uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
736
Obunachilar
-124 soatlar
-47 kun
-230 kun
Postlar arxiv
कालच्या कार्यक्रमाने राहुल गांधींबाबत अजून एक गंभीर बाब अधोरेखित केली. कोणती? राहुल गांधींना भारतीय संस्कृती, भारतीय इतिहास याची जराही माहिती नाही. कशावरून? २०२२ मध्ये पुण्यातील खडकवासला येथील NDA चे दरवाजे पहिल्यांदाच महिला कॅडेट्ससाठी उघडण्यात आले. का माहिती आहे? कारण काँग्रेस सरकारने महिलांना सैन्यात कमांड पोस्ट आणि स्थायी कमिशन देण्यात येऊ नये यासाठी विरोध केला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मोदी सरकारने नंतर न्यायालयात सरकारची काही हरकत नाही हे लेखी दिल्यावर महिलांना उच्च पदावर नेमणुका मिळाल्या. ज्या पुण्यात राहुल गांधी भारतीय कुटुंब व्यवस्थेविरोधात बोलत होते, त्याच पुण्यात एका महिलेनेच, ज्यांना महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यजननी म्हणतो, त्या राजमाता जिजाऊंनी हैवानी मुघल आक्रमकांविरोधात पुण्यातूनच लढा सुरू केला. भारताची "पहिल्या महिला डॉक्टर" आनंदीबाई जोशी पुण्याच्याच होत्या, भारतातील "पहिल्या प्रॅक्टिशनर महिला डॉक्टर रखमाबाई राऊत" (डॉ आनंदीबाई जोशी ह्यांनी डॉक्टरकीची सनद घेतली मात्र त्या सनद घेतल्यानंतर लगेचच क्षयरोगाने मृत पावल्या) भारतातील "पहिल्या महिला पत्रकार" तानुबाई बिर्जे या देखील पुण्यातीलच होत्या, भारतातील "पहिल्या महिला वकील" कॉर्नेलिया सोराबजी या देखील पुण्याच्याच. स्त्री शिक्षणासाठी महाराष्ट्रात आयुष्य वाहणाऱ्या "पहिल्या महिला शिक्षिका" क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले देखील पुण्याच्याच. त्यामुळे ज्या पुण्याने देशाला नवी दिशा दिली आहे, तिथेच येऊन महिलांना अधिकार नाहीत म्हणणे हे केवळ आणि केवळ अज्ञान आहे आणि भारतापासून १३ हजार किमी लांब असणाऱ्यांच्या डोक्यातून निघालेली भारतविरोधी स्क्रिप्ट सादर करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे चाणक्याने सांगितल्याप्रमाणे परदेशी मातेच्या पोटी जन्मलेली संतती कधीच देशहितवादी असू शकत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. राहुल गांधींच्या कार्यक्रमात इतरांनीही केलेल्या पप्पूगिरीचा पोस्टमार्टम पुराव्यानिशी लवकरच करणार... त्यासाठी www.facebook.com/DevendraFadnavisforMaharashtra या पेजला लाईक/फॉलो करून ठेवा. ता.क १- पितृसत्ताकतेच्या नावाने नरेटिव्ह पसरवणाऱ्या राहुल गांधींना त्यांच्या वडिलांनी आपल्याच भावाच्या विधवेबाबत "बेटी है सरदार की, देश के गद्दार की" अशी घोषणा दिली होती का? दिली होती तर मेनका गांधी यांचे वडील लेफ्टनंट कर्नल त्रिलोचन सिंह आनंद हे शीख होते आणि शिखांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केली होती. म्हणजे शीख कुटुंबांतील महिलांना, पुरुषांना जिवंत जाळल्यानंतरही समाधान झाले नव्हते, म्हणून अमेठीमध्ये निवडणूक लढणाऱ्या आपल्याच वहिनीचे अशा रीतीने धिंडवडे काढणाऱ्या त्याच राजीव गांधींचे वारसदार आज कशावर बोलत आहेत? तर पितृसत्ताकतेवर! ह्याच घोषणेविरोधात त्याच १९८६ मध्ये 'अझहर हुसेन विरुद्ध राजीव गांधी' हा खटलाही चालला होता. अभी तो रुको..Climax अभी बाकी है ता.क. २ — पुणे म्हणजे प्रेम तर आहेच, पण पुणे म्हणजे देशविरोधी शक्तींचा परफेक्ट गेम करण्याचे पण ठिकाण आहे. मुघलांच्या आणि जिहादी शाह्यांच्या जिहादी मनसुब्यांवर नांगर फिरवण्याचे काम शिवछत्रपतींनी पुण्यातूनच आरंभ केले. मुघलांचा, निजामाचा परफेक्ट गेम करणारे बाजीराव पेशवे, राष्ट्रसुरक्षेसाठी अब्दालीला भिडणारे सदाशिवभाऊ आणि पानिपतनंतर पुन्हा गगनभेदी ललकारी देत भगवा दिल्ली आणि त्याही पलीकडे जिहाद्यांच्या छाताडावर गाडणारे माधवराव पेशवे पुण्याचेच, इंग्रजांच्या थोबाडावर इथून चालते व्हा, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हे केसरी गर्जनेने सांगणारे लोकमान्य टिळकही पुण्याचेच. ज्यांच्या नावाने इटलीची नकली गांधी आपले दुकान चालवतात, त्या महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले हे देखील पुण्याचेच बरं का. त्यामुळे पुण्याने देशाला दिशा दिली आणि राष्ट्रविरोधी शक्तींची दशा लावली. तूर्तास एवढेच.

या एका फोटोने राहुल गांधींचा, काँग्रेसचा आणि शहरी नक्षलींचा प्रोपगंडा उद्ध्वस्त केला... कार्यक्रमात काय झालं, राहुल गांधींनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी त्यांची पप्पूगिरी कशी उघड पडली, हे नंतर बघूया. आधी थोडं भूतकाळात जाऊया... सत्यकथा आहे आजच्या ४५ वर्षांपूर्वीची... पुण्यापासून ६०० किमी दूरवर इंदोरमध्ये एका ६२ वर्षीय महिलेला तिच्या वकील पतीने तीन तलाक दिला आणि घराबाहेर काढलं. त्या महिलेने CRPC कलम १२५ अंतर्गत स्वतःच्या आणि मुलांच्या उदरनिर्वाहासाठी पोटगीचा दावा दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य करत Muslim Law ला वगैरे काही नाही, या देशातील सर्वांना हे कलम लागू होते, देश संविधानाने चालेल, Personal Law ने नाही, असे सांगून पोटगी देण्यास त्या महिलेच्या वकील पतीला म्हणजे मोहम्मद अहमद खानला बाध्य केले. आता इथून खरा ट्रॅक बदलतो... सरकार होतं काँग्रेसचं... आमच्या धर्मापेक्षा कायदा कसा काय वरचढ ठरू शकतो म्हणून शाब्दिक काय, शारीरिक काय आक्रमणे सुरू केली. म्हणजे आमच्या शरीयात तुम्ही कशी काय ढवळाढवळ करू शकता, आमची मते पाहिजे की नको, असे दबावगट निर्माण केले. आणि नेहमीच शांतीसमुदायाचे लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेसने एका महिलेला न्याय मिळू नये, तिला तिचा अधिकार मिळू नये म्हणून संसदेत मुस्लिम महिला कायदा १९८६ मंजूर केला, ज्यात घटस्फोटानंतर केवळ ९० दिवस पत्नीची जबाबदारी पतीवर असेल असा कायदा केला. ती अभागी महिला होती शाह बानो आणि महिलेचा न्यायदत्त अधिकार हिसकावणारे प्रधानमंत्री होते राजीव गांधी... काल पुण्यात (कालबाह्य झालेल्या) मनुस्मृतीवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचे वडील. आता बॅक टू पुणे छात्रो की गुंज कार्यक्रमात एक से बढकर एक विनोदी सादरीकरण झाले. कार्यक्रम फक्त (काँग्रेसी नेत्यांच्या विद्यापीठातील) विद्यार्थिनींसाठी होता, हे कदाचित राहुल गांधींनाही माहिती नव्हते कारण मध्येच त्यांनी विचारले, इथे मला मुलंच दिसत नाहीत, फक्त मुलीच दिसत आहेत. तर असो. विद्यार्थी, शिक्षण यावर न येता राहुलजी सरळ मनुस्मृतीवर आले आणि मनुस्मृतीने महिलांना अधिकार दिले नाहीत, पितृसत्ताक वगैरे वगैरे काहीबाही बोलले. आता इथे एक गोष्ट छातीठोकून मांडत आहोत. हा लेख वाचणारे आणि काल कार्यक्रमाला असणारे, कालचा कार्यक्रम पाहणारे यातील एकालाही मनुस्मृती काय हे माहिती नसेल कारण ती कोणीच वाचली नाही, वाचत नाही, कारण ती वाचायची गरजच पडत नाही. हिंदू धर्मातील लोकांना मनुस्मृतीचा शेवटचा उल्लेख आठवत असेल तो भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली म्हणून आणि त्यानंतर हिंदू कोड बिलासाठी महिलांना अधिकार देण्यासाठी मनुस्मृतीतील अध्याय क्रमांक ९, श्लोक ११७ चा आधार घेतला, ज्याविषयी बाबासाहेब स्वतः म्हणतात, "माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी हिंदू धर्मशास्त्राच्या नियमांचे उल्लंघन करून मुलींना मालमत्तेत वाटा देत आहे. परंतु, मी विरोधकांना आठवण करून देऊ इच्छितो की, १३७ स्मृतींपैकी सर्वोच्च मानल्या गेलेल्या मनुस्मृतीने स्वतःच अध्याय ९, श्लोक ११७ मध्ये भावांनी आपल्या बहिणींना मालमत्तेचा १/४ हिस्सा देणे बंधनकारक केले आहे आणि न देणाऱ्यांना 'पतित' मानले आहे." तर जी मनुस्मृती आजच्या युगात हिंदूसाठी जगण्याचा भाग नाही. हिंदूंना त्याची माहितीही नाही, त्यावरून राहुल गांधी यांनी शहरी नक्षलींनी, ज्यांना पंतप्रधान मोदीजी दिमागी नक्सल म्हणतात, त्यांनी लिहून दिलेली पितृसत्ताक व्यवस्था उलथून लावा अशी स्क्रिप्ट वाचून दाखवली. पण त्याचवेळी बाजूला उभ्या असलेल्या बुरख्यातील मुलीला हा बुरखा उतरवून फेकून दे असे बोलण्याची हिंमतही नाही केली किंवा शरीयाविरोधात बोलण्याची हिंमत नाही केली, याचे उत्तर किंवा मानसिकता तुम्हाला १९८६ शहाबानो कायद्यात दिसेल.

पितृसत्ता ठेचून काढायची भाषा करणाऱ्या राहूल गांधीनी आधी स्वताच्या सरकारला ज्ञान द्यावे.
पितृसत्ता ठेचून काढायची भाषा करणाऱ्या राहूल गांधीनी आधी स्वताच्या सरकारला ज्ञान द्यावे.

महिलांच्या हिताच्या आड येणारे हे कलयुगी रावण....खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे…
महिलांच्या हिताच्या आड येणारे हे कलयुगी रावण....खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे…

कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या महाविद्यालयांतून मुलींना आणलेले आहेत - मुली स्वता संगत आहेत

दिव्यांगांना मिळाला हक्काचा पाठीराखा धन्यवाद देवाभाऊ

पुणे विद्यापीठात भाजपचा वंदे मातरम् कार्यक्रम, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर नागुपरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार, पुणे विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

काँग्रेसवर पैसे देऊन इन्फ्लुएन्सर आणि विद्यार्थ्यांना गोळा करायची वेळ आलीये... देवाभाऊंनी काँग्रेसचा खरा चेहरा उघडा पाडला आहे.

भाड्याच्या इन्फ्लुएन्सरकरवी खोटी प्रसिद्धी होईल पण राहुल गांधी तू जनतेच्या मनात कधीही जागा निर्माण करू शकणार नाहीस !

काँग्रेस वातावरण निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना खोटं बोलायला लावत आहे आणि काही मराठी माध्यमे यात सामील झाली आहेत ! जाणून घ्या काय सत्य आहे !

२०२७ पासून एसी लोकलची नवी सुरुवात, मुंबईकरांच्या प्रवासाला मिळणार ‘कूल’ टच!
२०२७ पासून एसी लोकलची नवी सुरुवात, मुंबईकरांच्या प्रवासाला मिळणार ‘कूल’ टच!

जनाधार नसलेले आंदोलन चालवण्यासाठी कॉंग्रेसचा केविलवाणा प्रयत्न.

राहुल गांधी सर मला तुम्हाला आणि कोणालाही भेटायचं नाही मला कोणत्या राजकीय फायद्यासाठी वापरू नका

देवाभाऊंनी घेतलेला हा निर्णय म्हणजे खाकी गणवेशातील निष्ठावंतांच्या त्या अबोल प्रेमाची आणि सेवेची पोचपावती आहे...
देवाभाऊंनी घेतलेला हा निर्णय म्हणजे खाकी गणवेशातील निष्ठावंतांच्या त्या अबोल प्रेमाची आणि सेवेची पोचपावती आहे...

देवेंद्रजींसोबत उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्ततेची शपथ घेतली.

It is not cool to do drugs, it is cool to say no to drugs, it is courageous to say no to drugs

आज भारताला मिलिटरीली हरवणं कठीण आहे

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश अमेरिका नाही जपान नाही कोणीही दक्षिण ध्रुवावर आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकलं नाही ते केवळ आणि केवळ भारताने करून दाखवलं

now we are in a golden period; our demography is supporting us, and if we transform this demography into a demographic dividend, if we transform this population into a human resource, nobody can stop us nobody, nobody, nobody can stop us.