Passion MPSC Study 🎯
Відкрити в Telegram
मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯
Показати більше2 072
Підписники
-224 години
-77 днів
-2130 день
Архів дописів
2 072
1872 या वर्षी भारताची पहिली जनगणना कोणाच्या कारकिर्दीत पार पडली ?
2 072
🔹भारताचे ९६ वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर (Chess Grandmaster) कोण बनले आहेत?
2 072
PM-FCT (PM-Family Care Tracker)
योजना...
लाँच: 2026
लाँचकर्ते: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
उद्देश: गर्भावस्थेपासून 18 वर्षांपर्यंत माता व बालकांचे आरोग्य, पोषण व शिक्षण यांचे एकात्मिक डिजिटल ट्रॅकिंग.
2 072
💠 "थायमामन थंगा मोथिरम थिट्टम" ( मामाची अंगठी) योजना
⭕️ तामिळनाडू सरकारने सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या प्रत्येक बालकाला 1 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.
▪️ 15 सप्टेंबर 2026 पासून ही योजना सुरू होणार आहे.
- विजय जोसेफ ( तामिळनाडू मुख्यमंत्री )
2 072
जा. क्र. ०११/२०२६
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
2 072
ऑनलाइन ऑफलाईन परीक्षांबाबत एक मार्गदर्शक म्हणून मत...
स्पर्धा परीक्षांच्या पूर्व परीक्षेसाठी पारंपरिक OMR आधारित ऑफलाइन परीक्षा पद्धतीऐवजी CBT (Computer Based Test) पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी पूर्वीप्रमाणेच OMR आधारित ऑफलाइन परीक्षा पद्धत कायम ठेवण्याची विनंती केली आहे.
या विषयावर विद्यार्थ्यांचे मत अधिक व्यापक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने जाणून घेण्यासाठी शासन अथवा आयोगाने Google Form किंवा अन्य योग्य माध्यमातून विद्यार्थ्यांकडून अभिप्राय मागविण्याचा विचार करावा.
प्राप्त झालेल्या अभिप्रायाचे निष्पक्ष विश्लेषण करून निर्णय प्रक्रियेत त्याचाही विचार करण्यात यावा.
कारण परीक्षा प्रत्यक्षात विद्यार्थी देत असतात. त्यामुळे परीक्षा पद्धतीबाबत त्यांचे अनुभव, सूचना आणि अपेक्षा जाणून घेणे ही लोकाभिमुख व सहभागी निर्णय प्रक्रियेची महत्त्वाची बाब ठरू शकते.
शासन, आयोग, विद्यार्थी व इतर सर्व संबंधित घटक यांच्यात परस्पर विश्वास व संवाद कायम राहावा, तसेच पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहिताचा निर्णय व्हावा,हीच आमची नम्र अपेक्षा आहे.
2 072
🔸१) रामोशी, भिल्ल वगैरेंना संघटित करून इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे रणशिंग फुंकणाऱ्या .... यांना 'आद्य क्रांतिकारक' म्हणून गौरविले जाते.
- वासुदेव बळवंत फडके
🔹२) राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?
- व्योमेशचंद्र बॅनर्जी
🔸३) वंगभंगाच्या चळवळीचे देशव्यापी आंदोलनात रूपांतर करून एकूणच भारतीय राजकारणाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या .... या नेत्याने "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?". "राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे!" अशा मथळ्यांचे अग्रलेख लिहून इंग्रज राजवटीवर घणाघाती प्रहार केले.
- लोकमान्य टिळक (केसरी)
🔹४) राष्ट्रसभेच्या जहाल राजकारणाच्या कालखंडात उदयास आलेले लाला लजपतराय, लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल हे नेते .... या नावाने ओळखले जात.
- 'लाल-बाल-पाल'
🔸५) .... या ब्रिटिश संसद सदस्याने स्विकारले की, १८५७ चा उठाव सैनिकी विद्रोह नसून 'राष्ट्रीय उठाव' होता.
- बेंजामिन डिझरायली
2 072
🔸१) मॅडम ब्लाव्हट्स्की व हेन्री स्टील ऑलकॉट यांनी इ. स. १८७५ मध्ये न्यूयॉर्क येथे 'थिऑसॉफिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची शाखा मुंबई येथे सुरू झाली ....
- इ. स. १८७९
🔹२) इ. स. १८९८ मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालया'ची स्थापना केली....
- अॅनी बेझंट
🔸३) .... हे विवेकानंदांचे गुरू होत.
- रामकृष्ण परमहंस
🔹४) .... यांच्या प्रयत्नांचे फलित म्हणूनच इ. स. १८७२ मध्ये बालविवाहाला आळा घालणारा 'सिव्हिल मॅरज अॅक्ट' संमत झाला.
- ईश्वरचंद्र विद्यासागर
🔸५) स्त्रियांची गुलामी नष्ट झाली पाहिजे या विचाराच्या .... या मुस्लीम समाजसुधारकाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजाला आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगण्याचे कार्य केले..
- मौलवी चिरागअली
2 072
❇️ संस्था आणि स्थापना वर्ष ❇️
⦿ प्रार्थना समाज : 1867
⦿ विधवा विवाहोत्तेजक मंडळ : 1865
⦿ रामकृष्ण मिशन : 1897
⦿ अभिनव भारत : 1904
⦿ भारत सेवक समाज : 1905
⦿ हिंदू महासभा : 1915
⦿ बहिष्कृत हितकारणी सभा : 1924
⦿ हरिजन सेवक संघ : 1932
2 072
भारताचे ऑपरेशन अमिस्ताद'
⭕️ भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेल्या मानवतावादी मोहिमेला 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) असे नाव देण्यात आले आहे
⭕️ अर्थ: 'अमिस्ताद' (Amistad) हा मूळ स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा मराठीत अर्थ 'मैत्री' असा होतो
⭕️ मोहीम: या अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या विमानांमधून ३५ टनांपेक्षा जास्त वैद्यकीय मदत, औषधे, लष्करी रुग्णालय आणि अत्याधुनिक 'भीष्म क्यूब' व्हेनेझुएलाला पाठवले गेले आहेत।
⭕️ उद्दिष्ट: 'वसुधैव कुटुंबकम्' या विचाराला अनुसरून संकटकाळात मित्र राष्ट्रांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना तातडीची मदत पुरवणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
2 072
🔸१) लष्करामध्ये दक्षिण आघाडी (Southern Command) व उत्तर आघाडी (Northern Command) असे दोन विभाग पाडून .... याने लष्कर अधिक सुसज्ज बनविले.
- लॉर्ड किचनेर
🔹२) एकूणच भारतीय राजकारणावर व भारताच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम घडवून आणणारी कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची घटना ....
- १९०५ मधील बंगालची फाळणी
🔸३) कर्झनने केलेली बंगालची फाळणी पुढे १९११ मध्ये .... याच्या कारकिर्दीत रद्द केली गेली.
- लॉर्ड हार्डिंग्ज
🔹४) १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे भव्य दरबार भरवून बंगालची फाळणी* रद्द केल्याची घोषणा केली गेली. ही घोषणा कोणी केली ?
- ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज
🔸 ५) इ. स. १८३५ मध्ये मुद्रण स्वातंत्र्यावरील बंदी उठविणाऱ्या .... या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला 'मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता' म्हणून गौरविले जाते.
- चार्ल्स मेटकाफ
2 072
4) 'कांचनगंगा' हे भारतातील सर्वोच्च शिखर कोणत्या राज्यात आहे?
2 072
1) पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत?
2 072
💥 गट-क सेवा संयुक्त पूर्व 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु 👍...
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून 👍...
लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/main#
