🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
279. खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो.
2 804
पुढीलपैकी कोणती ग्रंथी ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?
MPSC🇮🇳ExamReality™
2 804
वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अत्यावश्यक अन्नद्रव्यांची गरज असते?
MPSC🇮🇳ExamReality™
2 804
नॅचरल गॅस हा उत्तम गॅस आहे कारण:
अ] त्याची केलोरीफिक व्हॅल्यू कमी आहे.
ब] तो धुरविरहित जळतो. क] तो कोणताही विषारी वायू तयार करीत नाही. वरीलपैकी बरोबर विधाने ओळखा. @mpsc_examreality
2 804
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा
• राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 - 13 सप्टेंबर 2020 रोजी होणार
• संयुक्त गट - ब पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर रोजी होणार
2 804
SIPRI REPORT
🎯Stockholm International Peace Research Institute नुकताच nuclear weapons चा रिपोर्ट पब्लिश केला
🎯भारताने आपल्या शस्रसाठ्यात 10 nuclear weapons ची वाढ केलेली आहे
🎯साद्या भारताकडे 150 nuclear weapoms आहेत
🎯 सगळ्यात जास्त nuclear weapoms हे रशिया कडे आहेत त्यानंतर अमेरिका कडे आहेत
🎯 रशिया आणि अमेरिकेने आपल्या nuclear weapons मध्ये घट केली आहे
2 804
◾️“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” यात भारत सहभागी.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✔️“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी (Global Partnership on Artificial Intelligence अर्थात GPAI किंवा Gee-Pay)” याची स्थापना करण्यासाठी भारत सरकार अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जापान, मेक्सिको, न्यूझीलंड, कोरिया, सिंगापूर यासारख्या आघाडीच्या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समूहामध्ये सहभागी झाला आहे.
✔️मानवी हक्क, सर्वसमावेशकता, विविधता, नवसंशोधन तसेच आर्थिक वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence -AI) तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्ण विकास आणि वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी “कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) हा अनेक हितधारकांचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे.
✔️“कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी” (GPAI) एका सचिवालयाद्वारे व्यवस्थापित केली जाणार आहे, ज्याचे यजमानपद पॅरिस या शहरातली आर्थिक सहकार व विकास संघटना (OECD) तसेच मॉन्ट्रियल (कॅनडा) आणि पॅरिस (फ्रान्स) या शहरांमध्ये असणारी तज्ञांची दोन केंद्रे हे भूषवतील.
🔴ठळक बाबी...
✔️सहभागी देशांचा अनुभव आणि विविधता यांचा उपयोग करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आसपासची आव्हाने आणि संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.
✔️हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्राधान्यक्रमांवर आधारित उपक्रमांना सहाय्य करून कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सिद्धांत आणि कृती यांच्यातले अंतर कमी करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असणार आहे.
✔️भागीदार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने GPAI कृत्रिम बुद्धिमतेच्या जबाबदार उत्क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, नागरी समाज, सरकारे आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणणार.
✔️GPAI कोविड-19 विषाणूच्या विद्यमान जागतिक संकटाला चांगला प्रतिसाद देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा लाभ घेता येऊ शकतो, हे दर्शविण्यासाठी कार्यपद्धती विकसित करणार.
✔️भारताने अलिकडेच राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संकेतस्थळ सुरू केले आहे; तसेच विकासाला पूरक मानवी दृष्टिकोनाचा समावेश आणि सबलीकरणासह शिक्षण, कृषी, आरोग्य सेवा, ई-कॉमर्स, वित्त पुरवठा, दूरसंचार इत्यादी विविध क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ उठवण्यास सुरवात केली आहे. संस्थापक सदस्य म्हणून GPAIमध्ये सामील झाल्यामुळे समावेशक वाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुभवाचा फायदा घेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक विकासात भारताला आता सक्रियपणे सहभागी होता येणार.
2 804
ऊर्जा अक्षयतेचा नियम (Law of Conservation of Energy) :
‘’ ऊर्जा नष्टही करता येत नाही किंवा निर्माणही करता येत नाही, तर ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येते. पृथ्वीवरील ऊर्जा नित्य स्थिर आहे. ‘’
सूर्य हा पृथ्वी वरील ऊर्जेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत आहे.
2 804
● ऊर्जा ही अदिश राशी आहे
- व्याख्या: पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय
- SI पद्धतीत उर्जेचे एकक जीवन ज्यूल आहे, तर CGS पद्धतीत अर्ग आहे विविध क्षेत्रातील ऊर्जेच्या वापरानुसार एकके बदलत जातात जसे की Kilowatt – Hour, Kilocalories इत्यादी
ऊर्जेचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहे
यांत्रिक ऊर्जा
रासायनिक ऊर्जा
Prakash ऊर्जा
उष्णता ऊर्जा
ध्वनि ऊर्जा
भू-औष्णिक ऊर्जा
जलविद्युत ऊर्जा इत्यादी
भौतिक शास्त्राच्या दृष्टीने ऊर्जेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऊर्जेचे विविध प्रकार असले तरी भौतिक दृष्टीने यांत्रिक ऊर्जेत प्रमुख दोन प्रकार पडतात.
2 804
🔸फ्लोरिन :
✅0.15 मिली ग्रॅम(लेश मूलद्रव्य)
✅पाणी, समुद्र्जन्य अन्नपदार्थ,मांस, मासे, चीज, चहा
✍कार्य:
✅फ्लोरिन हे अतिशय अस्थिर मूलद्रव्य असल्याने निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही
✅96% फ्लोराईड दात व हाडात आढळते
✅त्याचे क्षरीकरण होते
✅दातांचे एनमल दंतीन तयार होण्यासाठी फ्लोरिनची आवश्यकता असते
✅दातांना चमक व मजबूती प्राप्त होते
✍अभाव :
✅दंतक्षय-दातांचा ह्रास होतो
✅त्याची झीज होते
✍अतिसेवन :
✅दातांचा फ्लोरोसिस (dental flourosis)-याचा परिणाम लहान मुलाच्या दातावर होऊन चमक नाहीशी होते
✅एनमल वर खडूसारखे पांढरे डाग पडतात
✅डाग वरील जबड्यातील पटाशीच्या दातावर स्पष्टपणे दिसतात
✅हाडांचा कंकाली फ्लोरोसिस ( skeletal flourosis) :
✅प्रौढ व्यक्तीत आढळतो
✅हाडे कास्थिरजूवर परिणाम होतो
✅पाठ व संदयाच्या वेदना मानेच्या हालचालीवर मर्यादा येते
✍ माझी एमपीएससी
2 804
पुढीलपैकी कोणते नील-हरित शैवाल वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भात शेतीची सुपीकता वाढवते?
2 804
आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या_ _ _ _ _ _ नुसार करतात.
2 804
'अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते;पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर आकुंचन पावते.' ही क्रिया खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे होते?
2 804
विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हॅंडल ज्यापासून बनवितात ते बेकेलाइट पोलिमर कशापासून तयार करतात?
2 804
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन
🔸स्थापना – 11 फेब्रुवारी, 2010 (अकरावी पंचवार्षिक योजना)
🔸 उद्देश – भारताला सौरऊर्जेमध्ये एक अग्रणी देश बनवणे
🔸लक्ष्य –
- 13 व्या पंचवार्षिक योजनेअखेर 2022 पर्यंत 20,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करणे
- वर्ष 2022 पर्यंत ग्रामीण क्षेत्रांमध्ये 20 दशलक्ष सौर ऊर्जा उपलब्ध करणे
- वर्ष 2013 पर्यंत 1000 मेगावॅट क्षमतेची ग्रीड कनेक्टेड सौर ऊर्जा उत्पादन करणे
