Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 209
Підписники
-424 години
-117 днів
-9230 день
Архів дописів
4 209
CMO Maharashtra Tweets:
NepalFloodsAlerts
CM Devendra Fadnavis’ prompt intervention!
Journey resumes for 106 Nagpur passengers stranded in Nepal
All 106 passengers from Nagpur have safely departed from Kathmandu for Danapur, Bihar.
Following a phone call from CM Devendra Fadnavis, Nepal MP Sandeep Rana arranged four local mini-buses to facilitate their journey from Kathmandu to Janakpur.
The passengers are expected to reach the Janakpur–Bihar border tomorrow morning. Buses have been arranged for their journey to Danapur, Bihar, from where their return journey by train has also been arranged.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
4 209
CMO Maharashtra Tweets:
CM Devendra Fadnavis assures support to Maharashtra's citizens stranded in Nepal
CM Devendra Fadnavis interacted with tourists from Maharashtra stranded due to the flood situation in Nepal through a video call. After inquiring about their well-being, he reassured them, saying, "Do not worry, the Government stands with you."
He directed the administration to take all necessary steps to ensure their safe return to Maharashtra and also took up the matter with the Ministry of External Affairs, urging that their safe evacuation and return be given priority.
The Chief Minister also spoke with Nepal MP Sandeep Rana. Reiterating that the safety of Maharashtra's citizens is the Government's highest priority, he assured the stranded tourists that every possible effort is being made to bring them home safely.
#Maharashtra #Mumbai #NepalFloods
4 209
CMO Maharashtra Tweets:
NepalFloodsAlerts
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू
नागपूरचे सर्व 106 प्रवासी काठमांडूवरून दानापूर (बिहार) करिता सुखरुप निघाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर काठमांडूवरून जनकपूरपर्यंत नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी त्यांना स्थानिक 4 मिनी बस करून दिल्या.
हे सर्व लोक जनकपूर (बिहार) बॉर्डरला उद्या सकाळी पोहोचतील.
दानापूरपर्यंत (बिहार) त्यांच्यासाठी बसेस केल्या आहेत. तेथून रेल्वेने त्यांची परतण्याची व्यवस्था झालेली आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
एमपीएससीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
एमपीएससी की परीक्षा में होने वाली अनियमितताओं को रोकने के लिए समिति गठित की गई है।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भोर तालुक्यातील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन संदर्भात योग्य मार्ग काढला जाईल.
भोर तालुका के प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन के संदर्भ में उचित मार्ग निकाला जाएगा।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai
4 209
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नेपाळ दुर्घटनेबाबत केंद्र सरकारशी बोलणे झाले असून, सरकार अलर्ट मोडवर आहे.
नेपाल दुर्घटना के संदर्भ में केंद्र सरकार से बातचीत हुई है, एवं सरकार अलर्ट मोड पर है।
( मुंबई | 27-8-2026)
#Maharashtra #Mumbai
4 209
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting with a delegation regarding the proposed GIS substation at Bhongavali in Bhor taluka.
Senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भोर तालुक्यातील भोंगवली येथील प्रस्तावित जीआयएस सबस्टेशनसंदर्भात शिष्टमंडळासोबत बैठक.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में भोर तालुका के भोंगवली में प्रस्तावित जीआयएस सबस्टेशन के संदर्भ में प्रतिनिधिमंडल के साथ बैठक।
इस अवसर पर वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕓4pm | 27-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ४ वा. | २७-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 209
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Ensuring Sarvajanik Ganeshotsav with Harmony, Health and Safety!
Chaired a meeting regarding law and order preparedness for the 'Sarvajanik Ganeshotsav 2026' at Sahyadri Guest House in Mumbai today.
Lokmanya Tilak envisioned Ganeshotsav as a medium for social integration and public awakening, and we must continue to uphold these ideals. Now that Ganeshotsav has been accorded the status of a 'State Festival', preserving its sanctity, traditions and discipline is a collective responsibility.
Directed the administration, Ganeshotsav mandals and coordination committees to work in close coordination, resolve difficulties promptly and ensure disciplined and exemplary celebrations. Instructed the administration to identify emerging challenges, expedite permissions and ensure that routine applications do not remain pending.
Emphasised compliance with FDA regulations for prasad distribution to ensure devotees receive pure and safe prasad. Directed that idol procession and immersion routes be kept pothole-free and well-lit.
The Maharashtra Government has informed the High Court of the measures taken to prevent pollution from PoP idol immersion. Instructed the police to enforce regulations on firecrackers, loudspeakers and other violations strictly. Mandals must re-verify safety arrangements, especially for large idols, with the necessary support from the Maharashtra Government.
DCM Eknath Shinde ji, Minister Mangal Prabhat Lodha ji, MoS Yogesh Kadam and senior officials were present.
#Maharashtra #Mumbai #Ganeshotsav2026
https://x.com/Dev_Fadnavis/status/2092976374919352522?s=20
4 209
CMO Maharashtra Tweets:
गणेशोत्सवाची पवित्रता जपत शुद्ध प्रसाद आणि शिस्तबद्ध उत्सवावर भर.. फटाके, लाऊडस्पीकरच्या नियमभंगावर कठोर कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'सार्वजनिक गणेशोत्सव 2026' निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बैठक पार पडली.
महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होणे गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार राज्यभर पुढे नेणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्सवाची परंपरा जपताना शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकासह प्रशासन, मंडळे आणि विविध संघटनांवर आहे.
महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम पद्धतीने साजरा होण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. आयोजनातील त्रुटी दूर करून मंडळांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक वर्षांत संरचित व्यवस्था निर्माण झाली आहे. मात्र, दरवर्षी निर्माण होणाऱ्या नव्या अडचणी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत. जुन्या मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
विविध महानगरपालिका क्षेत्रांतील गणेशमूर्तींच्या आगमनाचे आणि विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवावेत. या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत आणि रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध असेल, याची विशेष काळजी घ्यावी. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 143 नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांसाठी मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. त्यासाठी संबंधित मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. गणेशमूर्तींच्या मिरवणुकीदरम्यान सर्व मंडळांनी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पुन्हा पडताळणी करावी. विशेषतः मोठ्या मूर्ती असलेल्या मंडळांना आवश्यक सूचना देऊन सर्व व्यवस्था सुरक्षित असल्याची खात्री करावी, यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाने मागील वर्षीचा निर्णय कायम ठेवल्यामुळे मंडळांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पीओपीच्या मूर्ती समुद्रात किंवा नदीपात्रात विसर्जित होऊन प्रदूषण होणार नाही, यासाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती सरकारने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Ganeshotsav2026
4 209
CMO Maharashtra Tweets:
नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी मुख्यमंत्री यांचा संवाद
नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांची परिस्थिती जाणून घेत, “घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे,” असा धीर दिला.
पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले तसेच परराष्ट्र मंत्रालयाशीही संवाद साधून त्यांच्या सुरक्षित परतीला प्राधान्य देण्याबाबत पाठपुरावा केला.
नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशीही मुख्यमंत्री यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी पर्यटकांना सांगितले.
#Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods
