uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 154
Obunachilar
-224 soatlar
-107 kunlar
-5130 kunlar
Postlar arxiv
photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मंत्रालय, मुंबई येथे बालभारतीच्या इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचे अनावरण केले. यावेळी मंत्री दादाजी भुसे, मंत्रिमंडळातील इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Education

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांनी सदिच्छा भेट घेतली. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

CMO Maharashtra Tweets: जननायक भगवान बिरसा मुंडा : संघर्ष आणि बलिदानाची गाथा राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकभवन, मुंबई येथे जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात जननायक, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची अशी ज्योत पेटवली की संपूर्ण ब्रिटिश राजवट हादरून गेली. जल, जमीन आणि जंगलांसाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लढा केवळ झारखंड-बिहारपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण देशभरातील आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा ठरला. स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी नायक-नायिकांचे योगदान अनन्यसाधारण असूनही इतिहासाने त्यांची दखल घेतली नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे या वीरांचा गौरवशाली इतिहास देशासमोर आला आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचू लागला. आदिवासी संस्कृतीतील निसर्गसंवर्धन, समता आणि समृद्ध समाजव्यवस्था ही आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. आदिवासी संस्कृतीचे जतन आणि या समाजाचे सक्षमीकरण ही सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम आदिवासी समाज घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भगवान बिरसा मुंडा हेच या सर्व कार्यामागील प्रेरणास्थान आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #BirsaMundaBalidanDiwas

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आदिवासी जननायकांचा गौरवशाली इतिहास नव्याने देशासमोर आणला. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने आदिवासी जननायकों का गौरवशाली इतिहास नए सिरे से देश के सामने प्रस्तुत किया। (भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन | लोकभवन, मुंबई | 9-6-2026) #Maharashtra #Mumbai #BirsaMundaBalidanDiwas

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकभवन, मुंबई येथे जननायक, 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त वृक्षारोपण केले. यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार किसन कथोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #BhagwanBirsaMunda

photo content

photo content

photo content

photo content