LetsUpp Marathi
Відкрити в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Показати більше6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
6 624
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● चेंबूर बालसुधारगृहातील 18 मुलांना कोरोना, मुले बाधित होण्याची मुंबईतील दुसरी मोठी घटना
● केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदेचं आयोजन करणार
● केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज पहिली पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला
● अजूनही तपास सुरू आहे! माजी गृहमंत्री अनिल देशमुख 'क्लीन चिट'प्रकरणी सीबीआयचा खुलासा
● अयोध्येतील राम मंदिर होणार इकोफ्रेंडली, एकाच वेळेस 5 लाख भाविक दर्शन घेऊ शकणार
● राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली. मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी 'ईडी' कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार
● शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे - आरोग्यमंत्री राजेश टोपे
● अफगाणिस्तान धोरणाचा नव्याने विचार करण्याची गरज आहे, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
● राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा
● निशादला रौप्य, विनोदला कास्य, क्रीडादिनी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/2d6xINsd8ib
6 624
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार काळाच्या पडद्याआड
LetsUpp | Trending
😢 ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे.
🏥 शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.
😔 मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे नाट्य क्षेत्रासह सगळीकडेच शोककळा पसरली आहे.
🏵️ पवार यांना 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
✍️ जयंत पवार यांचे नाट्यलेखन
● अंधातर
● काय डेंजर वारा सुटलाय
● टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
● दरवेशी
● पाऊलखुणा
● फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
● बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक
● माझे घर
● वंश
● शेवटच्या बिभत्साचे गाणे
● होड्या
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/GBT9hpjE6ib
6 624
रचला इतिहास; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक
LetsUpp | Trending
🥈टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे.
⚡ भारताच्या भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.
⭐ अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाचा ३-० असा पराभव केला.
💫 टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/Oz9W6m6F6ib
