uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
736
Підписники
Немає даних24 години
-17 днів
-230 днів
Архів дописів
IMP Wadhvan Port

सर्वात खटकणारा विरोधी व्यक्तिमत्व कोण?

देवा भाऊंचा आवडता हिंदुत्ववादी नेता कोण?

आवडते सोशल मीडिया नेटवर्क कोणते?

डीजे मुक्त गणेशोत्सव की डीजे युक्त गणेशोत्सव बघा मी कालच सांगितलेल आहे की पुण्यामध्येच क्षमता आहे संपूर्ण महाराष्ट्राला पारंपारिक पद्धतीने आपला गणेशोत्सव साजरा करायची प्रेरणा देण्याची मला विश्वास आहे पुणेकर करतील कदाचित एका वर्षात पूर्ण होणार नाही दोन वर्षात करतील

त्यामुळे मला विश्वास आहे आणि आपण बघितलं असेल तर आता फर्स्ट क्वार्टरमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेत देशाची अर्थव्यवस्था ही जगामध्ये तीन आणि चार ट्याने जेव्हा अर्थव्यवस्था विकसित होतायत त्या देशाची अर्थव्यवस्था ही 7.8%ने विकसित झाली आहे आणि महाराष्ट्राची 8.8%ने विकसित झाली आहे त्यामुळे हा विकासाचा दर हा वेगाने चाललेला आहे शहरीकरणाच्या संदर्भात कारण आपल्याला माहिती आहे की विकासामध्ये जगाच्या पाठीवर जर आपण विकास बघितला तर त्या विकासामध्ये शहरीकरण हे इनहेव्हिटेबल आहे.

आज जीसी मध्ये एक मोठी इकोसिस्टीम आपण तयार करतो आहोत सगळ्यात जास्त मागच्या वर्षी जीसी आपल्याकडे आलेले आहेत त्यामुळे सेवा क्षेत्रामध्ये नवनवीन संधी तयार करायच्या हा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत उद्योग क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहेत एक प्रकारे देशाचं मॅन्युफॅक्चरिंगच ग्रोथ इंजिन हे आपण झालेलो आहोत . जवळपास आपल्याला माहिती आहे की देशाचा 39% देशात येणारा एफडीआय 39% हा महाराष्ट्रात येतोय देशामध्ये येणारी सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात येते सर्वात जास्त डेटा सेंटर महाराष्ट्रामध्ये तयार होत आहेत

वेगवेगळे जी क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेची ज्यामध्ये शेतीचे क्षेत्र आहे शेतीमध्ये आपण महाविस्तार ॲप च्या माध्यमातून एआय आणलेला आहे देशातला सर्वात चांगला प आहे ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये शेतीमध्ये प्रेडिक्टिबिलिटी आणण्याकरता आणि एक प्रकारे आपल्या प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता जे काही आपल्याला उपाय करायचे आहेत ते या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून होणार आहे

दीड वर्षामध्ये पहिल्यांदा मी प्रशासकीय सुधारणा केलेल्या आहेत आणि या प्रशासकीय सुधारणांमध्ये एक प्रकारे आपल जे प्रशासन आहे हे आपल्याला कसं उत्तम करता येईल या दृष्टीने अनेक सुधारणा आपण केलेले आहेत आपल्याला माहिती आहे की एवढं मोठं पंधरा 20 लाख कर्मचाऱ्यांचे आपली शासकीय व्यवस्था आहे या शासकीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात कमजोर आमच एचआर डिपार्टमेंट होतं ते एचआर डिपार्टमेंट आपण सुधरवून देशामध्ये पहिल्यांदा एचआर स्टॅक आपण तयार केलाय

कोल्हापूरचं वातावरण कोल्हापूरमध्ये असलेले रिसोर्सेस, कोल्हापूर मध्ये असलेलं पाणी या सगळ्यांच्या भरोशावर कोल्हापूर हे ग्रोथ इंजिन कालही होतं आजही आणि उद्या अधिक चांगलं आपण करू शकतो

मागेही तो निर्माण झाला होता आताही त्या ठिकाणी प्रश्न आहे आता हिंजवडीच्या संदर्भातही लवकरच निर्णय करून हिंजवडीचा सगळा भाग हा आम्ही पिंपरी चिंचवड म्युसिपल कार्पोरेशनमध्ये ट्रान्सफर करतो आहोत जेणेकरून रेगुलर तिथे जे काही काम आहे ते देखील आपल्याला करता येईल आणि तिथला परिसरही चांगला होईल

आम्ही नाशिकचा रिंग रोड या निमित्ताने केला हा एक रिंग रोड नाशिकच्या GDP मध्ये १ ते २% टाक्याचा परिवर्तन करेल

विशेषतः आपल्याला याची कल्पना आहे की एक आपल्या देशामध्ये जे एनडीए च सरकार आहे त्यातल्या एक प्रमुख घटक पक्ष म्हणून ते त्या ठिकाणी आहेत आणि घटक पक्षांच्या संदर्भात सातत्याने वेगवेगळ्या बैठका होत असतात घटक पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलावलं जातं अनेक वेळा मला बोलवण असत कारण ती घटक पक्षाच्या प्रमुखांची बैठक असते त्यामुळे त्यांना बोलवणं असतं ते त्या ठिकाणी जातात आणि आपल्याच नेत्यांना भेटतात याचा मला मनापासून आनंद आहे अजून दोन वेळा जास्ती गेले तरी मला आनंदच आहे

मंत्री हा स्वतंत्र नसतो मंत्री हा Appointent बाय चिफ मिनिस्टर असतो आणि चिफ मिनिस्टर देईल तेवढा कारभार हा मंत्र्याला करायचा असतो.

तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे सांगतो माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवू इच्छितात त्यामुळे 2029 पर्यंत मी महाराष्ट्र
तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे सांगतो माझे नेते मला महाराष्ट्रात ठेवू इच्छितात त्यामुळे 2029 पर्यंत मी महाराष्ट्रात आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मला असं वाटतं की आता जे काही लग्न सुप्रिया ताईकडे मुलीचं झालं, तर त्या ठिकाणी मी पण इथे गेलो होतो दिल्लीला. मोदी साहेब देखील त्या ठिकाणी गेले होते, सगळ्याच पक्षाचे लोक होते फक्त आम्हीच होतो असं नाही आहे. ही तर आपली संस्कृती आणि पवार साहेबांशी इतक्या वर्षाचा आमचा जरी राजकीय काही विरोध राहिला किंवा नीतिगत काही गोष्टींवर आमचे मतभेद राहिले तरी देखील मला असं वाटतं की संबंध तर नेहमी चांगलेच राहिले ना. म्हणजे त्यांना कधी आमच्याकडे यायला वाईट वाटलं नाही आम्हालाही त्यांच्याकडे जायला वाईट वाटलं नाही आणि महाराष्ट्राची संस्कृतीच आहे.

या देशाचा इतिहास असा आहे जे पीएम इन वेटिंग आहेत ते जन्मभर वेटिंग मध्येच राहिलेत त्यांचं वेटिंग कधीच कन्फर्म झालेलं नाही आणि भ
या देशाचा इतिहास असा आहे जे पीएम इन वेटिंग आहेत ते जन्मभर वेटिंग मध्येच राहिलेत त्यांचं वेटिंग कधीच कन्फर्म झालेलं नाही आणि भारतामध्ये व्हॅकन्सी देखील नाही. मोदीजीच 2029 ला पुन्हा पीएम होणार आहेत मोदीजी 2034 ला पुन्हा पीएम होणार There is No vacancy . मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माझं मत एवढंच आहे ते एकत्रित येणार की नाही तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. आता जे घडलेलंच नाही त्याच्यावर इथे चर्चा करून फायदा काय आहे? काही मला असं वाटतं जेव्हा घडेल, त्यावेळेस आपण त्याचा विचार करू. हा ही माझं जे काही मत होतं, ते आजही आहे की समजा माझे जे दोन्ही पार्टनर आहेत आमचे, या दोन्ही पार्टनर्स मध्ये कोणी जर त्या ठिकाणी येत असेल तिसरा पार्टनर, ते कोणाला आणत असतील आमच्याशी चर्चा केली पाहिजे. एवढीच आमची अपेक्षा आहे.

अजित दादांचे गेल्या काही वर्षातले संबंध हे अतिशय जिव्हाळ्याचे आणि वैयक्तिक होते त्यामुळे मला तर ती माझी जबाबदारीच वाटते त्यामुळे निश्चितपणे मी ती करेन पण याचा अर्थ तो पक्ष मी चालवतो किंवा भाजप चालवते असं म्हणणे योग्य होणार नाही त्यांचे निर्णय तेच घेतात त्यांचे निर्णय कोणी दुसरे घेत नाही

राहुल गांधींच्या हातात जे संविधान आहे ते लाल रंगाच आहे कारण समोर मुखपृष्ठ संविधानाच आहे आणि आतमध्ये माओवाद्याच लाल पुस्तक आहे