ru
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Открыть в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Больше
6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp | Bulletin ● चेंबूर बालसुधारगृहातील 18 मुलांना कोरोना, मुले बाधित होण्याची मुंबईतील दुसरी मोठी घटना ● केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान काँग्रेस देशभरात पत्रकार परिषदेचं आयोजन करणार ● केंद्रीय मंत्री नारायण राणेंची आज पहिली पोलिसांसमोर हजेरी, अलिबागमध्ये बंदोबस्त वाढवला ● अजूनही तपास सुरू आहे! माजी गृहमंत्री अनिल देशमुख 'क्लीन चिट'प्रकरणी सीबीआयचा खुलासा ● अयोध्येतील राम मंदिर होणार इकोफ्रेंडली, एकाच वेळेस 5 लाख भाविक दर्शन घेऊ शकणार ● राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली. मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी 'ईडी' कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार ● शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबपर्यंत पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे - आरोग्यमंत्री राजेश टोपे ● अफगाणिस्तान धोरणाचा नव्याने विचार करण्याची गरज आहे, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन ● राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा ● निशादला रौप्य, विनोदला कास्य, क्रीडादिनी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदकांची लयलूट अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/2d6xINsd8ib

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार काळाच्या पडद्याआड LetsUpp | Trending 😢 ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि लेखक जयंत पवार यांचे निधन झाले आहे. 🏥 शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. 😔 मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे नाट्य क्षेत्रासह सगळीकडेच शोककळा पसरली आहे. 🏵️ पवार यांना 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहासाठी 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ✍️ जयंत पवार यांचे नाट्यलेखन ● अंधातर ● काय डेंजर वारा सुटलाय ● टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन ● दरवेशी ● पाऊलखुणा ● फिनिक्सच्या राखेतून उठला मोर ● बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक ● माझे घर ● वंश ● शेवटच्या बिभत्साचे गाणे ● होड्या अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/GBT9hpjE6ib

रचला इतिहास; टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक LetsUpp | Trending 🥈टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. ⚡ भारताच्या भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. ⭐ अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाचा ३-० असा पराभव केला. 💫 टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/Oz9W6m6F6ib