uk
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Відкрити в Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Показати більше
6 624
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवावे की नाही? वैज्ञानिकांचा खुलासा ! LetsUpp | Covid Helpline ● गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केलं. ● हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं देखील सांगितलं गेलं. पण आता त्याच वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ● लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे. ● देशात लसींचा तुटवडा असल्याचं समोर येत असतानाच केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. ● यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून हा निर्णय घेतल्याचं देखील जाहीर करण्यात आलं. ● या गटाने अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिलं नव्हतं, असा धक्कादायक खुलासा यापैकी काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/rSYy5qfT7gb

आता लसीकरणासाठी कोविनवर ऑनलाईन नोंदणीची सक्ती नाही LetsUpp l Trending ● लसीकरणासाठी ‘कोविन’वर ऑनलाईन नोंदणीची सक्ती रद्द करण्
आता लसीकरणासाठी कोविनवर ऑनलाईन नोंदणीची सक्ती नाही LetsUpp l Trending ● लसीकरणासाठी ‘कोविन’वर ऑनलाईन नोंदणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय नुकताच केंद्राने घेतला आहे. ● दरम्यान त्यामुळे १८ वर्षांवरील कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन थेट नोंदणीनंतर लस घेता येणार आहे. ● देशात लसीकरण संथगतीने सुरू असून, ऑनलाईन नोंदणीच्या सक्तीमुळे ग्रामीण भागांमधील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ● २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटासाठीही केंद्रच लसपुरवठा करणार असल्याने लसीकरण मोहीम व्यापक होण्याची आशा आहे. ● या पार्श्वभूमीवर केंद्राने ‘कोविन’वर ऑनलाईन पूर्वनोंदणीची सक्ती न करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने सांगितले आहे. To know more click here https://letsup.app.link/CmtjnA447gb

photo content

‘एमएचटी-सीईटी’ परीक्षांबाबत महत्वाची बातमी LetsUpp l Trending ● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ जुलैपासून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणारी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा परिमंडळ स्तरावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. ● याबाबतची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ● राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, स्थापत्य अभियांत्रिकी आणि हॉटेल व्यवस्थापन या अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्यावतीने प्रवेश परीक्षा घेतली जाते. ● या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून साडेतीन लाखांवर विद्यार्थी नोंदणी करतात. त्यासाठी ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महाविद्यालयात परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात येते. ● मात्र, यंदा कोरोनामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. त्यातच तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. ● त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांना अधिकाधिक परीक्षा केंद्रांवर विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ● यासाठी तालुका स्तरापेक्षा परिमंडळ स्तरावर परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा त्रास वाचणार आहे. To know more click here https://letsup.app.link/gk4LskoZ7gb

photo content

गृहिणींच्या बजेटला किंचित दिलासा! खाद्यतेलांच्या दरामध्ये घट LetsUpp l Trending ● कोरोना काळात खाद्यतेलांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत आवक वाढल्याने खाद्यतेलांच्या दरात घट झाली आहे. ● कोरोनाचा काळात जागतिक बाजारपेठेतून होणारी खाद्यतेलांची आवक कमी होत गेल्याने देशासह जगभरातील बाजारपेठांमध्ये खाद्यतेलांचा तुटवडा जाणवत होता. ● त्यामुळे खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत गेली. सध्या खाद्यतेलांची आवक वाढल्याने दरामध्ये घट झाली आहे. मात्र, पुढील काळात खाद्यतेलांचे दर यापुढील काळात टिकून राहणार असल्याचे तेलाचे व्यापारी आंग्ल आहेत. किती घट? : - किरकोळ बाजारात एक किलो तेल पिशवी : १० ते १५ रुपये - घाऊक बाजारात १५ किलो तेलडबा : २०० ते २५० रुपये आयात : ● जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असून भारतात दरवर्षांला दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. ● आपल्या देशाची गरज २२५ लाख टन असून देशात ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होते. - राज्यात शेंगदाणा तेलाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर केले जाते. - इंडोनेशिया, मलेशिया, रशिया, स्वित्र्झलड या देशांतून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आयात केली जाते. To know more click here https://letsup.app.link/C1VKxflR7gb

दिलासादायक ! राज्यातील रुग्णवाढ १० हजारांच्या खाली LetsUpp | Trending ● राज्यात आज ८,१२९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आले. तर आज २०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ● राज्यात आज १४,७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५६,५४,००३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ● राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५५ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के एवढा आहे. ● सध्या राज्यात ९,४९,२५१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर राज्यात एकूण १,४७,३५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. To know more click here https://letsup.app.link/DbPs2Ixp5gb

राज्यातील 'हे' 20 जिल्हे निर्बंधमुक्त LetsUpp | Trending कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यात अनेक अनलॉक प्रक्रिया राबवली जात आहे. यातच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती काहीशी आटोक्यात आली आहे, असे तब्ब्ल 20 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच ठाणे शहर तिसऱ्या लेव्हलमध्ये असून निर्बंधांतील शिथिलता कायम आहे. तर आजपासून पुणे शहरातील निर्बंध शिथिल केले आहे. राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल : अहमदनगर, नागपूर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या आणि संसर्गदर जास्त, चौथ्या स्तरात समावेश. मुंबईतील रेल्वेसेवा कोणासाठी? जाणून घ्या : मुंबई शहर तिसऱ्या लेव्हलमध्ये असल्याने सर्वसामान्यांना या आठवडय़ात रेल्वे सेवेचा वापर करता येणार नाही. ही सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. To know more click here https://letsup.app.link/TRd5D0DL4gb

ग्रेट भेट : मराठा आरक्षणप्रश्नी दोन्ही 'राजे' सोबत LetsUpp | Trending ● खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. ● पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. पत्रकार परिषदेनंतर दोन्ही राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ● उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या कोल्हापुरातील मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला. ● त्यांनी 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उदयनराजे झाले आक्रमक... ● मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे. ● मात्र राज्यकर्त्यांना आरक्षण द्यायची इच्छाच नसून यांना फक्त राजकारण करायचे आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. ● त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. ● आरक्षणप्रश्नी समाज बोलला आहे, लोक बोललेत आणि लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. To know more click here https://letsup.app.link/0BGJfwxW4gb

बारावीची परीक्षा रद्द, बोर्डाची अधिकृत घोषणा LetsUpp | Trending ● बारावीची परीक्षा रद्दची बोर्डाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबत सविस्तर परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. ● कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून परीक्षा रद्द करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून बारावी परीक्षा रद्दचा शासन निर्णय जारी ● सुधारित मूल्यमापनाचं धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ● कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची सरकारची भूमिका आहे. ● 12 वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. ● सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्यानं परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होतं असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. To know more click here https://letsup.app.link/Clcsqmfe5gb

पुणेकरांना दिलासा ! आजपासून निर्बंध उठविले जाणार LetsUpp | Trending कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्यात पाच टप्यात अनलॉ
पुणेकरांना दिलासा ! आजपासून निर्बंध उठविले जाणार LetsUpp | Trending कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्यात पाच टप्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येत असून नुकतेच आजपासून पुण्यात अनलॉक प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुण्यातील निर्बंध उठविले जाणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गोष्टी सुरु राहणार ● दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 7 वा.पर्यंत सुरु राहतील ● बसमध्ये 100 टक्‍के आसन क्षमतेने प्रवास ● मॉल, अभ्यासिका, ग्रंथालये 50 टक्के क्षमतेने सुरू ● हॉटेल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू तर रात्री 11 पर्यंत पार्सल सुविधा उपलब्ध ● सार्वजनिक मैदाने : पहाटे 5 ते सकाळी 9 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 वा.पर्यंत खुली राहणार ● लग्नकार्यास 50 लोकांना मान्यता तर अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्‍तींना परवानगी ● सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम 50 लोकांना परवानगी ● जिम, सलून, स्पा 50 टक्‍के क्षमतेने सुरू करता येणार ● जमावबंदी काय असून रात्री 10 नंतर संचारबंदी ● मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार To know more click here https://letsup.app.link/muc8Odhn4gb

दिलासा! देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी घट LetsUpp l National ● देशामध्ये गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. ● केंद्रीय आरोग्यमंत्रालच्या माहितीनुसार, दिवसभरामध्ये देशात कोरोनाच्या ८० हजार ८३४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ● दरम्यान देशात २४ तासांमध्ये ३ हजार ३०३ जणांचा मृत्यू झाला आहे. ● दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या १ लाख ३२ हजार ६२ रुग्णांना घरी सोडले. एकूण आकडेवारी : - कोरोनाबाधित : २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ - कोरोनामुक्त : २ कोटी ८० लाख ४३ हजार ४४६ - मृत्यू : ३ लाख ७० हजार ३८४ - सक्रिय रुग्ण : १० लाख २६ हजार १५९ देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/qlMsn0O02gb

भारतीय वंशाच्या पत्रकाराला पुलित्झर पुरस्कार *LetsUpp l International* ● भारतीय वंशाची महिला पत्रकार मेघा राजगोपालन यांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. ● मेघा यांनी आपल्या विशेष वृत्ताच्या माध्यमातून चीनच्या डिटेंशन कॅम्पचे सत्य जगासमोर मांडले होते. ● मेघा यांनी सॅटेलाइट छायाचित्रांचे विश्लेषण करत चीनकडून उइगुर मुस्लिमांचा होणारा छळ जगासमोर उघड केला. ● चीनमध्ये उइगुर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा दावा अमेरिका आणि इतर देशांकडून करण्यात येतो. तर, चीनकडून याबाबत फारसं भाष्य केले जात नाही. ● उइगुर मुस्लिमांना एका मोठ्या कॅम्पमध्ये कैद करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांचा छळ होत असून पुरेशा सुविधा नसल्याचा आरोप करण्यात येतो. ● त्या पार्श्वभूमीवर मेघा राजगोपालन यांचे वृत्त दखल घेण्याजोगे ठरले असल्याचे म्हटले जाते. ● बजफीड न्यूज या इंटरनेट मीडियाच्या दोन पत्रकारांनाही हा प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. ● भारतीय वंशाचे पत्रकार नील बेदी यांना स्थानिक वार्तांकनाच्या श्रेणीत हा पुरस्कार मिळाला. त्यांनी फ्लोरिडामध्ये सरकारी अधिकारी आणि लहान मुलांच्या तस्करीबाबत टंपा बे टाइम्ससाठी शोध पत्रकारिता केली होती. देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/bBAYZcVU2gb

लहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच LetsUpp l Positive News ● लहान मुलांनाही लवकरात लवकर कोरोना लस देण्याची धडपड सुरू आहे. लहान मुलांसाठी खास कोरोना लस तयार करण्यात आली आहे. नेझल स्प्रे स्वरूपात ही लस तयार करण्यात आली आहे. रशियामध्ये ही लस तयार केली असून ती सप्टेंबरमध्येच लाँच केली जाणार आहे. सध्या भारतात परवानगी मिळालेली रशियाची स्पुतनिक V लसच आहे. ● गॅमेलिया इन्स्टिट्यूचे प्रमुख अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितलं, आम्ही तयार केलेला नेझेल स्प्रे ही स्पुतनिक V लस आहे. ती फक्त इंजेक्शनऐवजी नोझलमार्फत दिली जाईल. 15 सप्टेंबरपासून ही लस उपलब्ध होईल. ● 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. या वयोगटातील मुलांवर या लशीची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसला नाही. त्यांच्या शरीराचं तापमानही वाढलं नाही, असं गिंट्सबर्ग यांनी सांगितलं. भारतात लहान मुलांना दिली जाणार का? ● भारतात सध्या लहान मुलांसाठी भारतातच तयार करण्यात आलेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लशीला मंजुरी मिळालेली आहे. याचं लहान मुलांवर ट्रायलची तयारी सुरू आहे. आठ आठवड्यात हे ट्रायल पूर्ण होणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. ● भारतात सध्या आपात्कालीन मंजुरी मिळालेल्या तीन लशींमध्ये रशियाच्या स्पुतनिक V लशीचाही समावेश आहे. त्यामुळे कदाचित या लशीचा वापर लहान मुलांवरही होऊ शकतो. आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर https://letsup.app.link/a1dp9E1W2gb

स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्व गणेश दामोदर सावरकर LetsUpp | Special आज 13 जून. भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू, अभिनव भारत सोसायटीचे संस्थापक वीर स्वातंत्र्यसेनानी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणूयात. गणेश सावरकर उर्फ बाबाराव यांचा जीवनप्रवास : ▪️ १३ जून १८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण भगूर गावात गेले. सावरकर लहानपणापासूनच हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, सततोद्योगी होते. ▪️ तसेच बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते पटाईत होते. घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकले पण योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ▪️ आईच्या अकाली निधनानंतर १८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी पत्‍नीचे नाव यशोदा ठेवले. बाबारावांना दोन मुले झाली पण दोघेही फार काळ राहू शकली नाही. बाबाराव भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. ▪️ तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र, नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. ▪️ गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी १ जानेवारी १९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते. ▪️ बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले. बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. ▪️ १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता. ▪️ या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. ▪️ या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे. २०-जुलै-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार - होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. ▪️ बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला. सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पाळतीवर होतीच. त्यातच बाबाराव मुंबईला गेले आणि क्षुल्लक वादात सापडले. ▪️ त्यावरून चौकशी करून बाबांना २८ फेब्रुवारी १९०९ रोजी मुंबईत अटक करण्यात आली. नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले. सखोल चौकशीअंती बाबांच्या घरी आक्षेपार्ह बर्‍याच गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर तत्कालीन दंडविधानाच्या कलम १२१ आणि १२४ अ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. ▪️ ८ जून इ.स. १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची - काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगावयाची होती. ही शिक्षा सुनावल्यावर थोड्याच काळात बाबारावांनी उच्च न्यायालयात फेर निर्णयासाठी याचिका दाखल केली. ▪️ पण यथावकाश त्याचाही निकाल बाबांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली. काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत. ▪️ दरम्यान, अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतांनाच १६ मार्च १९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/xO3yvFtV2gb

दहावीच्या निकालाची तारीख ठरली: मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार होणार LetsUpp | Trending ● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. ● परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. ● शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाने हा आराखडा तयार केला आहे. शाळांनी या आराखड्यामध्ये गुण कसे भरायचे आहेत, या संदर्भांत एक व्हिडिओ तयार केला आहे. To know more click here https://letsup.app.link/ujtLvFa22gb

प्रो-कॅल्सिटोनिन टेस्ट ● रुग्ण बुरशीजन्य आजाराला कशाप्रकारे प्रतिसाद देत आहे, हे पाहण्यासाठी ही रक्ताव्दारे केली जाणारी बायोमार्कर टेस्ट आहे. याची रेंज बुरशी संसर्गाच्या 3ते6 तासांनी वाढते, 12 ते 24 तासांत सर्वोच्च पातळीवर जाते आणि संसर्ग बरा झाल्यावर कमी होते. ● मात्र विषाणूजन्य आजारांमध्ये याची प्रो-कॅल्सिटोनिनची पातळी कमी होते. दुय्यम बुरशीजन्य संसर्गाची तपासणी आणि रोगाची प्रगती ठरवण्यासाठी पीसीटी मदत करते. ● स्टेरॉईडसमुळे किंवा बुरशीच्या संसर्गामुळे डब्ल्यूबीसीची (WBC) संख्या वाढली आहे की नाही हे देखील या टेस्टद्वारे समजू शकते. रुग्णाला अँटिबायोटिक औषधांची गरज आहे की नाही हे ठरवण्यासाठी पीसीटी एक महत्वाचे साधन आहे. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक गोष्टी तसेच महत्वपूर्ण माहिती आता मिळवा एका क्लिकवर! https://letsup.app.link/dSxDLATU2gb

कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यावेत? जाणून घेऊया सविस्तर ... LetsUpp | Covid Helpline ● एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यावर प्रत्येकाला त्याच्या लक्षणांनुसार आणि प्रमाणानुसार वेगवेगळे उपचार दिले जातात. कोणत्या कोरोना रुग्णाला कोणते उपचार द्यायचे, यासाठी काही टेस्ट केल्या जातात. ● सीबीसी, सीआरपी, डी-डायमर, एलडीएच, आयएल 6, एलएफटी , आरएफटी आणि ब्लड शुगर लेव्हल सारख्या लॅबोरेटरी रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, या चाचण्यांच्या अनुषंगाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, जाणून घेऊया सविस्तर काही प्रश्नांची उत्तरं. ● सीबीसी/सीबीपी म्हणजे संपूर्ण रक्ताची स्थिती दाखवणारी आकडेवारी. यात रक्तपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्ल्यूबीसी) आणि प्लेटलेटस (थ्रोम्ब्रोसाईटस) यांची पातळी तसंच परिणात्मक आणि आकारात्मक झालेला बदल दिसून येतो. ● संसर्गामुळे रक्तपेशींमध्ये संख्यात्मक (प्रमाण) आणि मॉर्फोलॉजिकल (आकार) बदल होतात. ज्यामुळे डॉक्टरांना उपचार व्यवस्थापनाची पुढील दिशा ठरवण्यात मदत होते. सीआरपी ● सी रिअॅक्टिव प्रोटीन यकृतात वेगात संश्लेषित होऊन संसर्गाला प्रतिक्रिया देते. दाह आणि संसर्गाची प्रतिक्रिया म्हणून रक्तातील सीआरपीची पातळी वाढलेली दिसते. मधुमेह आणि रक्तदाबासारख्या तीव्र आजारात याची पातळी सौम्यपणे वाढते. संधिवात आणि संसर्गजन्य संधिवातात ती मध्यम प्रमाणात तर विषाणूजन्य किंवा बुरशीजन्य आजारांमध्ये ही पातळी उच्च प्रमाणात वाढलेली असते. डी-डायमर ● गंभीर आजार आणि संसर्गामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. याला प्रतिसाद म्हणून, रक्ताच्या गुठळ्या ब्रेक होतात. परंतु, या विरघळलेल्या गुठळ्यांमधील निकृष्ट दर्जाचे पदार्थ लहान रक्त वाहिन्यांमध्ये साठतात आणि यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. ● डी-डायमर हे या गुठळ्यातील निकृष्ट गुठळ्यांचे (फायब्रिन) उत्पादन होय. डी-डायमरची पातळी वाढलेली असणं हे रक्तांच्या गुठळ्या अधिक प्रमाणात असल्याचे सूचित करतं. अशावेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी रक्त पातळ करण्याची औषधे सुरू करण्याची गरज असते. एलडीएच ● लॅक्टेड डिहायड्रेजनेस हे एन्झामाईन शरीरातील सर्व पेशींमध्ये असतं. काही रोग किंवा संसर्गामुळे पेशींचे नुकसान झालं असल्यास याची रक्तातील पातळी वाढते. अनेकदा अधिक हालचाली किंवा जोरदार व्यायाम केल्याने याची पातळी वाढलेली दिसते. ● अवयवांशी संबंधित विविध प्रकारचे एलडीएच त्या विशिष्ट अवयवाच्या नुकसानी संबंधी माहिती देऊ शकतात.याचा तपासणीचा उपयोग एखादया अवयवची स्थिती बघून निदान आणि उपचारांसाठी होतो. आयएल 6 ● शरीराच्या प्रतिकारशक्तीमुळे इंटरल्युकीन -6 हा पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ यकृतात सीआरपी आणि फायब्रिनसारख्या घटकांचं उत्पादन वाढवून संसर्गास विरोध करतो. आयएल6 ची रक्तातील वाढलेली पातळी सातत्याने होणाऱ्या संसर्गाची प्रतिक्रिया म्हणून दाह स्वरुपात दर्शवते. ● संधिवातासारख्या अनेक दाहक आजारांमध्ये त्याची पातळी वाढल्याचे दिसते. याची पातळी वाढली असता यजमान पेशींच्या संरक्षणासाठी अँण्टी इन्फ्लेमेट्री औषधे किंवा स्टेरॉईडस सुरू करणं गरजेचं असतं. एलएफटी ● लिव्हर फंक्शन टेस्ट ही रक्ताद्वारे केली जाणारी आणि लिव्हरचे कार्य सामान्यपणे सुरू आहे की नाही हे तपासण्याची एक सामान्य चाचणी असते. लिव्हरचं सामान्य कार्य म्हणजे अलब्युमिनसारखी प्रथिनं तयार करणं आणि बिलीरुबिनसारखे रक्तातील टाकाऊ घटक बाहेर फेकणं. ● रक्तातील प्रोटीनची कमी पातळी आणि एन्झामाईमची उच्च पातळी लिव्हरचे कार्य बिघडल्याचे दर्शवते. एलएफटी ही असामान्य येणे म्हणजे नेहमीच लिव्हर डिसीज असल्याचे दर्शवत नसते तर ते संसर्ग आणि औषधांमुळे देखील असामान्य होऊ शकते. आरएफटी ● मूत्रमार्ग शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकत किडनी रक्त शुध्द करीत असते. किडनी फंक्शन टेस्टमध्ये किडनीव्दारे फिल्टर केलेल्या अलब्युमिन, युरिया आणि क्रिएटिनिन सारख्या घटकांचे मूल्य दर्शवते. ● असामान्य आकडेवारी किडनीच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे दर्शवते. मात्र किडनी फंक्शन टेस्टचा रिपोर्ट असामान्य येणे म्हणजे किडनी विकारच आहे असे समजू नये, कारण रिपोर्ट असमान्य येण्यास अन्य आजार किंवा औषधे देखील कारणीभूत असतात. युरीन रुटीन मायक्रोस्कोपी किंवा युरिन अॅनालिसिस ● या चाचणीत युरीनची मायक्रोस्कोपखाली तपासणी केली जाते. यात युरीनचे स्वरुप, केंद्रीकरण आणि सामुग्री तपासली जाते. मुत्रमार्गातील संसर्ग, मुतखडा आणि मधुमेहासंबंधी विकारांवर उपचारांकरिता ही चाचणी उपयुक्त ठरते. ब्लड शुगर टेस्ट ● ही तपासणी प्रामुख्याने रक्तातील ब्लड शुगर लेव्हल बघण्यासाठी केली जाते. मधुमेही रुग्णांवरील उपचारांसाठी ही सर्वात महत्वाची तपासणी असते. तणाव, संसर्ग किंवा स्टेरॉईड सारख्या औषधांमुळे ब्लड शुगर लेव्हल विस्कळीत होऊ शकते.

मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो, उद्योगांसाठी वापरणार पाणी LetsUpp | | Trending ● गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधी भरून वाहिला पवई तलाव १८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते ● बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज दिनांक १२ जून २०२१ रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. हाच तलाव गेल्या वर्षी दिनांक ०५.०७.२०२० रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. ● ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे २४ दिवस आधी भरून वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे : १. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. २. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. ३. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. ४. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. ५. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. ६. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते. To know more click here https://letsup.app.link/pVBydEg21gb

१०० दिवसांच्या आत तयार होणार कोणत्याही साथीवरील लस? LetsUpp | Positive News ● जगभर कोरोनाने थैमान घातलेले असताना ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या जी-७ देशांच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. ● यामध्ये भविष्यातील कोरोना सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी जी-७ देशांकडून जगासमोर ॲक्शन प्लॅन मांडला जाण्याची शक्यता आहे. ● या घोषणेचे प्रमुख उद्देश भविष्यात अशी कुठली साथ आल्यास त्या साथीवरील लस विकसित करण्यासाठीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा कमी करणे हा असल्याचे सांगण्यात येत आहे. ● कारण कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यानंतर जगाला या आजारावरील पहिली लस मिळवण्यासाठी सुमारे १० महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागली होती. ● मिळालेल्या माहितीनुसार जी-७ देश एक विशेष अधिवेशनानंतर कार्बिस बे डिक्लरेशन जारी करण्यात येणार आहे. आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर https://letsup.app.link/c58qijXN1gb