगेत उभं राहायला वारकरी व्हावं लागतं .. प्रॅक्टिकल हिशोबी माणसाच्या हाताचा खेळ नाही त्यासाठी वेडच असावे लागते देवाच्या भेटीचे.. वर्षानुवर्षे अशी परंपरा जपण्यासाठी,बहाणे न देण्यासाठी ,शिवाय कसल्याच लक्झरीची अपेक्षा न बाळगता फक्त रामकृष्ण हरी म्हणत पांडुरंगाच्या भेटीची ओढ असायला वारकरीच व्हावे लागतं.. वर्षाभरातून वारीचे दिवस म्हणजे संसार प्रपंचातून ब्रेक घेत विठ्ठलासोबत अंतर्मुख व्हायला वारकरीच व्हावं लागतं .. नास्तिकांच्या सिध्दांताना भेदून असा नामाचा गजर अन् भक्तीचा माहोल लाखोंच्या गर्दीत अनुभवायला वारकरीच व्हावं लागतं .. जगण्याची सगळी गाऱ्हाणी त्यांच्याकडे मांडून नव्या उर्जेने घराकडे परतत नव्या उमेदीने आयुष्याला भिडण्यासाठी वारकरी व्हावं लागतं 🚩🚩 सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
13 125
14
No text...
10 965
15
Question Answer and Informal Session Today 9 pm Put your questions in comment box.
11 219
16
प्रशासनात असो आयुष्यात शांत ऐकून घेण्यात मोठे शहाणपण दडलेले असते. आपला काही एक संबंध नसतानाही कधीही कुणाचीही फडफड ऐकून घेण्याची क्षमता तयार करावी लागते. कुठे रिॲक्ट करायचे आणि कुठे रिस्पॅान्ड करायचे हे कळायला लागले की आयुष्यात त्रागा करायची वेळ नाही 💯 #प्रशासन निरिक्षण सिध्दांत
14 072
17
खालील कविता ४ जुलै २०२६ च्या लोकसत्ता “चतुरंग” मधील लेखातून साभार “उच्चभ्रूंच्या या ‘जेन झी’चं बरं असतं कमावण्याची चिंता नसते जगण्याची भ्रांत नसते कुणासाठी तरी झिजण्याची तिळतिळ तुटण्याची काळजात हात घालण्याची प्रेमात पुरतं हरण्याची कदाचित कधीच आस नसते… तेवढी तर आयफोनमध्येही      स्पेस नसते यांच्या प्रेमाच्या त्रिकोणाचीही गोष्ट पुरी फिल्मी असते एवढं कोरडंठाक खरंच होता येतं? कड्यावरून ढकलताना इतकं आसुरी सुख मिळतं? तेव्हाही ‘स्टेटस’वरची ‘सेंटी’  पोस्टच आठवत असते रीलचं अल्गोरिदम तेव्हाही  डोक्यात घुमत असते एका क्षणी सगळंच कसं     मातीमोल होऊ शकतं? सोबतचं हाडामांसाचं माणूस     क्षणात होत्याचं नव्हतं होतं खोट्या आसवांनी घरच्यांशी     नजर भिडवताना खोट्या नात्याची आहुती देऊन     खरं प्रेम कवटाळताना पोलिसांनी उलटतपासणी करेपर्यंत पश्चात्तापाची जाणीवही     फिरकत नसते आताही कदाचित आईबापच     दोषी ठरतील मारलेल्या लेकराचे अन् जिवंतपणी मरण भोगणारीचेही कधीच ‘नाही’ ऐकायची सवय नसलेल्या जनरेशनसाठी हे अगदी किरकोळ कांड असते इथे पोर्शवाला पोरगा आरामात सुटतो त्यानंतर त्याचा बाप बिनधास्त     पार्टी  करतो… इथे तर साक्षात ‘अजाण’ कन्या    आहे दोन-चार महिन्यांची तर फक्त गोष्टय उच्चभ्रूंच्या जगात सगळं कसं     मॅनेज  होतं हे त्यांच्या पोट्ट्यांना पुरतं ठावूक    असतं त्यामुळेच तर उच्चभ्रूंच्या या     ‘जेन झी’चं  बरं असतं! niranjan@soundsgreat.in
46
18
वैभव जोशी लिखित “काळ पुढे सरकत राहिला “ मधून साभार ✨
वैभव जोशी लिखित “काळ पुढे सरकत राहिला “ मधून साभार ✨
18 090
19
संपूर्ण उन्हाळा हे झाड झाड वाटतं नव्हतं नुसतचं वाळलेली काडी आपण पोसतोय असं वाटायचं याला पाणी घालतांना कित्येक वेळा याला काढून इथे दुसरं काही लावू असं मी म्हणायची त्यावर आमचे साहेब म्हणायचे,” राहू दे गं,वाट पाहू ,तुला काय त्रास आहे का त्याचा.?“ ज्याच्या जगण्याची आणि बहरण्याची मला तरी शक्यता जवळजवळ शून्य वाटत होती कारण बागेतील इतर २०-२५ झाडं स्वतःच किमान अस्तित्व दाखवणारी काहीतरी लक्षणं दाखवत होती परंतु हे पूर्ण रुक्ष ,निष्पर्ण वाळलेलं झाडं नुसतंच वाळलेली काडी मातीत अडकावी असं दिसत होतं आणि तब्बल ६ महिन्यांनी ,पावसाच्या आगमनाने म्हणा वा नवऱ्याच्या इच्छाशक्तीने किंवा त्याच्या जगण्याच्या इच्छाशक्तीने गेल्या आठवड्यापासून असं खाली मुळापासून फुटतांना दिसतयं.. शेवटच्या घटका मोजणार्या, आयसीयु मध्ये निपचित पडलेल्या पेशंटने हात पाय हालवावे अन् आशा पल्लवित व्हाव्यात असं या झाडांचं स्थित्यतंर मनाला संयमाची शिकवण देऊन गेलं . माणसाच्या आयुष्याचही काही अंशी असचं असतं ज्यांच्याकडून कुणी अपेक्षा करत नाही अशी माणसंही आयुष्याच्या रंगमंचावर कमाल खेळी खेळून जातात कारण त्यांचा विश्वास असतो स्वतःच्या मुळांवर ,वेळेवर आणि संयमावर .. जगण्याची आणि जिंकण्याची उर्मी गोष्टी घडवून आणते 🌿✨
15 438
20
+1
No text...
11 913