en
Feedback
प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

Open in Telegram

📚 दररोज प्रेरणादायी लेख 💡 सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स 🌱 व्यक्तिमत्त्व विकास ✨ सुंदर सुविचार आणि मराठी साहित्य 🎯 स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी चॅनेल जॉईन करा. https://t.me/PreranadayiVyaktimatva जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤

Show more
5 860
Subscribers
+424 hours
+237 days
+2330 days
Posts Archive
जे लोक कधीच बोलत नव्हते, ते जर अचानक मेसेज करू लागले, फोन करून विचारपूस करायला लागले, तर जरा सावध राहा... 👉🏻 कारण अचानक निर
जे लोक कधीच बोलत नव्हते, ते जर अचानक मेसेज करू लागले, फोन करून विचारपूस करायला लागले, तर जरा सावध राहा... 👉🏻 कारण अचानक निर्माण झालेली प्रत्येक जवळीक ही आपुलकीचीच असेल असं नाही...कधी कधी त्या आपुलकीच्या पडद्यामागे स्वार्थ, अपेक्षा किंवा एखादा छुपा लोभ सुद्धा दडलेला असतो... म्हणून लोकांच्या गोड शब्दांना भुलू नका माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याच्या हेतूकडे लक्ष द्या...❤️ ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके

जग तंत्रज्ञानाच्या कितीही संपर्कात असलं तरी मनातील भावना व्यक्त करायला आपल्या माणसांची गरज भासते कारण की तंत्रज्ञान फक्त आपल्
जग तंत्रज्ञानाच्या कितीही संपर्कात असलं तरी मनातील भावना व्यक्त करायला आपल्या माणसांची गरज भासते कारण की तंत्रज्ञान फक्त आपल्याला अचूक माहिती शोधून देऊ शकते पण माणसाच मन समजून घेण्यासाठी दुसऱ्या मनाची गरज असते!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

तुमची सध्याची परिस्थिती काय आहे... यावर लक्ष देण्यापेक्षा भविष्यात तुमची परिस्थिती कशी असायला हवी याकडे जास्त लक्ष द्या... 👉
तुमची सध्याची परिस्थिती काय आहे... यावर लक्ष देण्यापेक्षा भविष्यात तुमची परिस्थिती कशी असायला हवी याकडे जास्त लक्ष द्या... 👉🏻 बघा, जो माणूस सकरात्मक आणि मोठा विचार करू शकतो, तो भविष्यात काय काय करता येईल, याचे कल्पनाचित्र नेहमी रंगवत असतो... तो कधीही वर्तमान परिस्थितीत अडकून राहत नाही...💫 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके

यशस्वी होण्यासाठी फक्त अभ्यास नाही, योग्य Time Management आवश्यक आहे...📚 मित्रांनो, आज अनेक विद्यार्थी आपले Goal ठरवतात. मोठी स्वप्ने पाहतात, अभ्यासाचे नियोजन करतात आणि मेहनतही करतात. पण जेव्हा त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो “तुमचा अभ्यास करण्याचा Prime Time कोणता आहे..??तेव्हा अनेक विद्यार्थ्यांकडे त्याचे उत्तरच नसते...🤷‍♂️ मित्रांनो, स्वतःला एक प्रश्न विचारा... आज तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत, त्याच गोष्टी जर तुम्हाला 5 वर्षांपूर्वी माहिती असत्या, तर आज तुम्ही कुठे असता...?? 👉🏻 कदाचित तुमचे ज्ञान वेगळे असते, तुमच्या सवयी वेगळ्या असत्या, तुमचे निर्णय वेगळे असते आणि कदाचित तुमचे आजचे Result देखील वेगळे असते... बरोबर ना... 👉🏻 बघा, यश मिळवण्यासाठी फक्त जास्त वेळ अभ्यास करणे पुरेसे नाही. आपला वेळ योग्य पद्धतीने वापरणे महत्त्वाचे आहे... काही विद्यार्थी दिवसातील अनेक तास अभ्यास करतात, तरीही त्यांना अपेक्षित Result मिळत नाही. दुसरीकडे काही विद्यार्थी Job किंवा इतर जबाबदाऱ्या सांभाळूनही अभ्यास करतात आणि चांगले यश मिळवतात. असे का..??? 👉🏻 कारण फरक फक्त मेहनतीचा नसतो फरक असतो तो Time Management, Planning, Priority आणि योग्य पद्धतीने काम करण्याचा... प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही Secret किंवा System असते... 📌 अभ्यास करताना कोणता विषय कधी करायचा..?? 📌 आपला Prime Time कोणता आहे..?? 📌 महत्त्वाची कामे आधी कशी पूर्ण करायची..?? 📌 मोबाईल आणि Social Media पासून स्वतःला कसे दूर ठेवायचे..?? 📌 दिवसभरातील वेळ वाया कुठे जातो हे कसे ओळखायचे..?? 📌 Goal चे छोटे-छोटे Tasks कसे तयार करायचे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या वेळेचा योग्य उपयोग करून Consistency कशी निर्माण करायची..?? या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.... 👉🏻 कारण वेळ प्रत्येकाकडे 24 तासच असतो. फरक एवढाच असतो की कोणीतरी त्या 24 तासांचा योग्य वापर करतो, तर कोणीतरी तो नकळत वाया घालवतो. शाळेत शिकलेले Time Management आयुष्यभर उपयोगी पडते. आज अभ्यासासाठी केलेले Planning उद्या Job, Business, Career आणि Personal Life मध्येही उपयोगी ठरते... म्हणूनच मी खूप मेहनत करतो एवढ्यावर थांबू नका. स्वतःला प्रश्न विचारा मी योग्य दिशेने, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने मेहनत करतोय का..?? 👉🏻 तुम्हाला आयुष्यात चांगले Result हवे असेल, तर केवळ Goal ठरवू नका Goal पूर्ण करण्यासाठी Time Management शिका... कारण योग्य ज्ञान योग्य वेळी मिळाले, तर तुमचा वेळ वाचतो, चुका कमी होतात आणि तुमच्या प्रगतीचा वेग वाढतो...💞 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ 9545441697

दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हि
दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हिणवून आपल्या बद्दल त्यांच्या मनात कमीपणा करून घेऊ नका आणि प्रत्येकात दोष बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण शोधा कारण हीच सोबती तुम्हाला जीवनात कधी एकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

"इंकलाब जिंदाबाद"असे स्वातंत्र्यासाठी नारा लावणारे भगतसिंह हे फक्त क्रांतिकारक नसून एक उत्तम पुस्तकप्रेमीही होते🇮🇳..त्यांच्
"इंकलाब जिंदाबाद"असे स्वातंत्र्यासाठी नारा लावणारे भगतसिंह हे फक्त क्रांतिकारक नसून एक उत्तम पुस्तकप्रेमीही होते🇮🇳..त्यांच्या शेवटच्या प्रवासात जेल मध्ये असताना त्यांनी अनेक पुस्तके वाचली,लेखनही केले✍त्यांच्या सारख्या विचारवंतांची आज गरज आहे✍,त्यांचे वर्तमानपत्रातील लेखन ब्रिटिशांना वटणीवर आणणारे होते,मनात जे क्रांतिकारक विचार येतात ते कागदावर आणि लोकाच्या मनावर बिंबवण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला,त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून अनेक क्रांत्या घडल्या✍स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारे युवक,"मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ हैं मेरी कलम,मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनक़लाब लिखा जाता हैं !असे ठाम विचार मांडणारे,स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर क्रांतिकारक,शहीद भगत सिंह यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏जय हिंद,वंदे मातरम्🇮🇳 ........🦋🌺😇💞....... लेखन✍-B.S Kendre(Stud) Telegram id-@Bskendre5 प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा

तुम्ही काय विचार करता, यासाठी तुम्हीच जबाबदार असता… 👉🏻 कारण तुमचे विचार हेच तुमच्या वर्तनाचे, निर्णयांचे आणि शेवटी आयुष्यात
तुम्ही काय विचार करता, यासाठी तुम्हीच जबाबदार असता… 👉🏻 कारण तुमचे विचार हेच तुमच्या वर्तनाचे, निर्णयांचे आणि शेवटी आयुष्यात मिळणाऱ्या परिणामांचे मूळ असतात. 💫 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके

वेळ हीच खरी संपत्ती आहे...✨ पैसा गमावला तर तो पुन्हा कमावता येतो पण एकदा गेलेली वेळ पुन्हा मिळवता येत नाही... प्रत्येक व्यक्तीला दिवसाचे 24 तास समान मिळतात. तरीही काही लोक कमी वेळेत अनेक कामे पूर्ण करतात, तर काही लोक दिवसभर व्यस्त असूनही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकत नाहीत... यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे Time Management वेळेचे व्यवस्थापन...⏰ 👉🏻 आजच्या डिजिटल युगात वेळ वाया जाण्याची अनेक कारणे आहेत... मोबाईल, सोशल मीडिया, अनावश्यक चर्चा, नियोजनाचा अभाव, काम पुढे ढकलण्याची सवय आणि एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न यामुळे आपला मौल्यवान वेळ नकळत खर्च होतो... त्यामुळे आजचा तारखेला वेळेचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन शिकणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे झाले आहे... 👉🏻 Time Management Course म्हणजे फक्त वेळेचे वेळापत्रक बनवायला शिकणे नाही. यामध्ये महत्त्वाची कामे ओळखणे, Priority ठरवणे, योग्य नियोजन करणे, काम वेळेत पूर्ण करणे, Procrastination म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय कमी करणे आणि आपल्या दिवसाचा प्रभावी वापर करणे यासारख्या कौशल्यांचा विकास केला जातो... विद्यार्थ्यांसाठी Time Management विशेष महत्त्वाचे आहे. अभ्यास, गृहपाठ, परीक्षा तयारी, खेळ, मोबाईलचा वापर आणि विश्रांती यामध्ये योग्य संतुलन ठेवण्यासाठी वेळेचे नियोजन आवश्यक असते... योग्य Time Management मुळे अभ्यासाचा ताण कमी होतो आणि नियमित अभ्यासाची सवय लागते... 👉🏻 नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठीही हे कौशल्य अत्यंत उपयुक्त आहे. ऑफिसमधील अनेक कामांपैकी कोणते काम आधी करायचे, कोणते काम किती वेळात पूर्ण करायचे आणि महत्त्वाच्या कामांसाठी वेळ कसा राखून ठेवायचा, हे Time Management मुळे शिकता येते. त्यामुळे कामाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते... व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी तर वेळेचे व्यवस्थापन आणखी महत्त्वाचे आहे... ग्राहक, कर्मचारी, मार्केटिंग, आर्थिक नियोजन, बैठका आणि व्यवसायाच्या भविष्यातील नियोजनासाठी वेळ द्यावा लागतो. वेळेचे योग्य नियोजन असल्यास व्यवसायातील महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता कमी होते. 👉🏻 Time Management मुळे केवळ कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, तर शिस्त, आत्मविश्वास, एकाग्रता, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना यांसारख्या गुणांचाही विकास होतो. आपल्या दिवसाचे नियोजन आधीच केले असल्यामुळे आज काय करायचे..?? या गोंधळात वेळ वाया जात नाही... 👉🏻 सर्वात महत्त्वाचे म्हणजे Time Management आपल्याला Busy राहण्याऐवजी Productive राहायला शिकवते. दिवसभर व्यस्त असणे म्हणजे आपण योग्य काम करत आहोत असे नाही. योग्य वेळी योग्य काम करणे आणि आपल्या ध्येयाकडे सातत्याने पुढे जाणे हे खरे वेळेचे व्यवस्थापन आहे. म्हणूनच विद्यार्थी, नोकरी करणारे, व्यवसायिक, गृहिणी किंवा स्वतःच्या आयुष्यात प्रगती करू इच्छिणारी कोणतीही व्यक्ती असो Time Management हे आजच्या काळातील अत्यंत आवश्यक Life Skill आहे. Time Management Course 📅 बॅच सुरू: 01 ऑक्टोबर 2026 ⏳ कोर्स कालावधी: 15 दिवस अधिक माहितीसाठी संपर्क करा - 9545441697 धन्यवाद... 🙏🏻🌹😇 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ 9545441697

तुम्हाला जर परिवर्तनाची भीती वाटत असेल, तर स्वतःला Comfort Zone मध्ये अडकवून एखाद्या बंद पडलेल्या गाडीसारखं आयुष्य जगत राहा..
तुम्हाला जर परिवर्तनाची भीती वाटत असेल, तर स्वतःला Comfort Zone मध्ये अडकवून एखाद्या बंद पडलेल्या गाडीसारखं आयुष्य जगत राहा... परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, 👉🏻 गाडी पुढे न्यायची असेल तर ती सुरू करावी लागते आणि आयुष्य पुढे न्यायचं असेल तर बदल स्वीकारावा लागतो...🌼 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके