Devendra Fadnavis
Open in Telegram
4 154
Subscribers
-224 hours
-107 days
-5130 days
Posts Archive
4 154
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕛 12.02pm | 2-6-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/KooMr51h2dU?si=MX3l-WCRt8NGntsz
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1892928785427935
https://x.com/Dev_Fadnavis/status/2061697562848178615?s=20
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from a day dedicated to empowering women and honouring Hindi journalism...
नारी शक्तीला बळ देणाऱ्या आणि हिंदी पत्रकारितेचा सन्मान करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
(मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #Mumbai #NariShakti #HindiJournalism
4 154
*CMO Maharashtra Tweets:*
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 1 जून 2026
ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'विकसित महाराष्ट्र' अंतर्गत एसटीचा 100 % ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट
https://mahasamvad.in/202699/
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202726/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मराठी आणि हिंदी भाषा एकमेकींच्या अत्यंत जवळ...
मराठी और हिंदी भाषा एक दूसरे के बेहद करीब...
(हिंदी सेवा सम्मान - 2026 | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #HindiSevaSamman #Mumbai
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
हिंदी पत्रकारितेने देशाच्या वैचारिक प्रवाहाला दिशा देण्याचे काम केले.
हिंदी पत्रकारिता ने देश के विमर्श को दिशा देने का काम किया।
(हिंदी सेवा सम्मान - 2026 | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #HindiSevaSamman #Mumbai
4 154
*CMO Maharashtra Tweets:*
स्वातंत्र्यापासून लोकशाहीच्या बळकटीकरणापर्यंत हिंदी पत्रकारितेचे अमूल्य योगदान!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाद्वारे आयोजित 'हिंदी सेवा सन्मान - 2026' कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी पत्रकारितेचा इतिहास समृद्ध असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यामध्ये तिचे मोठे योगदान राहिले आहे. ‘उदन्त मार्तण्ड’ या पहिल्या हिंदी वृत्तपत्रापासून सुरू झालेल्या प्रवासाने देशातील सामाजिक आणि राष्ट्रीय विचारप्रवाहाला दिशा दिली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेत्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले.
पत्रकारितेत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले आहे. तथापि, कोणतीही बातमी किती वेगाने प्रसारित झाली यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असून समाजजीवनातील मूल्यांचे जतन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याचे कार्य पत्रकारिता करत असते. बदलत्या काळातही पत्रकारितेने आपल्या मूलभूत मूल्यांचे जतन करीत समाजहिताची भूमिका कायम ठेवावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या धाग्यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचे नाते शतकानुशतके दृढ राहिले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आणि सांस्कृतिक ऐक्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. मातृभाषा आणि भारतीय भाषांमधून ज्ञान, संस्कृती व मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीत साटम व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #HindiJournalism #HindiSevaSamman
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
3 नव्या कायद्यांमुळे ‘तारीख पे तारीख’ आता बंद!
3 नए कानूनों के कारण अब ‘तारीख पर तारीख’ बंद!
(NDTV मराठी मंच -नारी शक्ती महाराष्ट्राची | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #Mumbai #ndtvmarathimanch
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नदीजोड प्रकल्प आणि दीर्घकालीन उपाययोजनांमुळे दुष्काळ भूतकाळात, महाराष्ट्र सदासर्वदा पाणीदार असेल.
नदी जोड़ परियोजनाओं और दीर्घकालिक उपायों के कारण सूखा अब अतीत की बात बनेगा और महाराष्ट्र सदैव जलसमृद्ध रहेगा।
(NDTV मराठी मंच -नारी शक्ती महाराष्ट्राची | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #Mumbai #ndtvmarathimanch
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण द्यावे लागेल.
राजनीति में महिलाओं की भागीदारी बढ़ाने के लिए विधानसभा और लोकसभा में महिलाओं को आरक्षण देना आवश्यक होगा।
(NDTV मराठी मंच -नारी शक्ती महाराष्ट्राची | मुंबई | 1-6-2026)
#Maharashtra #Mumbai #ndtvmarathimanch
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
