en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 868 subscribers, ranking 1 282 in the Education category and 2 493 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 868 subscribers.

According to the latest data from 03 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 730 over the last 30 days and by 70 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 32.41%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.47% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 34 315 views. Within the first day, a publication typically gains 20 613 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 64.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 04 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 868
Subscribers
+7024 hours
+3437 days
+1 73030 days
Posts Archive
photo content

"राज्यसेवा पुर्व टेस्ट सिरीज (Test series) २०२०" राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२० साठी एक दर्जेदार टेस्ट सिरीज देण्याचा मानस ठेवुन रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज सुरु होतेय. टेस्ट सिरीज चा नेमका उद्देश डोळ्यासमोर ठेवुन सराव होणे ,updation होणे,परीक्षे दरम्यान होणाऱ्या चुका टाळता येणे या गोष्टी प्राथमिकतेला ठेवत रयत च्या टेस्ट सिरीज होत असतात. राज्यसेवेच्या बदलत्या आणि update होणाऱ्या परिस्थितीला समोर ठेवत रचना केलेली टेस्ट सिरीज मागील टेस्ट प्रमाणेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या ठरतील अशी आशा आहे. टिप- 5 October 2020 रोजी होणारा पेपर "warm up " पेपर होणार असुन ,आपण सुरुवात करतानाची अभ्यासाची नेमकी परिस्थिती कळण्यासाठी याचा उपयोग होईल असे आम्ही समजतो. यापुढील test मधुन "गुणात्मक " आणि "संख्यात्मक " असे दोन्ही बदल सकारात्मक घडवाण्यासाठी रयत प्रबोधिनीची संपुर्ण टिम तुमच्या सोबत असेल.. उमेश कुदळे

photo content

▪️एमपीएससी च्या अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती: •महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य आणि प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक आज निवृत्त झाले असून आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवृत्त अतिरिक्त मुख्यसचिव सतीश गवई यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. •राज्य सरकारच्या सेवेतून 2 वर्षापूर्वी चंद्रशेखर ओक निवृत झाल्यानंतर त्याची लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली  होती. शिवाय अध्यक्ष पदाचा प्रभारी अध्यक्ष पदाची सुत्रही  सोपविण्यात आली होती. आयोगाच्या घटनेत कमीत  कमी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होत पर्यन्त कार्यरत राहु शकतात अशी तरतूद आहे. ओक यांना 15 सप्टेंबर रोजी 62 वर्ष पूर्ण होत असल्याने आणि पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने आज शासनातर्फे ओक यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. आयोगात मिळालेल्या 15 महिन्याच्या कालावधीनंतर ओक आज निवृत झाले असून त्यांनी आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.    •काही दिवसांपूर्वी उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून सतीश गवई निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्त केले असून यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जाहीर केले. सतीश गवई यांनाही अध्यक्ष म्हणून दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. त्याच बरोबर दयानंद मेश्राम हे सदस्य पदावर कार्यरत असून 6 पैकी 4 सदस्य पद अद्यापही रिक्त ठेवण्यात आले आहे. 

​​🌖 स्वाऱ्या चंद्रावरच्या 🌗 ◾️गेल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. ◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता. ◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका. ◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं. ◾️ त्यानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं. ◾️त्या काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली. ◾️ त्यानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत. 💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢 ◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या. ◾️ त्यापैकी १६ यशस्वी झाल्या. ◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले. 💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢 ◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या. ◾️यातील १५ यशस्वी झाल्या. ◾️लुना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले. ◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं. 💢 जपान : १९९० पासून 💢 ◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली. ◾️चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला. ◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली. ◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते. 💢 चीन : २००७ पासून 💢 ◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत. ◾️चँग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते. ◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते. 💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢 ◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता. ◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली. ◾️श्रीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले. ◾️चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते. ◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

photo content

photo content

■‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ला सुरुवात झाली √दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस अश्या रोगांना लक्ष्य करीत देशव्यापी ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’ याचा आरंभ करण्यात आला. √केंद्र सरकारने या योजनेसाठी येत्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2024 सालापर्यंत 12,652 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ■कार्यक्रमाविषयी √प्राण्यांमध्ये आढळून येणार्‍या पाय व मुखरोग (FMD) या धोकादायक रोगाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरातल्या गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे अश्या 500 दशलक्षाहून अधिक जनावरांचे लसीकरण करणे हे या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे. शिवाय ब्रुसेलोसिस रोगाविरूद्धच्या लढाईत दरवर्षी 36 दशलक्ष गायीच्या मादा वासरांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. ■कार्यक्रमाचे दोन घटक – √2025 सालापर्यंत रोगांवर नियंत्रण आणणे √2030 सालापर्यंत पाय व मुखरोगांचे (FMD) निर्मूलन करणे गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकर इत्यादी पशूंमध्ये पाय व मुखरोग (FMD) आणि ब्रुसेलोसिस हे रोग सामान्यपणे आढळून येतात. जर दुधावर असलेले पशू रोगाची लागण झाली असेल तर शंभर टक्क्यांपर्यंत दुधाचे नुकसान होऊ शकते जे जवळपास चार ते सहा महिने टिकू शकते. त्यामुळे उत्पादकाला अत्याधिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवविला जात आहे.

photo content

डच ईस्ट इंडिया कंपनी : डच लोक अतिपूर्वेकडील मसाल्यांच्या बेटांशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी १५९५ पासूनच प्रवास करीत होते. अखेर १५९७ मध्ये जावाच्या सुलतानाबरोबर तह करण्यात डचांना यश मिळाले. अतिपूर्वेकडील व्यापारात वर्चस्व असणाऱ्या पोर्तुगीजांबरोबर स्पर्धा करण्यासाठी एकत्रित संघटित प्रयत्‍नांची आवश्यकता आहे, या जाणिवेने नेदर्लंड्सच्या स्टेट जनरलने एक व्यापारी कंपनी स्थापन केली. त्या देशातील विविध भागधारकांकडून कंपनीसाठी भांडवल गोळा करण्यात आले. भागधारकांच्या हितांची काळजी घेणारे एक मंडळ ह्या कंपनीवर देखरेख ठेवण्यासाठी नेमण्यात आले. २० मार्च १६०२ ला नेदर्लंड्स सरकारने कंपनीला २१ वर्षांच्या कराराने सनद दिली. त्याचप्रमाणे कंपनीला आयात करात माफी देऊन, ज्या ठिकाणी व्यापार करावयाचा त्या भागावर राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यास परवानगी देण्यात आली. दहा वर्षांच्या अवधीतच डचांनी मोल्यूकस, टिडोर, बांदा व अँबोइना ह्या भागांवर राजकीय व व्यापारी सत्ता प्रस्थापित केली. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांनी अति पूर्वेकडील व्यापारात व राजकारणात प्रवेश केला होता. डच व इंग्रज ह्यांच्यामध्ये १६१९ मध्ये जावामधील जाकार्ता येथे प्रथम स्पर्धा सुरू झाली, पण इंग्रजांना माघार घ्यावी लागली. डच कंपनीचा गव्हर्नर यान पिटर्सन कोएन याने कंपनीसाठी जाकार्ता येथे प्रमुख कार्यालय बांधले. जाकार्ताला ‘बटाव्हिया’ असे नाव देण्यात आले. पुढील काळातील डचांच्या अतिपूर्वेकडील व्यापाराचे बटाव्हिया हे प्रमुख केंद्र बनले. अतिपूर्वेकडील मलायापासून बोर्निओपर्यंतचा प्रदेश डचांच्या ताब्यात आला. डचांनी १६०० मध्ये जपानमध्ये प्रवेश केला व पुढे पाच वर्षांनी डच ईस्ट इंडिया कंपनीला जपानशी व्यापार करण्याची परवानगी मिळाली. १६३७-३८ च्या जपानमधील क्रांतीनंतर सर्व ख्रिस्ती धर्मीयांना जपानमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली. डचांना मात्र नागासाकी विभागातील देशिया ह्या बेटावर राहण्याची परवानगी मिळाली. १६५२ मध्ये डचांनी दक्षिण आफ्रिकेतील पोर्तुगीजांचा पराभव करून केप ऑफ गुड होप येथे आपली सत्ता स्थापन केली. तथापि यापुढील काळात मात्र डचांना इंग्रजांना तोंड द्यावे लागल्याने, त्यांची पूर्वेकडील सत्ता हळूहळू कमी होत गेली. १७९५ मध्ये इंग्रजांनी दक्षिण आफ्रिकेतील डचांची सत्ता नष्ट केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जावा व आसपासची काही बेटे एवढाच प्रदेश राहिला. १८१५ मध्ये डच कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रदेश डच वसाहती म्हणून डच सरकारने आपल्या ताब्यात घेतला. इंडोनेशिया १९४५ पर्यंत डच साम्राज्यांतर्गत एक वसाहत होती. १७३२ मध्ये स्थापन झालेली डॅनिश एशियाटिक कंपनी १८४५ पर्यंत व्यापार करीत होती. या कंपनीला राजकीय दृष्टीने महत्त्व नाही.

रयत राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज प्रवेश सुरू......
+1
रयत राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज प्रवेश सुरू......

photo content

photo content

पहिले अफगाण युद्ध : (१८३८–१८४२). अफगाणिस्तानातून रशिया हिंदुस्थानावर स्वारी करील, अशी धास्ती इंग्रजांना वाटत होती. त्यातून इराणच्या शाहाने रशियाच्या मदतीने अफगाणिस्तानातील हेरातला १८३७ मध्ये वेढा दिल्यामुळे इंग्रजांना रशियाचे आक्रमण होणार, याची खात्री वाटली व त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू केले. याच सुमारास रणजितसिंगाने घेतलेला पेशावर प्रांत परत जिंकून घेण्यासाठी अफगाणिस्तानच्या दोस्त महंमदाने इंग्रजांकडे मदत मागितली. इंग्रजांनी नकार दिल्यामुळे दोस्त महंमद रशियाकडे गेला. आपल्या वर्चस्वाखाली राहील असा अमीर अफगाणिस्तानात असावा, म्हणून गव्हर्नर जनरल ऑक्लंडने रणजितसिंग व शाह शुजा यांबरोबर त्रिपक्षीय तह करुन शाह शुजाला अफगाणिस्तानचे अमीरपद देण्याचे ठरविले. दरम्यान १८३८ मध्ये हेरातचा वेढा उठला होता. तरीही ऑक्लंडने शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी सर जॉन किन व सर कॉटन यांना सैन्य देऊन काबूलास रवाना केले. सिंधच्या अमीराचा विरोध असतानाही इंग्रज सैन्याची एक तुकडी फिरोझपूरहून सिंध, बोलन खिंड, बलुचिस्तान या मार्गाने कंदाहार येथे पोहचली. शाह शुजाचा मुलगा तैमूर याच्या नेतृत्वाखाली शीख सैनिक व इंग्रज अधिकारी वॉड यांची दुसरी तुकडी पंजाब, पेशावर, खैबरखिंड या मार्गाने कंदाहारला पोहोचली. इंग्रजांनी १८३९ च्या एप्रिल महिन्यात कंदाहार, जुलैत गझनी आणि ऑगस्टमध्ये काबूल घेतले. दोस्त महंमद बूखाऱ्याला पळाला. त्यानंतर इंग्रजांनी त्याला कलकत्त्यात कैदेत ठेवले. इंग्रजांनी शाह शुजाला गादीवर बसवून त्याच्या संरक्षणासाठी तेथे फौज ठेवली. त्यामुळे अफगाण चिडले. दोस्त महंमदाचा मुलगा अकबरखान याने बंड करून १८४१ मध्ये बर्न्स, मॅकनॉटन व इतर अधिकारी यांचे खून केले. त्यानंतर मेजर हेन्री पॉटिंजर आला. त्याने पूर्वी झालेला तह अंमलात आणून जलालाबाद, गझनी व कंदाहार ही स्थळे सोडून देण्याचे ठरविले. परत जाणाऱ्या इंग्रजांची अफगाणांनी खैबर खिंडीत कत्तल केली. बाहेरूनही मदत मिळण्यास इंग्रजांना अडचण पडू लागली. गव्हर्नर जनरल नॉर्थब्रुकने सैनिकांना माघार घेण्यास सांगितले. अखेरीस खजिना व तोफा अफगाणांच्या स्वाधीन करून इंग्रजांनी माघार घेतली. या युद्धामुळे इंग्रजांचा काहीच फायदा झाला नाही. ज्या शाह शुजासाठी इंग्रजांनी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले, त्याचाच अफगाणांनी खून केला. ऑक्लंडच्या आक्रमक धोरणामुळे निष्कारण पैसा खर्च होऊन २०,००० लोक मृत्युमुखी पडले. दुसरे अफगाण युद्ध : (१८७५–१८७९). इंग्लंड व रशिया यांत अफगाणिस्तानात आपापले वर्चस्व स्थापन करण्याची स्पर्धा होती. यातूनच दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. वारसाहक्काच्या भांडणाचा निकाल लागून १८६८ मध्ये शेरअली हा अमीर झाला. रशियाचे मध्य आशियात वर्चस्व वाढल्यामुळे शेरअलीने इंग्रजांकडे मदत मागितली परंतु इंग्रजांच्या धरसोडीमुळे त्याने रशियाबरोबर मैत्रीची याचना केली. रशियाचा वकील काबलला जाताच गव्हर्नर जनरल लिटनने शेरअलीस आपलाही वकील काबूल येथे ठेवून घेण्याचा आग्रह धरला. शेरअलीने ही विनंती नाकारताच गव्हर्नर जनरल लिटनने त्याविरुद्ध युद्ध पुकारले. जनरल रॉबर्ट, जनरल स्ट्यूअर्ट व सॅम ब्राउन हे खैबर खिंडीतून अफगाणिस्तानात पोहोचले. इंग्रजांनी कंदाहार घेताच शेरअली रशियाच्या हद्दीत पळाला. त्याचा मुलगा याकूबखान याने इंग्रजांबरोबर १८७९ मध्ये गंदमक येथे तह केला. या तहानुसार इंग्रज वकील काबूल येथे रहावयाचा होता. कुर्रम, पिशी आणि तिवी ही ठिकाणे इंग्रजांच्या ताब्यात आली. अफगाणांना हा तह मान्य नसल्यामुळे त्यांनी काही इंग्रज अधिकाऱ्यांचे खून केले व याकूबखानला कैद केले. त्याचा भाऊ अयूबखान याने बंड करुन इंग्रज फौजेचा मैवंद येथे पराभव केला. शेवटी गव्हर्नर जनरल रिपनने शेरअलीचा पुतण्या अब्दुर रहमान याच्याशी तह करुन दुसरे अफगाण युद्ध थांबविले. इंग्रजांनी अमीराकडून खंडणी घेऊन गंदमकच्या तहाने सोडलेला प्रदेश परत मिळविला. या युद्धामुळे इंग्रजांचे वर्चस्व अफगाणिस्तानात स्थापन होऊन रशियाच्या आक्रमक धोरणाला पायबंद बसला. तिसरे अफगाण युद्ध : (१९१९). पहिल्या दोन युद्धांत इंग्रजांनी अफगाणिस्तानावर स्वारी केली होती. तिसऱ्या वेळी मात्र अफगाणिस्तानने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. अमीर ⇨ अमानुल्ला याने अफगाण लोकांच्या दडपणामुळे १९१९ च्या एप्रिल महिन्यात ब्रिटिश प्रदेशावर आक्रमण केले. हे युद्ध फक्त दोनच महिने चालू होते. अफगाण लोकांनी खैबर खिंडीतून पेशावरच्या परिसरात हल्ले केले. इंग्रजांनी विमानासारख्या आधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे ते यशस्वी झाले. १९१९ च्या नोव्हेंबर महिन्यात तह झाला. अफगाणिस्तानला परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांकडून अमीराला मिळणारे आर्थिक साहाय्य बंद झाले. या युद्धानंतर इंग्रज अफगाण संबंध सुधारले.

photo content

photo content

।। आजचा दिनविशेष ।। #rayat_prabodhini #umeshkudale #mpsc #combine_exam
।। आजचा दिनविशेष ।। #rayat_prabodhini #umeshkudale #mpsc #combine_exam

photo content

photo content

रयत नोट्स च्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधणारे मा.महेश लोळे सर यांची ASO पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन ..✌✌