en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
759
Subscribers
No data24 hours
+17 days
+130 days
Posts Archive
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे अध्यासन सुरू होणार आहे

इंदू मिलच जे स्मारक आहे जवळपास सिव्हिलच वर्क हे ८० टक्के पूर्ण झालय. पुतळ्याच काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच अतिशय सुंदर अशा प्रकारच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे त्या ठिकाणी पहायला मिळेल.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्या ठिकाणी ५०० कोटी रुपये आपण दिले

बोधगयेला मोठ्या प्रमाणात आपले भाविक जातात आणि म्हणून बोधगयेमध्ये आपलं महाराष्ट्र भवन असलं पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे निश्चितपणे मी स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी जागा मिळवीन आणि आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक चांगलं भवन हे त्या ठिकाणी तयार करू.

आज देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं झालेला आहे की, ज्या लोकांवर जाती भावनेतन अत्याचार झाले, अशा प्रकारच्या लोकांच्या ९८ पाल्याना थेट शासकीय नोकरी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे समतेकडे जाणारं एक महत्त्वाचं पाऊल आपण उचललय.

जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे? हे ही आपल्याला समजणार नाही आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे? हे ही आम्हाला समजणार नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर चवदार तळं हे सर्वांकरता खुलं झालं आणि केवळ चवदार तळ नाही तर या देशातले सगळे पानवठे या एका आंदोलनामुळे सर्वांकरता खुले झाले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या मोठ्या लढाईच्या आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून संपूर्ण देशाला एक समतेचा संदेश दिला

बहिष्कृत भारत मध्ये ३ एप्रिल १९२७ रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहीत असताना सांगितलं की ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासातला एक असं वळण आहे की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला, तशाच प्रकारे भारताच्या इतिहासातला एक असं वळण हे चवदार तळे आहे

महाराष्ट्र सरकारने हे वर्ष 'समता आणि समरसता वर्ष' म्हणून साजर करण्याचा निर्णय घेतलेला आहे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या शताब्दी वर्षाची आज सुरुवात होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायगडच्या भूमीतून 'स्वराज्याचा' संदेश दिला होता तर दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनातून हा संदेश दिला की, स्वराज्य हे 'समते'सोबत असले पाहिजे.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ (सुधारित अधिनियम २०१५) अंतर्गत बाधित कुटुंबातील वारसांना शासकीय नोकरीत थेट नियुक्तीचे पत्र वाटप

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते तरुण भारत अंकाचा प्रकाशन सोहळा

मी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आणला. बाबासाहेब आंबेडकरांनी जे पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली, त्याची आता डागडुकीला ती इमारत आलेली आहे. सिद्धार्थ कॉलेज असेल, वडाळ्याचं हॉस्टेल असेल, मिलिंद कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टीला साहेब मला सहकार्य करायची गरज आहे. साहेब मला मदत करा. देवेंद्रजींनी एका मिनिटामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ५०० कोटी रुपये आपल्याला दिले.

देवाभाऊंविषयी बोलताना अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या भावना व्यक्त केल्या

दलित समाजाच्या उद्धारासाठी मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वेळेला बाराशे कोटी रुपये मला दिले. आता एप्रिल महिन्यामध्ये जवळपास ६० नवीन वस्तीगृहांची आपण पायाभरणी करतोय. तेव्हा या समाजातील जवळपास २० ते २५ हजार नवीन विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहेत.

माननीय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी मला सांगितलं, चवदार तळ्याच काम हे चांगलं काम आहे. त्या ठिकाणी निधीची कमतरता पडणार नाही. तुला करायचं बिंदास कर.

*Program begins* 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | Chavdar Tale | चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन | रायगड https://www.youtube.com/live/IZNYsHZoiok?si=hbYdmyKazoYlC6TW

सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार सोहळा संपन्न

महाराष्ट्राचे लाडके व लोकप्रिय मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अर्थात देवाभाऊ श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार