uk
Feedback
mpscCurrentinfo🔥

mpscCurrentinfo🔥

Відкрити в Telegram

स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी तील महत्वाच्या facts

Показати більше
428
Підписники
Немає даних24 години
+77 днів
+630 днів
Архів дописів
Eco कर बाबत सर्व महत्वाच्या समिती .................................................... करचौकशी आयोग (जॉन मथाई आयोग)  1953 निकोलस कोल्डॉर कर सुधारणा शिफारस समिती — 1956 प्रत्यक्ष कर प्रशासन चौकशी समिती (वांछू समिती) — 1970 अप्रत्यक्ष कर चौकशी समिती (एल. के. झा समिती) — 1976 कर सुधारणा समिती (राजा चेल्लय्या समिती) — 1991 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर समिती (केळकर समिती) — 2002

Eco Concept 👉Cute Economy म्हणजे काय ? (क्यूट इकॉनॉमी) (( गोंडस (Cute) डिझाईन,व आकर्षक पॅकेजिंगच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून विक्री वाढवणारी अर्थव्यवस्था. उदाहरणे :Labubu / Pop Mart खेळणी Blind Box विक्री मॉडेल गोंडस पॅकेजिंग असलेली उत्पादने.)) 👉Gig Economy म्हणजे काय ? (गिग इकॉनॉमी) ((अर्थ : कायमस्वरूपी नोकरीऐवजी अल्पकालीन / टास्क आधारित काम करून उत्पन्न मिळवण्याची अर्थव्यवस्था. उदा.Uber – ड्रायव्हर Zomato / Swiggy – डिलिव्हर पार्टनर...))

ICC T20 World Cup 2026 भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 जिंकला आहे. भारत हा टी-
ICC T20 World Cup 2026 भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 जिंकला आहे. भारत हा टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग दोनदा (2024 आणि 2026) जेतेपद मिळवणारा आणि घरच्या मैदानावर जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. आवृत्ती :- 10वी ठिकाण :- भारत आणि श्रीलंका सुरुवात :- 2007 आयोजक :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) अंतिम सामन्याचे ठिकाण :- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद विजेता :- भारत [कर्णधार :- सूर्यकुमार यादव] उपविजेता :- न्यूझीलंड [कर्णधार :- मिशेल सँटनर] पहिला विजेता (2007) :- भारत [कर्णधार :- महेंद्रसिंग धोनी] भारताने तिसऱ्यांदा पटकावले टी-20 विश्वविजेतेपद परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे : प्लेअर ऑफ द मॅच :- जसप्रीत बुमराह [15 धावांत 4 विकेट्स] प्लेअर ऑफ द टूर्नामेंट :- संजू सॅमसन [5 डावात 321 धावा] सर्वाधिक धावा :- साहिबजादा फरहान (पाकिस्तान : 383 धावा) सर्वाधिक विकेट्स :- जसप्रीत बुमराह (भारत) आणि वरुण चक्रवर्ती (भारत) - प्रत्येकी 14 विकेट्स विजेता संघ बक्षीस रक्कम : ₹ 27.48 कोटी उपविजेता संघ बक्षीस रक्कम : ₹ 14.65 कोटी

current.. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्या दरम्यान चालू असलेल्या युद्धात खालील ऑपरेशन राबविले होते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची... 👉2025 मधील imp ऑपरेशन 👉ऑपरेशन रायझिंग लायन → इस्रायलने इराणच्या अणु प्रकल्प व लष्करी तळांवर हल्ला. 👉ऑपरेशन मिडनाईट हॅमर → अमेरिकेने इराणच्या अणु सुविधांवर हवाई हल्ला. 👉ऑपरेशन ग्लॅड टिडिंग्स ऑफ व्हिक्टरी → इराणने अमेरिकन तळांवर प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र हल्ला ============================= 👉2026 मधील IMP ऑपरेशन 👉ऑपरेशन एपिक फ्युरी → अमेरिका + इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला. 👉ऑपरेशन रोअरिंग लायन → इस्रायलची इराणविरोधी लष्करी मोहीम.

भारतीय घटनेच्या कलम १५५ नुसार, राष्ट्रपतींनी तेलंगणाचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा जी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नि
+1
भारतीय घटनेच्या कलम १५५ नुसार, राष्ट्रपतींनी तेलंगणाचे राज्यपाल मा. जिष्णू देव वर्मा जी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली आहे. आयोगाच्या सर्व परीक्षांचा विचार करता राज्यपाल या टॅपीकवर प्रश्न विचारला जात आहे. वरील फोटो मध्ये राज्यपाल पदाविषयी सर्व कलमांचा उल्लेख केला आहे. जोड्या लावासाठी नेहमी यावर प्रश्न विचारला जातो. धन्यवाद 🙏

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते *सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महा
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते *सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राजपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता. आता महाराष्ट्राला पूर्ण वेळ राज्यपाल मिळाले.

लहान मुलांसाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात सोशल मीडिया वापरावर येणार बंदी कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया
लहान मुलांसाठी कर्नाटक-आंध्र प्रदेशात सोशल मीडिया वापरावर येणार बंदी कर्नाटक व आंध्र प्रदेश सरकार लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणार आहे. कर्नाटकात 16 वर्षाखालील तर आंध्रात 13 वर्षांखालील मुलांसाठी ही बंदी लागू असणार आहे उद्देश : अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाच्या वाईट व्यसनापासून दूर ठेवणे Note : जगात सर्वप्रथम 2025 साली ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली होती.

Maharashtra Budget 2026-27
Maharashtra Budget 2026-27

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय ! 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी
कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय ! 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी

🔰जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 🔸पूर्ण नाव: जिष्णू देव वर्मा 🔹जन्म: 15 ऑ
🔰जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 🔸पूर्ण नाव: जिष्णू देव वर्मा 🔹जन्म: 15 ऑगस्ट 1957 🔸जन्मस्थान: अगरतळा, त्रिपुरा (भारत) 🔹वय: सुमारे 67 वर्षे 🔸राजकीय पक्ष: भारतीय जनता पक्ष (BJP) 🔹शिक्षण: B.A. (English Literature), कलकत्ता विद्यापीठ 🔸पत्नी: सुधा देबबर्मा 🔰पूर्वीची महत्त्वाची पदे 🔸तेलंगणाचे राज्यपाल ▪️कार्यकाळ: 31 जुलै 2024 – 5 मार्च 2026 🔹त्रिपुराचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) ▪️कार्यकाळ: 2018 – 2023 🔸त्रिपुरा विधानसभा सदस्य (MLA) ▪️मतदारसंघ: चरिलाम 🔹North East Regional Power Committee (NERPC) चे अध्यक्ष 🔸Badminton Association of India व त्रिपुरा बॅडमिंटन संघटनेशीही संबंधित कार्य केले. 🔰 राजकीय कारकीर्द 🔸1990 च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला. 🔹त्रिपुरामध्ये BJP मजबूत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. 🔸2018 मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

डॉ. मंदाकिनी आमटेंना अहिल्यारत्न पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोला
डॉ. मंदाकिनी आमटेंना अहिल्यारत्न पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात येणारा मानाचा “अहिल्यारत्न पुरस्कार” जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व 51 हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. [अहिल्यारत्न पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.]

🔰संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. 🔹घोषणा: संयुक्त राष्ट्र (UN)
🔰संयुक्त राष्ट्राने (UN) 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले आहे. 🔹घोषणा: संयुक्त राष्ट्र (UN) 🔸वर्ष: 2026 🔹नाव: International Year of the Woman Farmer 🔸उद्देश: ▪️महिला शेतकऱ्यांचे कृषी व अन्नसुरक्षेतील योगदान ओळखणे ▪️महिलांना जमीन, कर्ज, तंत्रज्ञान व बाजारपेठेचा अधिक प्रवेश मिळवून देणे ▪️कृषी क्षेत्रात लैंगिक समानता (Gender Equality) वाढवणे.

✅शून्य आधारित अर्थसंकल्प राबवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या संस्थां... पहिले राज्य :- महाराष्ट्र (१९८६ मध्ये डॉ. श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता) पहिली जिल्हा परिषद :- सातारा पहिले महानगरपालिका :- बृहन्मुंबई महानगरपालिका पहिली /ग्रामपंचायत :- मालेगाव (जि. वाशिम)

photo content

जिष्णु देव वर्मा आता महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त
जिष्णु देव वर्मा आता महाराष्ट्राचे राज्यपाल तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. [ते यापूर्वी तेलंगनाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा हे मुळचे त्रिपुरामधील आहेत.] यापूर्वी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

photo content

‘ब्रह्मपुत्रा’वर देशातील पहिल्या ‘रिव्हरिन लाईटहाऊस’ची उभारणी
‘ब्रह्मपुत्रा’वर देशातील पहिल्या ‘रिव्हरिन लाईटहाऊस’ची उभारणी

देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय; तसेच शासकीय आयुर्वेद म
देशी गाय संशोधन केंद्राला अजित पवार यांचे नाव पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय; तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे नामकरण 'स्व. अजित (दादा) पवार' यांच्या नावाने करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरण 'अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र' असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे

व्हेनेझुएला आणि सौदी अरेबिया या देशात जगातील सर्वाधिक तेलाचे साठे आहेत. [इराण तिसऱ्या स्थानावर]
व्हेनेझुएला आणि सौदी अरेबिया या देशात जगातील सर्वाधिक तेलाचे साठे आहेत. [इराण तिसऱ्या स्थानावर]