uk
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 день
Архів дописів
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp l Bulletin ● स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही,अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इ.11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी 30 दिवसांची मुदत, वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करता येणार; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ● बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने गाठल्याचा प्राथमिक अंदाज, चित्रपट सृष्टीवर शोककळा ● बीड जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा काम न करताच वेतन उचलण्याचा प्रताप; तब्बल 9 ग्रामसेवकांनी उचलला 51 लाख रुपयांचा पगार! ● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात येत ● अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस; वैद्यकीय क्षेत्रातील हलगर्जीपणामुळे आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित आजाराची लागण ● गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या अटीवर सार्वजनिक, खासगी भागीदारी गुंतवणुकीच्या साहाय्याने नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी ● जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला आणि मुलीला बेदम मारहाण; चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या मिंडाळा गावात हा प्रकार घडला ● शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नागपूरहून भाग्यश्री बानाईत-धिवरे यांची नियुक्ती; शिर्डीचे सीईओ कान्हूराज बगाटे यांच्या जागी त्यांची नियुक्ती ● भाजप पाठोपाठ मंदिर मुद्द्यावर MNS आक्रमक, राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी मनसेचं नाशिक आणि पुण्यात घंटानाद आंदोलन ● धक्कादायक! राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 45 चिमुकल्यांसह 100 लोक आजारी; काहींची प्रकृती गंभीर अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/zmy86haDdjb

टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या! LetsUpp l Bulletin ● शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला; आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्यात येणार ● राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय; शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन जीआर जारी केला ● TET 2021 साठी नोंदणीची तारीख वाढवली, अर्ज करण्याची तारीख 5 सप्टेंबर करण्यात आली; अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करु शकता ● घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत आजपासून 25 रुपयांची वाढ; गेल्या 15 दिवसात विनाअनुदानित LPG सिलेंडर 50 रुपयांनी महागला ● शासकीय रुग्णालयांच्या डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकार दोन हजार खासगी सुरक्षा रक्षक तैनात करणार ● ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविषयी खोटी बातमी दिल्याच्या आरोपावरून औरंगाबाद येथील एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक व प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ● निलेश राणेंच्या करेक्ट कार्यक्रमाच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ, ६ जवान तैनात, घराजवळही कडेकोट बंदोबस्त ● राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला ● स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेला सुरुवात; 5 सप्टेंबरला शेतकऱ्यांसोबत जलसमाधी घेणार ● भारताच्या अध्यक्षेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने तालिबानला अफगाणिस्तानमधील सरकार सांभाळण्यासाठी सशर्त मंजुरी दिली अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/xNjaFtuWbjb