We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more764
Subscribers
+124 hours
+57 days
+630 days
Posts Archive
मला सांगताना आनंद वाटतो आतापर्यंत २००० लाडक्या बहिणींना मुंबई बँक, महाराष्ट्र सरकार आणि लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून व्यावसायिक बनवण्याचं काम आपण केलंय.
स्वयं पुनर्विकासच्या माध्यमातन मागच्या काळात काही इमारतींचा आम्ही उद्घाटन केलं, आणि मला पाहून इतका आनंद वाटला की ज्यांचं 500 चौरस फुटाच घर होतं त्यांना बिल्डर 600 चौरस फूट देत होता
पण स्वयं पुनर्विकासात त्या 500 फूट वाल्याला कोणाला 900 फूट मिळालं कोणाला 1100 फूट मिळालं आणि त्यांच्याही जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेला आपण बघितलं
सगळ्यांना मुंबईत यावं लागतं मग आपण त्याचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. गृहनिर्माण सोसायट्यांकरता एक वेगळा निर्णय घेऊन आणि त्यांना अतिशय कमी दरामध्ये मला असं वाटतं पाच टक्क्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग एक मध्ये आणून त्यांना सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचा मालक करण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केला
सहकारामध्ये १००% डिजिटायझेशन करायचं आणि कोणालाही कार्यालयामध्ये सहकार विभागाच्या येण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील आपण तयार केला.
आपण सहकार कायद्यात बदल केला आणि गृहनिर्माण संस्थांचा वेगळा चॅप्टर हा आपल्या सहकार कायद्यामध्ये ऍड करून गृहनिर्माण संस्थांकरता ज्या ज्या तरतुदींची आवश्यकता होती त्या सगळ्या तरतुदी आपण त्यामध्ये घेतल्या
काहींचं राजकारणच खोट्या अफवांवर चालतं… लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांना देवाभाऊंचा इशारा..अफवा पसरवली तर थेट फौजदारी कारवाई होणार
दरेकर साहेब तुम्ही सगळ्या लोकांना उन्हात का बसवलं हा माझा तुम्हाला प्रश्न आहे बर उन्हात बसवलं तर बसवलं अशा वेळी घेतला की तो सूर्य सरळ माझ्या तोंडावर येऊन राहिलेला आहे
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते गृहनिर्माण पुस्तकाच अनावरण करण्यात आलं
कन्नवार नगर विक्रोळी येथे मुंबई हाउसिंग फेडरेशन संचालित सेवा मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्राच उद्घाटन
आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांनी देवेंद्रजींच्या कर्तव्यनिष्टतेच उत्तम उदाहरणं सांगितलं.
जो बोला वह करके दिखाने वाले सम्मानीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब है
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आता 5 लाखापर्यंत मोफत इलाज घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.
सध्या जवळपास २४०० आजारांवर मोफत सेवा दिली जात असून, त्यासाठी 4500 हजार रुग्णालये एमपॅनल (Empaneled) करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, 9 विशिष्ट आजारांसाठी राज्य सरकार २२ लाख रुपयांपर्यंतची मदत करते, ज्यामध्ये रुग्णाला एक पैशाचाही खर्च करावा लागत नाही
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाची कॅपॅसिटी दुपटीच्या जवळपास जाणार आहे.
३२८६ बेड्स उपलब्ध होणार आहेत. डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या निवासासाठी २५ मजली टॉवर असणार, १३ मजल्याची कॅन्सर केअर सुविधा असणार, १५ मजल्याची रुग्णालयाची इमारत असणार, १४ मजल्याची आपातकालीन सेवा असणार, १३ मजल्याची बाह्य रुग्ण इमारत असेल,
४० च्या वर ऑपरेशन थिएटर्स हे या ठिकाणी असतील आणि जवळपास २५०० कोटी रुपये महानगरपालिका याच्यावर खर्च करणार आहे
1947 मध्ये केवळ 60 खाटांच हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं आज जवळपास 1900 खाटा या ठिकाणी आहेत
मला अतिशय आनंद आहे की, सायन हॉस्पिटलच्या कामाची सुरुवात आपण सगळे करतो आहोत.
डी फॉर देवेंद्र, डी फॉर डेव्हलपमेंट, डी फॉर डेडिकेशन आणि डी फॉर धन्वंतरी असं मला या ठिकाणी आमच्या देवाभाऊ बद्दल देवेंद्रजी बद्दल बोलावसं वाटतं
एक अजून गोष्ट मी सांगतो की या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टिम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल
आता जी घटना आहे जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेच आहे. आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच
नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरधनीवर संपर्क करून असं सांगितलेल आहे की हा जो व्हिडिओ आहे तो तीन चार व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे मी त्यांना ॲडव्हाईस केलेला आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी
आता त्यांचा पक्ष हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे ते आपापसात भांडो माऱ्यामाऱ्या करो एकमेकांच्या झिंज्या उपटो एकमेकाचे कॉलर पकडो त्यांचं त्यांना लखलाब
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
