uk
Feedback
FUTURE OFFICER ( PSI SANJAY VIGHNE 🚨)

FUTURE OFFICER ( PSI SANJAY VIGHNE 🚨)

Відкрити в Telegram

नमस्कार मी संजय विघ्ने ( पोलिस उपनिरीक्षक 2021 🚨🌟🌟) चॅनेलवर सर्व प्रकारच्या mpsc update... अभ्यासासाठी अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन येथे आपल्याला मिळेल ... 💯Id- @vighnesanjay123

Показати більше
3 315
Підписники
+124 години
-17 днів
-1430 день
Архів дописів
आशाताई' -दि लास्ट एम्परर - राज ठाकरे ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात. लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं. तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच, ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं. 'गाणं हे माझं पॅशन आहे' किंवा 'ऍक्टिंग माझं पॅशन आहे' असं म्हणत स्वतःला कलाकार आणि कालांतराने ज्येष्ठ कलाकार इत्यादी म्हणून घेणारे हल्ली ढिगाने आढळतात. असलं म्हणण्याची मुभा नियतीने आशाताईंना कधीच दिली नाही. वयाच्या १५व्या वर्षी स्वतःला आणि कुटुंबाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी काय जमतंय तर निसर्गदत्त आवाजाची देणगी. या इतक्या भांडवलावर त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. अजाणत्या वयात व्यक्तिगत आयुष्यात आशाताईंनी अफाट त्रास सहन केला. पण या त्रासाने किंवा दुःखाने त्यांच्या मनातला किंतुपरंतुवर मात केली आणि आयुष्यात जी धिटाई आली ती आवाजात आली. मी वर म्हणल्याप्रमाणे लतादीदींचा आवाज म्हणजे परफेक्शन आणि कमालीचा ठहराव. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळं वातावरण भारावलेलं असताना असा आवाज हा त्या काळाचा आवाज वाटावा असा आवाज आहे. अशावेळेस स्वतःचा आवाज तयार करायचा, त्यासाठी आपल्या एक्सप्रेशनला साजेसं गाणं मिळेपर्यंत वाट पहायची यासाठी आशाताईंनी काय पेशन्स ठेवले असतील हे त्याच जाणोत. 'पिया तू अब तो आजा' मध्ये प्रियकराला थेट बेधडक आवाहन आहे. 'आईये मेहरबान' मध्ये लडिवाळपणा आहे, 'दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए' मध्ये नजाकत आहे. 'दम मारो दम' मध्ये बंडखोरी आहे, सगळ्या चौकटी तोडून येण्याची तीव्र उर्मी आहे. याच आशाताई मराठी भावसंगीतात 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' म्हणत युगायुगांचं वैराग्याचे प्रतीक शंकर चराचरात आहेत आणि लक्ष ठेवून आहेत हे आर्तपणे सांगतात. व्यक्तिगत आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर त्यांनी वादळं पहिली. तरीही आशाताई खचल्या नाहीत, दुःख हत्यार बनवलं नाही, कडवटपणा येऊ दिला नाही. दुःख हाताळायची त्यांनी कलाच जणू आत्मसात केली होती. म्हणूनच दीदी कायम दैवी वाटत राहिल्या तर आशाताई खूप मानवी वाटत राहिल्या. जसा दीदींचा सहवास मिळाला तसाच आशाताईंचा मिळाला. मी भाग्यवान आहे की ज्यांनी या देशाच्या अनेक दशकांच्या भावविश्वाला आकार दिला त्या दोन्ही बहिणींचा मला ओतप्रोत सहवास मिळाला. माझ्यासाठी आशाताईंकडे फक्त ज्येष्ठ गायिका म्हणून बघणं हे पुरेसं नाही तर तो गाण्यातून घडलेला अलौकिक प्रवास होता. तो चिरकाल तुमच्या माझ्यासोबत राहील, नवनवीन पदर उघडत राहील. मी मागे माझ्या भाषणांत म्हणालो होतो की लता दीदी असतील, आशाताई असतील किंवा त्यांच्यासारखे इतर कलाकार असतील, ते जर नसते आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात गुंतवून ठेवलं नसतं तर या देशांत कधीच अराजक आलं असतं ! उत्तुंग काय असतं आणि ते कुठे बघायचं याचा मापदंड या लोकांनी आपल्याला घालून दिला ! जसं लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटले तरी युरोपातील रेनेसाँस युगाला त्या दोघांनी वेगेवेगळ्या पद्धतीने आकार दिला. तसा आकार लतादीदी आणि आशाताईंनी भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाला दिला. काही वर्षांपूर्वी दीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या. भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक आज आपल्यातून गेला ! आशाताईंना विनम्र श्रद्धांजली. राज ठाकरे

Repost from MPSC Mantra

पुणे इंग्लिश क्लब ची VOCAB MASTER BATCH जागतिक महिला दिनानिमित्त आज मोफत ऍडमिशन्स. 📌 Idioms 📌 One Word Substitutions 📌 Syn
पुणे इंग्लिश क्लब ची VOCAB MASTER BATCH जागतिक महिला दिनानिमित्त आज मोफत ऍडमिशन्स. 📌 Idioms 📌 One Word Substitutions 📌 Synonyms 📌 Antonyms 📌 Homophones 📌 Phrasal Verbs 📌 Prepositions 📌 Proverbs वरील घटकांचे MPSC PYQ आणि Pal and Suri व S. P. Bakshi मधील सर्व One Word Substitutions व Idioms ची व्यवस्थित revision करायची असल्यास आपल्या App वरील VOCAB MASTER BATCH जॉईन करू शकता. आज batch ला एकही रुपया न भरता ऍडमिशन्स सुरु आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत. Batch ला admission घ्या. मित्र -मैत्रिणींना कळवा. पण अभ्यास seriously करा. सर्व lectures करा. 🙏🏻 - शरद खेडकर पुणे इंग्लिश क्लब 7796060795 📌 टेलिग्राम 👇🏻 https://t.me/puneenglishclub 📌 youtube 👇🏻 https://youtube.com/@puneenglishclub?si=jHQBn8hLfxNdo8LV App link 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.sharads.english.club.pune

उद्या कोणीही VOCAB MASTER BATCH ला admission घेऊ नका. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त फक्त याच दिवशी या batch ला सर्वांना फक्त 1 रुपयात ऍडमिशन दिले जाईल. Batch validity 31 मे 2026 पर्यंत. ऍडमिशन्स फक्त 8 मार्च रोजीचं होतील. धन्यवाद! - शरद खेडकर App link👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.sharads.english.club.pune

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#

जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - राज्यसेवा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

नीती आयोग पहिल्या महिला CEO - निधी छिब्बर.

पद्म पुरस्कार 2026🇮🇳 पद्म पुरस्कार १३१ ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण,११३ पद्मश्री..

🇮🇳पद्म पुरस्कार 2026🇮🇳

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रश्नपत्रिका आयोगाच्या साइटवर अपलोड करण्यात आली आहे 👍

GR b pre 2025 question paper .pdf1.30 MB

आयोगाने साइटवरअपलोड केली आहे

Combine Gr B प्रश्नपत्रिका

सर्व विद्यार्थ्यांना उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा! 💐💐 आत्मविश्वास ठेवा ✍️ तुमच्या मेहनतीला यश मिळो ❣️ All The Best 🏆

Company No 3 मध्ये फर्स्ट लाईन मध्ये डावीकडून 1 क्रमांकावर आहे मी...सगळे सारखेच दिसतात उद्या शोधायला अडचण नको म्हणून सोय😅

उद्या होत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 126 यांची पासिंग परेड युट्युब आणि फेसबुक वर सकाळी साडेसात वाजल्यापासून LIVE सुरू होईल आपण अवश्य पहावी. धन्यवाद.