Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 108
Підписники
-124 години
Немає даних7 днів
-2330 днів
Архів дописів
4 108
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्धमान नगर, नागपूर येथील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त मान्यवर
🏆डॉ. निलेश अग्रवाल
🏆डॉ. निधीश मिश्रा
🏆डॉ. महेश सारडा
🏆डॉ. अलंकार रामटेके
🏆डॉ. आनंद भुतडा
🏆डॉ. राहुल सक्सेना
🏆राजेश पी. व्ही.
🏆डॉ. सुनील कुट्टी
यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार कृष्णा खोपडे, न्यू एरा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व सह-संस्थापक डाॅ. आनंद संचेती, माजी खासदार अजय संचेती, लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Hospital
4 108
CMO Maharashtra Tweets:
सर्वसामान्यांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा देण्यावर भर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्धमान नगर, नागपूर येथे ‘न्यू एरा हॉस्पिटल’चे उदघाटन करण्यात आले.
सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर हे मेडिकल हब म्हणून ओळखले जात असून, देशात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा विकसित होत असल्याने मेडिकल टुरिझमला चालना मिळत आहे. भारतातील आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी विविध देशांतील नागरिकही प्राधान्य देत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यात अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळणेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत 2400 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. न्यू एरा हॉस्पिटलच्या माध्यमातून नागपूर आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार कृष्णा खोपडे, न्यू एरा हॉस्पिटलचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद संचेती, माजी खासदार अजय संचेती, लोकमत मीडिया समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Hospital
4 108
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूरच्या वर्धमान नगर येथील ‘न्यू एरा हॉस्पिटल’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांची पाहणी केली.
#Maharashtra #DevendraFadnavis #Hospital
4 108
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्र सरकार ने 'शॉर्ट सर्विस कमीशन' पूरा कर चुके 'अग्निवीरों' की नौसेना की पहली बैच को तटीय सुरक्षा बल में भर्ती किया है।
( नागपुर | 23-10-2026)
#Maharashtra #Nagpur #Agniveer
4 108
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
निवृत्त होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व अग्निवीरांना पोलीस दलात सामावून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
सेवानिवृत्त होने वाले महाराष्ट्र के सभी अग्निवीरों को पुलिस बल में शामिल करने का राज्य सरकार का निर्णय।
( नागपूर | 23-10-2026)
#Maharashtra #Nagpur
